गोल्डन फ्राइड प्रॉन्स

सुजित फाळके's picture
सुजित फाळके in पाककृती
2 Jan 2012 - 10:43 am

माझी मिसळ-पाव वरील पहिली पाककृती माझी प्रिय बायको दीप्ती हिच्यासाठी...

साहित्य:
१. टाइगर प्रॉन्स
२. बेसन
३. मैदा
४. तिखट व मीठ (चवीनुसार)
५. कोथिंबीर
६. लिंबू

पाकृ:
१. एका भांड्यात ३/४ बेसन व १/४ मैदाचे मिश्रण एकत्र करून घ्यावे.
२. ह्या मिश्रण मध्ये पाणी, मीठ व तिखट टाकून थोडे घट्ट मिश्रण तयार करावे.
३. ह्या मिश्रण मध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर व लिंबू पिळून एकत्र करून घ्यावे.
४. त्यात प्रॉन्स टाकून थोड्या वेळ फ्रिड्ज मध्ये ठेवावे.

५. नंतर एका कढईत तेल घेऊन गरम करायला ठेवावे.
६. प्रॉन्स गरम तेलात गोल्डन रंग येई पर्यंत तळून घ्यावे.

७. गरम गरम गोल्डन फ्राइड प्रॉन्स सेझवान सॉस बरोबर सर्व करावेत.

प्रतिक्रिया

पियुशा's picture

2 Jan 2012 - 10:46 am | पियुशा

अरे व्वा ! झक्कास जमली आहे पहिलीच पाक्रु.
येउ द्यात अजुन :)

अमृत's picture

2 Jan 2012 - 11:13 am | अमृत

आणि चविष्ट (बनवल्यावर कळेलच) पाकृ...

अमृत

जाई.'s picture

2 Jan 2012 - 11:15 am | जाई.

मस्त

कॉमन मॅन's picture

2 Jan 2012 - 12:43 pm | कॉमन मॅन

अप्रतिम..

Mrunalini's picture

2 Jan 2012 - 12:45 pm | Mrunalini

मस्त पाकृ... तोंपासु :)

परिकथेतील राजकुमार's picture

2 Jan 2012 - 12:52 pm | परिकथेतील राजकुमार

पैसा's picture

2 Jan 2012 - 2:24 pm | पैसा

मिपावर स्वागत!

बेसन असल्यामुळे याना कोलंबीची भजी म्हणावे काय?
(तुम्ही किंवा तुमची दीप्ती आयतीमधे आहात का?)

सुजित फाळके's picture

2 Jan 2012 - 11:31 pm | सुजित फाळके

होय कोलांबीची भजी म्हणायास हरकत नाही. मी प्रथम ही डिश गोवा मध्ये खाल्ली होती. त्यांनी ठेवलेले नाव मी कंटिन्यू केले आहे. (आणि होय मी आय.ती. मध्ये आहे.)

कपिलमुनी's picture

3 Jan 2012 - 6:48 am | कपिलमुनी

ते 'आय ती' च कसा कळल??;)

पैसा's picture

3 Jan 2012 - 12:53 pm | पैसा

आयटी वाले किंवा आयटी वाल्या बायकांचे नवरे एवढ्या नीटनेटक्या पाकृ देतात!

निश's picture

2 Jan 2012 - 2:37 pm | निश

मस्त पाकृ

प्रभाकर पेठकर's picture

2 Jan 2012 - 2:39 pm | प्रभाकर पेठकर

पहिली पाककृती माझी प्रिय बायको दीप्ती हिच्यासाठी...

मग, आम्ही काय करावे अशी इच्छा आहे. पाककृती बायकोसाठी असल्या कारणाने वाचलीही नाही. दुसर्‍यांची प्रेमपत्रे वाचू नयेत, असे म्हणतात.

मिपावर स्वागत.
साधारण किती वेळ तळाव्यात?

सुजित फाळके's picture

2 Jan 2012 - 11:35 pm | सुजित फाळके

२-३ मिनिटे मध्यम आचेवर रंग गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळव्यात.

शाबास.. मस्त... जिंकलंस मित्रा..

पण शेवटच्या फोटोत तेलकट वाटतात.. तसेच असतात का ??

सुजित फाळके's picture

2 Jan 2012 - 11:40 pm | सुजित फाळके

बेसन भरपूर तेल शोषून घेते. कढई मधून काढल्यावर मी नेहेमी पेपर टॉवेल काढून तेल टॉवेल वर शोषून घेतो. फोटो काढन्याआधी मी हे केले नव्हते.

सानिकास्वप्निल's picture

2 Jan 2012 - 4:32 pm | सानिकास्वप्निल

पाकृ एकदम झकास आहे :)

तुषार काळभोर's picture

2 Jan 2012 - 4:54 pm | तुषार काळभोर

कुठायत??

सुजित फाळके's picture

2 Jan 2012 - 11:47 pm | सुजित फाळके

पहिली पोस्ट असल्यामुळे फोटू चा काहीतरी प्रॉब्लेम झला आहे. काही लोकांना दिसत आहे आणि काही लोकांना दिसत नाहीए. मी ठीक करण्याचा प्रयत्न करत आहे.

कपिलमुनी's picture

2 Jan 2012 - 10:51 pm | कपिलमुनी

मस्त आहे ..पण बेसन आणि मैदा घालून तळले तर आतमधील कोळंबी शिजते का ?
किती वेळ तळावी ??

सुजित फाळके's picture

2 Jan 2012 - 11:42 pm | सुजित फाळके

आतली कोलंबी छान शिजते. २-३ मिनिटे मध्यम आचेवर रंग गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळव्यात.

सुहास झेले's picture

3 Jan 2012 - 1:59 pm | सुहास झेले

लैच भारी..... पाककृती आवडली.

मिपावर स्वागत :)

छान!
माझा फ्रेफरंस बीअर बॅटर!

आनंदी गोपाळ's picture

7 Jan 2012 - 9:27 pm | आनंदी गोपाळ

शेझवान सॉस घरी केला आहे का?
लसणाचे तुकडे 'दिसत' नाहियेत त्यात, म्हणून विचारलं.