महाभारताच्या युद्धात १६ वर्षीय अर्जुनपुत्र अभिमन्यू याने कौरवांच्या चक्रव्यूहाचा भेद करण्याचा प्रयत्न केला. दुर्योधन, कर्ण, जयद्रथ इत्यादी कौरवांच्या महारथींना तोंड देत तरुण वयात एवढा मोठा पराक्रम केल्यामुळे भारताच्या इतिहासात अभिमन्यू अजरामर झाला. अधर्माच्या विरोधात धर्माने दिलेल्या या लढाईत धर्मासाठी अनेक रथी-महारथींनी पराक्रम केला. त्यांच्या पराक्रमामुळेच धर्माचा जय झाला.
कौरवांच्या ११ अक्षौहिणी सैन्याचा केवळ ७ अक्षौहिणी पांडव सेनेकडून पराभव झाला. याला ‘यतो धर्मस्ततो जयः ।’ हेच कारण होते. त्यामुळे ‘अधर्माच्या विरोधात संख्येने कितीही अल्प असलो, तरी धर्माच्या बाजूने असणार्यांचा नेहमीच जय होतो’, हे महाभारताने जगापुढे ठेवलेले धर्मसत्य आहे. आज येथे हे उदाहरण सांगण्याचे प्रयोजन इतकेच की, या भारतदेशात अधर्मियांचे राज्य आहे. या अधर्मियांच्या विरोधात लढण्याची शक्ती सामान्य नागरिकात नाही. कारण धर्मशक्तीचा अभाव. अशा धर्मसंकटाच्या वेळी ज्येष्ठ समाजसेवक श्री. अण्णा हजारे देशातील भ्रष्टाचाररूपी अधर्माचा नाश करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. देशासाठी सीमेवर लढणारे, गावातील अनेक गैरकृत्ये नष्ट करून एक आदर्श ग्राम निर्माण करणारे, सामान्य जनतेला माहितीचा अधिकार मिळवून देणारे आणि हे करण्यासाठी राळेगणसिद्धीच्या मंदिरात निःस्वार्थीपणे राहून स्वतःपेक्षा देशाच्या अन् जनतेच्या भल्यासाठीच्या विचारात मग्न असणारे अण्णा धर्माच्याच बाजूने आहेत, हे वेगळे सांगायला नको. अशा वेळी देशाला लुटणारे, देशातील पैसा परदेशी अधिकोषात नेऊन ठेवणारे, जनतेला महागाईच्या दरीत ढकलणारे, देशाच्या मुळावर येणार्या धर्मांध मुसलमानांना अन् खिस्त्यांना लाडावून ठेवणारे, बांगलादेशी घुसखोरांना अन् जिहादी आतंकवाद्यांना घरजावयासारखे पोसणारे राज्यकर्ते आणि अन्य राजकीय पक्ष अधर्मी आहेत, हेही वेगळे सांगयला नको. अशा बलाढ्य अन् संघटित अधर्मियांच्या विरोधात अण्णा त्यांच्या काही मोजक्या सहकार्यांसह युद्ध करत आहेत. या युद्धाच्या तिसर्या फेरीत मुंबईतील वांद्रे येथील रणांगणात पुन्हा एकदा अधर्मियांना अण्णांनी ललकारले आहे. अण्णांची लढाई लगेच संपण्यासारखी नाही. कारण ही लढाई सामान्य नाही, तर क्रांतीची आहे. अशा वेळी पूर्ण शक्तीनीशी अधर्मी राज्यकर्ते लढत आहेत. संख्याने अल्प असले, तरी अण्णा धर्माच्या बाजूने लढत असल्याने त्यांचा विजय आज ना उद्या होणार आहे, याची निश्चिती बाळगायलाच हवी !
अधर्मियांचा विरोध !
१६ ऑगस्टच्या रामलीला मैदानावरच्या आंदोलनाला देशातून मिळालेला अभूतपूर्व पाठिंबा पाहिल्यावर काँग्रेस सोडून बहुतेक राजकीय पक्षांनी अण्णांचा उदोउदो चालू केला. संसदेतही अण्णांचे लोकपाल स्वीकारण्यासाठी भूमिका मांडून ते स्थायी समितीकडे पाठवण्यात आले. त्यानंतरच्या गेल्या साडेचार महिन्यांच्या कालावधीत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यानंतर कालपासून अण्णांच्या चालू झालेल्या आंदोलनाला काँग्रेससह अनेक राजकीय पक्ष विरोधच करू लागले आहेत. कालपर्यंत अण्णाच्या लोकपालला पाठिंबा आहे, असे म्हणणारे आता अण्णांना विरोध करत आहेत. न्यायपालिकेनेही अण्णांवर कोरडे ओढले आहेत. अण्णांना सर्व बाजूंनी घेरण्याचा प्रयत्न होत आहे, तसेच अण्णांचे उपोषणस्थळ दिल्लीवरून मुंबईत आल्यानंतर आणि त्या स्थळाच्या निवडीवरून, भाड्यावरून झालेल्या गोंधळामुळे जनतेत एक प्रकारचा संभ्रम निर्माण करण्यात अधर्मी यशस्वी झाले आहेत. यामुळेच अण्णांच्या या आंदोलनातील जनतेची उत्स्फूर्तता काहीशी उणावल्याचे जाणवत आहे. तरीही एक लक्षाहून अधिक नागरिकांनी ‘कारागृह भरा’ आंदोलनासाठी नावनोंदणी केली आहे. ५० सहस्रांहून अधिक असणार्या इंग्रजांनी या देशावर राज्य केले. त्या तुलनेत अण्णांच्या पाठीशी असणार्या सत्यप्रेमी नागरिकांची ही संख्या खचितच अधिक आहे.
धर्माचाच जय !
संसदेत लोकपाल विधेयकावर चर्चा चालू झाली आहे. अण्णांनी सादर केलेल्या ‘सशक्त’ जनलोकपालातील अनेक कठोर नियम गुंडाळून ठेवत ‘अशक्त’ लोकपाल काँग्रेसी राज्यकर्त्यांनी संसदेत सादर केले आहे. त्याला भ्रष्ट राजकीय पक्ष आणि त्यांचे लोकप्रतिनिधी समर्थन देत आहेत. उद्या कदाचित हे विधेयक काँग्रेसी आणि त्यांचे भ्रष्ट सहकारी पक्ष आसुरी बहुमताच्या जोरावर संमतही करतील; मात्र यामुळे अण्णांची लढाई संपेल असे होणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे. अण्णांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलनाचे रोवलेले बीज आज ना उद्या उगवणार आणि त्याचे मोठ्या वटवृक्षात रूपांतर होईल, यात शंका नाही. अभिमन्यू धारातीर्थी पडला, तरी अखेर या युद्धात पांडवांचा विजय झाला. आज अण्णांच्या पाठीशी अल्प जरी नागरिक असले, संसदेत अण्णांच्या लोकपालला फेटाळण्यात आले, तरी अखेर जय अण्णांचाच आहे, हे अधर्मियांनी लक्षात ठेवावे.
हा लेख २८ डिसेंबर च्या दैनिक सनातन प्रभात मध्ये प्रसिद्ध झाला आहे. तो या मार्गिकेवर उपलब्ध आहे. या लेखासंधर्भात प्रकाशनाचे सर्व हक्क आहेत. हा लेख येथे चर्चेसाठी ठेवण्यात येत आहे .
प्रतिक्रिया
28 Dec 2011 - 1:37 pm | परिकथेतील राजकुमार
नका हो असले काही वाचत जौ.
नम्र विनंती आहे तुम्हाला... शर्ट पसरतो तुमच्यासमोर.
28 Dec 2011 - 1:40 pm | गवि
सनातन प्रभात. अरे देवा.
28 Dec 2011 - 3:51 pm | अत्रुप्त आत्मा
हा लेख सनातनचा आहे,हे सांगायची(ही) काही गरज नाही.इतकी ही स्टाइल आंम्हाला परिचयाची झालेली आहे...खरच धन्य त्या शोधकबुद्धीची..! बाकी सनातनवाल्यांची इति-हास आणी वर्तमानकाळाची जाण तर दररोज आणी दर पाच मिनिटानी,खरोखर साष्टांग नमस्कार घालण्याच्या लायकतेची आहे,यात आंम्हास बिलकुल शंका नाही...
28 Dec 2011 - 3:56 pm | एक तारा
पण मला राहवले नाही म्हणुन बोलतोय.
हे अधर्मी जे कोणी आहेत त्यात सामान्य नागरिक एकही नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला? मग हे भ्रष्टाचार करणारे कोण आहेत? सगळेच राजकरणी आहेत? सरकारी नोकरी करणारे पण लाच खाणारे सुद्धा सामान्य नागरिकच म्हणवले जातात जोपर्यंत ते पकडले जात नाहीत. नंतर ते असामान्य होतात तो भाग अलाहिदा.
माझ्या मते अश्या नागरीकांना जर सरळ वाटेवर आणले तरी भारतातला ८०% भ्रष्टाचार कमी होईल. आणि याच जनजाग्रुतीची सध्या गरज आहे. हे एकतर त्यांच्या भावनांना हात घालुन करता येईल किंवा गांधीगिरि करुन करता येईल.
सुरुवात आपल्यापासुन केली तर दुसर्यांना म्हणायचा अधीकार आपोआप मिळतो.
हे उघड आहे कि लोकांना आता उपोषणात इंटरेस्ट नाही राहीला. मग या वेगळ्या वाटेने जाऊन पाहायला काय हरकत आहे?
जर सगळीच सामान्य जनता भ्रष्टाचार मुक्त असेल तर त्यांचे पुढारी कसे भ्रष्टाचार करतील. हा भाबडा समज पण असु शकतो.
30 Dec 2011 - 8:50 pm | आनंदी गोपाळ
बाकी सनातन प्रभातचे कौतुक काय वर्णावे?
28 Dec 2011 - 4:24 pm | विनायक प्रभू
आरे परा किती शर्ट मळतील नाही का?
आणि वर मंदाकिनी रागवेल ते वेगळे.
असो.
ठाण्याला कधी येतोस ते सांंग.
इथे स्टेशनला ७० रु. मधे ब्र्यँडेड शर्ट मिळतात.
28 Dec 2011 - 4:40 pm | परिकथेतील राजकुमार
सगळ्यांना त्या मंदाकिनीचीच काळजी.
गुर्जी मी तुमच्यावरती रागावलेलो आहे. त्यामुळे आता ठाण्याला आलो तरी तुम्हाला कळवणार नाही :(
28 Dec 2011 - 4:46 pm | विनायक प्रभू
रागावु नकोस रे परा.
हे चक्रव्युहातले अभिमन्यु काढता काढता घसा फाटला.
डॉक्टरांनी गर्दीच्या ठिकाणी जाय्ला मनाई केली.
काय करु?
29 Dec 2011 - 10:49 am | कॉमन मॅन
पॉईंट टू बी नोटेड युअर ऑनर, हे अधर्मियांचे राज्य निवडून कुणी दिले हे स प्र ने सांगितल्यास बरे होईल..
बाकी सनातन प्रभात बद्दल अधिक काही भाष्य करण्याइतके आम्ही प्रगल्भ नाही. त्यामुळे नो कॉमेन्टस्
-- कॉमॅ.
3 Jan 2012 - 8:45 pm | अविनाशकुलकर्णी
हे अधर्मियांचे राज्य निवडून कुणी दिले..
मग काय ५ वर्षे तोंड दाबुन मार खायचा?