मासे ३६) घोये

जागु's picture
जागु in पाककृती
7 Dec 2011 - 3:35 pm

साहित्यः
घोये मासे७-८ किंवा त्याचापेक्षा जास्त.
हळद पाव चमचा
मसाला ७ चमचा
मिठ गरजे पुरते
तेल तळण्यासाठी
थोडा लिंबू रस (ऑप्शनल)
आले-लसुण वाटण (ऑप्शनल)

पुर्वीच्या काळच्या लेंग्यासारखे वाटतात ना ? :हाहा:

कृती :
माश्यांचे शेपुट, पर, खवले काढावीत.
पोटाच्या जागेवर चिर पाडून आतली घाण काढून मासे ३ पाण्यांमधून स्वच्छ धुवुन घ्यावेत.
धुतलेल्या माश्यांना मिठ, हळद, मसाला आणि हवा असल्यास थोडा लिंबाचा रस किंवा आले, लसूण चे वाटण चोळून थोडा वेळ ठेवावे.

गॅसवर तवा गरम करून त्यात तेल सोडून मासे तव्यावर अलटी- पलटी करून खरपूस तळावेत.

अधिक टिपा:
घोये मासे हे खाडीत जास्त प्रमाणात मिळतात.
तसे चविला चांगले असतात पण थोडे काटेरी असतात.
हे मासे शक्यतो तळूनच चांगले लागतात.
रस्सा करायचा झाल्यास इतर माश्यांच्या रश्याप्रमाणे करावा.

प्रतिक्रिया

अत्यंत चविष्ट मासा. :)
जसे जास्त काटे असलेला मासा जास्त चविष्ट असतो तसेच समुद्रातल्या मास्यांपेक्षा खाडितले मासे जास्त चवदार असतात असा स्वानुभव आहे.

थांब. वायपर घेवून आलोच.
बाकी मासे एकदम छान हो जागुताय. लहानपणी खाडीवर जायला बंदी म्हणून जास्तीत जास्त उघडीपर्यंत मजल असायची.
मला काय हे मासे खाता यायचे नाही म्हणून वडील निवडून द्यायचे.मी टिकोजीपणा करत खायचो.

नरेश_'s picture

7 Dec 2011 - 4:51 pm | नरेश_

सध्या मार्गशीर्ष चालू आहे ना, म्हणून नाहीतर.....
जाऊ दे! नक्कोच प्रतिसाद देणं ;)

मला वाटते सर्वच प्रकारच्या माश्यांची फ्राय करण्याची कृती मोअर ऑर लेस एकच आहे. पण नवनवीन मासे पहायला मिळतात या सीरीजमधे मस्त.. धन्स जागुताई..

हो.. चट्ट्यापट्याचा आद्य कोकणी लेंगा आठवला माश्याचे डिझाईन पाहून.

इतके लहान मासे कधी खाल्लेले नाहीत अद्याप. फार काटेवाले खाण्याची सवय नाही. सारखी तोंडात बोटे घालायला लागतात. :(

जाई.'s picture

7 Dec 2011 - 5:39 pm | जाई.

झकास

सहीच एकदम... तोंपासु... :)

विजुभाऊ's picture

7 Dec 2011 - 7:29 pm | विजुभाऊ

इतके लहान मासे कधी खाल्ले नाहीत ( माझ्या आडनावाचा माणूस फार तर पापलेट नाहीतर सुरमई खाणार) पण इतक्या लहान माशात काटे म्हणजे टोचके काटे असतात का धागे धागे असतात?

विश्वनाथ मेहेंदळे's picture

7 Dec 2011 - 8:58 pm | विश्वनाथ मेहेंदळे

विजुभाऊ, आकारावर जाऊ नका, छोट्या माशाचा काटा जीव अडकवू शकतो :-)

रानी १३'s picture

8 Dec 2011 - 4:45 pm | रानी १३

माशाचे डोळे नाही काढायचे का?

(शाकाहारी)-