बीटाचे सुप

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
18 Nov 2011 - 2:33 pm

साहित्यः
१ मध्यम आकारचे बीट साल काढून
१ मध्यम आकाराचा टोमॅटो
१ छोटा बटाटा साल काढून
कोथींबीरीच्या कोवळ्या काड्या (तुम्ही सेलरी ही वापरु शकता)
१ छोटा कांदा बारीक चिरून
३-४ लवंगा
२-३ दालचिनीचे तुकडे
२-३ तमालपत्र
१ टीस्पून काळीमिरीपूड
मीठ चवीनुसार
थोडीशी चिरलेली कोथींबीर
२ टीस्पून तुप

.

पा़कृ:

बीट, टोमॅटो, बटाटा व कोथींबीरीच्या काड्या उकडून घेणे. गार झाल्यावर त्याची मिक्सरमधून प्युरे करून घेणे.
एका भांड्यात तुप गरम करुन त्यात लवंगा, दालचिनी व तमालपत्र घालणे.मग त्यात चिरलेला कांदा घालून परतणे.

.

कांदा मऊसर शिजला की त्यात बीटची प्युरे घालणे. लागेल तसे पाणी घालणे.

.

उकळी आली की त्यात चवीनुसार मीठ व काळीमिरीपूड घालणे. थोडेशी कोथींबीर ही शिजताना घालणे म्ह्णजे स्वाद छान येतो.

.

कोथींबीर घालून गरमा-गरम बीट सुप ब्रेड स्टीक बरोबर सर्व्ह करणे.

.

नोटः आवडत असल्यास वरुन थोडे फ्रेश क्रिम घालणे.

उकळी आल्यावर त्यातील लवंगा, दालचिनी व तमालपत्र काढून ही सुप सर्व्ह करु शकता.

प्रतिक्रिया

विशाखा राऊत's picture

18 Nov 2011 - 3:15 pm | विशाखा राऊत

भन्नाट दिसत आहे. :)

मदनबाण's picture

18 Nov 2011 - 3:30 pm | मदनबाण

वाह... मस्तच ! :)

(स्वीट कॉर्न सुप प्रेमी) :)

वाहीदा's picture

18 Nov 2011 - 3:53 pm | वाहीदा

सुपला उकळी येई पर्यंत कोण थांबणार? त्या आधीच सर्व्ह करुन घेणार :-)

वा मस्तच गं... तस मला बीट आवडत नाही. पण सुप बघुन ट्राय करावस वाटतय. बघु, एकदा करुन बघेन. :)

थंडीसाठी योग्य पेयकृतीबद्दल धन्यवाद!;)
एका मैत्रिणीनं बिटाचे रसम् नुकतेच शिकवले आहे त्याची आठवण झाली.

निवेदिता-ताई's picture

19 Nov 2011 - 6:43 pm | निवेदिता-ताई

एका मैत्रिणीनं बिटाचे रसम् नुकतेच शिकवले आहे त्याची आठवण झाली.

-------------------------------------------

येउदेत रसम..ची कॄती...
----------------------
बिटाचे सूप भन्नाट ह ..

JAGOMOHANPYARE's picture

18 Nov 2011 - 8:25 pm | JAGOMOHANPYARE

सुंदर..

आत्मशून्य's picture

18 Nov 2011 - 9:13 pm | आत्मशून्य

ही काहीतरी जडीबूटीची आयूर्वेदीक भानगड वाटत आहे., या सूपाने उर्जा वाढणार हे नक्कि.

कच्चा पापड पक्का पापड's picture

18 Nov 2011 - 10:19 pm | कच्चा पापड पक्क...

काय पण हि हेल्दी रेसीपी........
आणि फोटो पण सु....रे...ख.
विशेषतः सुप कलरफुल आणि बाकी समद.... black n white

५० फक्त's picture

18 Nov 2011 - 10:32 pm | ५० फक्त

शेवटच्या फोटोचं कलर काम्बिनेशन जबराच, पहिला आणि शेवटुन दुसरा कलर थोडा डार्क वाटतोय.

आणि पाकृ बद्दल काय बोलणार, आईनं आणि बायकोनं बिट बिट बिटलंय तरी बिट दाताखाली बिट करुन घशातुन पोटात घालायचं च्यालेंज मी अजुन बिट करु शकलो नाही., त्यामुळं पास.

अवांतर - अगदी जपुन ठेवलंय ओ तुपाचं भांडं, तुळशीबागेत किती हट्ट करुन घेतलं होतं मागच्या वेळी.

रुमानी's picture

28 Nov 2011 - 3:41 pm | रुमानी

बघते करुन घरी!! मस्तच ग..........!

farnaz naikwadi's picture

30 Nov 2011 - 7:01 pm | farnaz naikwadi

न आवडनार्‍या बीटची खुप चांगली रेसिपी दिलीस. पया॓ग करायला हरकत नही. महत्वाचे हे खुप पा॓ष्टीक आहे.