संसदेतला गोंधळ

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
30 Dec 2011 - 9:41 am
गाभा: 

कालची रात्र संसदेतला गोंधळ बघण्यात गेला.
बिल टर्कावुन कागद संसदेत उधळले गेले.
अंण्णा खरे ठरले.
व लोकशाहिचा रात्री १२ वाजता खुन झाला अश्या तिखट प्रतिक्रिया विचारवंत व राजकिय नेते यांच्या कडुन ऐकण्यात आल्या....
शेवटी लोकपाल विधेयक राज्यसभेत लटकले. 187 दुरुस्ती प्रस्ताव. विरोधकांचा ठाम पवित्रा. सहकारी पक्षांचा विरोध. सभागृहातील अल्पमत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस. अभूतपूर्व परिस्थितीत अधिवेशनाचे सूप वाजले. लोकपाल विधेयकावर मतदान होऊ शकले नाही.

लोकसभेत पारित झालेल्या लोकपाल विधेयकावर गुरुवारी राज्यसभेत सुमारे 13 तास चर्चा चालली. सभागृहात बहुमत नसल्याने आणि सहका-यांच्या आक्षेपांमध्येच सरकारने क्लायमॅक्समध्ये विधेयकासाठी वेळ मागितला. त्यावर भाजप, डाव्या पक्षांसह सगळ्या विरोधकांनी गदारोळ केला. अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही बाजूंकडून एकमेकांना हिणवण्याचा प्रयत्न होत आहे. अशात घरी जाण्याखेरीज दुसरा कोणताही पर्याय नाही, असे सभापती हमीद अन्सारी म्हणाले आणि त्यांनी कामकाज स्थगित करून टाकले.

आता हे बिल येणार का?
हा तमाशा करायचे आधिच ठरले होते..चॅनल्स ना हि बातमी लिक झाली..
व ते दुर्दैवाने खरे ठरले.
आता एक मेकावर दोषारोपण चालु होणार..
विचार वंत लेखण्या पारजणार..
आणी असाह्य जनता मात्र निमुट पणे बघत रहाणार....

प्रतिक्रिया

सोत्रि's picture

30 Dec 2011 - 10:22 am | सोत्रि

लोकपालचे सरकार आणि विरोधी पक्षांमधे 'मॅच फिक्सींग' होते असे मला वाटते. कुठल्याही राजकिय पक्षाला 'सक्षम लोकपाल' नकोय. लोकापालच्या बाबतीत सरकार आणि विरोधी पक्ष ह्यांचा एकमेकांबरोबर 'मी मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखे कर' असा फार्स चालू आहे. ह्यात मुर्ख आपणच (जनता,जिच्यासाठी ही लोकशाही राबवली जातेया) आहोत.

>> अंण्णा खरे ठरले.

ते खरे होतेच आणि रहातील. त्यांनी आता आंदोलनाची दिशा आणि मार्ग ह्यावर पुनर्विचार करून पुन्हा जोरदार रीस्टार्ट करावी.

- (स्वयंघोषित 'जनलोकपाल') सोकाजी त्रिलोकेकर

पक पक पक's picture

30 Dec 2011 - 3:20 pm | पक पक पक

एकदम सहमत आहे....

सुनील's picture

30 Dec 2011 - 11:44 pm | सुनील

त्यांनी आता आंदोलनाची दिशा आणि मार्ग ह्यावर पुनर्विचार करून पुन्हा जोरदार रीस्टार्ट करावी

त्यांनी आता आंदोलनाची दिशा आणि मार्ग आणि सहकारी ह्यावर पुनर्विचार करून पुन्हा जोरदार रीस्टार्ट करावी. हे अधिक योग्य वाटते.

लोकपालचे सरकार आणि विरोधी पक्षांमधे 'मॅच फिक्सींग' होते असे मला वाटते.

हा तमाशा करायचे आधिच ठरले होते..

सरकार आणि विरोधी पक्षांनी मिडियाला हाताशी धरुन हे सगळे घडवून आणले.
जोडीला त्यात काही मिपाकरांचाही हात होता असा आमचा छुपा वार्ताहर कळवतो. :)

भाजपाने आज खालील वाक्य म्हणलेले पाहीले. अतिशय चपखल असलेल्या वाक्यात कुठल्याही पक्षाचे नाव नसल्याने, मी सर्वपक्षीय समजत आहे. ;)

At the stroke of the midnight hour when the world slept, India awoke to a great fraud being played on its parliamentary democracy.

नितिन थत्ते's picture

31 Dec 2011 - 12:46 pm | नितिन थत्ते

चटपटीत आणि टाळीबाज बोलण्यात भाजप नेहमीच पुढे असतो.

:(

अण्णांनी (वा इतर कोणिही) कितीही चांगल्याप्रकारे आंदोलन केले तरी त्याची हीच शोकांतीका असेल. मूळ कारण तेच... वी डिसर्व्ह इट...

(भारतीय) अर्धवटराव

विजुभाऊ's picture

30 Dec 2011 - 10:58 pm | विजुभाऊ

भाजपला खरेतर काल एक उत्तम संधी होती. पण त्यानी ती अप्पलपोटेपणा करीत वाया घालवली.
लोकपाल विधेयक आले असते त्यात नंतर सुधारणा झाल्या असत्या.
भाजप ने मात्र स्वतःचे खायचे दात दाखवले.

विकास's picture

30 Dec 2011 - 11:05 pm | विकास

आणि काँग्रेसने काय केले असे म्हणायचे आहे?

मला वाटते ह्यात एकाच पक्षाचा काही संबंध नाही... बाकी तुम्हाला जे भाजपाने अप्पलपोटेपणाने वाया घालवले असे वाटते, तीच कदाचीत त्यांनी वापरलेली (त्यांच्या दृष्टीकोनातून) संधी असावी.

आपले दुर्दैव असे आहे की, उठबस भ्रष्टाचारामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष त्रासलेले आपण सर्वच, लोकपालासारख्या महत्वाच्या विषयावर चर्चा करताना पक्ष कुठला बघून करत आहोत. असे का होते यावर चर्चा करायला आवडेल.

अर्धवटराव's picture

31 Dec 2011 - 1:21 am | अर्धवटराव

आपण कधीच एक नागरीक म्हणुन विचार करत नाहि... राजकीय पक्षाचा चश्मा झोपताना देखील उतरुन ठेवत नाहि.... मग निव्वळ नागरीकाचे स्वप्न तरी कसे पडणार...

अर्धवटराव

नितिन थत्ते's picture

31 Dec 2011 - 1:11 pm | नितिन थत्ते

भाजपने संधी घालवली की नाही ठाऊक नाही.

परंतु माझे निरीक्षण पुढीलप्रमाणे आहे.

१. राज्यसभेत काँग्रेसचे (सहयोगी पक्ष धरूनही) बहुमत नव्हते. (वाजपेयींच्या काळातले लोकपाल विधेयक असेच राज्यसभेत नसलेल्या बहुमतामुळे बारगळले असे सांगितले गेले). त्यामुळे विधेयक मंजूर होण्यासाठी इतर पक्षांचे सहकार्य गरजेचेच होते.

२. यूपीएतले पक्ष (विशेषतः तृणमूल काँग्रेस) ज्या मुद्द्यावर विरोध करू लागले तो मुद्दा असलेले 'कमजोर' लोकपाल विधेयक आणखी कमजोर करण्यासाठी होता (लोकपालाबरोबर निर्माण केला जात असलेला प्रत्येक राज्यातील) लोकायुक्त* रद्द करावा अशी मागणी केली जात होती. त्याच मतभेदाचा फायदा घेऊन भाजपने सरकारची नाचक्की करण्याची संधी साधली. यात चांगला लोकपाल आणण्याची कळकळ वगैरे काहीही नव्हते.

*सामान्य माणसाला ज्या भ्रष्टाचाराला सामोरे जावे लागते त्या बहुतांश गोष्टी उदा. आरटीओ, रेशन ऑफीस, जमीन व्यवहार, पोलीस या राज्य शासनाच्या अखत्यारीत येतात. त्यामुळे राज्यांमध्ये लोकपाल येणे अधिक गरजेचे आहे.

(सरकारने तृणमूलची मागनी मान्य केली असती आणि तृणमूलने सरकारची सोबत केली असती तरी भाजप आणि एनडीए विधेयकाच्या विरोधातच मतदान करणार होते. त्यामुळे तृणमूलचा मुद्दा स्वीकारूनही विधेयक मंजूर झालेच नसते. उलट सरकारने लोकायुक्त रद्द करण्याची मागणी फेटाळून लोकपाल कायदा आणखी कमजोर होऊ दिला नाही).

३. सरकारने समजा मतदान घेतले असते तरी सरकारचा पराभव होणार हे राज्यसभेत विधेयक मांडण्या आधीही माहिती होते. त्यामुळे राज्यसभेत मतदान झाले नाही म्हणून कोणतीही गोष्ट झाकली राहिली नाही. उलट विरोधी पक्षांना कमजोर किंवा सबळ असा कोणताच लोकपाल नको आहे ही गोष्ट अधिक स्पष्ट झाली.

पुण्याचे वटवाघूळ's picture

31 Dec 2011 - 3:25 pm | पुण्याचे वटवाघूळ

थत्तेकाका,

तुम्ही ज्या हिरीरीने काँग्रेस पक्षाचे समर्थन करता ते बघून कुमार केतकरांनाही लाजिरवाणे वाटायला लागेल.

(रात्रीच्या वेळी झाडावर उलटे लटकणारे) पुण्याचे वटवाघूळ

विकास's picture

1 Jan 2012 - 4:20 am | विकास

*सामान्य माणसाला ज्या भ्रष्टाचाराला सामोरे जावे लागते त्या बहुतांश गोष्टी उदा. आरटीओ, रेशन ऑफीस, जमीन व्यवहार, पोलीस या राज्य शासनाच्या अखत्यारीत येतात. त्यामुळे राज्यांमध्ये लोकपाल येणे अधिक गरजेचे आहे.

मला वाटते विरोधाचे मूळ कारण राज्यात असा लोकपाल नेमण्याचे हक्क हे केंद्र सरकारने स्वतःकडे ठेवण्याकडे पक्षी: राज्यांवर राजकीय अंकूश ठेवण्यासाठी राज्यपालांपेक्षाही अधिक हक्क असलेला स्वतःचा कर्मचारी नेमण्याच्या प्रकाराला होते, जे या कायद्यामुळे सहजसाध्य झाले असते.

त्याच मतभेदाचा फायदा घेऊन भाजपने सरकारची नाचक्की करण्याची संधी साधली. यात चांगला लोकपाल आणण्याची कळकळ वगैरे काहीही नव्हते.

अर्धसत्य. भाजपाने राजकीय खेळी केली नाही तरी तुम्ही-आम्ही म्हणणारच की त्यांना राजकारण येत नाही. आता खेळली तरी बोंब. ;) पण मुद्दा तो अथवा भाजपा नाही. या विधेयकाप्रमाणे धर्माधारीत आरक्षण देखील लोकपाल आणि त्याच्या अधिकार कक्षातील कर्मचार्‍यांसाठी आवश्यक होते, जे भाजपाला मान्य नव्हते. (मी काही भाजपाचा अथवा कुठल्याच पक्षाचा नाही, तरी देखील) मला देखील ते मान्य नाही. तुम्हाला असे धर्माधारीत आरक्षण योग्य वाटते का?

अन्या दातार's picture

1 Jan 2012 - 5:51 am | अन्या दातार

पहिले प्रथम लोकपाल बिल नक्की कोणत्या अनुच्छेदाने आणावे याबाबत आधी सरकारमधील मंत्र्यांनी "ऑन रेकॉर्ड" उलट-सुलट विधाने केली. त्यांच्यातच एकवाक्यता नव्हती असे दिसून येते.

आणायचा तर एकदाच सक्षम लोकपाल आणावा असे सरकारला वाटले नाही असं वाटत नाही का? १८७ दुरुस्त्या ही काही साधीसुधी गोष्ट खचितच नाही. इतक्या दुरुस्त्या सुचवल्या गेल्या याचाच अर्थ सरकारने मांडलेले विधेयक पुरेसे सक्षम नव्हते असा का घेतला जाऊ नये?

लोकसभेत खुद्द सरकारचेच (कॉंग्रेस पक्षाचे) १९ सदस्य गैरहजर राहतात. जिथे एकेक मत महत्वाचे आहे तिथे सरकारपक्ष आपल्या सदस्यांना गैरहजर राहूच कसे देतो? याचाच अर्थ मतदान होण्याची शक्यता असूनही काँग्रेस पक्ष आपली मते टिकवून ठेवू शकत नाही असा घेणे चुकीचे खचितच नाही.

फक्त तृणमूल काँग्रेस व राष्ट्रीय कॉंग्रेस यांच्यातील मतभेदाचा फायदा विरोधी पक्षांनी उठवला असे म्हणणे हा एक बुद्धीभेद म्हणावा लागेल. कारण त्या एकाच सूचनेच्या आधारावर विरोध झाला नाही. आरक्षणाचा मुद्दा तर घटनेचे उल्लंघन करणारा ठरत असताना विरोधी पक्षांनी त्याकडे डोळेझाक केली नाही याकडे तुमचे नेमके लक्ष कसे काय गेले नाही? घटनात्मक गंभीर त्रुटी ठेवणे ही सरकारची चूक की विरोधी पक्षांची? आणि अशा त्रुटींकडे बोट दाखवणे हे विरोधी पक्षांचे काम नाही का?

अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ बघा जरा.

का विरोधी पक्षांनी फक्त होयबा-होयबा करणे अपेक्षित आहे? संवाद हा लोकशाहीचा आत्मा म्हणतात. हा संवादच सरकार तोडून टाकू पाहत होती असे मलातरी वाटले.

वरील गोष्टींवरुन काँग्रेसही काही लोकपालच्या बाजूने नाही असे म्हणण्यास पुरेसा वाव आहे. सगळेच खापर विरोधी पक्षावर फोडणे ही निव्वळ दिशाभूल ठरावी.