पाईनअ‍ॅपल केक

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
27 Dec 2011 - 8:02 pm

काल आमच्या लग्नाचा वाढदिवस होता त्यानिमित्ताने आमच्या दोघांचा सर्वात आवडता पाईनअ‍ॅपल केक बनवला त्याची पा़कृ :)

.

साहित्यः

३/४ वाटी मैदा
१/२ वाटी साखर
२ अंडी रुम टेम्परेचरला असलेली
१/४ कप दूध
१ टेस्पून बटर
१/२ टीस्पून बेकिंग पावडर
टीनमधले अननस (अननसाचे तुकडे किंवा चकत्या ज्या अननसाच्या ज्युसमधे असतील त्या घेणे, जर सिरप मधल्या घेतल्या तर मग अननसाचा एसेन्स वापरणे)
१/२ टीस्पून खाण्याचा सोडा
१ टीस्पून व्हॅनिला एसेन्स ( जर अननसाचा एसेन्स वापरणार असाल तर हा नका वापरु)
फ्रेश क्रीम
.

पाकृ:

प्रथम मैदा, बेकिंग पावडर व खाण्याचा सोडा ३ वेळा चाळून घेणे.

.

अंडी फोडून त्यातील पांढरे व पिवळा बलक वेगळा करणे.

.

ईल्केट्रीक बीटरने किंवा वायर व्हिस्कने अंड्याचे पांढरे घट्ट होईपर्यंत फेटावे. इतके घट्ट झाले पाहिजे की त्याचे भांडे उलटे केले तरी खाली पडणार नाही.

.

एका भांड्यात अंड्याचे पिवळे बलक फेटावे. त्यात थोडी-थोडी करुन साखर घालून फेटावे.

.

मायक्रोवेव्हमध्ये दूध व बटर घालून १० सेकंद गरम करावे. ते मिश्रण वरील अंड्याच्या मिश्रणात घालून फेटावे. त्यात थोडा-थोडा मैदा घालून हलक्या हाताने किंवा एकदम स्लो वर ईल्केट्रीक बीटरने फेटावे. त्यात आता व्हॅनिला किंवा पाईनअ‍ॅपल एसेन्स घालावा व एकत्र करावे.

.

आता अंड्याचे पांढरे वरील मिश्रणात हलक्या हाताने मिसळायचे. फेटायचे अजिबात नाही .
तयार मिश्रण ग्रीज केलेल्या किंवा बेकिंग पेपर लावलेल्या केकच्या भांड्यात ओतून, प्री-हीट केलेल्या ओव्हनमध्ये १८० डिग्रीवर २०-२५ मिनिटे बेक करणे.

.

केक तयार झाला कि कुलिंग रॅकवर थंड होण्यासाठी ठेवावे.

एका मोठ्या भांड्यात बर्फाचे पाणी घ्यावे व त्यावर मिक्सींग बाऊल ठेवावे. त्यात थंड फ्रेश क्रीम ओतून बीटरने फेटावे.
त्यात थोडीशी साखर व एसेन्स घालावा व सॉफ्ट पीक्स येईपर्यंत फेटावे.

.

थंड झालेल्या केकचे दोन किंवा तीन भाग करुन घ्यावे.

.

केकच्या खालच्या भागावर टीनमधल्या अननसाचा ज्युस चमच्याने सर्वत्र टाकावा.

.

त्यावर क्रीमचा थर सुरीने किंवा पॅलेट नाईफने नीट पसरवावा.

.

त्यावर अननसाचे तुकडे लावावे.

.

आता त्यावर दुसरा केकचा भाग लावावा. त्यावर पुन्हा अननसाचा ज्युस चमच्याने सर्वत्र टाकावा व क्रीम लावावे. केकच्या बाजुलाही क्रीम लावावे.

.

पायपींग बॅगमध्ये क्रीम घालून केकवर आवडीप्रमाणे डिझाईन काढावी.
अननसाच्या तुकड्यांनी सजवावे. (आवडत असल्यास चेरी ही वापरु शकता)
तयार केक फ्रिजमध्ये ४-५ तास ठेवावे.

.

नोटः

टीनमधला अननस वापरणं सोपे पडते नाहीतर अननसाच्या चकत्यांना आधी स्ट्यु करावे लागते व त्याची क्रिया मोठी असते. स्ट्युईंग नीट नाही झाले तर अननस कडवट होऊ शकतं.

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

27 Dec 2011 - 8:25 pm | मदनबाण

अभिनंदन ! :)
केक मस्तच दिसतोय... :)

(केक प्रेमी) :)

लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा :)
बाकी हा केक म्हण्जे माझा जीव की प्राण आहे :)
धन्स गो :)

प्रचेतस's picture

27 Dec 2011 - 8:44 pm | प्रचेतस

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. या केकच्या निमित्ताने मूळचा अस्सल चमचाही दिसला. पाकृ नेहमीप्रमाणेच जबरदस्त.

इन्दुसुता's picture

28 Dec 2011 - 7:44 am | इन्दुसुता

<<या केकच्या निमित्ताने मूळचा अस्सल चमचाही दिसला>>

कुठे कुठे ? मला नाही दिसला.... बाकी सानिका तैंच्या चमच्यावर किति लोकांचा डोळा आहे ते आज जाणवले, आणि तो सर्व दोष ५० फक्त यांचाच आहे ... शिवाय त्यांना सानिकातै भारताच्या पुढच्या वारीत तसलाच एक चमचा देणारेत म्हणे... मग आम्हीही लायनीत उभे रहावे काय असा विचार सुरु आहे.... तुम्ही येणार असाल वल्ली तर तुमचा नंबर माझ्या माsss गे.

सानिकातै तुम्हाला आणि तुमच्या अहोंना लग्नाच्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. केक व पाकृ उत्कृष्ट.....

५० फक्त's picture

28 Dec 2011 - 8:34 am | ५० फक्त

+१०, हेच म्हणतो, <<या केकच्या निमित्ताने मूळचा अस्सल चमचाही दिसला>>, छे रे हे शक्य नाही, तो चमचा मला देण्यासाठी त्यांनी व्यवस्थित ठेवला आहे कपाटात, हो कि नै ओ सानिकातै.

पण च्यायला असं करायला लागले तर त्यांना पुढच्या दोन वर्षात आख्खं किचन कटलरीसहित रिफर्निश करावं लागेल आणि त्यासाठी मला जबाबदार ठरवतील, अग बाबो, अवघड होईल मग.

मूळचा अस्सल चमचा म्हणजे तुमचा तो लाडका प्लास्टिकचा चमचा नाही हो ५०.
खालून ५ व्या गोटोमध्ये दिसतोय तो ओरिजीनल क्लासिक चमचा.
सानिकाताईंकडे चमच्यांचे इतके वैविध्य आहे ना की तो मूळचा स्टीलचा चमचा दिसेनासाच झाला होता.

तुषार काळभोर's picture

27 Dec 2011 - 8:50 pm | तुषार काळभोर

सर्वप्रथम लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
पायनॅपल केक मस्तच!

क्रीम स्मूथ आणि हलकी होण्यासाठी काय करावे?

प्रास's picture

27 Dec 2011 - 8:56 pm | प्रास

हॅप्पी अ‍ॅनिवर्सरी!

केक दिसायला उत्तमच झालाय. चविष्टही झालाच असेल ;-)

हा केक बिन-अंड्याचा - बिन-ओवन् द्वारे कसा करावा?

धन्यवाद!

सॅमचीआई's picture

27 Dec 2011 - 9:10 pm | सॅमचीआई

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!केक उत्तमच झालाय.

Mrunalini's picture

27 Dec 2011 - 9:39 pm | Mrunalini

एकदम मस्त... तोंपासु... :)

वाढदिवसाच्या शुभेच्छा
केक छान दिसतोय
मस्त

कौशी's picture

28 Dec 2011 - 4:15 am | कौशी

केक मस्त दिसत आहे.तोंपासु...

पाषाणभेद's picture

28 Dec 2011 - 4:25 am | पाषाणभेद

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! केक झकास दिसतोय. छान आठवण राहील.

प्राजु's picture

28 Dec 2011 - 6:47 am | प्राजु

प्रचंड सुंदर!!
दिसतोय तर अप्रतिमच पण अगदी निगुतीने केला आहेस आणि त्याची कृतीही अगदी नीटनेटकी , पायरी पायरीने सांगितल्यामुळे काम सोपेही झाले आहे.
नक्कीच करुन बघेन मी.
धन्यवाद तुला.

तूही गणपासारखाच ब्लॉग का नाही सुरू करत?

तायडे सानिका तैंचा ब्लॉग आहे गं.

लग्नाच्या वाढदिवसाच्या बिलेटेड शुभेच्छा !!!

केक फक्कड झालेला दिसतोच आहे. चवीलाही तितकाच उत्तम असणार. :)

जबराच, धन्यवाद सास्व, केकची पाकृ आणि फोटो दोन्हीही मस्तच

आणि महत्वाचे म्हणजे तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या अतिशय उत्तम हार्दिक आणि खादाड -एक वाढदिवस तुमच्या स्वताच्या बागेतला अननस वापरुन कराल ही शुभेच्छा.

wish you both many many happy, healty and wealthy returns of the day and cake.

सुहास झेले's picture

28 Dec 2011 - 7:21 am | सुहास झेले

सर्वप्रथम लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ....... केक अफलातून झालाय.. जिओ !!!

रम केक कसा बनवतात? कोणी त्याची पाककृती देऊ शकेल काय? :) :)

ऋषिकेश's picture

28 Dec 2011 - 9:09 am | ऋषिकेश

आणिवर्सरीच्या शुभेच्चा! ;)
केक मस्तच दिसतोय. वरच्या क्रीमच्या सजावटीसाठी क्रीमचा कोन घरी केलात का विकतचा आणलात? घरी केला असल्यास कसा? याशिवाय पायनॅपल ऐवजी इतर फळांचे फ्लेवर हवे असल्यास कृती अशीच (फक्त इसेन्स, सिरप व फळांचे तुकडे इतके त्या त्या फळाचे) असेल का?

सानिकास्वप्निल's picture

28 Dec 2011 - 1:44 pm | सानिकास्वप्निल

शुभेच्छांसाठी मनापासून धन्यवाद :)
केकवरच्या सजावटीसाठी क्रीमचा कोन विकतचा आहे , पायपींग बॅग मिळते व त्याबरोबर वेगवेगळ्या डिझाईनचे नॉझल्स मिळतात :)
याशिवाय तुम्ही संत्री घालून ही हा केक बनवु शकता :) त्यात १ टेस्पून संत्र्याची किसलेली सालं, ३-४ टेस्पून संत्र्याचा रस घाला खुपचं स्वादिष्ट लागतो केक.
मी तो ही करुन पाहीला आहे त्याचा फोटो देत आहे :)

.

उदय के&#039;सागर's picture

28 Dec 2011 - 10:49 am | उदय के'सागर

लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा !!! :)

पाईनॅप्पल केक म्हणजे काय म्हणावे...केवळ .. अहाहाहा!!!!

तुम्हि केवळ सुग्रणच नाहि अहात तर उत्तम मार्गदर्शक व शिक्षक अहात. पाकृ खुपच सविस्तर व सोपी करुन सांगितली आहे. तुमचि हि अवघड पाककृतीच्या सहज सोपी मार्गदर्शनाचि पद्धत अमच्या (माझ्या) सारख्या नव-शिक्यांना खुप प्रेरणा देते.
Keep it up, so that we will keep doing it further :)

सविता००१'s picture

28 Dec 2011 - 11:50 am | सविता००१

मस्त.......अप्रतिम

सदानंद ठाकूर's picture

28 Dec 2011 - 11:58 am | सदानंद ठाकूर

थोडी वाईन मिक्स करुन पहा.
जास्त लज्जत येईल.

स्वातीविशु's picture

28 Dec 2011 - 12:02 pm | स्वातीविशु

सानिकातै लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासुन शुभेच्छा.......केक खुपच छान, दिसतो आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

28 Dec 2011 - 12:08 pm | परिकथेतील राजकुमार

एकदम अ प्र ति म झाला आहे केक. वासही छान सूटलाय ;)

michmadhura's picture

28 Dec 2011 - 12:17 pm | michmadhura

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मस्त झालाय केक.

RUPALI POYEKAR's picture

28 Dec 2011 - 12:41 pm | RUPALI POYEKAR

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सानिकास्वप्निल's picture

28 Dec 2011 - 1:48 pm | सानिकास्वप्निल

तुम्हा सर्वांना शुभेच्छांसाठी मनापासून धन्यवाद :)
असेच प्रेम राहू द्या :)

जान्हविनागेश's picture

28 Dec 2011 - 3:18 pm | जान्हविनागेश

सानिकास्वप्निल, तुमच्या सगळ्या पाक्रु मी वाचते, खरच खुप छान आवड आहे तुमची, तुमचे अहो खरच खुप नशिबवान आहेत.
तुम्हा दोघाना खुप खुप शुभेच्या, तुमचा फोटो पहायला खुप आवडेल.

धनुअमिता's picture

28 Dec 2011 - 2:19 pm | धनुअमिता

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

केक छानच दिसतोय.

घरच्या घरी क्रीम कशी बनवावी हे सांगाल का?

पिंगू's picture

28 Dec 2011 - 4:53 pm | पिंगू

सानिकाताय, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

बाकी केक एकदम बेश्ट झालाय..

- पिंगू

अमृत's picture

29 Dec 2011 - 10:09 am | अमृत

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेछा.. . . बाकी तुम्ही एक बेकरी टाका... जबरदस्त चालेल तै....डोनट्स, अ. केक, सं. केक आणखी येऊ देत...

अमृत

मीनल's picture

2 Jan 2012 - 8:26 am | मीनल

केक मस्त. प्रेझेंटेशन रोमेंटिक!