पनीर चिली

कपिलमुनी's picture
कपिलमुनी in पाककृती
5 Dec 2011 - 3:45 pm

नमस्कार मंडळी ..
गुरुवर्य गणपा यांसी प्रणाम करुन माझिइ पहिली पाकृ देत आहे ..
मि पा वर आणि पाक कले मधे नवीन प्रवेश असल्याने नवा प्रयोग न करता साधीच रेसीपी पुन्हा देत आहे
पूर्वी स्वाती आणि सानिकास्वप्निल यांनी दिली होती
http://www.misalpav.com/node/8373
http://www.misalpav.com/node/17037

तरी पण हाता हाताची चव वेगळी ..

पूर्व तयारी

२५० ग्राम पनीर लांब तुकडे karun
१ कांद्याच्या पातीची जुडी
४ सिमला मिरची
७-८ हिरव्या मिरच्या लांब चिरून
६-७ हिरव्या मिरच्या एकदम बारीक चिरून
१०-१२ लसून पाकळ्या बरीईक चिरून
२" आले बारीक चोकोनी चिरून
१ वाटी कॉर्नफ्लोवर पीठ
१ वाटी मैदा
१ छोटा चमचा अजिनोमोटो
सोया सॉस
व्हिनेगर
चिली सॉस
मीठ
ओलिव्ह ओईल किंवा तेल

कापाकापी
पहिल्यांदा मिरच्या, कांदा पात , पनीर चिरुन घ्या

कॉर्नफ्लोवर पीठ व मैदा एकत्र करून घ्या ..त्या मध्ये सोया सॉस , व्हिनेगर,मीठ आणि पाणी घाला

याची घट्ट पेस्ट तयार करा .. त्या मध्ये पनीरला टाकून १० मिनिट ठेवा

कढई मध्ये तेल तापवत ठेवा ..पनीर आता बाहेर काढा ..त्या भोवती मिश्रणाचे कोटिंग असेल ..पनीर तपकिरी / सोनेरी होईपर्यंत तळून घ्या ..आता बाहेर काढून ठेवा.. ( लेयर नाही आलि फार दाट)

चिरलेले सर्व पदार्थ कढई मध्ये टाका ..ते फ्राय करा ..

आता सॉस चे मिश्रण त्यात घाला ..हवे असेल तर पाणी घाला

.नंतर पनीर त्या मध्ये घाला ..गरम करा..थोड्या वेळाने बाहेर काढा

कांद्याची चिरलेली पात आणि लांब मिरच्या चे डेकोरेशन करा आणि सर्व्ह करा

मिपाकरहो..पहिलीच डिश आहे ..'.पनीर चिली' गोड मानुन घ्या

प्रतिक्रिया

यम्मी !
मला फार आवड्त पनीर - चीली
रेसेपी बद्द्ल आभारी आहोत :)

स्पा's picture

5 Dec 2011 - 3:58 pm | स्पा

मस्त

मुनीवर्य पहिलाच प्रयत्न सुत्य आहे. :)

त्या पराला बोलवा रे लवकर. त्याची आवडती डिश आली आहे. ;)

परिकथेतील राजकुमार's picture

5 Dec 2011 - 4:11 pm | परिकथेतील राजकुमार

श्री. कपिलमुनी, आपण आपल्या पहिल्याच प्रयत्नान ही अशी भिकार आणि टूकार डिश का दिलीत हे समजू शकेल काय ?

अहो काच खा, कागदाचे बोळे खा वेळ पडली तर विष खा. पण हे पनीर काय खायची गोष्ट आहे का ?

असो...

आकाशातला बाप तुम्हाला माफ करो.

गणपा मेल्या तुला आकाशातल्या बापाने माफ केले तरी मी करणार नाही. ;)

मी-सौरभ's picture

5 Dec 2011 - 6:09 pm | मी-सौरभ

यावर उतारा म्हणून 'भन्नाट' नाहीतर 'मंदाकिनी'चा पुढचा भाग टंका बरं!!

चिंतामणी's picture

6 Dec 2011 - 12:49 pm | चिंतामणी

नॉन वेज डिश टाकली तरी तेच आणि वेज टाकली तरी तेच.

काहीतरी चांगले खायला शिक रे.

@ कपिलमुनी
तुम्ही लक्ष देउ नका तिकडे वरती ;)
पनीरच्या अजुन नविन नविन डिश येउ द्या लवकर :)

( पनीरप्रेमी पियु )

पियुशा शी सहमत.
कपिलमुनी त्या परा कडे लक्ष नका देवु. त्याला चांगल्या डिशाना नाय म्हणायची सवयच आहे.
साधी शेंगदाणा भजी खाताना फक्त वरचे टरफल काढून आतले दाणे तेवढे खात असतो. ( का विचारले तर म्हणतो : डॉक्टरानी बाहेरचे काहिही खायला नाही म्हंटलय )
ल्हानपणी सुद्धा तो असेच करायचा. भेळ खायची सोडून कागदावरची मल्लीका शेरावत पहात बसायचा

परिकथेतील राजकुमार's picture

7 Dec 2011 - 10:47 am | परिकथेतील राजकुमार

आपल्या ह्या प्रतिसादाचा स्क्रीनशॉट सिब्बल साहेबांच्या हापिसात पाठवल्या गेल्या आहे.

पक पक पक's picture

5 Dec 2011 - 6:01 pm | पक पक पक

काय झाले भाऊ एवढे नाराज का झालात्?त्या बरोबर काहि गार गार हवे का पिण्यास , मग घ्या ना !आणी आत्मा शान्त करा.

पक पक पक's picture

5 Dec 2011 - 6:03 pm | पक पक पक

का अधिच झाले आहे ?

मी-सौरभ's picture

5 Dec 2011 - 6:10 pm | मी-सौरभ

स्तुत्य प्रयत्न...

कपिलमुनी's picture

5 Dec 2011 - 6:34 pm | कपिलमुनी

खायला ये एकदा

मी-सौरभ's picture

6 Dec 2011 - 1:38 pm | मी-सौरभ

आयुर्विमा आहे माझा त्यामुळे नक्की येइन
अन येताना पेय पण घेऊन यीन!!!

सन्जोप राव's picture

5 Dec 2011 - 6:47 pm | सन्जोप राव

आवडली. बल्लवाचार्य गणपा यांची पुढली पिढी तयार होते आहे, ही उत्साहवर्धक गोष्ट आहे.

मी-सौरभ's picture

6 Dec 2011 - 1:45 pm | मी-सौरभ

राव साहेब,

गणपा शेठ ना सहकारी तयार होतायत असं म्हणा...
आजच गणपाला मागच्या पिढीत टाकलतं??? बरेच तरुण आहेत आमचे गणपाभौ (५५+ चा धागा बघितला नाहीत का?? )

प्रभाकर पेठकर's picture

5 Dec 2011 - 6:49 pm | प्रभाकर पेठकर

प्रयत्न बरा दिसतो आहे. अभिनंदन.

( लेयर नाही आलि फार दाट)

पनीरला घोळवलेले पीठ/मसाला नीट लागलेला दिसत नाही. पनीर ओले असल्यामुळे मसाला चिकटणार नाही.
खात असाल तर पीठात एक अंडे मिसळा. अंडे खात नसाल तर घोळविलेल्या पीठात/मसाल्यात पनीर टाकण्या पुर्वी कोरड्या पीठात घोळवून मग मसाल्यात नुसते बुडवून लगेच तळा. (बुडवून ठेवू नका)
एवढे उपद्व्याप कराच कशाला? पनीर थेट तेलात तळून घ्या. (पनीर लगेच शिजते. जास्त वेळ तेलात ठेवू नका)

चिरलेल्या वस्तू तेलात टाकण्याचा क्रम आहे.
आधी तेल चांगले तापले की आलं-लसूण टाका. ते नीट परतून घ्या. नंतर हिरव्या मिरच्या मस्त तिखटपणा तेलात उतरेपर्यंत तळा, नंतर पाती कांद्याचा बारीक चिरलेला कांदा टाका. (पात नको) त्या नंतर ढोबळी मिरच्या टाकून अर्धवट शिजवा. त्यावर तळलेले पनीर टाकून मिसळा. सॉय सॉस, लाल किंवा हिरवा चिली सॉस, व्हिनेगर टाकून कि़चित शिजवा. शेवटी पाण्यात घोळविलेले कॉर्नस्टार्च घालून (२ -३ टेबलस्पून) दाट झाले की उतरवा. सरतेशेवटी कांद्याची पात टाकून सजवा.

कपिलमुनी's picture

5 Dec 2011 - 7:09 pm | कपिलमुनी

मस्तच ...
क्रम छान दिलात ..
धन्यवाद

( शिकाउ) मुनी

मोहनराव's picture

5 Dec 2011 - 11:20 pm | मोहनराव

कप्या चांगला प्रयत्न आहे. व्हेज सोडुन तु फिश वगैरे काही धागे टाकशील असे वाटले होते, जी तुझी स्पेशॅलिटी आहे.
पुलेशु!!

(पनीर जास्त न आवडणारा) मोहन.

ही पाकृ लवकरच करण्यात येईल. धन्स.

सानिकास्वप्निल's picture

6 Dec 2011 - 1:10 am | सानिकास्वप्निल

आवडली पाकृ :)

छान. एकदा एका ठीकाणी मी ड्राय चिली पनीर नावाचा पदार्थ खाल्ला होता त्यासारखा पदार्थ अन चव अजुनही सापडलेली नाही.

सुहास झेले's picture

6 Dec 2011 - 4:35 am | सुहास झेले

मस्त... मला आवडतो हा प्रकार.

रेसीपीसाठी धन्स :) :)

पैसा's picture

6 Dec 2011 - 11:12 am | पैसा

पाकृ आणि पेठकर काकांची व्हॅल्यु अ‍ॅडिशन छान. यातले अजिनो मोटो बाद करून प्रयत्न केला जाईल. (अजिनोमोटो खाल्लं तर माझे २/३ दिवस वाईट जातात.)

वेताळ's picture

6 Dec 2011 - 12:54 pm | वेताळ

पण पनीरचे तुकडे अजुन लहान करता येतील.

अन्या दातार's picture

6 Dec 2011 - 1:56 pm | अन्या दातार

तसेच पनीरचा भुगासुद्धा करता येईल. हो कि नै?

स्तुत्य प्रयत्न!

चला.. मिपाचे स्वयंपाकघर आणखी समृद्ध होते आहे. :)

नविन रेशिपि मिळाली ....'पनिर चे पिठले '