मदत हवी आहे

वाटी's picture
वाटी in काथ्याकूट
21 Dec 2011 - 12:23 pm
गाभा: 

मदत हवी आहे मला येथे माझ्याकडे असलेले महाराष्ट्रातील गड कील्यांचे फोटो कलादालन या विभागात डकवायचे आहेत.

प्रतिक्रिया

१. पिकासा किंवा अन्य कुठेतरी ते फोटो अपलोड करा
२. तिथून ते उघडून राईट क्लिक --> प्रॉपर्टीज मधे जाऊन त्याचा पाथ (यूआरएल) कॉपी करा.
३. "कलादालन बनवा" ऑप्शनमधे मजकुराच्या चौकटीत जाऊन "इन्सर्ट / एडिट इमेज" चे बटण दाबल्यावर जो डायलॉग बॉक्स येईल त्यात ते कॉपी केलेले यूआरएल डकवा. हवे असल्यास हाईट आणि विड्थ टंका (इंग्रजीत) आणि इन्सर्ट करा..

४. सर्व इमेजेस इन्सर्ट झाल्या की पूर्वदृश्य पहा. मग प्रकाशित करा..

अमृत's picture

21 Dec 2011 - 12:36 pm | अमृत

हि घ्या मदत...

http://www.misalpav.com/node/13573

अमृत

किसन शिंदे's picture

21 Dec 2011 - 12:36 pm | किसन शिंदे

ते फोटो कलादालन ऐवजी भटकंती या विभागात टाकावेत.

वाटी's picture

21 Dec 2011 - 1:07 pm | वाटी

आभारी आहे मला प्रतिसाद दिल्याबद्दल गवि, अम्रूत आणि किसनजी परंतू पिकासावरून मला ते जमत नाहीये... काही दूसरा पर्याय नाही आहे का?

परिकथेतील राजकुमार's picture

21 Dec 2011 - 1:13 pm | परिकथेतील राजकुमार

काही दूसरा पर्याय नाही आहे का?

आहे ना आहे ना....

तुम्ही लेखन तेवढे प्रसिद्ध करा आणि फटूच्या लिंक संपादकांना द्या. ते करतील तुमच्या लेखनात फोटो पेस्ट.

तसेही आजकाल संपादक* आळशी झाले आहेत, काही कामे नाहीच आहेत त्यांना. ;)

*ह्यात छुपे संपादक देखील आले.

पिकासा नसल्यास अन्य कुठल्याही सेवादात्याचा (उदा: फिल्कर) उपयोग करावा.
पण फोटो हे जालावरच कुठे तरी साठवलेले असले पाहिजेत. (केवळ तुमच्या संगणकावर असणं पुरेस नाही.)

प्रभाकर पेठकर's picture

21 Dec 2011 - 1:25 pm | प्रभाकर पेठकर

(उदा: फिल्कर)

फिल्कर की फ्लिकर?

गणपा's picture

21 Dec 2011 - 1:29 pm | गणपा

स्लीप ऑफ फिंगर. :p

दिपक's picture

21 Dec 2011 - 1:25 pm | दिपक

पिकासावरुन जमत नसेल तर खालील वेबसाईट्स वापरुन बघा.
tinypic.com
www.zoomin.com

अविनाशकुलकर्णी's picture

21 Dec 2011 - 2:15 pm | अविनाशकुलकर्णी

तिथून ते उघडून राईट क्लिक --> प्रॉपर्टीज मधे जाऊन त्याचा पाथ (यूआरएल) कॉपी करा.

.............
इमेज साईज योग्य ति सिलेक्ट करा...