गाभा:
बरोबर १० वर्षांपूर्वी आज भारताच्या संसदभवनावर दहशतवाद्यांनी अतिभयंकर हल्ला केला. या हल्ल्यात सुरक्षारक्षकांनी जोरदार प्रतिकार केला आणि केवळ म्हणून ते आत घुसले नाहीत आणि आपण मोठ्या संकटातून वाचलो. त्या दिवशी देशासाठी प्राणार्पण केलेल्या सुरक्षारक्षकांना भावपूर्ण श्रध्दांजली.
इतकी वर्षे झाली तरी या हल्ल्याचा सुत्रधार अजून जिवंतच आहे. त्याला लवकरात लवकर फासावर लटकवावे ही इच्छा.
पुण्याचे वटवाघूळ
प्रतिक्रिया
13 Dec 2011 - 1:12 pm | प्यारे१
सुरक्षारक्षकांना भावपूर्ण श्रध्दांजली.
13 Dec 2011 - 1:13 pm | चिंतामणी
>>>>>>>इतकी वर्षे झाली तरी या हल्ल्याचा सुत्रधार अजून जिवंतच आहे. त्याला लवकरात लवकर फासावर लटकवावे ही इच्छा.
या वाक्याने चर्चेची दारे पुन्हा उघडली आहेत.
असो.
आपल्या मा. राष्ट्रपतींना सही करायला वेळ मिळाला की पुढे कधीतरी शिक्षेची अंमलबजावणी होइल असी भाबडी आशा आहे.
13 Dec 2011 - 1:14 pm | आत्मशून्य
:(
13 Dec 2011 - 1:15 pm | सुहास झेले
तुमची इच्छा इतक्यात पुर्ण होणार नाही.....
त्या हल्ल्यात एखादा तरी नेता मेला असता, तर त्याला फाशी झाली असती निदान छुपा एन्काऊंटर तरी ....
13 Dec 2011 - 1:18 pm | किसन शिंदे
त्या हल्ल्यात एखादा तरी नेता मेला असता, तर त्याला फाशी झाली असती निदान छुपा एन्काऊंटर तरी ....
हेच म्हणतो. एखाद्याची तरी विकेट जायला हवी होती.
13 Dec 2011 - 11:04 pm | देवदत्त
त्या हल्ल्यात एखादा तरी नेता मेला असता, तर त्याला फाशी झाली असती निदान छुपा एन्काऊंटर तरी
काही वेळा असेच वाटते पण तरीही.. राजीव गांधीच्या मारेकर्यांना शिक्षा केव्हा झाली?
13 Dec 2011 - 11:50 pm | चिंतामणी
शिक्षा जाहीर झाली आहे पण अंमलबजावणी नाही झाली.
राजकारण चालू आहे. |( \( :angry:
13 Dec 2011 - 1:19 pm | चिरोटा
भावपूर्ण श्रध्दांजली.
13 Dec 2011 - 1:40 pm | सुहास झेले
ट्विटरवर असलेला फेमस ट्विट....
The only Guru who has mastered the ART OF LIVING is Afzal Guru! #10 years of Parliament attack
13 Dec 2011 - 8:01 pm | विनोद१८
...त्या दिवशी देशासाठी प्राणार्पण केलेल्या सुरक्षारक्षकांना भावपूर्ण श्रध्दांजली
ते सुरक्षारक्षक त्या ह्ल्ल्याच्या सुत्रधाराची वर येण्याची वाट पहात असतील कदाचित्...सूड घेण्यासाठी. त्यान्ची इच्छा पूर्ण व्हावी.
ती पूर्ण होइल का ?????
इतका महत्वाचा विषय मान्डल्याबद्दल व आठवण करुन दिल्याबद्दल ' पुण्याचे वटवाघूळ ' तुमचे आभार.
विनोद१८
13 Dec 2011 - 8:10 pm | डावखुरा
लवकरच अफजल आणि कसाबला श्रद्धांजली वाहण्याचीही संधी मिळो ही ईच्छा..
14 Dec 2011 - 10:14 am | नितिन थत्ते
>>लवकरच अफजल आणि कसाबला श्रद्धांजली वाहण्याचीही संधी मिळो ही ईच्छा..
आम्ही नाही बुवा अफजल आणि कसाबला मेल्यावर "श्रद्धांजली" वाहणार.
13 Dec 2011 - 9:31 pm | प्राजु
आपले सुरक्षा जवान पण ना... !
त्या संसद भवन मध्ये सगळे हलकट नेते असतात हे माहित असूनही त्यांना वाचवायला जीव धोक्यात घातला आणि मेले...!
घुसू द्यायला हवं होतं एखाद्या अतिरेक्याला आत मध्ये.. एखादातरी नेता मेला असता तर निदान कसाबला पोसावंसं वाटलं नसतं नंतर!
सगळ्या जवांनांना आदरांजली!!
13 Dec 2011 - 10:53 pm | दादा कोंडके
कालच फेसबुकवर एकाचा स्टेटस पाहिला.
"Dear God,Your love for films (Shammi Kapoor and Dev Anand), music (Jagjit Singh and Bhupen Hazarika), art(M.F. Hussain) and technology (Steve Jobs) is now beyond all doubt. We suggest to take keen interest in Politics too"
14 Dec 2011 - 6:28 am | सुहास झेले
फेसबुकवर कॉपी करतोय..... :) :)
13 Dec 2011 - 9:49 pm | देविदस्खोत
शहिद सुरक्षारक्षकांना भावपूर्ण श्रध्दांजली ..........!!!!!!! हल्लेखोरांना लवकरात लवकर फाशी होवो ही समस्त भारतवासियांची ईच्छा परमेश्वराने पूर्ण करावी..........!!!!!!!! --" भा र त माता की जय " !!!!!!!! --
12 Feb 2013 - 12:01 am | आशु जोग
" भा र त माता की जय "