No space...!!!

चन्द्रशेखर गोखले's picture
चन्द्रशेखर गोखले in काथ्याकूट
17 Dec 2011 - 4:01 pm
गाभा: 

माझा मित्र माझ्या घरी आला अचानक.. घरात नेहमीप्रमाणेच पसारा.. मी त्या पसा-यावर कव्हर करायचं म्हणून म्हणालो " इतक सामान झालाय ना..की जागाच पुरत नाही.. आता मोठी जागा घ्यायचं चाललाय.." तो मित्र हसला.. मी म्हणलो "हसायला काय झालं ..? खरच" म्हणाला .. "अरे राजा जागेचा प्रश्न नाही..अव्यवस्था ,बेशिस्त हा तुझ्या स्वभावाचा भाग आहे..मोठी जागा घेउन तुझा पसारा कमी होणार नाही..मोठी जागा घेतलीस तर पसाराही मोठा होइल.. दुसरं काही होणार नाही..! तुला अनावश्यक गोष्टी जमवण्याचा जाम सोस आहे..आणि त्यात बेशिस्त..आता याच जागेतल्या अनावश्यक गोष्टी फेकून दिल्यास ना तर हीच जागा तुला पुरेशी आहे असं वाटेल बघ..पुरे कर आता नको ती जमवा जमवी..!!! " नंतर मी विचार केला योग्यच होतं त्याच म्हणणं.आपल्या मनात देखिल अशीच असंख्य अनावश्यक विचारांची, आठवणींची खोगिर भरती झाली आहे.. नव्या विचाराना काही space च नाही .. नकोत्या गोष्टींना, नाते संबंधांना आपण खूप महत्व देतो.. उगिचच " special treatment" देतो..फेकून द्यायला पाहिजेत अशा अनावश्यक गोष्टी,, चिटकूनच रहातो फार . भावनिक होउन,, पण आता निर्णय घ्यायलाच हवा.. एक अवकाश , एक स्पेस .. तयार करूया..!!!

प्रतिक्रिया

गणपा's picture

17 Dec 2011 - 4:09 pm | गणपा

मुक्तक आवडले.

कुसुमिता१'s picture

17 Dec 2011 - 10:59 pm | कुसुमिता१

छान आहे!

पैसा's picture

17 Dec 2011 - 11:02 pm | पैसा

मुक्तक आवडल. आता कधीतरी राहती जागा बदलून बघा, आपण किती गरज नसलेल्या गोष्टी जमा करून ठेवतो तेही लक्षात येईल!

शरद's picture

18 Dec 2011 - 6:49 am | शरद

देव न लगे, देव न लगे ! साठवणीचे रिघले जागे !!
आपल्या मनात इतक्या फालतू गोष्टी आपण साठवून ठेवतो की त्यात देव ठेवावयाला जागाच उरत नाही ! तुकोबा देव फुकट द्यावयाला निघाले तरी लोकांना तो नकोसा झाला.
शरद

आत्मशून्य's picture

18 Dec 2011 - 6:47 pm | आत्मशून्य

.