गाभा:
आम्ही काही मित्र मिळुन एक मराठी मोबईल मॅगझिन सुरु करन्याच्या विचारात आहोत. पण आम्ही थोडे साशंक आहोत याला प्रतिसाद कसा मिळेल. म्हणुन आम्ही मिपा करांना याविषयी काय वाटते हे जाणुन घेणार आहोत. तर मग आपल्याला आमच्या या कल्पनेबद्दल काय वाटते?
आपल्या मताची आणि सुचनांची आम्ही वाट पाहत आहोत. लवकर रिप्लाय द्या.
आम्हाला या आधि मोबईल कंटेंट डाउनलोअडींग साइट्स् चा अनुभव आहे.
कामापुरती PHP, CSS, xHTML येते.
तर मग मिपा करांचा आणि मराठी ब्लॉगर लोकांचा कसा प्रतिसाद मिळतोय यावर आम्हि पुढिल कार्यक्रम ठरवू.
वि.सु. आमचे शुध्धलेखन बरे नाही ते आम्ही सुधराण्याचा प्रयत्न करत आहोत आणी आमच्या बीडच्या (अगा बाबो) मराठी चा वापर कमीत कमी करण्याचा प्रयत्न केला जाइल.
प्रतिक्रिया
25 Nov 2011 - 11:41 pm | बिपिन कार्यकर्ते
कल्पना छान आहे.
25 Nov 2011 - 11:48 pm | अन्या दातार
कंटेंट चांगला असेल तर कुठल्याही कल्पनेला चांगला प्रतिसाद मिळू शकतो. (मराठी मोबईल मॅगझिन म्हणजे मोबाईलवरुन वाचता येण्याजोगे प्रकाशन असे गृहित धरले आहे)
>>आमचे शुध्धलेखन बरे नाही ते आम्ही सुधराण्याचा प्रयत्न करत आहोत
हे आधीच डिक्लेअर केलेत ते बरे झाले. ;)
>>आमच्या बीडच्या (अगा बाबो) मराठी चा वापर कमीत कमी करण्याचा प्रयत्न केला जाइल.
असे करु नका. जर लोकांना बीडची बोलीभाषा कळूदेत. मग भले सुद्दलेखनाला फाट्यावर का मारायला लागेना. :)
25 Nov 2011 - 11:52 pm | अंबाजोगाईकर
आपले गृहितक बरोबर आहे.
25 Nov 2011 - 11:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हे पहा काय असेल ते सुरु करा. ते किती उपयोगाचे आहे, आणि नाही त्याबद्दल आम्ही प्रतिक्रिया कळवूच.
तेव्हा अंबाजोगईकर आपल्यालाला मनःपूर्वक शुभेच्छा.
>>>> आमचे शुध्धलेखन बरे नाही
इथं कोणाचंच शुद्धलेखन बरं नाही. काळजी करु नये. बिंधास्त लिहा. :)
-दिलीप बिरुटे
26 Nov 2011 - 12:22 am | दादा कोंडके
उपक्रमास शुभेच्छा!
असेच म्हणतो.
25 Nov 2011 - 11:58 pm | अंबाजोगाईकर
http://DainikLatur.Com
हे पहिले मराठी मोबाईल दैनिक आहे.
26 Nov 2011 - 5:38 pm | निवेदिता-ताई
http://DainikLatur.Com
हे पहिले मराठी मोबाईल दैनिक आहे.
---------------------------------------------
हा छान प्रकार आहे....
26 Nov 2011 - 12:01 am | अंबाजोगाईकर
पण मला एक सांगा, तुमच्यापैकी कितीजण मोबाईल वर इंटरनेट वापरता?
26 Nov 2011 - 12:16 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मोबाईलवर मी मिसळपाव, जीमेल, फेसबूक, बातम्या-बितम्या,
न्युज-बीज, टीव्ही च्यायनल-बियनल, वगैरे-बिगैरे सर्व जवळजवळ मोबाईलवरच आहे.
-दिलीप बिरुटे
26 Nov 2011 - 12:17 am | यकु
मला नेमका हा प्रश्न तुमच्याबद्दल पडला होता.. म्हणजे तुम्ही अंबाजोगाईकर आणि बीड जिल्ह्यातले म्हणून हो..
म्हणजे तुमचा टार्गेट सबस्क्रायबर असणार बीड जिल्ह्यात (किंवा धरुन चला तुमचं मॅगझीन फार लोकप्रिय ठरलं तर अख्ख्या महाराष्ट्रात.. )
तर बीड जिल्ह्यातले किती लोक मोबाईलवर* इंटरनेट वापरतात?
नंतर महाराष्ट्रातले किती जण मोबाईलवर इंटरनेट वापरतात?
मुळात प्रश्न असा आहे की बीड जिल्ह्यातले किती लोक इंटरनेट वापरतात?
हे सगळे प्रश्न पडले ते तुमचं मोबाईल मॅगझिन आहे म्हणून, तुम्हाला हतप्रभ करायचं म्हणून नव्हे हे लक्षात घ्या, कारण मी सुद्धा बीड जिल्ह्यातलाच आहे.
हां, बडींग पीपल्स बिझिनेस असेल तर मग काहीही विचार न करता अगदी बिन्धास्त सुरु करा!
:)
26 Nov 2011 - 12:23 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
यकु, अंबाजोगाईकर आपल्या गावाकडचा दिसतो तेव्हा त्यांना उगाच प्रश्न विचारु नका.
आपून फूल्ल सपोर्ट करु. काय विदा-बिदा लागेल तो (सगळा) सॉरी सर्व किंवा सर्व ती माहिती देऊ.
अट फक्त येकच. जरा तुमच्या अंबा़जोगाईबद्दल आणि तेथील मुंकुंदराज, विवेकसिंदु आणि अंबेमातेबद्दल जरा ऐतिहासिक माहिती येऊ द्या. काय म्हणता ?
-दिलीप बिरुटे
26 Nov 2011 - 12:33 am | यकु
आता प्रा.डाँ. नी प्रश्न विचारु नका म्हणल्यावर काय म्हणायचं??
अंबेजोगाईकर, होऊ ना जाऊ द्या... जे काय होईल ते होईल तिच्यायला!!
पाहून घेऊ म्हणे..
26 Nov 2011 - 9:41 am | अंबाजोगाईकर
तर बीड जिल्ह्यातले किती लोक मोबाईलवर* इंटरनेट वापरतात?
मि अंबाजोगाई चा असुन देखिल गावात राहुन कुठलेही औपचारिक शिक्षण न घेता मोबाइल वेब डेव्हलपर आहे.
यावरुन अंदाज घ्या. ईकडे गेल्या २-३ वर्षामधे इंटरनेटचा (दोन्ही प्रकार) किती वढला आहे.
अहो मोबाईल इंटरनेट प्लान्स ३ रु. पासुन सुरु होतात, BSNL 3G, Idea 3G सुरु झाले आहे.
प्रत्येकाकडे चांगला हँडसेट आहे.
आहो दस्तगिरवाडी सारख्या छोट्या खेड्यातिल ३०% तरुण मोबाईल वर इंटरनेट वापरतात.
26 Nov 2011 - 9:50 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरे वा. आनंद वाटला की कुठलेही औपचारिक शिक्षण न घेता आवडीने आपण आपला छंद जोपासला आहे.
आता बीडचे किती लोक इंटरनेट वापरतात ते काही माहिती नाही. पण मोबाईलवर लोकप्रभाचे अंक वाचता येतो. न्युज हंट द्वारे सामना,सकाळ, वगैरे दैनिकं वाचताही येतात. मोबाईलवर मासिकं वाचायला मिळणे ही एक केवळ सुविधा होईल त्यात नवीन काय देणार ?
यकु, प्रश्न विचारायला नाही म्हणत नाही. प्रोत्साहान देणारे प्रश्न विचारा असे म्हणायचे आहे. :)
-दिलीप बिरुटे
26 Nov 2011 - 10:56 am | अंबाजोगाईकर
मोबाईलवर मासिकं वाचायला मिळणे ही एक केवळ सुविधा होईल त्यात नवीन काय देणार ?
ह..... अम्हि काय नविन देवु शकतो?
त्यपेक्शा आम्हि काय देउ शकणार नाहित हे सांगतो.
जातिवादि लेख,
फाल्तु राजकारण्यांचे गुणगाण करणारे लेख.
नको त्या विषयाला गरजेपेक्षा जास्त महत्व देणारे लेख.
कालबाह्य तत्वज्ञान,
आणी गांधीवाद म्हणुन काहिही खपवणारे लेख.
26 Nov 2011 - 12:22 am | पैसा
पण हेच की टार्गेट ग्रुप कोणता आहे? प्रसिद्धी कशी करणार? जाहिराती वगैरे असणार का? आणि मला वाटतं, जावा मोबाईल्स आणि अॅण्ड्रॉईड वगैरे वेगवेगळ्या सिस्टीम्सवर चालणार्या मोबाईल्ससाठी साईट्स एकच चालतात का? फॉण्ट्सचा प्रॉब्लेम कसा सोडवणार वगैरे बरेच प्रश्न विचारात घ्यावे लागतील
नवीन कल्पनेबद्दल अभिनंदन आणि प्रकल्पाला शुभेच्छा!
26 Nov 2011 - 10:06 am | अंबाजोगाईकर
टार्गेट= चालता बोलता कुठेही कधीहि एक बटण दाबताच वाचायला मिळावे अशी इच्छा करणारा मराठी वाचक.
जाहिरात प्रसिद्धी= त्यासाठी आपण आहातच कि..... :)
डिवाइसेस= सगळे ज्याच्यावर मराठी फॉन्ट सपोर्ट आहे, आणी जर नसेल तर खास मोडिफाइड ओपेरा मिनि हे मोबाइल वेब ब्राउजर आम्हि पुरवु.
26 Nov 2011 - 1:01 am | आत्मशून्य
संकल्पना फ्लॉप जाइल. मूळातच अंतरजालावरती सगळं हे केवळ मार्केटिंगवर चालतं. कल्पकता असेल तर त्याशिवायही चालतच चालत पण, देन यो सिरीअस्लि नीड दॅट अपिल. कारण इथे किंमत केवळ संकल्पनेलाच जास्त आहे. तांत्रिक कौशल्य हा बराच गौण मूद्दा आहे.
विचार करा चालूक्षणी तूम्हाला मोबाइल वर मराठी का वाचावसं वाटेल, अथवा तूमची सर्व्हीस चालू केल्यानंतर साधारण १ वर्षांनी लोकांना कोण कोनती कारणे मिळतील की ते तूमचच मोबाइल मॅगझिन वाचण जास्ति जास्त प्रेफर करू लागतील ?
आणी हो जर यातून व्यवसायच करायचा असेल तर मब बिझनेस मॉड्ल हवच हव. यात जरका खरच फायदा वाटत असेल व तूमचं सर्व अचूक आहे याची खात्री होत असेल (जर तरला फारशी जागा नसेल) तर सरळ व्हि.सी. गाठा व सध्या आहे त्याच्या भव्यदीव्य स्वरूपात सर्विसचं दणक्यात लॉचींग करा, व्यावसायीक यश मिळवायचा हाच राजमार्ग आहे. (किम्बहूना व्हि.सी. फंडिगला तयार झाला यातच तूम्ही ६०% लढाइ जिंकली आहे समजा)
26 Nov 2011 - 1:26 am | कोदरकर
अंब्याचेच आहोत...
मोबाईल वर लोक चारोळी वाचणे पसंत करतात.. साहित्य छोटे आणि लळा लावणारे असेल तर कल्पना यशस्वी होईल.. चालु करुन द्या... जास्त जोखीम नाही यात...
आपल्याला योगेश्वरी प्रसन्न आहेच....
-कोदरकर....
26 Nov 2011 - 10:09 am | अंबाजोगाईकर
धन्यवाद.
आपण किरण कोदरकर? कि..........
26 Nov 2011 - 6:54 am | रेवती
नवीन कल्पना.
26 Nov 2011 - 10:31 am | अंबाजोगाईकर
मित्रांनो आमचि एकच इच्छा आहे, कि आमच्यासारख्या ग्रामिण भागातिल नवोदित लेखकांना, ज्यांना अजुन ब्लॉगींग वगैरे वेब पब्लिशींग पध्धती वापरता येत नाहित किंवा काहि काराणास्तव जमत नाहित (उदा. मराठी टायपींग येत नाही, कंप्युटर नाही)
अशा सर्वांना समान संधी देणारे एक मुक्त माध्यम जे की त्याचे लेखन महाराष्ट्रातिल प्रत्येक कोपर्यापर्यंत पोहचवु शकेल.
मग तो नवोदित लेखक कोनिही असो एखादा कॉलेजकवी असो कि संत वाङ्मयावर लिहिणारे एखादे रिटायर्ड शाळामास्तर असो.
प्रत्येकाला आपले लेखन वाचकांपुढे ठेवण्याची संधी मिळेल.
26 Nov 2011 - 11:31 am | जोशी 'ले'
तुमच्या या उपक्रमास शुभेच्छा, मोबाईल मासिकाचा बेस 'न्युजहंट' aplication सारखा असावा म्हणजे fonts चा प्रोब्लेम येनार नाही व copy - pest पन करता येनार नाही
26 Nov 2011 - 11:31 am | परिकथेतील राजकुमार
आमचे काही मित्र फक्त आंतरजालावरील खास खास फटू बघायला इंटरनेट वापरतात.
26 Nov 2011 - 2:08 pm | आशु जोग
तुम्ही टेक्निकल गोष्टी नीट सांभाळा
बाकी भाषेची काळजी फार करू नका !
पुण्याची भाषा म्हणजे स्टँडर्ड असे मानणारे मानू देत.
तुम्हाला जी भाषा नीट जमते ती वापरा.
बाकी
टेक्निकल गोष्टींकडेच नीट ध्यान द्यावे, तिथे कमी पडू नका म्हणजे झाले
26 Nov 2011 - 2:41 pm | चिरोटा
प्रतिसाद चांगला मिळेल. मोबाईलवर मराठी वाचणार्यांची संख्या खूप् आहे. content कुठले निवडायचे हे कठिण काम असते.
सहमत आहे. साधारण दहापैकी नऊ startup पडतात. बर्याच वेळा कारण टेक्निकल असते. आपली कल्पना चांगली आहे. टेक्निकल गोष्टींत काही प्रॉब्लेम नाही आला तर मॅगझीन जोरात चालेल.
हे एक मोठे upcoming क्षेत्र आहे असे ऐकले आहे.
26 Nov 2011 - 3:44 pm | धमाल मुलगा
बिन्धास्त उडी मारा. तसाही काही फार अवाढव्य खर्च येणार नाही. त्याबाबतची काळजी नसेल. फारतर काय होईल? अगदीच वाईटात वाईट म्हणलं तर प्रकल्प फसेल. हरकत नाही, हा अनुभव गाठीशी घेऊन त्यामधल्या चुका पुढच्या प्रकल्पात दुरुस्त करुन जास्त ताकदीने नवा प्रकल्प उभा करता येईल. आणि हा प्ल्यान चांगला चालेल असं मला तरी वाटतं.
काही मदत लागलीच तर बिन्धास्त संपर्क साधा. :)
मराठीचा जेवढा प्रसार करता येईल तेव्हढा करा.
अवांतर: येता जाता भेटलेच तर भंडारीसरांना आमचा रामराम सांगा हो :)
26 Nov 2011 - 3:46 pm | गणपा
अंक पाहिला.
चांगला झालाय.
प्रकल्पासाठी आमच्या शुभेच्छा.
26 Nov 2011 - 5:41 pm | निवेदिता-ताई
कुठेय अंक ??
26 Nov 2011 - 9:44 pm | गणपा
ओह जे उदाहरण दिले आहे, मला वाटले की ते त्यांचेच आहे.
26 Nov 2011 - 8:02 pm | अंबाजोगाईकर
ठिक ठिक ठिक...
निर्णय झाला आहे.
आम्ही काम सुरु केले आहे...
आता फक्त या मॅगझिन ला काय नाव द्यावे याबद्दल काही सुचवा
नाव सुचवताना या गोष्टी ध्यानात घ्या
१) जास्त लांब नको
२) किचकट स्पेल्लिंग होईल असे नको.
28 Nov 2011 - 1:28 pm | परिकथेतील राजकुमार
ह्या अंकात काही 'पेज ३' वैग्रे असणार आहे का नाही ?
गेला बाजार आमच्या मटा सारखी 'फटू गॅलरी' वैग्रे ?
27 Nov 2011 - 10:46 am | फारएन्ड
शुभेच्छा!
असे काही करू शकाल का - लेख, कविता वगैरे "कंटेंट" तयार असले की ते एका फॉर्म मधे वेब साईटवर व थोड्या वेगळ्या फॉर्ममधे मोबाईलवर वाचता येतील. तसे करू शकलात तर दोन्ही प्रकारचे वाचक मिळतील. वाचकांनाही फक्त मोबाईलवर वाचण्याची सक्ती राहणार नाही. मी कदाचित छोटे लेख मोबाईलवर वाचेन पण दीर्घ लेख वेबवर वाचायला आवडतील.
27 Nov 2011 - 11:20 pm | विनोद१८
अहो अम्बाजोगाईकरानो......
.........तुमच्या या उपक्रमास मझ्या १०१ शुभेच्छा.....!!!!
..चले चलो....... चले चलो..........चले चलो..........
(मोबईल् वाचक) विनोद१८
28 Nov 2011 - 1:12 pm | विटेकर
माझ्या मोबाईल ( नोकिया इ ६३ )वर चेपु वरिल मराठी नीट दिसत नाही...म्हणजे कधी कधी ???? तर कधी कधी देव नागरी अक्शरे आणि काही चिन्हे अशी सरमिसळ दिसते .. अर्थबोध करता येत नाही.
मात्र जी मेल वरचे मरठी अगदि व्यवस्थित वाचता येते!
काय कारण असेल ? काय करावे लागेल ?
- विटेकर
28 Nov 2011 - 1:21 pm | विटेकर
काही अडचण नाही.. मिपावर मोबाईल वरुन लिहण्याचा कधी प्रयत्न केला नाही...
28 Nov 2011 - 1:34 pm | ऋषिकेश
कल्पना चांगली आहे. शुभेच्छा
माझ्याकडून तांत्रिक मदत कितपत करता येईल साशंक आहे, मात्र लेखन जरूर पाठवेन, आवडलं तर करा प्रकाशित :)
30 Nov 2011 - 2:00 am | कोदरकर
अंबाजोगाईकर .. आम्ही किरण चे काका... म्हणजे.. नुस्ते नात्याने.. वयाने मित्र.... :)