मसाला (रोजाच्या वापरातला)

जागु's picture
जागु in पाककृती
6 Dec 2011 - 3:29 pm

मिसळ पाव वर बर्‍याच जणांना माझ्या रेसिपीतील मसाला हा काय प्रकार आहे हे जाणून घ्यायचे आहे. म्हणून ह्या वर्षी वर्षी केलेला हा मसाला इथे देत आहे.

मसाल्याच्या रंगावर जाऊ नका. ह्या मसाल्याच्या पदार्थातही अनेक औषधी गुणधर्म आहेत. ह्यात असलेले जिरे, धणे थंड गुणाचे असतात. त्यामुळे ह्याचा दाह तेवढा जाणवत नाही.

साहित्य :

मसाला १ किलोच्या प्रमाणात करायचा असेल तर
१/२ किलो संकेश्वरी मिरची (जास्त तिखट हवा असेल तर पांडी/घाटी मिरची)
१/२ लो बेडगी किंवा काश्मिरी मिरची
५० ग्रॅम धणे
६० ग्रॅम मिरी
१०० ग्रॅम राई
६० ग्रॅम खसखस
५० ग्रॅम हळद
५० ग्रॅम जिरे
१० ग्रॅम शहाजिरे
१० ग्रॅम लवंग
१० ग्रॅम दालचिनी
१० ग्रॅम बाद्यान
४ ग्रॅम मसाले वेलची
४ ग्रॅम दगडी फुल
५ ग्रॅम तमाल पत्र
६ ग्रॅम जायपत्री
४ ग्रॅम नाकेश्वर
४ ग्रॅम तिरफला
अर्धा जायफळ
छोटासा हिंगाचा खडा

मी पाच किलो मिरचीचा मसाला केला त्यात मी तिन प्रकारच्या मिरच्या घेतल्या. २ कोलो पांडी, २ किलो बेडगी आणि १ किलो काश्मिरी.

ही आहे पांडी उर्फ घाटी मिरची. मला मार्केटमध्ये संकेश्वरी मिरची चांगली नाही मिळाली म्हणुन पांडी घेतली

ही आहे बेडगी मिरची हि रंग चांगला येण्यासाठी वापरतात.

ही आहे काश्मिरी मिरची रंग लाल भडक येण्यासाठी ही मिरची घेतात. हिच्या लाल भडक रंगाप्रमाणे हि महाग असते. ही आकाराने रुंद व बुटकी असते.

हे आहे ५ किलोच्या मसाल्याचे साहित्य

कृती :

मिरची २-३ दिवस चांगली कडक उन्हात तापवा.

१-२ दिवस तापली की जरा कुरकुरीत होते मग ती मोडायला सोपी पडते. मिरचीची देठे काढून (काही जणं नाही काढत देठे तसेही चालते, हल्ली बाजारात देठे काढलेली मिरची पण मिळते) एका मिरचीचे दोन ते तिन तुकडे करा. मिरचीचे तुकडे केल्यावर त्यातील जे बी पडते ते वेगळे ठेवायचे.

ज्या दिवशी मसाला करायचा असेल त्या दिवशी मसाल्यासे सगळे सामान कडकडीत उन्हात वाळवा. आधीपासुन वाळवले तर मसाल्यांचा वास काही प्रमाणात उडतो असे आईचे मत आहे.

प्रचि १) मध्ये हळद व बाजुला दालचिनी, तमालपत्र,जायपत्री, मिरी व बाद्यान किंवा चक्रिफुल

प्रचि २) मध्ये जिर बाजुला डाविकडुन दगडफुल, शहाजिर, लवंग, मसाले वेलची, हिंग, नाकेश्वर, जायफळ, तिरफला,

प्रचि ३) ह्यामध्ये मधल्या डिशमध्ये खसखस, दोन परातीत राई व धणे. पाठचे दोन थाळे प्रचि १ व प्रचि २ आहेत.

आता मसाला करण्यासाठी सज्ज व्हा.

हळद, हिंग खडा आणि जायफळ वेगवेगळे कुटून त्यांचे बारीक तुकडे करुन वेगवेगळे ठेवा.

मोठ्या कढईत किंवा टोपात मिरच्या भाजुन घ्या. जास्त भाजु नका नाहीतर रंग काळा पडेल. तापतील इथपत ठिक आहे. (काही जणं मिरच्या भाजत नाहीत त्या गिरणीत भाजल्या जातात असे त्यांचे मत आहे) हे जरा सहनशिलतेचे काम आहे. कारण मिरच्यांचा तिखट ठसका लागत राहतो मिरची भाजताना. तोंडाला फडके बांधुन भाजलेत तर ठसक्याचे प्रमाण कमी होईल.

मोकळ्या जागी खाली पेपर रचुन ठेवा. त्यावर भाजलेल्या मिरच्या गार करण्यासाठी ठेवा.

मिरच्या भाजून झाल्यावर राई सोडून मसाल्यासाठी लागणारे सगळे साहित्य एक एक करुन भाजा, करपवु नका. जिर, शहाजिर एकत्र भाजलत तरी चालेल, मिरी, तिरफला, नाकेश्वर असे जे एकाच आकाराचे पदार्थ आहेत ते एकत्र भाजलेत तरी चालतील. मिरचिच्या बियाही भाजुन घ्या. बाकीचे सगळे जिन्नस भाजुन झाले की मिरच्यांवर टाकुन गार करण्यासाठी ठेउन द्या.

आता राई करपेपर्यंत भाजा. करपली कि थंड करुन ती मिक्सरमध्ये वाटून एका डब्यात भरुन ठेवा. राई दळायला गिरणवाले घेत नाहीत कारण ती गिरणीला चिकटते. म्हणुन घरीच मिक्सरमध्ये काढून सोबत घेउन जायची.

आता मिश्रण गार झाले की ते स्वच्छ जाड पिशवीत भरा आणि दळायला घेउन जा. सोबर दळलेली राई न्यायला विसरू नका. मसाल्या दळणाच्या वेळा ठरलेल्या असतात. एक दिवस आधीच विचारुन या गिरणवाल्याला की मसाला कधी आणु ? (अपॉइंटमेंट घ्यावी लागते दळणासाठी )

आता गिरण वाल्याकडे मिश्रण आणि राईची पुड सोपवा आणि लक्ष ठेवा तो आपलेच दळण आपल्याला देतो का ? (हे ऑप्शनल आहे, विश्वासावर अवलंबुन आहे :हाहा:) आपली मिरची दळली की गिरणवाल्याकडे हल्ली चाळण्यासाठी बायका असतातच. मग ह्या बायका मसाला चाळतात आणि त्यात राई मिक्स करुन देतात. पुर्वी आपल्यालाच बायका मॅनेज कराव्या लागत. किंवा मग घरातलच कोणितरी चाळावी लागे. आता जर तुम्ही डबा नेला असेल तर डब्यात किंवा पिशवीत मसाला भरुन आणा.

(स्टिलच्या डब्याचा फ्लॅश मसाल्यावर पडलाय म्हणुन फोटो तिखट मानुन घ्या.)

मसाला थंड झाला की एखाद्या घट्ट झाकणाच्या डब्यात भरुन वरुन १-२ हिंगाचे खडे ठेवा म्हणजे तो लवकर उतरत नाही. तसेच त्याच्या तुम्ही पाव किलो अर्था कोलो च्या पिशव्या भरुन मेणबत्तीने पॅक करुन ठेवलात की डब्याच्या उघडझाकीमुळे मसाल्याला हवा लागणार नाही.

इति मसाला पुराण संपुर्णम.

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

6 Dec 2011 - 3:35 pm | विनायक प्रभू

तुमच्या आईच्या मताशी सौ. मास्तर एकदम सहमत.
(आत्ताच फोनवर बोलुन मगच प्रतिक्रिया लिहीली)
हे सायन्स आहे. खुप ठिकाणी लागु होते.

गणपा's picture

6 Dec 2011 - 3:42 pm | गणपा

+१००
;)

आवांतर : त्या विनय पाठकला मिरची लागली असावी काय हो मास्तर. ;)

विनायक प्रभू's picture

6 Dec 2011 - 3:47 pm | विनायक प्रभू

मिरची बरोबर तिरफळाने त्रिफळा उडाला.
तिरफळ सहन करायला कोकणी आतडे लागते.

पियुशा's picture

6 Dec 2011 - 3:57 pm | पियुशा

सेम सेम :)

गणपा's picture

6 Dec 2011 - 3:38 pm | गणपा

+१
:)

विनायक प्रभू's picture

6 Dec 2011 - 3:41 pm | विनायक प्रभू

सायन्स समजुन घेण्यास गणपाला व्य.नी करावा.

कोकण सोडून १०/१२ वर्षे झाली पण अजून आम्ही असाच बनवलेला मसाला वापरतो.
कुल मिलके १६ मसाल्याचे पदार्थ टाकून मिरची १७वि.... भन्नाट,
काय पण बनवा प्रकृतीनुसार हा मसाला घालायचा जाम भारी .

ता. क. चपाटा नावाची एक मिरची अजून मिळते तिचा रंग इतका गडद येतो कि भाजी पाहूनच पोटात गुर गुर सुरु होते कि काय असे वाटते.

अन्या दातार's picture

6 Dec 2011 - 3:42 pm | अन्या दातार

तुमच्या पेशन्स ची दाद द्यावी तितकी कमी आहे. हा सगळा प्रकार करताना, कॅमेरा जवळ बाळगणे आणि न चुकता फोटो काढणे हे अगदी लक्षात ठेवून करायचे काम आहे. :)

michmadhura's picture

6 Dec 2011 - 3:44 pm | michmadhura

जागुताई, खूप सुंदर माहिती.

मोहनराव's picture

6 Dec 2011 - 3:47 pm | मोहनराव

_/\_ जागुतै तुमचं हा मसाला बॅचलर लोक फक्त पाहू शकतात बाकी काही करु शकत नाहीत. हे समदं जमण्यासाठी जे कौशल्य लागतं ते तुम्हासारख्या कुशल सुगरणींनाच जमणार!!

कपिलमुनी's picture

6 Dec 2011 - 8:56 pm | कपिलमुनी

आई, काकु, मावशी, मामी , ताई ..वहिनी कितितरी जणी असतात कि ...
बायकोच पाहिजे मसाला कुटायला असा काही नाही ..

घरापासुन दुर रहाणारे बॅचलर लोक असे म्हणायचे होते कप्या!!

प्रभाकर पेठकर's picture

6 Dec 2011 - 5:31 pm | प्रभाकर पेठकर

झणझणीत आणि रंगतदार मसाला पाककृती. माशांच्या पाककृतीस एकदम पोषक.

नाकेश्वर = नागकेशर??
तिरफला = तिरफळं??

पांडी मिरची म्हणजेच गुंटूर मिरची का? तीही तशीच झणझणीत असते.

तिखटाला नुसताच रंग आणि तिखटपणा नसतो तर 'चव' हा गुणही असतो. गुंटूर तिखटपणासाठी, काश्मिरी रंगासाठी आणि बेडगी किंवा संकेश्वरी चवीसाठी असे मिश्रण व्यक्तीशः मला आवडते.

विनायक, गणपा, पियुशा, इरसाल, अन्या, मधुरा, मोहनराव धन्यवाद.

प्रभाकर गावांप्रमाणे जिन्नसांची काही ठिकाणी नावे व उच्चारायची पद्धतही वेगळी असते. धन्यवाद.

चित्रा's picture

6 Dec 2011 - 7:25 pm | चित्रा

धन्यवाद. ते दगडफूल नाव पहिल्याप्रथम ऐकले तेव्हा फार गंमत वाटली होती ते आठवते.

प्राजु's picture

6 Dec 2011 - 9:05 pm | प्राजु

आई गं!!
बघूनच मस्त झणझणीत भाजी करावी वाटतेय.

निवेदिता-ताई's picture

6 Dec 2011 - 9:25 pm | निवेदिता-ताई

मस्त ग जागुतै.....................

ए तुला सांबार मसाला येतो का??

मला त्याची कॄती दे ना...मला बनवायचा आहे.... :)

निवेदीता काही दिवसांत देते.

चित्रा, प्राजू धन्यवाद.

हा वेगळाच मसाला आहे. फोटो छान आलेत.
वाळवणांचे फोटो पाहून आई गव्हाला ऊन द्यायची किंवा मिरच्या वाळवायची त्याची आठवण झाली.

आम्ही घाटि ,तिरफळ बिरफळ नाहि सहन होत, सकाळच्याला उतारा द्यावा ..........

अत्रुप्त आत्मा's picture

6 Dec 2011 - 11:17 pm | अत्रुप्त आत्मा

मोडलेल्या मिर्चीवर बाकीचे मसाल्याचे पदार्थ टाकलेत ना,,,त्या खालच्या पेप्रावर एक फोटु हाय ,तशी आमची मसाला करायला गेलो तर अवस्था होइल.... आणखि काही नाही-फक्त भेजा फ्राय ---^---

अवांतर---कित्ती गहन आहे हे मसाला करणे प्रकरण....घर ते गिरणी :tired: आमच्या सारख्याचं खरच पीठ पडेल.

एकनाथ जाधव's picture

7 Feb 2018 - 1:43 pm | एकनाथ जाधव

काय तेनिरीक्शन्न

वीणा३'s picture

7 Dec 2011 - 1:08 am | वीणा३

पण कधी करायची हिंमत होइल अस वाटत नाही :(

असा मसाला बनवायला वेळ आणि कष्ट लागतीलच. माझ्या घरी हे दरवर्षी बघतो... :)

- पिंगू

परंतु रंगीबेरंगी दुपट्यावर वाळत घातलेल्या लालभडक मिरच्या बघूनच एकदम मस्त वाटलं! :)

(मिर्चमसालाप्रेमी) रंगा

ते दुपटं नाहिये साहेब!
बेडशीट आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

8 Dec 2011 - 6:39 pm | परिकथेतील राजकुमार

ते दुपटं नाहिये साहेब!
बेडशीट आहे.

मी काही वाचले नाही....
माझ्या मनात काही आले नाही...

चतुरंग's picture

8 Dec 2011 - 7:46 pm | चतुरंग

तुझ्या मनात कशाला काय येतंय मेल्या! तू मुळातच भोचक आहेस त्यामुळे तुझी प्रतिक्रिया एवढ्या उशीरा कशी आली याचेच आश्चर्य आहे! ;)

(खुद के साथ बातां : एक शब्द चुकला तर त्यावर ही जनता टपूनच बसलेली आहे रे रंगा, टाईपताना काळजी घे जरा!)

(रंगीबेरंगी बेडशीट प्रेमी) रंगा

प्रभाकर पेठकर's picture

8 Dec 2011 - 7:39 pm | प्रभाकर पेठकर

ते दुपटं नाहिये साहेब!
बेडशीट आहे.

ती वापरातील नसावी एवढीच त्या जगन्नियत्याच्या चरणी प्रार्थना.

हो ना नसत्या ठिकाणी मिरच्या झोंबायच्या! ;)

(ब्याडगीप्रेमी)रंगा

सुहास झेले's picture

7 Dec 2011 - 4:01 am | सुहास झेले

एकदम जबरा ..!!
माझी आई पण असाच मसाला करते, पण मला ते गुणधर्म माहित नव्हते... बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. आईला देतो हा धागा वाचायला :) :)

जागु's picture

7 Dec 2011 - 12:41 pm | जागु

धन्स सगळ्यांचे.

सानिकास्वप्निल's picture

7 Dec 2011 - 6:12 pm | सानिकास्वप्निल

मस्तच दिसत आहे मसाला :)
तु खरचं ग्रेट आहेस जागुतै :)

निवेदिता-ताई's picture

7 Dec 2011 - 8:15 pm | निवेदिता-ताई

ग्रेट......ग्रेट......ग्रेट......

मोदक's picture

7 Dec 2011 - 9:46 pm | मोदक

जागुतै , आमच्या कडे या मसाल्यात खोबरे (भाजून) आणि कांदा (तळून - बिर्याणीवर असतो तसा) घालतात...

त्याने चवीत फरक पडतो का..?

मोदक.

मोदक त्याला कांदा-लसुण मसाला म्हणता. तो वेगळा असतो. तोही केला आहे मी थोडासा.
सानिका, निवेदिता धन्यवाद.

मोदक's picture

8 Dec 2011 - 5:09 pm | मोदक

धन्स जागुताई. :-)

वेळ मिळेल तसे पुढील मसाल्यांच्या बद्दल पण लिही ना..

कांदा लसूण मसाला
काळा मसाला
गोडा मसाला
उपवासाचे तिखट

मोदक.

पुष्करिणी's picture

8 Dec 2011 - 1:41 am | पुष्करिणी

अगदी देखणी कृती, प्रचंड पेशन्स आणि आवड आहे तुम्हांला..ग्रेट

इंटरनेटस्नेही's picture

8 Dec 2011 - 5:02 am | इंटरनेटस्नेही

_/\_ सुर्पब! आजवर मिपावर अनेक पाकृ आल्या, पण अशी फंडामेंटल पाकृ विरळाच!
प्रिंटआउट काढुन फाईल केली आहे. मसाला दिसतोय पण एकदम टेंम्प्टींग!

५० फक्त's picture

8 Dec 2011 - 9:42 am | ५० फक्त

मस्त मस्त मस्त, बेसिक शिकवल्याबद्दल धन्यवाद. सगळे फोटो सुद्धा मस्त आले आहेत.

अवांतर - हल्ली तुम्हाला किचन मध्ये कॅमेरा घेउन फोटो काढताना पाहुन घरचे डोळे मोठे करुन पाहात असतील ना ?

५० - त्याच्या उलट झालय जर जेवण करताना माझ्याहातात कॅमेरा दिसला नाही की त्यांना चुकल्या चुकल्यासारख वाटत काहीतरी.

पुष्करिणी, इंटरनेट्स्नेही धन्यवाद.

५० फक्त's picture

8 Dec 2011 - 8:10 pm | ५० फक्त

हे असं का जागुतै

परिकथेतील राजकुमार's picture

8 Dec 2011 - 6:41 pm | परिकथेतील राजकुमार

हे सगळे तू जे काय इथे टाकत असतेस, तो खायचा योग कधी येणार आहे ?

काही योग जुळवून आणावे लागतात प्रसाद. एकदिवस जमवूया.

परिकथेतील राजकुमार's picture

8 Dec 2011 - 6:58 pm | परिकथेतील राजकुमार

एकदा येतोच येतो तिकडे :)

मलापण सांग मीपण नंबर लावतो. विकांताला मला तरी उरण जास्त लांब पडणार नाही.. :)

- पिंगू

प्रसाद स्वागत आहे तुमच. पिंगु कुठे राहता तुम्ही ?

ती बेडशीट बिनवापरातलीच आहे. कृपया एक विनंती आहे की मसाल्याच्या तयार करण्याच्या बाबतीतच इथे कॉमेन्ट्स कराव्यात.

प्रभाकर पेठकर's picture

9 Dec 2011 - 1:39 pm | प्रभाकर पेठकर

क्षमस्व.

प्यारे१'s picture

9 Dec 2011 - 11:58 am | प्यारे१

फटु बघूनच 'जाळ ' झाला.

अवांतरः फटु दिसलेच आत्ता तर काय करणार?
धागा टाकल्यापासून प्रयत्न करतोय, मिरच्या नि बाकी मसाले दिसतच नव्हते.
दुपटे / बेडशीट पण. आज दिसले. छान आहे. ;)

जागू,
हा मसाला करायचा म्हणून किचन स्केल घेतले.
तू दिलेल्या प्रमाणाच्या १/४ प्रमाणात मिरच्या न घालता मसाला केला. इथे मिळणारे रेशमपट्टी तिखट घालून सगळे मिक्स केले. मस्त झालाय. धन्यवाद.

जागुतै ग्रेट आहेस
सगळं प्रेझेँटशन निगुतीने केलंस अगदी

मी येउ का

जेवणानन्तर दुपटे पुरणारच नाही , बेडशीट्च लागेल...........

पक पक पक's picture

9 Dec 2011 - 10:52 pm | पक पक पक

क्श्म्स्व!!!!!

लव उ's picture

5 Mar 2014 - 5:13 pm | लव उ

माझी आई पण असाच मसाला करायची...
खूप दिवसात जागुतै कडून मत्स्यावताराबद्दल काही वाचले नाही.

जागुताई तुम्ही महान आहात. बहुतेक घरी सासू सुनेलादेखील आपला मसाल्याचा फोर्मुला देत नाही तुम्ही तो चक्क आंतरजालावर टाकलात. :)

तुमच्या पद्धतीनुसार मसाला बनवला. थोडेफार किरकोळ बदल केले. महत्वाचा बदल नातेवाईकांना विचारून केला तो म्हणजे धणे ५० ऐवजी २५० ग्राम घेतले. मसाल्याची चव एकदम मस्त झाली आहे. तुमचे खूप खूप आभार.

जास्त धणे घातले की मसाला उतरतात असे म्हणतात. पण धण्यामुळे दाहकता कमी होते मसाल्याची. पण कमी धण्यामुळे मसाल्याचा रंग चांगला टिकुन राहतो हे खरे आहे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

27 Oct 2014 - 12:08 am | निनाद मुक्काम प...

ए ताय
एवढे सगळे करायचे म्हणजे अंगावर काटा आला.आणि मला घरात परवानगी सुद्धा मिळणार नाही तो मुद्दा वेगळा .
असा मसाला तयार बाजारात नाही का मिळत

निनाद बाजारात आगरी कोळी मसाला मिळतो तो साधारण असा असतो किंवा पोटेचा मिक्स मसाला. पण घरी बनवलेल्या मसाल्या सारखा स्वाद त्याला येत नाही. शिवाय तिखटाचे प्रमाण आपण घरी केलेल्या मसाल्यात कमी-अधिक करू शकतो.

सुखीमाणूस's picture

7 Feb 2018 - 4:59 pm | सुखीमाणूस

जागु ताई केवढे कष्ट आहेत हे.
पण भारी आहे हा मसाला.
तुमच्या व्यवस्थितपणाच कौतुक कराव तितक थोडंच आहे.
अशाच पाककृती लिहीत राहा.

जागु's picture

8 Feb 2018 - 11:45 am | जागु

धन्यवाद :)