मिपावर कसे टंकावे हे सांगितलात तर मांसाहारी पदार्थांच्या आणि गोड-धोडच्या पाककृती टाकेल अशी लालूच दाखवली होती.तुम्ही सर्वांनी मला खूप मदत केलीत त्याबद्दल धन्यवाद! तसेच नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा.नवीन वर्षात खूप ख,खायला घाला आणि मिपावर भरपूर लेखन करा.
काल घरच्या घरी जी पार्टी होती त्यात मी केलेलं हे चिकन.
साहित्य:
१. गरम मसाला:
४-५ लवंग,दालचिनी,काळी मिरी,मसाल्याची विलायची, १ चमचा खसखस,१ तमालपत्र ,१ चमचा जिरे व धने.
वरील सर्व साहित्य व्यवस्थित भाजून मिक्सरवर बारीक करून घ्यावे.
२.वाटन:
५-६ मिरच्या,७-८ लसणाच्या पाकळ्या,१ कांदा उभा चिरलेला,१ टोमाटो,१/२ इंच आले,१/२ वाटी ओलं खोबर,१०-१२ कडीपत्त्याची पान,कोथिंबीर.
वरील सर्व साहित्य थोड्या तेलात गुलाबी किवा ब्राउन रंग येईपर्यंत परतावा.नंतर मिक्सरवर बारीक करावा.
३.इतर:
हळद, तिखट, मीठ,१ वाटी दही आणि १/२ किलो चिकन
पाककृती:
१.वाटलेल्या मसाल्यात,गरम मसाला, दही,हळद,तिखट, थोडेसे मीठ एकत्र करून घ्यावे.
२. चिकन साफ करून घ्यावे .त्यामध्ये वरचा मसाला नीट चोळून अर्धा तास मुरत ठेवावे.
३. अर्धा तासानंतर त्यातील मोठे व मध्यम आकाराचे तुकडे बाजूला काढावेत आणि बारीक तुकडे बाजूला काढावेत.
४.रस्शासाठी: एका कढाईत तेल गरम करून, त्यात वाटणाचा उरलेला अर्धा मसाला टाकावा.नीट परतून चवीनुसार तिखट टाकावे .चिकनचे मोठे व मध्यम आकाराचे तुकडे त्यात हवे त्या प्रमाणात पाणी टाकावे.नीट शिजवून घ्यावे.
५ : सुक्यासाठी : एक कांदा बारीक चिरून गुलाबी परतून घ्यावा,त्यात उरलेला वाटण टाकावे. थोडे तिखट आणि मीठ टाकून त्यात अगदी थोडे पाणी टाकावे. नंतर त्यात चिकनचे बारीक तुकडे टाकून शिजण्यास ठेवावे.
प्रतिक्रिया
1 Jan 2012 - 3:04 pm | अत्रुप्त आत्मा
आपण येथे दिलेली ही पहिलीच रेसीपी आहेसे वाटते... आंम्ही घास/फूसी असलो तरी, पहिला प्रयत्न छान जमलाय म्हणुन अभिनंदन... :-)
अवांतर- किचेन< :-) > चिकेन - कर्ता आणी कर्म यात शब्दसमानत्व अढळले...तर त्यास काव्यमययोग मानावे काय? की खाव्यमययोग मानावे? ;-)
कृ.ह.घे. :-)
1 Jan 2012 - 3:29 pm | पियुशा
पुढिल पाक्रु, शुभेच्छा :)
2 Jan 2012 - 11:50 am | ५० फक्त
तुम्हाला पुढच्याचीच घाई, आधी जे केलंय ते करुन बघा मग कसं झालंय ते सांगा, मग पुढच्याचं बघु की निवांत...
1 Jan 2012 - 4:14 pm | पक पक पक
छाळ्न ,सुंद्ळ्र ,लय भारीळ पाक्ळ्क्रुती ,तोंडाळा पाणि सुट्लेळ आहे......
1 Jan 2012 - 4:59 pm | पैसा
तुम्हाला आता मराठी टंकन जमलंय याची खात्री पटली. अशाच आणखी पाकृ येऊ द्या. शाकाहारी असल्याने पाकृ कशी आहे यावर मत देत नाही. फोटो चांगले दिसतायत. ते अपलोड करायचं मात्र बघून घ्या..
1 Jan 2012 - 6:24 pm | Mrunalini
वा वा... पहिलाच प्रयत्न चांगला झाला.. ;) तोंपासु.. :)
1 Jan 2012 - 7:21 pm | नीलकांत
काल आम्ही चिकन बनवून नवीन वर्षाचे स्वागत केले. वर चिकन बनवताना मस्त बनवलेला मसाला वापरल्याचे दिसतेय. याचा अर्थ चिकन स्वादिष्ट झाले असेल. :)
बाकी एक विचारायचे होते की चिकन किंवा मटन दह्यात किंवा या पाकृ मध्ये सांगीतल्याप्रमाणे ओल्या मसाल्यात मुरवून ठेवल्यामुळे नेमके काय होते? ( चव बदलते हे ठिकच पण चिकन मुरतं असं काही आहे का?)
- (शिकाऊ) नीलकांत
3 Jan 2012 - 8:16 pm | विश्वनाथ मेहेंदळे
होय चिकन मुरते. म्हणून वेळ कमी असेल तर चिकनच्या मोठ्या तुकड्यांना सुरीने चिरा पाडून घ्याव्यात. मग मसाला आतवर पोहोचतो व चवीत खूप फरक पडतो.
चिकन ची पाकृ बिघडवणे हे कौशल्याचे काम आहे असे माझे मत आहे. त्यातील एक कौशल्य कमी marination करणे असू शकते ;-)
3 Jan 2012 - 10:20 pm | अन्या दातार
>>चिकन ची पाकृ बिघडवणे हे कौशल्याचे काम आहे असे माझे मत आहे. त्यातील एक कौशल्य कमी marination करणे असू शकते
असे जर असेल तर विमे, तुम्ही आमच्या मेसमधले चिकन एकदा खाऊन बघाच. पुन्हा कधी मेसच्या चिकनच्या वाटेला जाणार नाही तुम्ही :(
(मेसचे चिकन टाळणारा) अन्या
4 Jan 2012 - 12:00 am | विश्वनाथ मेहेंदळे
अन्या भाऊ, मी कौशल्याचे काम आहे असे म्हटले आहे. अशक्य आहे असे नाही म्हटले.
असेल की तुमच्या मेसवालीचे नाव कौशल्या ;-)
(वाईट पी जे मारणारा) विमे
4 Jan 2012 - 11:13 pm | किचेन
मेरीनेशन हि एक कोल्ड कुकिंग पद्धत आहे. मेरीनेशन करण्यासाठी जे दही किवा इतर पदार्थ वापरले जातात त्यामुळे चिकन ,मटन, मासे यातलं फायबर मऊ पडत आणि मासालेल्यांचा स्वाद हा पूर्ण मांस मध्ये मुरायला मदत होते.यामुळे चिकन लवकर शिजते, जास्त मऊ लागते आणि सर्वात महत्वाचे चविष्ठसुद्धा(आल बाबा टंकता) लागते.
जर तुम्हाला याच उदाहरण बघायचं असेल तर माशाच्या तुकड्याला दही किवा लिंबाचा रस लावून ठेवा. काही वेळाने ते पांढर पडेल आणि अस वाटेल कि हा पीस शिजवलेला आहे.
- शेफ चेतन यांच्या सौजन्याने (आमचे हे) :)
5 Jan 2012 - 3:51 pm | विश्वनाथ मेहेंदळे
अच्छा अच्छा !! असे आहे होय.
ती वरची पाककृती कुणी केली म्हणायची ? तुम्ही की शेफ चेतन ने ?
बाकी तपशीलवार माहितीबद्दल धन्यवाद !!!
5 Jan 2012 - 6:55 pm | किचेन
मी केलीये.
5 Jan 2012 - 7:06 pm | प्रास
तुमचे 'हे' जर 'चे'तन आहेत तर 'कि'=? आणि 'न'=?
5 Jan 2012 - 9:46 pm | किचेन
अवांतरः
(मी 'की'र्ति अनि तो 'चे'त'न')
5 Jan 2012 - 9:52 pm | गणपा
प्रेषक किचेन गुरुवार, 05/01/2012 - 21:46.
अवांतरः
(मी 'की'र्ति अनि तो 'चे'त'न')
नक्की ठरवा पाहु काय ते?
5 Jan 2012 - 10:12 pm | किचेन
मिपावाले एका ओळीत शुद्ध लेखनाच्या हजार चुका काढतील!
अरे मिपावर टाईप करताना मी कितीतरी इंग्रजी शब्दांचे स्पेलिंग विसरलीये.
5 Jan 2012 - 10:46 pm | विश्वनाथ मेहेंदळे
हर हर !!!! काय पाळी आली मिपावर. हे म्हणजे अगदीच "कोण होतास तू, काय झालास तू" असे झाले.
अवांतर :- किचेन ताईंना उपक्रमाचा पत्ता देऊन बघितला पाहिजे
1 Jan 2012 - 7:30 pm | चिंतामणी
इतके भन्नाट दिसत आहे की तोंडाला पाणी सुटले.
पण कृतीचा मागोवा घेताना लक्षात आले की लिखाणात थोडी अजून सफाई हवी आहे. पुढील वाक्ये वाचल्यावर गोंधळायला होते.
१.वाटलेल्या मसाल्यात,गरम मसाला, दही,हळद,तिखट, थोडेसे मीठ एकत्र करून घ्यावे.
२. चिकन साफ करून घ्यावे .त्यामध्ये वरचा मसाला नीट चोळून अर्धा तास मुरत ठेवावे.
४.रस्शासाठी: एका कढाईत तेल गरम करून, त्यात वाटणाचा उरलेला अर्धा मसाला टाकावा.नीट परतून चवीनुसार तिखट टाकावे .चिकनचे मोठे व मध्यम आकाराचे तुकडे त्यात हवे त्या प्रमाणात पाणी टाकावे.नीट शिजवून घ्यावे.
५ : सुक्यासाठी : एक कांदा बारीक चिरून गुलाबी परतून घ्यावा,त्यात उरलेला वाटण टाकावे.
जरा वाटणाचे भाग किती व कसे करायचे, त्याचे प्रमाण वगैरे गोष्टी विस्ताराने सांगा म्हणजे पाकृ करताना गोंधळ व्ह्यायचा नाही.
1 Jan 2012 - 10:10 pm | किचेन
पुधच्या भागात चुका सुधारेल.
या वेळेस चुका आणि चिकन पोटात घ्या.
1 Jan 2012 - 10:57 pm | अत्रुप्त आत्मा
@या वेळेस चुका आणि चिकन पोटात घ्या. :-D
2 Jan 2012 - 10:48 am | खादाड
:)
1 Jan 2012 - 7:41 pm | स्वाती२
छान फोटो!
2 Jan 2012 - 7:32 am | कौशी
फोटो तर मस्तच आलेत. आवडली पाकक्रूती..
2 Jan 2012 - 12:36 pm | कॉमन मॅन
फारच छान..
2 Jan 2012 - 2:25 pm | निश
मस्त पाकॄ आहे.
2 Jan 2012 - 3:15 pm | गणपा
रस्सा मस्त झणझणीत दिसतोय. :)
2 Jan 2012 - 4:30 pm | सानिकास्वप्निल
पहिलाच प्रयत्न छान झालायं :)
चिकन एकदम मस्तचं दिसत आहे
पुढच्या पाकृसाठी शुभेच्छा :)
2 Jan 2012 - 7:36 pm | देविदस्खोत
आपल्या या पहिल्याच प्रयत्नांस, तसेच यापुढीलही " रुचकर व चमचमीत " लिखाणांस
मनांपासून शुभेच्छा.... !!!!!
******** G O A H E D ************
4 Jan 2012 - 1:49 am | दीपा माने
पहिलीच पाक्रु मस्तच दिसत आहे. अश्याच चविष्ट पाक्रु देत रहा. परंतु पाक्रु प्रकाशित करण्यापुर्वी एकदा डोळ्याखालून घाला अशी नम्र विनंति. नविन वर्षाच्या अनेक शुभेच्छा.