साहित्यः
पालक - १ जुडी
बेसन - १/२ कप
तांदुळाच पीठ - ३ चमचे
आले-लसुण पेस्ट - १ चमचा
हिरवी मिरची पेस्ट - १ चमचा
हळद - १/२ चमचा
लाल तिखट - १ चमचा
गरम मसाला - १/४ चमचा
हिंग - १/४ चमचा
ओवा - १ चमचा
तिळ - १ चमचा
तेल - १ चमचा
मिठ चवीनुसार
कृती:
१. पालक धुवुन १ तास निथळत ठेवावा. जितका जास्त कोरडा करता येईल, तेवढा कोरडा करुन घ्यावा.
२. पालक बारीक चिरुन घ्यावा.
३. त्यात बेसन, तांदुळाचे पीठ, आले-लसुण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट, हळद, ओवा, लाल तिखट, गरम मसाला, तिळ व चवीनुसार मिठ टाकावे.
४. हे पीठ निट मिक्स करावे. हे करताना पालकाला पाणी सुटल्यामुळे पीठ ओले होते.
५. १ चमचा तेल गरम करुन घ्यावे. हे गरम केलेले तेल ह्या पालकामधे टाकावे.
६. कोथिंबीर वडी करताना जसे आपण त्याचे लंबगोलाकार गोळे करतो, तसेच पालकाचे पण गोळे करुन घ्यावेत.
७. एका पातेल्यात पाणी उकळण्यास ठेवावे. एका चाळणीला तेल लावुन त्यात हे गोळे ठेवावे.
८. हे गोळे १०-१५ मिनिटे वाफवुन घ्यावेत.
९. १०-१५ मिनिटांनी गोळे बाहेर काढुन गार होउ द्यावेत. गार झाल्यावर त्याच्या वड्या कापाव्यात.
१०. ह्या वड्या shallow fry कराव्यात. तशाच छान लागतात.
११. ह्या वड्या तळुन किंवा नुसत्या उकडलेल्या पण चांगल्या लागतात.
प्रतिक्रिया
1 Dec 2011 - 4:53 am | सुहास झेले
व्वा व्वा.. सहीच !!!
भुक लागली :) :)
1 Dec 2011 - 1:15 pm | पियुशा
छान :)
आम्ही कोथिम्बिर वडया पण अशाच बनवतो सेम .
1 Dec 2011 - 4:00 pm | प्यारे१
>>>आम्ही कोथिम्बिर वडया पण अशाच बनवतो सेम .
आम्ही शब्दाबद्दल अधिक माहिती अपेक्षित आहे.
आदरार्थी बहुवचन की कसे?
1 Dec 2011 - 4:02 pm | Mrunalini
धन्स पियुशा. अगं मी पण कोथिंबीरच्या वड्या अशाच करते. पण इथे आपल्या सारखी कोथिंबीर मिळत नाही. इथे सेलेरी मिळते आणि ती खुप उग्र वाटते मला. मला नाही आवडत. पण नवर्याला कोथिंबीरच्या वड्या खुप आवडतात, म्हणुन म्हटले पालकाच्य करुन बघु. तर एकदम मस्त झाल्या.
मी अशाच कोबीच्या वड्या पण ट्राय केल्या होत्या, पण त्या एवढ्या खास नाही वाटल्या.
1 Dec 2011 - 1:30 pm | मृत्युन्जय
सहीच दिसते आहे राव.
1 Dec 2011 - 1:39 pm | गणपा
मस्त. :)
1 Dec 2011 - 2:36 pm | पप्पुपेजर
पालक वडे पण अशेच करतात का ?
1 Dec 2011 - 2:41 pm | प्रभाकर पेठकर
छान दिसताहेत पालकाच्या वड्या. करून पाहाव्या म्हणतोय. अभिनंदन.
पालकात लोह तसेच अ आणि क जिवनसत्व मुबलक असते.
1 Dec 2011 - 2:52 pm | सानिकास्वप्निल
वाह!! छानच :)
1 Dec 2011 - 2:54 pm | मेघवेडा
मस्तच.. सगळं साहित्य घरी आहे का हे आधी आठवून पाहिलं.. सगळी चेकलिस्ट पूर्ण झाली एक्सेप्ट चाळण. दुसरा काही उपाय??
आणखी एक प्रश्न : वड्या वाफवून घेणारच आहोत तर आधी पालक तासभर निथळत ठेवण्याचं काय प्रयोजन? (थोडक्यात काय तर तो एक तास एलिमिनेट करता येईल का असा विचार करत होतो! ;) )
चाळणीऐवजी दुसरा उपाय सापडल्यास आजच्या आज करून पावती दिली जाईल हो मृणालिनी! :D
1 Dec 2011 - 3:27 pm | विशाखा राऊत
मायक्रोवेव्ह मध्येपण होईल.
1 Dec 2011 - 3:58 pm | Mrunalini
चाळणी नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही. ज्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवले आहे, त्यात पाणी थोडे कमी ठेवावे. त्या पाण्यात एक बाउल ठेवावे. पण हे बाउल त्यामधे नीट बसले पाहिजे, ते तरंगायला नको. आता त्या बाउल वर एक छोटी ताटली ठेवावी. ती ताटली त्या पातेल्यात गेली पाहिजे. त्या ताटलीवर हे पालकाचे गोळे ठेवावे. पातेले झाकुन १०-१५ मिनिटे ठेवावे. १०-१५ मिनिटात गोळे शिजतील. :)
1 Dec 2011 - 10:13 pm | रेवती
पालकात आधीच पाणी जास्त असते त्यात भर म्हणून थोडेजरी बाहेरचे पाणी असले तर पातळ भाजीच होईल म्हणून जरा जास्त निथळून घ्यावा असे वाटते. तुझ्याकडे प्रेशर कुकर आहे का? भारतीय पद्धतीचा? ज्यात तळाशी घालायला ताटली मिळते. तीही चाळणीसारखी वापरू शकशील. भाज्या धुण्या, निथळण्यासाठी स्टीलची रोळी आहे काय? त्यात उंडे वाफवून होतील्.मायक्रोवेव्हचा कुकर असल्यास त्याची वरची प्लास्टीकची ताटली असते. खूप उत्साह असेल तर बाजारातून काय हवे ते विकत आण, पण हा शेवटचा उपाय.;)
1 Dec 2011 - 3:28 pm | विशाखा राऊत
मस्त आहे पालकवडी :)
1 Dec 2011 - 4:03 pm | मदनबाण
वा... भुक चाळवली गेली आहे. :)
फोटु लयं भारी काढता तुम्ही ! :)
(अळुवडी प्रेमी) :)
1 Dec 2011 - 4:20 pm | स्मिता.
पालकवडी मस्त दिसतेय. पाहून तोंडाला पाणी सुटलं आणि भूक लागली.
1 Dec 2011 - 4:29 pm | खादाड
:)
1 Dec 2011 - 10:06 pm | रेवती
वड्या छानच दिसतायत.
2 Dec 2011 - 7:30 am | शिल्पा ब
करुन बघते. लेकीला आवडली तर फारच छान ...थोडीतरी भाजी पोटात जाईल.
2 Dec 2011 - 11:59 am | पिंगू
पालकची पाने अळूवडीप्रमाणे गुंडाळून पण छान वड्या करता येतात. हा आयटम पण मस्त...
- पिंगू
3 Dec 2011 - 1:38 am | सचिन भालेकर
फोटो पालक वडीचा वाटत नाही..... मला तर ह्या कोथबीरीच्या वड्या वाटतायत........... :)
3 Dec 2011 - 10:29 pm | ५० फक्त
अंमळ स्पष्ट लिहितो, मलिंगानं हाफ व्हॉली टाकल्यासारखं वाटलं.
अवांतर - साला आता या ५-६ जणांना अवांतरच प्रतिसाद टाकायचे, तेच ते तेच ते अन तेच ते किति वेळा टंकणार.