Pune Gourmet Club पुण्यात 2007 पासून पुणे वाइन फेस्टीव्हल आयोजीत करते. पुण्याबरोबर मुंबईला बांद्र्यालाही हा वाइन फेस्टीव्हल ते आयोजीत करतात. अस्सल वाइनप्रेमींसाठी वेगवेगळ्या वाइनरीजच्या वाइन्स चाखण्याची आणि विकत घेण्याची, एकाच ठिकाणी, एक मस्त संधी ह्या निमीत्ताने प्राप्त होते.
ह्या शनिवारी काही मिपांकरांसोबत पुणे वाइन फस्टीव्हल 2011 ला हजेरी लावण्याचा योग आला (सहकुटुंब). खरचं खूप धमाल आली. जवळजवळ 16 वाइनरीजचे स्टॉल्स ह्या वेळी होते. तसेच खाण्याचेही बरेच स्टॉल्स असल्यामुळे वाइन चाखण्याबरोबरच खादाडीची सोय उपलब्ध होती.
ह्या इथे स्वागतकक्षात प्रवेशाचे सोपस्कार पार पाडून आत गेलो. खरेतर उशीरचं झाला होता पोहोचायला,चांगलेच अंधारून आले होते.
आत गेल्यावरचा नजारा असा होता.
एक फेरी मारून सर्व स्टॉल्सचा अंदाज घेतला. मग धम्याच्या सल्ल्यानुसार 'नाइन हिल्स' ह्या वाइनरीच्या स्टॉलपासून वाइन 'टेस्टींगला' सुरुवात केली. धम्याने ह्याच स्टॉलपासून का सुरवात करायला सांगीतले हे बाकीचे स्टॉल्स बघितल्यावर कळून आले. ;)
इथे मी सुरुवात केली 'सोविन्यॉन ब्लॅं' आणि 'शेनिन ब्लॅँ' ह्या व्हाइट वाइनपासून. धम्याने ह्या वाइअनरीची नविन लॉन्च केलेली वाइन 'विऑन्यें' ट्राय केली.
इथे मी माझ्या वाइनच्या तुटपुंज्या माहितीच्याआधारे वाइन टेस्टींगच्या 'वाइन बघणे', 'वाइनचा गंध अनुभवणे' आणि 'वाइन चाखणे' ह्या स्टेप्स उपस्थित मिपाकरांना समजावून सांगीतल्या. त्यांना त्या पटल्याने जरा आनंदही झाला.
पुढच्या वाइअनरीकडे गेलो तीथे रेड वाइनमधे शिराझ होती. माझे आणि सिराझचे जरा वाकडे असल्याने मी परत व्हाइट वाइनकडेच मोर्चा वळवला. इथे होती 'शॅर्दोने'.
मग जरा वाइन चाखत चाखत आजूबाजूची प्रेक्षणीय स्थळे बघण्यात पराने बराच वेळ घालवला. इथे आमचे कुटुंब मुलांचा पोटोबा करण्याकरिता गेले असल्याने मलाही ह्या संधीचा फायदा करून घेता आला.
त्यानंतर मोर्चा वळवला 'झंपा' ह्या वायनरीच्या स्टॉलकडे.
इथल्या वाइन्स जरा जास्तच अॅसीडीक होत्या कदाचित त्यांचे तापमान योग्य नसल्यामुळे असेल. पण इथे 'सुला' वाइन्स कश्या चांगल्या असतात ह्यावर आमची चर्चा झाली. ती नेमकी त्या स्टॉलवाल्याने ऐकली. मग सुला सध्या 'वाइनमधे कशी गडबड करते' ह्यावर त्याचे मौलिक विचार ऐकायला मिळाले. ते ऐकून पुढे सरकलो 'किंगफिशर' च्या स्टॉलकडे.
इथे 'शॅर्दोने' आणि 'शिनेन ब्लॅं' ह्या द्राक्षांचा ब्लेंड असलेली व्हाइट वाइन होती. हे कॉम्बीनेशनच इतके अपीलिंग होते की लगेच ट्राय केले. अतिशय सुंदर वाइन. वाइअनचे तापमान मस्त असल्याने अतिशय भन्नाट लागली. लागलीच ती विकत घ्यायचे ठरले आणि शेवटी निघताना विकत घेतली.
आता शोध घ्यायचा होता 'झिनफॅन्डलचा' कारण ती अजूनही कुठेच दिसली नव्हती. मग फिरून शोध घेतल्यावर झिनफॅन्डल मिळाली 'यॉर्क' नावाच्या वायनरीच्या स्टॉलवर. सगळ्यांना तिकडे मोर्चा वळवायला सांगीतला.
इथे झिनफॅन्ड्लची रोज वाइन ट्राय केली. एकदम मस्त होती. विकत घेण्याचे ठरवून शेवटी परत येताना विकत घेतली. इथे असताना वपाडावचे आगमन झाल. त्याला मर्गदर्शनाकरून यॉर्कच्या बाजूलाच 'फोर सीजन्स' वायनरीचा स्टॉल होता. तेथे मोर्चा वळवला.
ह्या स्टॉलवर 'ब्लश' ब्रॅन्ड्ची रोज वाइन टेस्ट केली. अतिशय भन्नाट वाइन होती. बाकीच्यांसाठी एक नविन बाटली फोडली जीचे तापमान एकदम परफेक्ट होते. त्यामुळे ब्लॅशचा लुत्फ मनमुराद घेता आला. ब्लश घेत असतानाच 'वाइन स्टॉम्पिंगची' घोषणा झाली आणि लगेच तीथे मोर्चा वळवला.
पण एकंदरीत हा असा माहोल बघता 'स्टॉम्पिंग' कमी आणि 'स्टेम्पीड' जास्त असे वाटल्याने फार वेळ न घालवता बाकीच्या वाइनरीजकडे मोर्चा वळवला.
पण वपाडाव (नवाबी शौक असणारे) ह्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी ह्या संधीचा 'लाभ' घेतला. त्यांच्या पदस्पर्शाने द्राक्षे पावन झाली.
त्यानंतर बर्याच वाइअनरीजच्या स्टॉल्सवर रेड वाईन, रोज वाइन आणि व्हाइट वाइन्स चाखल्या. काही बर्या होत्या तर काही ओके होत्या.
यानंतर एक कॉकटेल काउंटर दिसला जो बघितल्यावर आम्हा सर्वांनाच आनंद झाला. तिथे काही मित्रांनी रेड वाइनचे आणि मी 'स्प्राईट्झर' नावाचे व्हाईट वाइनचे कॉकटेल ट्राय केले. रेड वाइनचे कॉकटेल एकदम बकवास निघाले त्याचे नावही विसरलो ह्यातच सगळे आले. स्प्राईट्झर बरे होते.
रेसिपी
व्हाईट वाइन 30 मिली
स्प्राइट - ग्लास टॉप अप
ग्रॅपा (द्राक्षाचा सिरप) - 15 मिली
हजेरी लावलेले मिपाकर
डावीकडून: ध.मु., सोत्रि, विवेक मोडक, प्रीत-मोहोर (हीने फक्त वाइनचा ग्लास धरून अॅक्टींग केली आहे ;) ) , परा
डावीकडून: विवेक मोडक, परा आणि वपाडाव
मधेच धम्याने सिगार पैदा केला कुठून तरी त्याने आणखीणच मजा आली. धम्याच्या चेहेर्यावरून ते दिसते आहेच.
डावीकडून: सौ सोत्रि, सौ ध.मु. , जुनियर ध.मु., आणि प्रीत-मोहोर
रात्री साधारण दहाच्या सुमाराला परत निघालो. एकंदरीत ४-५ तास अगदी मजेत आणि हवेत तरंगत गेले. वाइन हे तर कारण होतेच पण दर्दी मिपाकरांची संगत चार चाँद लावून गेली.
प्रतिक्रिया
26 Dec 2011 - 1:16 pm | मी-सौरभ
मला पण नेणार होतात तुम्ही सो त्रि.
जाहीर निषेध....
वप्या: तुला व्यनीत बघतो रे...
26 Dec 2011 - 1:22 pm | बिपिन कार्यकर्ते
भन्नाट!
बाकी परा इथेही वासूगिरी करतोय! ;)
26 Dec 2011 - 2:06 pm | गणपा
=))
बिकाशी शमत आहे.
26 Dec 2011 - 2:36 pm | परिकथेतील राजकुमार
आपली जळजळ पोचली. ;)
त्या दिवशी विनाकारण आपण दोनदा फोन लावून आमच्या आनंदात माती कालवायचा केलेला प्रयत्न आम्ही जगासमोर उघडकीला आणल्यास काय होईल ह्याचा विचार करावा.
महत्वाचे :- वासूगिरी कुठे आणि कशी केली हे संदर्भासह स्पष्ट न केल्यास अब्रु लुस्कानीचा दावा लावल्या जाईल.
जपून वारकर्ते
26 Dec 2011 - 2:47 pm | गणपा
खालुन चौथा फोटो हा वासुगीरीचा उत्तम नमुना आहे.
जगाला असं भासवतोय की जणु वाईनचाच गंध घेत आहे. पण नजर बघा जरा. समोर नक्कीच एखादी मदनमंजरी (ती ही पाठमोरी)उभी असणार. ;)
काय खरां का नाय?
26 Dec 2011 - 3:01 pm | परिकथेतील राजकुमार
नशिब !
'समोर नक्कीच एखादी मदनमंजरी (ती ही वाकून)उभी असणार' असे म्हणाला नाहीस.
26 Dec 2011 - 3:11 pm | मृत्युन्जय
नशिब !
'समोर नक्कीच एखादी मदनमंजरी (ती ही वाकून)उभी असणार' असे म्हणाला नाहीस.
मग तुझी पण पोज बदलली असती ना रे परा
26 Dec 2011 - 1:29 pm | प्रचेतस
मस्त वृत्तांत.
26 Dec 2011 - 1:47 pm | श्रावण मोडक
प्रीमोच्या हातातील ग्लासात किंचित वाईन शिल्लक आहे हे पाहता ही अॅक्टींग 'वास्तववादी' वाटते! ;)
26 Dec 2011 - 1:54 pm | सोत्रि
बळंच हुच्चभ्रु असल्याचा आव आणण्याचा प्रयत्न केला तिने पण प्रयत्न फसला म्हणायचा ;)
- (हुच्च्भ्रु) सोकाजी
26 Dec 2011 - 2:07 pm | गणपा
आणि श्रामोंशी बाडिस.
26 Dec 2011 - 1:50 pm | छोटा डॉन
छान कट्टा झालेला दिसतोय.
कट्टा मिस्स केल्याचे दु:ख आहेच :(
- छोटा डॉन
26 Dec 2011 - 2:48 pm | स्पा
ह्म्म्म्म्म्म्म
:(
26 Dec 2011 - 2:19 pm | स्मिता.
वाईन टेस्टींग कट्टा एकदम झक्कास झाला म्हणायचा! पहिल्यांदाच स्त्री मिपाकर उपस्थित असलेले आणि 'सहकुटुंब' कट्ट्याचे फोटू बघून बरे वाटले ;)
सवयीने इनो घेतलेले आहे. त्याची कोणीही चिंता करू नये. धन्यवाद.
3 Jan 2012 - 1:03 am | रेवती
सहमत.
सवयीने इनो घेतलेले आहे. त्याची कोणीही चिंता करू नये.
खी खी खी
26 Dec 2011 - 2:20 pm | अन्या दातार
च्यायला, असल्या दारुच्या जत्रेत जाता, वर वृत्तांत टाकून जळवता पण होय! असो. आता स्प्राईट पिउन जळजळ कमी करावी म्हणतो ;)
26 Dec 2011 - 2:22 pm | प्यारे१
अरे वा.......!
वप्या : सुमडीत ? च्यायला फोनची वाट बघत होतो परवा. डायरेक्क तिकडं पोचला का?
प्रीमो : गोवा 'मुक्ती'चा आनंद उपभोगतेय ;) ,
सोक्या, परा नी धम्या : नेहमीचे येशस्वी कलाकार,
विमोंच्या हातातली सिगारेट आम्ही बघितली नाहीये. :)
-अम्मळ दु:खी प्यारे१
26 Dec 2011 - 2:32 pm | स्वाती दिनेश
फेस्टिवल जोरात दिसतोय, मिपाकरांनी धमाल केलेली दिसते आहेच.
स्वाती
26 Dec 2011 - 2:33 pm | पियुशा
जबरयाच ,झाला म्हणजे फेस्टीवल ;)
मस्त :)
26 Dec 2011 - 2:33 pm | ५० फक्त
मस्त रे मस्त झाला कट्टा, सगळ्या प्रकारच्या मिळुन एकुण ३-४ लिटर वाईन पिली असेल ना प्रत्येकाने ? आणि खाण्यात काय काय होते, म्हणजे असे खाणे जे विशेषतः वाईन बरोबर खाल्लं जाते, चीज वगैरे.
26 Dec 2011 - 2:38 pm | सोत्रि
वाइन्सची कुपन्स संपवता संपवता ढगात गेलो सगळे त्यामुळे खाण्याच्या पदार्थांकडे लक्ष द्यायला वेळच मिळाला नाही.
(हे म्हणाजे कोल्ह्याला द्राक्षं आंबट बरं का, भयंकर महाग होते सगळे पदार्थ ;) )
26 Dec 2011 - 2:38 pm | योगप्रभू
माझ्या नावानं कुणी दोन थेंब शिंपडले का रे?
(नसतीलच म्हणा. तेवढी तरी वाया का घालवतील हे टोळभैरव?)
चि. बालधमु घरी नेण्यासाठीच्या वाईन पार्सलकडे लक्षपूर्वक पाहातोय.
(हम्म मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, हे खरंच.)
तोंडात सिगार आणि हातात वाईन. काऊबॉय ईश्टाईल धमाल करणारा मुलगा
(तेवढा ग्लास नजाकतीने पकडा. बारामतीच्या माळावर म्हशींच्या मागे फिरताना दांडकं पकडल्यावानी सगळ्या गोष्टी धरु नये)
सौ. सोत्रिवैनी यंदा संक्रांतीच वाण म्हणून वाईन बॉटल लुटणार बहुतेक
(आमच्या कुटुंबाला आमंत्रण द्यायला विसरु नका कृपया)
हातातल्या वाईनचा वास घेताना ते परा भलतीकडं कुठं बघतंय?
(एका हातात वाईनचा ग्लास आणि दुसर्या हातात सिगार घेतल्यावर मग संगणकावर मराठी कसे लिहावे?)
26 Dec 2011 - 3:33 pm | धमाल मुलगा
हॅ हॅ हॅ! नाय बा! हां, म्हणजे एक वाईन टेस्ट करुन झाल्यावर दुसरी टेस्ट करण्यापुर्वी मात्र तुझी आठवण आली होती..तिथे स्पार्टन्स भेटले ना म्हणून. ;)
काय सांगायचं द्येवा... रोही व्हिलाच्या गेटापासूनच म्हाराज पळत सुटले. सोकाजीराव म्हणालं सुध्दा.."ह्याला कळालेलं दिसतंय आपण नक्की कुठे आलोय ते. बापापेक्षा पोरालाच घाई जास्त झालीए."
>>तोंडात सिगार आणि हातात वाईन. काऊबॉय ईश्टाईल धमाल करणारा मुलगा
हा हा हा! I reckon so!
>>(तेवढा ग्लास नजाकतीने पकडा. बारामतीच्या माळावर म्हशींच्या मागे फिरताना दांडकं पकडल्यावानी सगळ्या गोष्टी धरु नये)
=)) =)) दांडकं नाय रे...काठी म्हणावं ;)
आयला! कॉकटेल ग्लासातून वाईन प्यायला एकवेळ आम्ही येडे असू, देणार्याला लोक जोडयानं नाय मारतील? त्या ग्लासात (बहुतेक) लिक्विड कोकेन की रॅपिड फायर नावाचं कॉकटेल होतं भो.
>>सौ. सोत्रिवैनी यंदा संक्रांतीच वाण म्हणून वाईन बॉटल लुटणार बहुतेक
आयला! असं असेल तर अगदी चापूनचोपून नौवारी नेसून हळदीकुंकवाला येईन हों मी. ;)
>>हातातल्या वाईनचा वास घेताना ते परा भलतीकडं कुठं बघतंय
काय सांगायचं मर्दा, त्याच्या डोळ्याचं तर बॉल बेअरिंगच झालं होतं.. नुसतं गरागरा..गरागरा... :D
27 Dec 2011 - 10:51 pm | चिंतामणी
>>हातातल्या वाईनचा वास घेताना ते परा भलतीकडं कुठं बघतंय
काय सांगायचं मर्दा, त्याच्या डोळ्याचं तर बॉल बेअरिंगच झालं होतं.. नुसतं गरागरा..गरागरा...
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
=))
=))
=))
=))
=))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
27 Dec 2011 - 11:27 pm | श्रावण मोडक
सोत्रि, ठरवाच. हा सीन एरवी पहायला मिळायचा नाही. वाईनच्या एका बाटलीची सोय माझ्याकडं लागली. ;)
27 Dec 2011 - 11:37 pm | स्मिता.
हे कसं काय नजरेतून सुटलं काय माहिती. श्रामोंना फुल्ल अनुमोदन!! सोकाजींना काळजी करायचीही गरज नाही, श्रामो सोय बघणार आहेत.
मलाही बोलवायला विसरू नका... आवर्जून हजेरी लावली जाईल.
27 Dec 2011 - 11:46 pm | बिपिन कार्यकर्ते
माझ्या नवीन कॅमेर्याने फोटो काढायला मी पण उपस्थित असेन. आणि 'इकडून येणं झालं' वगैरे डायलॉग्ज येणार असतील व्हिडो शूटिंगही केल्या जाईल.
28 Dec 2011 - 11:07 am | श्रावण मोडक
भावोजी, तुम्ही हवेतच तिथं. त्याशिवाय कार्यक्रमाला शोभा येणार नाही. ;)
28 Dec 2011 - 3:54 pm | धमाल मुलगा
हल्ली पैठण्यांचे बस्तेच घेऊन हिंडत असतात की काय ते भावोजी ? ;)
-रावजी.
अवांतर: मोडक बाटलीची जबाबदारी घेतो म्हणताहेत तर नऊवारीच काय, कर्दळीची पानं नेसूनही यायची तयारी आहे आपली. ;)
मिष्टर कार्यकर्ते, नविन क्यामेर्याला अपशकुन नाही ना व्हायचा मग? :P
28 Dec 2011 - 5:13 pm | श्रावण मोडक
आधी नऊवारी. कर्दळीचा विचार नंतर करू. कारण तो पब्लिक शो असू शकतो. पूनमला करूया. ;)
28 Dec 2011 - 8:24 pm | विजुभाऊ
माझ्या नवीन कॅमेर्याने फोटो काढायला मी पण उपस्थित असेन
झैरात झैरात झैरात
28 Dec 2011 - 12:04 am | सोत्रि
साक्षात श्रामोंनीच वाइअनच्या बाटलीची सोय करण्याची जबाबदारी घेतल्याने 'हळदीकुंक' कार्यक्रमाचे मनावर घेतल्या गेले आहे. ;)
- (हळदीकुंक, बोरन्हाणं असले कार्यक्रम आवडणारा(?) ) सोकाजी
28 Dec 2011 - 12:17 am | चिंतामणी
म्हणजे फक्त एकाच बाटलीची.
लुटण्यासाठी अजून लागतील त्याचे काय??? :~ :-~ :puzzled:
28 Dec 2011 - 11:08 am | श्रावण मोडक
मी एकाच बाटलीची जबाबदारी घेतोय. ती लाखमोलाची आहे.
बाकी लुटायच्या बाटल्यांची जबाबदारी सोत्रिंची. अर्थात, इतरही कोणी (तुमच्यासह) नऊवारीत येणार असेल, तर वेगळा विचार केला जाईल (हे केल्या जाईल, असे वाचावे).
28 Dec 2011 - 11:26 am | चिंतामणी
http://www.misalpav.com/node/20197#comment-362178
बादवे. मी तुम्हालाच बाकीच्या खर्चातुन वाचवत आहे आणि तुम्ही उगाचच माझ्यावर............ :( :-( :sad:
28 Dec 2011 - 12:29 pm | श्रावण मोडक
अच्छा. मग ते तुमचं कुटुंब आणि सोत्रिंचं कुटुंब पाहून घेईल. मी त्या हळदीकुंकवात पडणार नाही. पडलो तर फक्त आपले टेबलावरचे किस्से त्या दोघींना सांगेन म्हणतो. ;)
28 Dec 2011 - 12:40 pm | परिकथेतील राजकुमार
सोत्रीकडे लूटायला बाटल्या आणणारच असतील, तर तिथे एक छोटासा टेस्टींग फेस्टिवल होऊन जावा असा प्रस्ताव मी पटलावरती ठेवतो आहे.
(प्रस्ताव मान्य झाल्यास, ग्लास आपले आपण आणायचे का संयोजक देणार हे देखील उपजोड पारित करुन घ्यावे.)
28 Dec 2011 - 4:39 pm | स्मिता.
बाटल्या लुटणे हे फक्त हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात होणार असल्याने धम्यासारख्या इच्छुकांनी नऊवारी साडी नेसून कार्यक्रमास हजेरी लावावी.
28 Dec 2011 - 4:41 pm | धमाल मुलगा
ड्रेसकोड आहे?
च्यायला, मग बाटलीचं पार्सल घेऊन येणारे मोडक आणि क्यामेरा घेऊन येणारे बिपीनभावोजी पैठणीवाले हेसुध्दा नऊवारीतच की काय? =))
28 Dec 2011 - 4:58 pm | परिकथेतील राजकुमार
आज बालगंधर्व असते तर त्यांना किती शरम वाटली असती.
बाकी आम्ही एकदा स्त्री वेषात अशोक सराफला पाहीलेले असल्याने, हा धक्का देखील सहन करू.
28 Dec 2011 - 5:01 pm | नंदन
आता शब्दशः 'वाण' नाही पण गुण लागला म्हणायची वेळ आली ;)
28 Dec 2011 - 5:03 pm | गणपा
वाण लुटून परत चाललेला धम्या ;)
28 Dec 2011 - 5:08 pm | वपाडाव
खुंखार....
तोडफोड.....
28 Dec 2011 - 5:11 pm | परिकथेतील राजकुमार
साला ह्या धम्याला वाटेत लुबाडला पाहीजे. तो ब्रँड माझा आहे कारण.
28 Dec 2011 - 5:14 pm | श्रावण मोडक
मेलो... ;) बाजार उठला धम्याचा.
28 Dec 2011 - 6:50 pm | धमाल मुलगा
च्यायचं हलकट है हे गणप्या!
जावद्या...आता बाजार उठण्यापेक्षा, सरळ ह्यो क्रेट घेऊन बाजारात बसावं. ;)
28 Dec 2011 - 5:44 pm | स्मिता.
बेक्कार आहे हा प्रतिसाद! पडले खुर्चीवरून...
28 Dec 2011 - 7:12 pm | सोत्रि
गणपा-भौ,
सादर प्रणाम :)
- (हसून हसून फुटलेला) सोकाजी
28 Dec 2011 - 5:11 pm | श्रावण मोडक
च्यायला, हे आले संस्कृतीचे उपासक. ड्रेसकोड म्हणे. फोटोग्राफरलाही नऊवारी असते का कधी? तसंच हरकाम्यालाही ड्रेसकोड लावतात का?
28 Dec 2011 - 5:24 pm | परिकथेतील राजकुमार
मेंढे पाटलांचा बंगला आठवा ;)
28 Dec 2011 - 6:09 pm | श्रावण मोडक
मेंढे पाटलांच्या बंगल्यात हळदीकुंकू झालं होतं का? माहिती नाही, म्हणून विचारतोय. ;)
28 Dec 2011 - 6:38 pm | परिकथेतील राजकुमार
मी ड्रेसकोड बद्दल बोलतोय.
28 Dec 2011 - 7:05 pm | श्रावण मोडक
हे असं होतं. मी हळदीकुंकवाच्या ड्रेसकोडविषयी बोलतोय. हे म्हणजे, आम्ही लोकपाल म्हणतोय तर तुम्ही जनलोकपाल म्हणायचं असं झालं, पराण्णा!
28 Dec 2011 - 8:33 pm | सोत्रि
वाइनफेस्टमधील ललनांचा पराण्णांवर चढलेला अंमल, अंमळ तसाच असल्यामुळे असेल.
तो तिथल्या 'ड्रेसकोड'मधून अजून बाहेर आलेला नाहेयेय बहुतेक.
- (वाइनफेस्ट 'ड्रेसकोड' आवडलेला) सोकाजी
30 Dec 2011 - 12:31 am | चिंतामणी
मग आधी येथे शेअर करू नकोस.
30 Dec 2011 - 10:26 am | सोत्रि
ब्वॉर...ब्वॉर ;)
- (आळीमिळी गुपचिळी केलेला) सोकाजी त्रिलोकेकर
26 Dec 2011 - 5:37 pm | सोत्रि
योगप्रभू,
एक नंबर प्रतिसाद.
धम्याने म्हटल्याप्रमाणे तुमची आठवण झाली होती हो. ते दोन थेंब तेवढे मात्र राहिले ;)
- ('प्रभू'पंखा) सोकाजी
27 Dec 2011 - 10:46 pm | चिंतामणी
>>>सौ. सोत्रिवैनी यंदा संक्रांतीच वाण म्हणून वाईन बॉटल लुटणार बहुतेक
(आमच्या कुटुंबाला आमंत्रण द्यायला विसरु नका कृपया)
सहमत.
:bigsmile:
26 Dec 2011 - 2:39 pm | गवि
यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच जाणे झाले नाही..
वाईट वाटले. पण सर्वांनी आनंद घेतला याचा आनंद आहेच.
-वाफेचा वारकरी (गवि)
26 Dec 2011 - 3:16 pm | वपाडाव
जबराट झाला कट्टा.....
विशेषत: शेवटी शेवटी तालावरचे स्टँपिंग तर नादच खुळा.....
पराशेट, धम्या अन मोडक यांची साथ भारीच....
अन सोकाजीरावांबद्दल काय बोलणे......
जियो मेरे लाल.....
3 Jan 2012 - 1:12 am | रेवती
मिपावर पायाचे फोटू मागण्याची पद्धत आहे.
तुझी कायमस्वरूपी सोय झाली रे!
कोणी फोटू मागितला की द्राक्षाळलेला फोटू पाठवत जा.
आजीचा सल्ला- आता संसाराला लागा म्हणजे असले प्रकार कमी होतील.;)
4 Jan 2012 - 1:57 pm | वपाडाव
आज्जे, त्या सुडला पोरगी शोधुन द्यायला इतकी वर्षं लावलीस.... (त्याचं जमलं अशी चर्चा आहे सध्या) ;)
हातची कामं जरा लौकर उरकुन घे की.... लै नातु हैत तुला ज्यांच कल्याण करणे अजुन बाकी आहे....
4 Jan 2012 - 5:26 pm | रेवती
काय म्हणतोस?
जमलं त्याचं?
असुरानंही दोनाचे चार करताना सांगितलं नव्हतं. आता हाही त्याच माळेतला निघाला.
देवाऽऽ! काय दिवस आलेत.
4 Jan 2012 - 5:38 pm | सोत्रि
आज्जे,
असे करून कसे चालेल? त्यात पुन्हा किचेनतै च्या रूपाने तुला तगडा प्रतिस्पर्धी मिळाला आहे.
- (आज्जीच्या मदतीची आता गरज नसलेला) सोकाजी
4 Jan 2012 - 5:45 pm | रेवती
त्या किचेनतै आल्यापासून नातवंडं मला विचारीनात अगदी!
26 Dec 2011 - 3:29 pm | आत्मशून्य
You people really made it high... OMG! my bad that I used to thought that a man's happiness really lies only in contentment ;)
26 Dec 2011 - 4:47 pm | गवि
द्राक्षे तुडवणे हे अत्यंत कमनीय आणि नाजुक रमणींच्या नितळ पावलांनी केले जाते अशी माझी समजूत होती. केसाळ मजबूत पायांचे बाप्येही यात सहभागी होतात हे पाहून आम्ही केवळ सांडू सोमासव घ्यायचे ठरविले आहे.
26 Dec 2011 - 5:32 pm | सोत्रि
- (स्मायलीप्रमाणेच गडबडा लोळून हसणारा) सोकाजी
26 Dec 2011 - 5:45 pm | धमाल मुलगा
येकतर तिच्यायला आम्ही पडलो गावाकडचं गावंढळ, त्ये जायचं कोरेगाव पार्कात तं अस्सल पुणेकरसुदिक गोंधाळत्यात तितं आमची काय अवस्ता. आणि पुन्ना...त्ये वाईनचं म्हंजे सगळं जातकुळीच निराळं की वो. त्यामुळं जाताना जीव जरा धाक्कधुक्क धाक्कधुक्कच होत होता. पण, एक जरा दोन घोट पोटात गेलं आन मग गाडी आशी उधाळली म्हणता, आहाहा ;)
लय दंगा केला भो. वाईनगुरु सोकाजीआण्णा ह्यांच्या मार्गदर्शनाखाली वाईन कशी प्यावी ह्याचा एक क्लासच झाला म्हना की. (हां, आता सोकाजीगुरुजी शिकवत व्हतं तवा आम्ही आमच्या ब्याक-बेंचर्सच्या तत्वाला अनुसरुन पाखरंबाजी करत होतो ही गोष्ट अलाहिदा. ;) )
एकुणच वाईन आणि अल्पवस्त्रांकित ललना हे गोड कोडं काही मला कधी उलगडलेलं नाही. नसेना म्हणा, त्या नशिल्या अन रसिल्या गमतीचं त्रैराशिक मांडून त्यातली मजा घालवण्यात काही राम नाही. :)
वाईन्सच्या स्टॉलवरच्या त्या रंगीत बाटल्या नुसत्या बघुनच भान हरपत होतं राव! चव घेतल्यानंतरची तर बातच सोडा.
शिवाय, तिथला चीझचा स्टॉलही बरा होता. जीरा, रिकोटा, गोट, फेटा वगैरे बर्याच प्रकारचे चीझ चवीसाठी अन अर्थातच विक्रीसाठी होते. मला विशेष आवडलेला स्टॉल म्हणजे कुकीजचा. कोणतेही प्रिझर्व्हेटिव्हज न वापरता केलेल्या, तोंडात टाकताच विरघळणार्या सुंदर कुकीज होत्या. विशेष उल्लेखनीय कुकीज : चॉको चिप्स, चॉकलेट-डेट-वॉलनट (हे डेट-वॉलनट कॉम्बिनेशन सालं माझं प्रचंड आवडीचं.) , अॅपल-कॅशु . आणि हो, प्लमकेकही मस्तच.
बाकी खादाडीबाबत सौ.सोत्रि ह्यांच्या एक्सपर्ट्स कमेंट नंतर कोणीही ढुंकूनही पाहण्याचे कष्ट घेतले नाहीत. :)
इथे वेलकम किटमध्ये टेस्टिंगसाठी प्रत्येकाला ग्लास दिला होता. तो आपापला ग्लास वागवत हिंडताना, वैतागून माननिय पर्यानं एक जबरा टाकलाच. येशू ख्रिस्त जसा आपला क्रॉस स्वतः घेऊन फिरला तसं आपला ग्लास स्वतः घेऊन हिंडावं लागतंय म्हणे.
ह्या फेस्टिवलमधल्या मला आवडलेल्या काही वाईन्स :
१. किंगफिशर-बोहेमिआ : शिनिन ब्लां आणि शार्डने ह्यांचं सुंदर ब्लेंड असलेली ही वाइन लैच्च झकास वाटली.
२.नाईन हिल्सः विअॅग्निआ ~ आवडीची शिनिन ब्लां नसेल तर ही गोड चवीची व्हाईट वाईन पर्याय म्हणून जेवणानंतरच्या डेझर्टसाठी घ्यायला आवडेल. (पण गोडसर असायला हवी, ती अंमळ जास्तच गोड आहे.)
३. यॉर्कः हा स्टॉल सगळ्यात जास्त आवडला. कारण ह्यांच्याकडच्या ३ वाईन आवडल्या. :) शिराझ आवडणार्यांनी रिझर्व्ह शिराझ तर शिराझ टाळणार्यांनी रिझर्व्ह कॅबर्नेट जरुर चाखून पहावी. यॉर्कच्याच स्टॉलवरचा झिन+रोज असा अप्रतिम प्रकारदेखील उल्लेखनीयच.
४: किआरा: किआरा वाईन्स हे इम्पोर्टर्स आहेत आणि इटली, स्पेन, हंगेरी इत्यादी देशातील वाईन्स ते इथे आणून विकतात अशी बहुमोल माहिती कळाली. ह्या स्टॉलवर अंमळ जास्त गप्पाटप्पा झाल्या. (काय गप्पा झाल्या ह्याच्या तपशीलात शिरावयास नको, आमच्याच अब्रुची लक्तरे..) तर त्यामुळे तिथल्या चाखलेल्या मेर्लाँ की मेल्बाक् (म्हणजे इथेही गोंधळच आहे..) कोणाची होती ते कळाले नाही. पण छान होती.
५.रिव्हिएलो: ह्यांची अवॉर्ड विनिंग असलेली कॅबर्नेट रिझर्व्ह (२००८) ही उत्तम!
६. व्हॅलोन्नि : आहाहा.... व्हॅलोनिची मेर्लाँ अगदीच सुंदर होती (असे माझे मत. :) ). एक छानसा सुगंध आणि घोट घशाखाली उतरल्यानंतरही जिभेवर रेंगाळणारी चव ही खासियत. अधिक उचकापाचक केली असता असे कळले की तो सुगंध फ्रेंच ओकचा आहे.
किआराच्या स्टॉलवर एक कॉकटेल काउंटर होता. तिथे वाइन्सचे कॉकटेल करुन दिले जात होते. (एकुणच तद्दन भिकार आणि चवीची काशी करणारे प्रकार केले जात होते असं माझं मत.) येऊन जाऊन त्यातलं 'ग्रॅप्पा' हे ५३% अल्कोहोल कंटेट्स असलेलं पाण्यासारखं नितळ पेय बाकी झक्क होतं. कोनतंही कॉकटेल केलं तरी त्यात ग्रॅप्पानं एक मस्त झिंग आणली जात होती.
शेवटी घेऊ घेऊ म्हणत ग्लु वाईनच्या काऊंटरला भेट द्यायचं राहिलंच गडबडीत. त्याची एक रुखरुख लागून राहिली आहे.
थोडक्यात (आणी विंग्रजी शिष्टाचाराचा भाग असलेल्या वाईनच्या भेटीला गेल्यामुळं विंग्रजी ष्टाईलीत) म्हणायचं तर, फ्रेन्डस, यु ऑल टुगेदर मेड माय इव्हनिंग फुल ऑफ फन अॅन्ड मेमोरेबल! आय ओ यु फॉर दिस लव्हली मोमेंट्स ऑफ माय लाईफ! :)
सोक्या, पर्या, मोडक, प्रिमो, वप्या...
चिअर्स मेट्स! चिअर्स!
26 Dec 2011 - 6:35 pm | परिकथेतील राजकुमार
तिथेच आम्ही साले २५०/ - २५०/- रुपडे मोजून 'लिक्विड कोकेन' हे भिकार कॉकटेल ट्राय केले :( वाहेगुरु त्या डँबिस निर्मलसिंगला कधी माफ करणार नाही.
26 Dec 2011 - 6:55 pm | धमाल मुलगा
५०% सवलत होती ना कुपन दिल्यावर? :P
तुम्ही तिच्यायला त्या निर्मलसिंगाच्या गोग्गोड बोलण्याला फसलात त्याला कोणी काय कराव? तो म्हणाआहे""मी मराठी आहे" की भुलले तिच्यायला! आम्ही आधीच बोलुन घेतलं होतं त्यामुळं 'मँ पंजाबी हां बाश्शाओ, बिज्ज्यनेस मेरे खूनविच हां।' हे ऐकुन आम्ही मापातच खेळलो. :P
रॅपिड फायर बरं होतं. (आणी मी आग्रहानं त्यात आणखी ग्रॅप्पा ओतायला लावल्यामुळं तर अंमळ जास्तच भिर्रर्र छान वाटत होतं. ;) )
26 Dec 2011 - 7:36 pm | स्मिता.
पुण्यात ग्लु वाईन घेतली नाहीत हेच बरं केलंत.
मी कालच इथे ग्लु वाईन पहिल्यांदा घेवून पाहिली. पण तिचा लुफ्त घ्यायला लागणारा महत्त्वाचा घटक म्हणजे कडाक्याची थंडीच नव्हती! त्यामुळे सुरुवातीचे २-३ घोट झाल्यावर (आणि वाईन गरम वरून कोमट झाल्यावर) अगदी औषधाहूनही बेकार लागत होती. त्यामुळे एवढाच सल्ला देईन की हाडं गोठवणारी कडाक्याची थंडी असल्याशिवाय ग्लु वाईनच्या वाटेला जावू नये.
26 Dec 2011 - 7:41 pm | धमाल मुलगा
रुखरुख अंमळ कमी झाली. :)
27 Dec 2011 - 10:57 am | परिकथेतील राजकुमार
तो शब्द 'लुत्फ' आहे ह्याची नोंद घेतल्या जावी. अन्यथा मिपावरील उर्दू अभ्यासकांच्या मनाची तडफड व्हायची.
28 Dec 2011 - 1:04 am | पाषाणभेद
>>> 'ग्रॅप्पा' हे ५३% अल्कोहोल कंटेट्स असलेलं ...
बापरे! एवढे अल्कोहोलचे प्रमाण वाईनमध्ये असते का हो सोकाजी? हे म्हणजे टांगा पल्टी करायला फारच उत्तम दिसते आहे.
28 Dec 2011 - 11:50 am | सोत्रि
हो ग्रॅप्पा मधे ४०-८०% अल्कोहोल असू शकते.
ग्रॅप्पा ही एक 'Pomace brandy' आहे. वाइनसाठी द्राक्षांचा रस काढून झाल्यावर शिल्लक राहिलेला द्राक्षांच्या सालीचा लगदा / गाळ ह्यापासून ग्रॅप्पा तयार करतात.
- (साकिया) सोकाजी
26 Dec 2011 - 6:01 pm | सोत्रि
आयचा घोsss खरंच की :(
हे सगळं त्या वप्यामुळे आणि त्याच्या त्या द्राक्ष तुडवलेल्या केसाळ पायांचे फोटो काढण्याच्या गडबडीमुळे घडंल! वप्या गुन्हेगार आहे. धम्या, काय शिक्षा करावी ह्याला?
- (दोष दुसर्यांवर ढकलण्यात पटाईत असलेला) सोकाजी
26 Dec 2011 - 6:16 pm | धमाल मुलगा
पहिलीच चूक है, जाव माफ कर दिया.
(वप्या, एक शिराझ रिझर्व्हचा क्रेट माझ्याकडं धाडून दे बे.)
26 Dec 2011 - 6:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान.....!!! चालू द्या....!
बाकी, वृत्तांत आणि प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत. :)
-दिलीप बिरुटे
27 Dec 2011 - 12:51 am | अत्रुप्त आत्मा
वृत्तां-त वाचुनच ढगात गेलो... बेफाम कल्ला केला बाकि सोकाजी आणी कंपनीने...लगे रहो..लगे रहो..मजा है भाइ... सगळे फोटु बी लै ब्येस आल्याती,हां....पण ज्युनिअर ध.मु. अगदी गोंदुश..गोंदुश आहे हो दिसायला.
(पुण्यात असुन पिण्यात नसलेला)...अत्रुप्त आत्मा
27 Dec 2011 - 1:57 am | नंदन
शेतकरी आत्महत्या करत असताना, स्वयंपाक करता येणारी बायको न मिळाल्याने आयटीची पोरं भुकेनी तडफडत असताना, मद्यार्कासाठी धान्य मिळत नसताना काही सदस्य अशा प्रकारचे धागे काढुन त्यावर चवीचवीने चर्चा करताना पाहुन एक मिपाकर म्हणुन शरम वाटली.
[प्रेरणा - :)]
27 Dec 2011 - 7:02 am | प्रभो
नंदोबाशी सहमत आहे...
शरमेवर उतारा म्हणून म्यानेजर नी नाताळची गिफ्ट म्हणून दिलेली फाँटॅना दी पापा, लाझियो (ईटालीयन - रेड वाईन) घेण्यात यील...
27 Dec 2011 - 10:58 am | परिकथेतील राजकुमार
=)) =))
च्यायला ! तू काय प्रतिसादांची एक्सेल पण ठेवायला सुरूवात केलीस का काय ?
27 Dec 2011 - 11:58 pm | सोत्रि
आमचा दंडवत स्विकारावा ही विनंती !
_/!\__/!\__/!\_
- (नतमस्तक) सोकाजी
27 Dec 2011 - 7:30 am | सुहास झेले
वाह वाह... मस्त... असे कट्टे होताना कळवत जा रे..... ईनो किती महाग झालंय, सारखं सारखं परवडत नाय ;)
27 Dec 2011 - 8:49 pm | गणेशा
छान , मस्त फोटो आणि वृत्तांत
27 Dec 2011 - 11:55 pm | दादा कोंडके
हा हा.
धाग्याप्रमाणेच प्रतिसादसुद्धा भन्नाट येणार याची खात्री असल्यामुळे आत्ता सवडीने धागा वाचला. आणि निराशा झाली नाही! :)
28 Dec 2011 - 1:25 pm | निनाद मुक्काम प...
अप्रतीम लेख झालाय.
भारतीय वाईन ह्या आता जागतिक बाजारपेठेत हळू हळू बस्तान बसवू लागल्या आहेत. तेव्हा भारतात त्या विषयी जागरुकता वाढणे हा स्तुत्य उपक्रम आहे. त्यामुळे देशी बाजारपेठ त्यांना उपलब्ध होईन.
ग्लू वाईन साठी थंड वातावरण हवे नाहीतर ती औषधी काढ्या सारखी वाटते. मात्र भारत थंडीत ती घेतांना जी काही मौज येते व थोड्या वेळानंतर तिची किक बसते त्याला तोड नाही.
म्हणजे एखादा नवशिका २ ते ३ पेले सहज रिते करायचा व अर्ध्या तासानंतर त्याचे विमान ..........
28 Dec 2011 - 4:50 pm | प्यारे१
सोक्या,
त्या दर्दी मिपाकर मधल्या 'दर्दी'ची नक्की व्याख्या नी अर्थ काय रे? ;)
28 Dec 2011 - 6:18 pm | मी-सौरभ
प्रत्येकाचा दर्द वेगळा असणार ना?
काहींना असण्याचे काहींना नसण्याचे.
फक्त बायको हा कॉमन फॅक्टर असणार त्यात...