चिकन करी आणी स्पंज डोसा

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
25 Nov 2011 - 3:33 pm

साहित्य व तयारी : चिकन करी:

५०० ग्राम चिकन साफ करुन तुकडे करुन घेणे.
त्याला २ टेस्पून आले+लसुण+ हिरवी मिरची+ कोथिंबीर पेस्ट, १/२ चमचा हळद, १-१/२ चमचा लाल तिखट, १/२ चमचा गरम-मसाला, १ चमचा धणे पावडर आणी २ टेस्पून दही लावून १ तास मॅरीनेट करून ठेवणे.

.

दिड कांदा उभा चिरून घेणे
३-४ लसुण पाकळ्या चिरून घेणे
३-४ टेस्पून सुके खोबरे
४ लवंगा

.

एका नॉन- स्टीक पॅनमध्ये १ चमचा तेल तापवून लवंगा, लसूण व चिरलेला कांदा परतून घ्यावा.

.

कांदा परतल्यावर त्यात सुके खोबरे घालून खमंग परतणे. मिश्रण गार झाले की मिक्सरमधून थोडेच पाणी घालून वाटून घ्यावे.

.

मॅरीनेट केलेले चिकन
तयार केलेले वाटप
१ मध्यम टोमॅटो बारीक चिरून घेणे
१ टेस्पून आले+लसुण पेस्ट
१ टीस्पून हळद
२-३ टीस्पून लाल-तिखट (आपल्या आवडीप्रमाणे कमी-जास्त करणे)
१-१/२ टीस्पून बेडेकर संडे मसाला
२ टीस्पून धणे पावडर
१-१/२ गरम-मसाला
मीठ चवीनुसार
तेल
.

पा़कृ:

एका भांड्यात तेल तापवून त्यावर आले+लसुण पेस्ट नीट परतणे.

.

आले+लसणाचा कच्चा वास गेल्यावर त्यात चिरलेला टोमॅटो घालून तो मऊ होईपर्यंत परतावा.

.

त्यात तयार केलेले कांदा-खोबर्‍याचे वाटप घालून चांगले परतावे. त्यात हळद, लाल-तिखट, धणे पावडर, गरम-मसाला, बेडेकर संडे मसाला व मीठ घालून तेल सुटेपर्यंत परतावे.

.

आता त्यात मॅरीनेट केलेले चिकन घालणे व रस्सा किती हवे ताप्रमाणे पाणी घालणे.

.

झाकण लावून मध्यम आचेवर चिकन शिजवावे. चिकन शिजले की वरून बटर सोडून नीट एकत्र करावे.

चिकन करी तयार :)

.

साहित्य आणी तयारी: स्पंज डोसा:

२ वाटया उकडे तांदूळ
१/४ वाटी मध्यम पोहे
३-४ वाटया आंबट ताक

.

वरील सर्व साहित्य एकत्र करुन ७-८ तास भिजु ध्यावे.

.

पाकृ:

वरील तांदुळ्-पोह्याचे मिश्रण मिक्सरमधून थोडे-थोडे पाणी घालून बारीक वाटून घेणे. (नेहेमीच्या डोश्याच्या पीठापेक्षा जरा जाड वाटले गेले पाहिजे.)

वाटलेले मिश्रण तुम्ही आंबवण्यासाठी ठेवू शकता म्हणजे पीठ फुगून दुप्पट होईल, पण इथे थंडीत पीठ आंबवणे कठीण जात असल्यामुळे मी पीठ लगेच वाटून त्यात चवीपुरते मीठ व १/४ चमचा खायचा सोडा घातला व एकत्र केले. तुम्ही सोड्या ऐवजी ईनो फ्रुट सॉल्ट ही घालून शकता.

.

नॉन-स्टीक तव्यावर १ चमचा तेल तापवून त्यावर डावाने हा डोसा घालावा, जरा जाडसरच ठेवावा म्हण्जे छान जाळी पडते. (नेहेमीचा डोसा बनवतो तसा डावाने पसरवायचा नाही)
झाकून मध्यम आचेवर शिजु ध्यावा.

.

गरमा-गरम स्पंज डोसा तयार आहे. तुम्ही हा कोणत्याही चटणीसोबत सर्व्ह करु शकता. मी हा चिकन करीसोबत सर्व्ह केला आहे :)

.

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

25 Nov 2011 - 3:46 pm | परिकथेतील राजकुमार

चिकन अ‍ॅज युज्वल फटूंसाठी बघितले. एकदम कातिल !

डोशाचा मात्र पाकृसकट आनंद घेतला.
आवडला एकदम.

रच्याकने :- तवा / नॉनस्टिक पॅनला न चिकटणारा डोसा कसा करावा ह्यावर कोणी अमूल्य मार्गदर्शन करेल काय ? स्वतः केल्यावरती अखंड डोसा खायचे भाग्य अजून मिळालेले नाही :(

चला आता इथे बेडेकर संडे मसाला शोधणे आले.

चला आता इथे बेडेकर संडे मसाला शोधणे आले.

मी ही आलोच रे. मला इंस्टंट डोश्याच पीठ हवय. :)

मेघवेडा's picture

25 Nov 2011 - 5:50 pm | मेघवेडा

चिकन अ‍ॅज युज्वल फटूंसाठी बघितले. एकदम कातिल !

डोशाचा मात्र पाकृसकट आनंद घेतला.
आवडला एकदम.

ऐसाच बोल्ताय! रापचिक पाकृ आणि फोटो. मजा आली! :)

चित्रा's picture

26 Nov 2011 - 3:33 am | चित्रा

डोश्यांचे पीठ गुळगुळीत असावे. ते चांगले आंबू द्यावे.

मुख्य म्हणजे डोसा घालण्याआधी (नॉनस्टिक) तवा चांगला तापलेला असायला हवा. तव्याला तेल लावण्याची गरज नसते. डोशाचे मिश्रण वाटीने किंवा डावाने घालावे. पीठ घातल्यावर वाटीच्या सपाट भागाने किंवा डावानेच चांगले पसरवावे. ते पसरवताना हलक्या हाताने वाढवत गोलाकार असे पसरवत जावे. डोसा पुरेशा व्यासाचा झाला की मग वाट बघावी, वरून हवे तर तेल पसरावावे, पण गरज नाही. उलथणे शक्य तेवढे पातळ आणि सपाट असावे, म्हणजे पातळ डोसाही नीट उलथता येतो. वरच्या बाजूने थोडे कोरडे वाटल्यावर मग तव्यापासून डोसा उलथन्याने वेगळा करून घ्यावा.

कुंदन's picture

26 Nov 2011 - 11:41 pm | कुंदन

>>मुख्य म्हणजे डोसा घालण्याआधी (नॉनस्टिक) तवा चांगला तापलेला असायला हवा.
+१
पर्‍या , तवा चांगला तापु देत जा रे.
तुला लेका सगळीच घाई. ;-)

झक्कासच आहे एकदम चिकनकरी अन डोसा :)

सुहास झेले's picture

25 Nov 2011 - 5:12 pm | सुहास झेले

झक्कास.... डोसा तर हटके आणि अप्रतिम :) :)

आत्मशून्य's picture

25 Nov 2011 - 5:19 pm | आत्मशून्य

.

स्मिता.'s picture

25 Nov 2011 - 5:56 pm | स्मिता.

चिकन करी आणि डोसा लई भारी! मी बहुदा याच पद्धतीने चिकन करी बनवते. मस्त झणझणीत, मसालेदार ग्रेव्ही होते.

श्रावण मोडक's picture

27 Nov 2011 - 1:19 am | श्रावण मोडक

मी बहुदा याच पद्धतीने चिकन करी बनवते.

उगाच काही तरी दावा करण्याचा क्षीण प्रयत्न. ;) तरी बरं, बहुदा हा शब्द जवळपास नकारार्थीच आहे.

स्मिता.'s picture

27 Nov 2011 - 3:57 pm | स्मिता.

उगाच काही तरी दावा करण्याचा क्षीण प्रयत्न.
उगाच काही नाही... तर हा माझा ठाम दावा आहे.

>>तरी बरं, बहुदा हा शब्द जवळपास नकारार्थीच आहे.
शब्दयोजना चुकली, अधोरेखीत शब्द बहुतेक वेळा असा वाचावा.

श्रावण मोडक's picture

27 Nov 2011 - 11:18 pm | श्रावण मोडक

उगाच काही नाही... तर हा माझा ठाम दावा आहे.

दावा ठाम आहेच. त्यातील आशय उगाच काही तरी आहे. म्हणे, मी चिकन बनवते. कैच्या कैच. :)

शब्दयोजना चुकली, अधोरेखीत शब्द बहुतेक वेळा असा वाचावा.

आता वेळ गेली. आम्ही तो आधीच वाचला. ;)

स्मिता.'s picture

27 Nov 2011 - 11:24 pm | स्मिता.

सानिकाचा धागा आपल्या वादात हायजॅक होवू नये असे वाटते.
पुढील चर्चा/वाद/भांडण आपण खवतून करावे अशी विनंती :)

मानस्'s picture

25 Nov 2011 - 7:00 pm | मानस्

चिकन करीची पाकृ छान आहे. ग्रेव्ही एकदम चविष्ठ होत असेल यात शंका वाटत नाही.

ही पाकृ म्हणजे करीना कपूर!

आनंदी गोपाळ's picture

25 Nov 2011 - 9:20 pm | आनंदी गोपाळ

इतकं सुंदर बनवायचं.
मग त्याचे फोटो काढायचे.
मग ते इथे डकवायचे.
मग ते आम्ही पहायचे.
अन घरी जाऊन मुगाची खिचडी खायची???

निषेध!!

अप्रतिम... आता लगेच तांदुळ भिजत घालते. म्हणजे रात्री वाटल्यावर सकाळी करता येइल. इथे पण पीठ लवकर आंबत नाही. म्हणुन मग मी ओव्हन ५० degree किंवा सगळ्यात कमी temp ला १० मिनिटे गरम करते आणि मग त्यात ते वाटलेले पीठ ठेवायच. दुसर्‍या दिवशी पीठ मस्त फुगलेले असते. मी इडलीच पीठ नेहमी असच करते. तु पण हे ट्राय करुन बघ, छान होत पीठ.

शाहिर's picture

26 Nov 2011 - 12:02 am | शाहिर

चमचे मिस केले या वेळेस :)

रेवती's picture

26 Nov 2011 - 6:52 am | रेवती

याबरोबर चालेलशी एखादी शाकाहारी भाजी दे की गं!
मी लगेच करून पाहीन.

रेवती, ह्या सोबत काळ्या वाटाण्याची उसळ मस्त लागेल. काय वाटते तुला??? :)

रेवती's picture

26 Nov 2011 - 10:45 pm | रेवती

चांगली लागेल की!
पण काळे वाटाणे इथं मिळतील असं वाटत नाही.
पराच्या भाषेत सांगायचं तर आता काळे वाटाणे शोधणं आलं.;)
मिपावर उसळीची पाकृ आहे काय?

चिंतामणी's picture

27 Nov 2011 - 1:35 am | चिंतामणी

http://recipes.mhadesar.com/?p=83

http://www.manogat.com/node/7040

कधीतरी बनवुन खायला द्या.

धन्यवाद चिंतुकाका!
आधी शिकते आणि जमली की मग बनवून खायला बोलावते.

चिंतामणी's picture

26 Nov 2011 - 8:16 am | चिंतामणी

गरमा-गरम स्पंज डोसा तयार आहे. तुम्ही हा कोणत्याही चटणीसोबत सर्व्ह करु शकता. मी हा चिकन करीसोबत सर्व्ह केला आहे

फटु, विशेषतः शेवटचा, जिवघेणे आहेत.

मयुरपिंपळे's picture

26 Nov 2011 - 10:55 am | मयुरपिंपळे


सुंदर सादरीकरण

कच्चा पापड पक्का पापड's picture

26 Nov 2011 - 11:11 am | कच्चा पापड पक्क...

एकतर नेहमी नेहमी नविन पदार्थ , सांगण्याची पध्द्त, सर्व साहित्याचे आकर्षक भांडी वापरुन काढ्लेले फोटो ,स्टेप बाय स्टेप पाककृतीचे फोटो, आणि ह्या सगळ्यावर कहर असतो तो फायनल फोटो ......

_/\_ दडंवत _/\_

प्रभाकर पेठकर's picture

27 Nov 2011 - 1:44 am | प्रभाकर पेठकर

कोंबडीची पाककृती खल्लासच आहे. अभिनंदन.

स्पंज डोसाची माझी पद्धत वेगळी आहे.

२ वाट्या बासमती तांदूळ
१ वाटी उडिदाची डाळ
१/२ वाटी जाडे पोहे
१/४ चहाचा चमचा मेथी दाणे.

हे सर्व एकत्र करून ४-५ तास पाण्यात भिजवून ठेवायचे. नंतर पाणी फेकून देऊन मिक्सर मध्ये कमीतकमी पाण्यात एकदम मुलायम वाटून घ्यायचे. नंतर ते वाटलेले पीठ ८-१० तास झाकून आंबवायला ठेवायचे . फुगून दुप्पाट होते.
थंडी जास्त असेल तर वरती, Mrunalini ह्यांनी सांगितल्या प्रमाणे ओव्हन पद्धत वापरावी किंवा पीठाच्या पातेल्यावर दुसरे एखादे पातेले गरम पाण्याने भरून झाकून ठेवावे. पीठ फुगून येते.

दुसर्‍या दिवशी त्या पीठात चवीनुसार मीठ घालून गरजेनुसार पाणी घालावे आणि डोसे करावेत. छान होतील.

ह्यांनाच स्पंज डोसा किंवा सेट डोसा किंवा भरपूर बटर सोडल्यास दावणगीरी बेने डोसा म्हणतात.

काळ्यावाटाण्याच्या उसळीबरोबर तसेच कोंबडी किंवा मटणाबरोबर भन्नाट मजा येते.

चिंतुकाकांनी दिलेल्या दोन पद्धती तसेच माझ्याकडील पुस्तकात एक काळ्या वाटाण्याच्या उसळीची पाकृ मिळाली आहे. तीनही थोड्या थोड्या वेगळ्या पाकृ आहेत. तुमची पद्धत सांगितलीत तर बरे होईल. आत्ता पावसात जाऊन काळे वाटाणे दुकानातून आणलेत. माझ्याकडे मालवणी मसाला किंवा मीट मसाला नाहीये. डोसे तुम्ही सांगितल्याप्रमाणे करणार आहे.

प्रभाकर पेठकर's picture

27 Nov 2011 - 10:40 am | प्रभाकर पेठकर

काळ्या वाटाण्याच्या उसळीची माझी पाकृ श्री. चिंतामणी ह्यांनी दिलेल्या क्रमांक दोनच्या (मनोगतावरील पुजा ह्यांच्या) पाककृती प्रमाणेच आहे. म्हणजे पद्धत तीच, प्रमाणे जरा वेगळी.

एका भांड्यात तेल गरम करून पुढील प्रमाणे मसाला त्यात घालावा:

३ टेबल स्पून धणे
१०-१२ काळीमीरी
४-५ लवंग
३ इंच दालचिनी
१ पाकळी जायपत्री
१ टिस्पून बडीशोप
३-४ वेलची

मसाला चांगला परतला की त्यावर २ मोठे कांदे (लांब चिरलेले) टाकून गुलाबी रंगावर परतून घ्यावेत.
कांदे गुलाबी झाले की मग ओले खोबरे घालून ते सर्व लाल होइपर्यंत परतावे.परतताना आंच मध्यम ठेवावी. सतत परतत रहावे. खोबरे नीट लाल झाले पाहिजे. (जळता कामा नये, कुठे पांढरे राहता कामा नये)
नीट झाले की एखाद्या ताटात काढून थंड करावे आणि कमीतकमी पाण्यात मस्त मुलायम वाटून घ्यावे. (पाणी जास्त झाले तर चालते पण मग वाटताना वाटप मुलायम न होता किंचित रवाळ राहते म्हणून पाणी कमी घालायचे.)
तिसरा कांदा व टोमॅटो बारीक चिरावा. तेलात कांदा परतून घ्यावा. कांदा परतला की टोमॅटो परतून घ्यावा. नंतर त्यात वाटलेले आले-लसूण घालावे. पुन्हा परतून आले-लसूण शिजले की हळद, तिखट, मीठ घालावे. किंचित परतून त्यावर शिजवलेले वाटाणे आणि वाटून ठेवलेले कांदा-खोबरे घालून परतावे. पाणी घालून उसळ दाटसर शिजवावी.

जेवायला घेताना वरून ताजी, हिरवीगार कोथिंबीर भुरभुरण्यास विसरू नये.

अशाच पद्धतीने चिकन, मटण करतात त्याला सागुती म्हणतात.

चिकन, मटण ऐवजी फ्लॉवर, गाजर, फरसबी, बटाटा इ. भाज्या घालून केल्यास त्याला व्हेज. सागुती म्हणतात.

शुभेच्छा...!

पैसा's picture

27 Nov 2011 - 11:37 am | पैसा

अशी उसळ आणि सेट डोसे हा फक्कड बेत आहे! बरोबर खोबर्‍याची लसूण घातलेली चटणी... अहाहा!

प्रभाकर पेठकर's picture

27 Nov 2011 - 1:05 pm | प्रभाकर पेठकर

अगदी..अगदी झकास बेत.

सेट डोशा ऐवजी नीर-डोसाही झकास लागतो.

गोव्याच्या पत्रादेवी सीमेजवळ रस्त्याला लागून, उजव्या हाताला, एक घरगुती खाणावळ लागते. तिथे 'आंबोळ्या तयार आहेत' (किंवा तत्सम) अशी पाटी दिसते. तिथे काळ्या वाटाण्याची उसळ आणि आंबोळ्या खाऊन आत्मा तृSSSप्तं झाला होता.

चिंतामणी's picture

27 Nov 2011 - 12:04 pm | चिंतामणी

फर्मास रेसीपी.

>>>जेवायला घेताना वरून ताजी, हिरवीगार कोथिंबीर भुरभुरण्यास विसरू नये.

ह्या प्रेमळ सुचने बद्दल धन्यवाद. हिरवीगार कोथिंबीर ही आवश्यक गोष्ट आहे अस्मादिकांसाठी.

प्रभाकर पेठकर's picture

27 Nov 2011 - 12:58 pm | प्रभाकर पेठकर

धन्यवाद श्री. चिंतामणी.

कोथिंबीर, चवी इतकीच नेत्रसुखद असते. तो माझाही अशक्तबिंदु आहे.

स्मिता.'s picture

27 Nov 2011 - 4:03 pm | स्मिता.

काय पाकृ सांगितलीये!! वाचतानाच तोंडाला पाणी सुटलं :)

धन्यवाद पेठकरकाका!
लगेचच काळे वाटाणे, दोश्याचे डाळ तांदूळ भिजत घालते.

तुमच्या कृतीप्रमाणे डोसे आणि सागुतीचा बेत पक्का! दोन्ही पाकृ बद्दल धन्यवाद!

कृतीनुसार काळ्या वाटाण्याची उसळ बनवली आणि स्पाँज डोसेही बनवले. चव खूपच छान होती! :)
धन्यवाद.

DSC03805"

प्रभाकर पेठकर's picture

29 Nov 2011 - 10:29 am | प्रभाकर पेठकर

धन्यवाद रेवती.

छायाचित्र भन्नाट आहे. आत्ता डोसे उचलून, उसळीत बुडवून आस्वाद घ्यावा असे वाटायला लावणारे आहेत. अभिनंदन.

चतुरंग's picture

29 Nov 2011 - 6:09 pm | चतुरंग

मी तसंच केलं अगदी! ;)

(चवप्रमुख) रंगा

परिकथेतील राजकुमार's picture

29 Nov 2011 - 12:57 pm | परिकथेतील राजकुमार

रेवती काकु, हा फटु सुपरलाईक केल्या गेल्या आहे.

काय जबर्‍या दिसतोय !

परिकथेतील राजकुमार's picture

29 Nov 2011 - 1:10 pm | परिकथेतील राजकुमार

प्र.का.टा.आ.

फोटू एकदम खंगरी आलाय.
मीही आज वाटाणे भिजत घालुन आलोय.

आताच करुन चापल्या गेले आहे. :)
बहुतेक याच धाग्यात कुणी तरी टीप दिली होती की डोश्याच्या पीठात एक लहान कांदा वाट्य्न घालावा.
ती टिप ही आमलात आणली.
सेट डोशे पण एकदम फर्मास आणि कुरकुरीत झले होते.

हा फोटु.

पेठकर काका आणि सानिकातै रेशीपीसाठी धन्स.
टिप देणार्‍या तैंचे नाव आठवत नाही. त्यांचे ही आभार.

परिकथेतील राजकुमार's picture

30 Nov 2011 - 12:37 pm | परिकथेतील राजकुमार

फटूच दिसत नाहीये ;)

नशीबवान आहात.

मला दिसतोय आणि हालत खराब झालीय..

बघणे टाळा..

चिंतामणी's picture

30 Nov 2011 - 2:07 pm | चिंतामणी

कसा दिसेल.

पुण्यवान माणसांनाच दिसतो.:p :-p :tongue:

गणपा- फोटो लै भारी आहे.

सानिकास्वप्निल's picture

30 Nov 2011 - 5:10 pm | सानिकास्वप्निल

रेवती आणी गणपाभौ पाकृचे फोटू एकदम भारी आले आहेत
+१ :)
आता लवकरच काळे वाटाण्यांची उसळ व सेट डोसा बनवायला हवे :)

स्मिता.'s picture

30 Nov 2011 - 5:14 pm | स्मिता.

आधी रेवतीताई आणि आता तुम्ही... का असे फोटू दाखवून अत्याचार करताय???

मस्तच!
मी ही उसळ केल्यानंतर तू केलीस आणि फोटू दाखवलास म्हणून तळमळ कमी झाली.;)
नाहीतर अख्ख्या प्लेटला त्यातल्या पदार्थांसकट भस्म करून धनगरी औषधात वापरलं असतं.;)

स्मिता.'s picture

29 Nov 2011 - 7:05 pm | स्मिता.

हा फोटो बघायचाच राहून गेला होता. १ नंबर दिसताय डोसे आणि उसळ.

सानिकास्वप्निल's picture

27 Nov 2011 - 4:35 pm | सानिकास्वप्निल

तुम्ही सांगितलेल्या सेट डोसाची पा़कृ मी नक्की नक्की करून बघेन
पाकृ आवडली :)

प्रभाकर पेठकर's picture

29 Nov 2011 - 10:38 am | प्रभाकर पेठकर

धन्यवाद सानिकास्वप्निल.

डोसे जरूर करून पाहा. नक्कीच आवडतील.
लोण्याच्या (किंवा बटर) वापरावर बंधन नसेल तर डोसा उलटायच्या आधी, पण वरून वाळल्यावर, वितळविलेले (किंवा मऊ झालेले) लोणी (अथवा बटर) लावून मग उलटावा. आणि जरा चरचरीत रंग आला की उतरवावा. चवीला अजून सुंदर होतो.

सानिका, मस्त पाकृ. थंडी वाढली की इथेही पीठ आंबवणे त्रासाचे पडते. सोडा घालून डोसे करायची आयडिया छान!

दिपाली पाटिल's picture

29 Nov 2011 - 10:26 am | दिपाली पाटिल

रेवती (ताई/काकू),

इकडे अमेरिकेत काळे वाटाणे कुठे मिळाले?

सानिका,

पाकृ छान आहे, स्पॉन्ज दोसा नक्कि बनवून बघेन, पण एक प्रश्न आहे, सोडा घातल्यावर दोसे लगेच बनवायचे की ते पीठ आंबवायचं आहे?

इंडियन ग्रोसरीत मिळाले.
मलाही मिळतिल याची खात्री नव्हती पण मिळाले.

मूळ पाकृ आणि पेठकरकाकांची व्हर्शन विथ शाकाहारी वाटाणा उसळ.. दोन्ही इक्वली कातिल.. :)

जागु's picture

29 Nov 2011 - 12:37 pm | जागु

वा झक्कास.