आजच्या लोकसत्तेतील बातमीनुसार पत्नीला पतीच्या मालमत्तेत ५०% वाटा देणारा कायदा महाराष्ट्र राज्यात करण्याचा प्रस्ताव आहे
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=194...
बातमी वरवरची वाटते, फार डीटेल माहीती दीलेली नाही.
पण जर बातमी खरी असेल तर या कायद्याबरोबर महाराष्ट्रात 'प्रीनप' () सुद्धा कायदेशीर करायला हवे.
http://en.wikipedia.org/wiki/Prenuptial_agreement
बातमीत पतीला पत्नीच्या मालमत्तेत वाटा मीळेल काय हे स्पष्ट होत नाही. सध्याच्या कायद्यानुसार पतीला पत्नीचे दागीने, माहेरुन मीळणारा वडेलांच्या संपत्तीतील वाटा यावर अधीकार नसतो. तसेच बातमीनुसार विवाहानंतर लगेचच पतीच्या घर, जमीन व ईतर मालमत्तेत पत्नीला ५०% वाटा मिळणार आहे. जगात असा कायदा कुठल्याही देशात नाही. अमेरीकेसारख्या प्रगत देशातही लग्नानंतरच्या पती-पत्नीच्या एकत्रीत कमाईचे विभाजन होते. लग्नाआधीच्या मिळकतीवर जोडीदारला हक्क सांगता येत नाही. त्यामुळे ही बातमी संपुर्ण खरी वाटत नाही.
महीलांना ३०% आरक्षण द्यायला एवढा विरोध करणारे राजकारणी असा कायदा सहजासहजी मंजुर करतील अशी शक्यता वाटत नाही.
पण जर असा कायदा झालाच तर समाजावर खुपच दुरगामी परीणाम होतील.
महीला सबलीकरण / सक्षमीकरण होईल - हा चांगला परीणाम असेल.
घटस्फोटात वाढ, संपत्तीच्या लोभाने नाममात्र विवाह, विवाह टाळुन विवाहाशिवाय एकत्र रहाण्याकडे कल, त्यातुन निर्माण होणार्या संततीचा आणी सिंगल पेरेन्टसचा प्रश्न, वृद्धांकडे वाढते दुर्लक्ष, अशा अनेक समस्या समाजात वाढु शकतात.
मला वाटते विवाहानंतर पती-पत्नीनी कमावलेल्या संपत्तीत दोघांचा समान वाटा असणे (दोघांपैकी फक्त एकच कमावत असेल तरीही) हे न्यायाला धरुन आहे. विवाह विच्छेदनाच्या वेळी दोघांवर कीती लोकांची जबाबदारी आहे या नुसार त्या संपत्तीची वाटणी व्हावी. उदा. मुले आईकडे रहाणार असतील तरी वडीलांवर त्यांच्या आई-वडीलांची जबाबदारी असु शकते.
आपल्याला काय वाटते या प्रस्तावीत कायद्यापद्दल?
प्रतिक्रिया
17 Nov 2011 - 9:13 am | पैसा
गोव्यात असा कायदा लागू आहे. आणि काही वर्षांपूर्वीपर्यंत, इन्कम टॅक्ससाठी पतीचं उत्पन्न विभागून दाखवता येत असे. घराचं मॉर्टगेज वगैरे करताना पतीबरोबर पत्नीला नेहमी जामीनदार म्हणून सह्या करणं बंधनकारक आहे. अर्थात त्यासाठी गोव्यात जन्म झालेला असणं आणि लग्न गोव्यात नोंदलेलं असणं आवश्यक आहे. इतर राज्यातून गोव्यात आलेल्या लोकांना हा कायदा लागू नाही.
17 Nov 2011 - 12:16 pm | नेत्रेश
गोव्यातील कायदा लग्नाआधीची पतीची ईस्टेट लग्नाच्या दुसर्या दिवशी ५०% पत्नीच्या नावावर करतो?
>> घराचं मॉर्टगेज वगैरे करताना पतीबरोबर पत्नीला नेहमी जामीनदार म्हणून सह्या करणं बंधनकारक आहे
हे ठीक आहे, लग्नानंतरच्या कमाईत पत्नीचा वाटा असण्यात काही गैर नाही.
17 Nov 2011 - 2:16 pm | पैसा
सगळ्या संपत्तीमधे वाटा आहे. पण काय हो, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? एवढा विश्वास नसेल तर लग्नच करू नका! सोप्पय.
17 Nov 2011 - 7:02 pm | तिमा
गोव्याचं सगळंच पेशल असतं काहो? मागे एक गोयंकार कवी आम्हाला, गोव्याला जो अंधार असतो तो इतका मिट्ट असतो की तुम्हा मुंबईकरांना कल्पनाच येणार नाही, असं सांगत होते.
17 Nov 2011 - 7:51 pm | पैसा
येऊनच बघा ना!
ज्योक्स अपार्ट, गोव्यात पोर्तुगीजांच्या वेळचा समान नागरी कायदा लागू आहे त्यामुळे या तरतुदी इतर भारतापेक्षा वेगळ्या असाव्यात.
17 Nov 2011 - 9:51 am | अर्धवट
आयला.. युयुत्सू तुमच्याकडे कॉपीराईट कायद्याचा भंग केल्याबद्दल नुकसानभरपाई मागणार बहुतेक.
17 Nov 2011 - 10:46 am | अन्या दातार
>>आयला.. युयुत्सू तुमच्याकडे कॉपीराईट कायद्याचा भंग केल्याबद्दल नुकसानभरपाई मागणार बहुतेक.
कॉपीराईट नव्हे हो, पेटंट कायद्याचा भंग. युयुत्सुंचे ते अनडिक्लेअर्ड पेटंट आहे.
17 Nov 2011 - 12:20 pm | JAGOMOHANPYARE
पण ही संपत्ती तर नवर्याकडेच असणार.. समजा, नवर्याने सांगितले की बायकोला एक पैही देणार नाही.. तर नवर्याला कोणती शिक्षा होणार? २-४ हजार द्म्ड भरुन आणि साधी कैद १५ दिवस अशी एखादी सजा भोगून या लचांडातून सुटका होऊ शकते का?
17 Nov 2011 - 12:31 pm | नेत्रेश
जर जमीन, घर व ईतर प्रोपर्टीवर (७/१२ वर) बायकोचे नाव लागले तर तीच्या संमत्ती शिवाय त्या प्रोपर्टीचा कोणताही व्यवहार होउ शकणार नाही. तसेच व्यवहार झाल्यावर मिळालेल्या अर्ध्या पैशांवर पत्नीची मालकी असेल. जेव्हा पती पत्नीमध्ये बेबनाव असेल तेव्हा प्रोब्लेम होउ शकतो.
लग्न होउन काही दीवसांत पत्नीच्या चुकीमुळे / लोभामुळे घटस्फोट झाला तर नवर्याची वडीलोपार्जीत संपत्ती अर्धी पत्नीला फुकट मीळेल.
17 Nov 2011 - 12:46 pm | JAGOMOHANPYARE
तिचे अजुन नाव लावलेलेच नाही, तोवरच एखाद्याने विकले तर? पतीची एफ डी, बँक अकाउंट.. इ ना काय नियम आहे?
17 Nov 2011 - 12:54 pm | अन्या दातार
>>लग्न होउन काही दीवसांत पत्नीच्या चुकीमुळे / लोभामुळे घटस्फोट झाला तर नवर्याची वडीलोपार्जीत संपत्ती अर्धी पत्नीला फुकट मीळेल.
वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याचा प्रश्नच येत नाही. नवर्याची(स्वकष्टार्जित) जी संपत्ती असेल ती मिळेल कदाचित.
17 Nov 2011 - 1:50 pm | वाहीदा
२-४ हजार द्म्ड भरुन आणि साधी कैद १५ दिवस अशी एखादी सजा भोगून या लचांडातून सुटका होऊ शकते का?
सजा भोगायला तयार आहात याचा अर्थ तुम्ही गुन्हा केला आहे हे नकळत कबूल करित आहात
अन more on Serious Note, पत्नी हे एक लचांड आहे असे तुम्हाला खरेच वाटते का ?
मग तिच्याशी लग्नच का करायचे ?
नवर्याने सांगितले की बायकोला एक पैही देणार नाही..
का देणार नाही याची हि मिमांसा होणे गरजेचे आहे. कारण लग्नानंतर तिची अन मुलांची काळजी घेणे (काळजी करणे नव्हे ) ही नवर्याची नैतीक जवाबदारी नाही का ? जर जवाबदारी घ्यायचीच नव्हती तर लग्नाच्या बंधनात तरी तीला का अडकवायचे ?
17 Nov 2011 - 1:58 pm | प्रभाकर पेठकर
धागाकर्त्याचा उद्देश सफल होताना दिसतो आहे.
चालू द्या.
17 Nov 2011 - 2:13 pm | JAGOMOHANPYARE
पत्नी हे एक लचांड आहे असे तुम्हाला खरेच वाटते का ?
पत्नी कशी आहे यावर ते अवलंबून आहे.. :)
कायद्याची चर्चा म्हटली की त्यातील वाटा, पळवाटा यांचीही चर्चा होणारच.. त्यात काही वाईट नाही. त्यामुळे, .....
समजा, नवर्याने सांगितले की बायकोला एक पैही देणार नाही. ...
तर काय? असा प्रश्न विचारलेला आहे.. प्रत्येकाचे वाक्य हे त्याच्या स्वतःच्याच आयुष्याशी संबंधित असतेच असे नाही..
17 Nov 2011 - 3:46 pm | वाहीदा
पत्नी कशी आहे यावर ते अवलंबून आहे
ती पत्नी आहे हे महत्वाचे बाकी सर्व मुद्दे गौण ! कसें :-)
कायद्याची चर्चा म्हटली की त्यातील वाटा, पळवाटा यांचीही चर्चा होणारच.. त्यात काही वाईट नाही. त्यामुळे, .....
कायद्यात पळवाटा शोधत आहात म्हणजे कायदा तुमच्या मार्गावर आहे .. बाकी 'कानून के हात बहोत लंबे होते हैं' असे आम्ही हिंदी चित्रपटात नेहमीच बघत आलो आहोत अन ते असणारच !! उसकी गिरफ्त से कहां तक बचोगे ??
समजा, नवर्याने सांगितले की बायकोला एक पैही देणार नाही. ...
तर काय? असा प्रश्न विचारलेला आहे.. प्रत्येकाचे वाक्य हे त्याच्या स्वतःच्याच आयुष्याशी संबंधित असतेच असे नाही..
नसेलही तुमच्या संधर्भात, पण नवर्याने बायकोला एक पैही देणार नाही असे म्हणणेच मुळात चुकीचे आहे.
बाकी कोई लडकी शादी सिर्फ पैसे के लिए करती है याने उस शख्सके पास पैसोंके अलावा कोई खुबी नहीं
कोणतीही मुलगी काय फक्त पैसे बघुन व्यक्तीशी लग्न करत असेल तर त्या व्यक्तीत पैशाशिवाय काहीच गुण नाहीत असे समजावे काय ? बाकी काहीच पात्रता नाही त्या पुरुषाची म्हणून पैसा सांभाळतो आहे का ?
17 Nov 2011 - 12:28 pm | JAGOMOHANPYARE
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10764456.cms
17 Nov 2011 - 12:34 pm | नेत्रेश
पण ईथे घटस्फोटा आधीच अर्धी संपत्ती मिळाल्यावर घटस्फोटा नंतर काय नाव आहे याचा काय फरक पडतो?
17 Nov 2011 - 1:39 pm | प्रभाकर पेठकर
पतीच्या मालनत्तेत....
शिर्षकात असे वाचून, कुणा पतीच्या मालन बद्दल काही चमचमीत वाचायला मिळणार असा समज झाला होता. पण........
17 Nov 2011 - 2:11 pm | गवि
मिळेना प्रत्येकाच्या बायकोला त्याच्याकडचं ५०%.
लग्न केलंय ना? मग ५० काय १००% सगळं तिचंच आहे की.. निदान विभक्त होताना तरी ५०% राहिले तिच्याकडे तर काय दुखावं पोटात..?
तेवढंही मीलन होणार नसेल तर मुळात लग्नच कशाला ?
किंवा तुम्हाला लुटण्यासाठीच कोणी मुलगी तुमच्याशी लग्न करत असेल तर ते कळत नाही आधी?
कायदा हा नेहमी सद्यस्थितीतल्या मेजॉरिटीसाठी करावा.. बायकांतली भयानक मेजॉरिटी अजून पुरुषांवर पूर्ण अवलंबून आहे.
पुरुषांनाही स्त्रीच्या मालमत्तेत अधिकार का नको वगैरे ही तांत्रिक भाषा आत्ताच्या तारखेला भारतात करणे म्हणजे .. उपाशीपोटीच हवाबाण हरडे, भावी अपचनाच्या भीतीने..
17 Nov 2011 - 2:25 pm | JAGOMOHANPYARE
किंवा तुम्हाला लुटण्यासाठीच कोणी मुलगी तुमच्याशी लग्न करत असेल तर ते कळत नाही आधी?
:) हवाबाण हरडे खाल्ले तरी पोटातला गॅस उद्या जाईलच याची गॅरंटी खाणार्याला असतेच का? एखादी मुलगी फसवेल किंवा नाही हे तरी आधी कसे समजणार? :)
17 Nov 2011 - 2:37 pm | गवि
बरे.. निदान नुसत्या ऑब्झर्वेशनने तरी अशा घटना हजारात एक असतात एवढं तरी मान्य कराल की नाही?
पत्नीला काडीची किंमत (आर्थिक बळ तिच्याकडे नसल्याने) नसलेल्या किंवा मनास आले की लाथ मारुन नेसत्या वस्त्रानिशी रात्रीबेरात्री बायकोला हाकलून देण्याच्या घटना एका मोठ्या वर्गात अगदी सहज घडत असतात, त्यातल्या काही पाहण्यात आल्या असतील असं मानतो.
म्हणूनच म्हटलं.. मुद्दा केवळ तांत्रिक दृष्टीने बरोबर आहे.. पण देशव्यापी कायदा करताना असं पाहण्याची गरज नाही. अगदी उदाहरणादाखल एखाद्या पुरुषावर समजा बाईकडून बलात्कार होऊ शकतो.. (किंवा खोटा आरोप होऊ शकतो..) पण वास्तवात बहुतांश बलात्कार पुरुषांकडून बायकांवर होत असल्याचे स्पष्ट होत असताना, संरक्षक कायदा स्त्रीच्याच बाजूला झुकणारा हवा. तिथे मग एखाद्या गोत्यात आणणार्या खोट्यानाट्या वाईट बाईचा विचार करुन त्या मूठभर अत्याचारित पुरुषांना प्राधान्य देऊन कसे चालेल?
17 Nov 2011 - 2:35 pm | प्रभाकर पेठकर
मग ५० काय १००% सगळं तिचंच आहे की..
माझेही तेच म्हणणे आहे. प्रेम मोठे की पैसा? जिथे आयुष्यभराकरीता प्रेमाचे नुकसान होणार असते तिथे क्षुल्लक पैशांची हाव बाळगणे चुकीचे आहे.
तसेच, घटस्फोटीतेचे पुन्हा लग्न होणे आणि तिच्या आवडीचा दूसरा पती मिळणे जरा दुरापास्तच असते. जरी दुसरे लग्न झाले तरी ती परिस्थितीशी एक तडजोड असते. तेंव्हा अशा परिस्थितीत स्वतःची नैतिक जबाबदारी ओळखून पतीने निदान आर्थिक मदत तरी स्वेच्छेने करावी.
अर्थात, ह्या कायद्यात काही काळाची तरतूद असावी असे मलाही वाटते. तसेच, काही बाबतीत फसवून लग्न केलेले असेल तर असा हक्क मिळू नये.
माझ्या एका मित्राचे लग्न एका कोड झालेल्या मुलीशी त्याला फसवून करण्यात आले. (तिचे कोड तिच्या कपड्यांत लपणारे होते, त्या मुळे लग्नाआधी लक्षात आले नाही.) लग्नापासून दोन दिवसातच सासरच्या माणसांनी तिला माहेरी पाठवून दिले. अशा केस मध्ये त्या मुलीला नवर्याच्या मिळकतीत वाटा मिळणं नवर्यास अन्यायकारक आहे असे वाटते.
17 Nov 2011 - 2:43 pm | गवि
अशा केस मध्ये त्या मुलीला नवर्याच्या मिळकतीत वाटा मिळणं नवर्यास अन्यायकारक आहे असे वाटते.
अगदी.. फसवणुकीच्या केसेस असतात आणि असतीलच.. मूळ डिफॉल्ट कायदा मेजॉरिटीकडे झुकणारा हवा.. "एक्सेप्शन्स" असलेल्या केसेसमधे ते सिद्ध करता येईल..
लग्नानंतर काही महिन्यांनी ही मालमत्ता नावावर करायची असा कायदा केला तर मात्र पत्नीला किरकोळ बाबींवरुनही लग्नानंतर (सहा महिन्याच्या आत) घाईने तातडीने हाकलणार्यांची संख्या वाढेल आणि सामोपचाराने जुळवून घेण्याचा काळ संक्षिप्तात येईल असं वाटतं.
17 Nov 2011 - 4:03 pm | दादा कोंडके
सहमत आहे पण आणखी एक बाजू,
ह्या बाबतीत भारतात प्रचंड विषमता आहे. कायदा तर एकच आहे पण परिस्थिती खूप वेगळी. आणि, असले कायदे करून खेड्यापर्यंत रुजवायला, लोकजागृती करायला किती वेळ लागेल हे माहित नाही. पण शहरात लगेचच दुरुपयोग होईलच असं वाटतय.
18 Nov 2011 - 11:03 pm | Pain
चूक.
तुम्ही म्हणता ती मेजॉरिटी ग्रामीण भागात असावी*. शहरी भागात क्षुल्लक कारणांवरून घटस्फोट घेण्याचे प्रमाण वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा कायदा योग्य ठरणार नाही.
आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे बायकांतली भयानक मेजॉरिटी अजून पुरुषांवर पूर्ण अवलंबून आहे, म्हणजे, लग्न करण्यासाठी, कुटुंब सुरु करण्यासाठी पुरुषांनाच घर, गाडी वगैरेची तजवीज करावी लागते. आता लग्न यशस्वी झाले किंवा नाही झाले, बायकांचा दोन्हीतही फायदा आहे. हे अयोग्य आहे. कायदा करतानाच तो शक्य तेवढा बिनचूक, नि:पक्षपाती करावा.
तेवढंही मीलन होणार नसेल तर मुळात लग्नच कशाला
मीलन झाले तर ५०% -१००% याची गरजच पडणार नाही. मात्र नाही झाले तर फक्त मुलांवर त्याची जबाबदारी का?
किंवा तुम्हाला लुटण्यासाठीच कोणी मुलगी तुमच्याशी लग्न करत असेल तर ते कळत नाही आधी?
मुलीचे सोडा.
तुम्हाला आजपर्यंत जितक्या लोकांनी फसवण्याचा प्रयत्न केला ते सगळे तुम्ही आधीच ओळखू शकला होता?
19 Nov 2011 - 1:14 am | प्रभाकर पेठकर
आता लग्न यशस्वी झाले किंवा नाही झाले, बायकांचा दोन्हीतही फायदा आहे
गवि साहेब,
बायकांचा फायदा कसा? लग्न यशस्वी झाले तर त्यात बायकोचा शारीरिक आणि भावनिक सहभाग असतोच. यशाच्या मार्गावर पुरूष तडजोड करतो तसेच स्त्रिही तडजोड करीतच असते. काही काही कुटुंबांच्या बाबतीत स्त्रिच जास्त तडजोड करीत असते.
लग्न अयशस्वी झाले तर घटस्फोटानंतर स्त्रिचे जे शारीरिक, भावनिक, मानसिक, सामाजिक नुकसान होते त्याची किंमत नवर्यालाच चुकविली पाहिजे. ती त्याची नैतिक जबाबदारी ठरते.
ह्या विधानांमागे घटस्फोट प्रकरणात पत्नीचा काही दोष नसल्याचे गृहित धरण्यात आले आहे. पण पत्नी दोषी असेल तर वेगळा विचार करावा लागेल.
19 Nov 2011 - 2:13 am | Pain
तो प्रतिसाद गवि यांचा नसून मी त्यांना दिलेला आहे.
फायदा म्हणजे कमीत कमी किमतीत/ कष्टात जास्तीत जास्त मोबदला. लग्न यशस्वी झाले तर चांगलेच, पण नाही झाले तरीही त्यांना नवर्याच्या कमाईतला अर्धा वाटा मिळणारच, हे चूक आहे. याचा दुसरा अर्थ, लग्न टिकवण्याची सगळी जबाबदारी पुरुषांची. बायकांनी काहीही केले तर ते सहन करायचे किंवा अर्धी संपत्ती गमवायची. हे चूक आहे.
आत्ताच्या परिस्थितीत घटस्फोट झाल्यास त्यांना त्या नवर्याच्या संपत्तीत वाटा मिळत नाही पण मग दुसरे लग्न केल्यावर सगळे मिळतेच. पण हा कायदा झाल्यावर बायका दर लग्नागणिक श्रीमंत होत जातील आणि पुरुष मात्र पहिले लग्न मोडल्यास आयुष्यातून उठतील.
लग्न अयशस्वी झाले तर घटस्फोटानंतर स्त्रिचे जे शारीरिक, भावनिक, मानसिक, सामाजिक नुकसान होते त्याची किंमत नवर्यालाच चुकविली पाहिजे. ती त्याची नैतिक जबाबदारी ठरते
म्ह्णजे पुरुषांचे ते होत नाही? त्यांना शरीर, भावना, मन आणि सामाजिक स्थान नसते?
ह्या विधानांमागे घटस्फोट प्रकरणात पत्नीचा काही दोष नसल्याचे गृहित धरण्यात आले आहे
गृहित धरू नका. जो कोणी पीडीत असेल (नवरा / बायको) त्याला (योग्य तेवढाच) न्याय मिळायला हवा.
19 Nov 2011 - 8:39 am | गवि
ह्म्म.. पेन,तुम्ही म्हणताय त्यातही तथ्य वाटतंय खरं..
19 Nov 2011 - 12:02 pm | प्रभाकर पेठकर
तो प्रतिसाद गवि यांचा नसून मी त्यांना दिलेला आहे.
चुक झाली. क्षमस्व.
फायदा म्हणजे . कमीत कमी किमतीत/ कष्टात जास्तीत जास्त मोबदला.
'कमीत कमी किमतीत/कष्टात' हे तुम्ही गृहित धरता आहात. घरकाम, बाळंतपणं,मुलांचे संगोपन, शिक्षण, नवर्याची (असतील तर सासू/सासर्यांचीही) खिदमत, पैपाहुणा, आजारपणं, सणवारांच्या, प्रत्येकाच्या आवडीनिवडीच्या रोजच्या जीवनापेक्षा वेगळ्या मागण्या, काही प्रमाणात बाजारहाट, बँकांची कामे, मुलांच्या शाळांच्या भेटी अशी अनेक कामे ह्या 'कमीत कमी कष्टात' येतात.
लग्न टिकवण्याची सगळी जबाबदारी पुरुषांची. बायकांनी काहीही केले तर ते सहन करायचे
असे माझे मत नाही हे मी माझ्या प्रतिसादात सुचविले आहे. पत्नीचा काही दोष नाही असे गृहित धरलेले आहे. वेगळ्या परिस्थितीत वेगळा विचार होऊ शकतो. असे म्हंटले आहे.
आत्ताच्या परिस्थितीत घटस्फोट झाल्यास त्यांना त्या नवर्याच्या संपत्तीत वाटा मिळत नाही
मला नक्की माहित नाही. पण तुमची हि माहिती चुकीची असण्याची शक्यता आहे. कारण, माझ्या एका मित्राच्या घटस्फोटाच्या विचारांना वकिलाने, 'कायदा स्त्रियांच्या बाजूने जास्त आहे' असे समजावून त्याला त्या कृतीपासून परावृत्त केले होते. घटस्फोटाचे कारण, तत्कालिन परिस्थिती ह्यावर बरेच अवलंबून असते.
दुसरे लग्न केल्यावर सगळे मिळतेच.
दूसरे लग्न तितकेसे सोपे नसते. ती खुपदा नुसतीच एक तडजोड असते.
हा कायदा झाल्यावर बायका दर लग्नागणिक श्रीमंत होत जातील आणि पुरुष मात्र पहिले लग्न मोडल्यास आयुष्यातून उठतील.
हि भिती अनाठायी वाटते. झाला घटस्फोट, किती संपत्ती आहे? भागिले दोन करा. द्या एक हिस्सा बायकोला. इतके ते सरळ नसणार. पतीलाही आपले निर्दोषित्व शाबित करण्याची संधी मिळणार असेलच.
त्यांना शरीर, भावना, मन आणि सामाजिक स्थान नसते?
पुन्हा सांगतो, जर पती निर्दोष असेल तर एकूण प्रकरणाचा वेगळा विचार करावा लागेल. पण मी मांडलेला विचार पत्नी निर्दोष आहे ह्या गृहितकावर आधारित आहे. म्हणजेच पती दोषी आहे. त्यामुळे दोषी पतीने घटस्फोटाने येणारे नुकसान स्वतःहून ओढाऊन घेतले आहे. त्यामुळे घटस्फोटाचे कारण अतिशय महत्त्वाचे ठरते. जो कोणी दोषी असेल त्याच्या माथी नंतरचे भोग हे त्याच्या स्वतःच्या चुकीमुळे येणार आहेत त्यासाठी दुसर्याला जबाबदार धरता येणार नाही.
पण बहुतांश घटनांमध्ये, पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत, पुरुषांकडून 'हम करेसो कायदा' अशा वृत्तीने स्त्रीवर अन्याय्य घटस्फोट लादले जातात त्याला प्रतिबंध बसावा म्हणून असा कायदा अस्तित्वात येत असावा.
घटस्फोटाच्या केस मध्ये पती-पत्नीच्या संबंधावर साधक-बाधक चर्चा होऊनच निर्णय घेतला जातो, जाईल. त्यामुळे कुणाही एकावर अन्याय होणार नाही अशी आशा आहे.
17 Nov 2011 - 2:45 pm | JAGOMOHANPYARE
मुसलमान बायकाना हा अधिकार मिळणार का? मुसलमान लोक घटस्फोटीत बायकोला पोटगीही देत नाहीत. त्याना वफ्फ बोर्ड आणि सरकार पोटगी देते. . असे लोक इस्टेटीचा अर्धा भाग काय देणार? :)
मुसलमान पुरुष होण्यात फायदेच फायदे आहेत .. :)
17 Nov 2011 - 3:03 pm | वाहीदा
हा ! हा ! हा ! दूर के ढोल सुहाने !!
17 Nov 2011 - 4:08 pm | मदनबाण
मुसलमान पुरुष होण्यात फायदेच फायदे आहेत ..
अफजल खानाला ६३ बायका होत्या म्हणे ! (हा ऑफिशियल काउंट बरं !) त्यांच त्याने काय केल हे माहितच असेल !
अजुन बुरख्या बाहेर यांच्या स्त्रिया पडु शकल्या नाहीत ! तर कसले आले पोटगी हक्क ?
17 Nov 2011 - 4:16 pm | वाहीदा
मुद्दा स्त्रीयांचा आहे अन त्यांच्या हक्काचा आहे त्यात परत आपल्या सवयीप्रमाणे धार्मिक, जातीयवादी गरळ ओकू नये हि नम्र विनंती.
17 Nov 2011 - 8:20 pm | JAGOMOHANPYARE
पण ४ बायका असतील तर प्रत्येक बायकोला ५० % या हिशोबाने कसे वाटणार? :) सरकारचं गणित कच्चं आहे.. :)
17 Nov 2011 - 2:40 pm | आदिजोशी
म्हणजे आता स्वतःच्या मालमत्तेतला ५०% भाग तरी पुरुषांना मिळणार. वा वा वा :)
17 Nov 2011 - 2:53 pm | गणपा
ह्याला म्हणतात अर्धा गल्लास भरलेला पहाणाच्या दृष्टिकोन. ;)
17 Nov 2011 - 2:44 pm | विजुभाऊ
एक चांगला कायदा आहे.
मला वाटले हा धागा युयुत्सु नी काढला आहे की काय
17 Nov 2011 - 3:06 pm | राजघराणं
पूर्वी बायका नवर्याला उजव्या खिशात टाकून १००% डाव्या खिशात टाकत असत.
ही बातमी वाचून - उरलेले ५० % बुडाले - अशी प्रतिक्रिया आमुच्या, सुविद्य पत्नीने दिली !
17 Nov 2011 - 4:24 pm | संपादक मंडळ
चर्चा विषयाला अनुसरून करावी. धार्मिक रंग देऊ नये ही सर्वांना विनंती.
17 Nov 2011 - 4:27 pm | मदनबाण
विनंतीस मान देउन, या विषयावर मी मौन घेतो.
18 Nov 2011 - 5:43 pm | राजघराणं
हि आमुची स्वाक्षरी आहे हो ...
17 Nov 2011 - 5:00 pm | परिकथेतील राजकुमार
काय सांगताय काय ?
म्हणजे उद्या आमच्या नीलकांताने लग्न केले की इथल्या पाशवी शक्ती अजून पाशवीपणा* दाखवणार म्हणा की ;)
*भयग्रस्त होऊन आधी लिहीलेला 'माज' हा शब्द खोडून 'पाशवीपणा' असा बदल केल्या गेल्या आहे.
17 Nov 2011 - 8:46 pm | रेवती
आधी तुम्ही लग्न करा महाराज!
एक साधा संसार करायचा तर घाबरलाय.
हा बुवा पाककृतींसाठी जिन्नस शोधत गावभर हिंडेल पण एखाद्या सुगरणीशी लग्न करायला नाही म्हणेल!
18 Nov 2011 - 11:18 am | परिकथेतील राजकुमार
एकूणच हे कायद्याचे बडगे बघता लिव्ह इन मध्येच राहणे फायद्याचे असे वाटते आहे.
सुगरणी उरल्यात कुठे आजकाल ? ;)
आपण तर लग्न करायचेच नाही ह्या मताचे आहोत. त्यातुन उद्या विचार बदललाच, तर सरळ तळकोकण गाठणार आणि एखाद्या भटजीची सालस आणि गुणी पोरगी करून आणणार :) चार चौघात उठुन वैग्रे दिसली पाहीजे, कमावती पाहीजे असली आपली काय अट नाही.
*रात्री आमची लडखडती पावले ऐकली की सासु सासरे उठायच्या आत दार उघडायला शिकली म्हणजे झाले ;)
18 Nov 2011 - 11:24 am | मदनबाण
तर सरळ तळकोकण गाठणार आणि एखाद्या भटजीची सालस आणि गुणी पोरगी करून आणणार
उत्तम बर्याच संधी आहेत रे... परवाच धावती कोकण यात्रा करुन आलो आहे ! ;) अर्थात देव दर्शनासाठी हो ! ;)
एकदा व्याडेश्वराचे दर्शन घेच ! ;)
चार चौघात उठुन वैग्रे दिसली पाहीजे
खी खी खी... प्रभू मास्तरांनी सांगितलेली एक म्हण आठवली ! ;)
(कोकण प्रेमी) :)
18 Nov 2011 - 12:17 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>>खी खी खी... प्रभू मास्तरांनी सांगितलेली एक म्हण आठवली !
हा हा हा !!! कळले कुठली म्हण ते.
18 Nov 2011 - 12:27 pm | वाहीदा
रात्री आमची लडखडती पावले ऐकली की सासु सासरे उठायच्या आत दार उघडायला शिकली म्हणजे झाले
=)) =))
18 Nov 2011 - 1:11 pm | प्रभाकर पेठकर
आपण तर लग्न करायचेच नाही ह्या मताचे आहोत.
अत्यंत स्तुत्य विचार आहे. आम्ही आता श्री. गवि म्हणतात तसे 'नो रिटर्न पॉईंट' ओलांडून पुढे गेलो आहोत.
त्यातुन उद्या विचार बदललाच तर,
झाSSSSलं...! लगेच उद्याच??
एखाद्या भटजीची सालस आणि गुणी पोरगी करून आणणार चार चौघात उठुन वैग्रे दिसली पाहीजे.
राजे..राजे...२५ वर्षांपुर्वी का नाही हो भेटलात??
रात्री आमची लडखडती पावले ऐकली की सासु सासरे उठायच्या आत दार उघडायला शिकली म्हणजे झाले.
कुणाचे सासू-सासरे?? तळ कोकणात सासुरवाडीतच कायमचा तळ ठोकायचा विचार आहे कि काय? pun unintended.
18 Nov 2011 - 1:25 pm | परिकथेतील राजकुमार
तुम्ही गविंचे मनावर घेऊ नका. टंचनिकेशेजारी बसून असे काहिही सल्ले देतात ते आजकाल. ;)
लगेच उद्याच असे नाही. पण आपले एक सेफर साईड म्हणुन..
हायला ! काका, काय बालविवाह करणार होतात का काय माझा ?
अर्थात त्या कन्येचे सासू सासरे ;)
मी मोठा तळ ठोकीन हो, पण सासर्याने ठोकून द्यायला हवा ना.
18 Nov 2011 - 1:36 pm | प्रभाकर पेठकर
हायला ! काका, काय बालविवाह करणार होतात का काय माझा ?
अहो! तुमच्या मार्गदर्शनाखाली आमच्या आयुष्याला योग्य अशी दिशा (म्हणजे डायरेक्षन हो, हे कुणा मुलीचे नांव नाही) लाभली असती.
18 Nov 2011 - 2:32 pm | गवि
तुम्ही गविंचे मनावर घेऊ नका. टंचनिकेशेजारी बसून असे काहिही सल्ले देतात ते आजकाल
>>>>
ऑ? "आजकाल" का बोवा?
आम्ही आजकालच नव्हे... पहिल्यापासूनच काहीही सल्ले देत आलो आहोत.. ;)
17 Nov 2011 - 8:51 pm | रेवती
सारखे सारखे काय कायदे करायचे अन् बदलायचे?
कधी नवर्याच्या संपत्तीत तर कधी वडीलांच्या संपत्तीत तर कधी सासर्यांच्या संपत्तीत बायकोचा/मुलीचा/सुनेचा हिस्सा किती या चर्चांचा कंटाळा आलाय. किती दिवस त्याच त्या चर्चा? प्रेम म्हणून काही आहे की नाही?
17 Nov 2011 - 8:52 pm | विशाखा राऊत
जर लग्न करताना पत्नी कमवती हवी अशी अट असते. कमवत्या पत्नीचे पैसे चालतात तर मग त्याच पत्नीला ५०% कमाई द्यायला एवढी कुरकुर का?
17 Nov 2011 - 9:33 pm | प्रशु
कमवती पत्नी हि काळाची गरज आहे. एकट्याच्या पगारात आज घर नाही चालु शकत..
17 Nov 2011 - 10:15 pm | जाई.
विशाखाशी सहमत आहे
17 Nov 2011 - 9:31 pm | प्रशु
एक वेळ हक्क मानुन घेऊ पण जबाबदरीचे काय? समजा एखाद्याचा घटस्फोट झाला आणी नवरयाच्या जागेचे जर ग्रुहकर्ज असेल. तर तो बिचारा फेडत बसेल आणि बायको मात्र त्यात हक्क मागेल. ह्याबद्द्ल कायद्यात काय तरतुद असेल?
17 Nov 2011 - 10:09 pm | JAGOMOHANPYARE
या सगळ्या समस्यांचे समाधान कायदा पूर्ण वाचल्याशिवाय होणार नाही.
18 Nov 2011 - 8:25 am | ५० फक्त
अजुन एक तलवार, आता अजुन एक ढाल बघणं आलं, नाहीतर यापेक्षा मोठी तलवार तरी.
आधीच असे एकांगी कायदे कमी का आहेत, यात अजुन एकाची भर. युगानुयुगे अन्याय झालेला आहे हे कबुल पण तो असा कायदे करुन का निवारता येणार आहे ?
आणि महत्वाचं म्हणजे नवरा बायको हे नातं, कुटुंबपद्धती ही काही सिटिसि आणि पिएलाय या बेसिसवर निर्माण करायची अन जपायची असतात का ? प्रेम असेल तर पैसा मिळेलच, पण प्रेम नसेल किंवा कमी असेल, कमी झालेलं असेल तर मात्र उचलुन ५०% पैसा देणं हा नव-यावर अन्याय नाही का ? आणि हा कायदा मग असा ही पुरुषप्रधानतेला अधोरेखित करत नाही का ?
याचा एक दुरगामी परिणाम म्हणजे लोकं प्रॉपर्टी करणंच कमी करतील आला पैसा उडवुन टाका, आजच्या दिवशी बायको खुश आपण पण खुश, उगा जीवाचं पाणी करुन प्रॉपर्टी करा आणि उद्या बायकोबरोबर पटलं काय नाही पटलं ती उभी राहणार कायदा हातात घेउन द्या मला यातले ५०% म्हणुन, किंवा मग भाव उतरत जाणा-या प्रॉपर्टी करा. गाड्या घ्या, पाच वर्षात किमती १५% पण रहात नाहीत मग करा ५०-५० %.
आणि एकत्र कर्ज घेणं वगैरे गोष्टी फक्त ५-८ % घरात होत असतील आणि अशा केसेस मध्ये घराची मालकी सध्याचा कायद्यानुसार जॉईंटच असते, त्यासाठी वेगळा कायदा करायची काय गरज आहे.
18 Nov 2011 - 8:44 pm | आत्मशून्य
.
19 Nov 2011 - 3:43 pm | भास्कर केन्डे
ही चर्चा वाचून अशातच वाचलेला एक लेख आठवला (शोधत आहे. सपडला तर इथे अडकवू).
त्या लेखात उदार व्यापारी धोरण असलेल्या पाश्चात्य देशात कुटुंब संस्थेचे झालेले राष्ट्रीयकरण (Nationalization) आणि त्यामुळे समाजावर तसेच अर्थव्यवस्थेवर पडणारा ताण यावर जरा हटके चर्चा केलेली होती. त्यात भारताच्या सामाजिक रचनेचा उल्लेख होता. त्यांच्या मते कुटुंबांमध्ये कामपेक्षा जास्त सरकारी लुडबुड केल्याने घटस्फोटित, निराधार वृद्ध आणि एका पाल्यासोबत वाढलेले एकलकोंडी मुले ही सगळी डोकेदुखी वाढत आहे. त्यांची जबाबदारी सरकारी खजिण्यावर पडून अर्थव्यवस्थेवरही तान पडत आहे. ही जबाबदारी सरकारवर पडू द्यायची नसेल तर केवळ कायदे करत बसण्या ऐवजी कुटुंबसंस्था मजबूत होण्यासाठी शिक्षण आणि "भावी घटस्फोटितांना" जोडपे म्हणून एकत्र राहण्यासाठी प्रोत्साहित करणारी संस्था विकसित करणे जास्त हितवाह आहे.
आपल्या देशात महिलांवरील अत्याचार बघता कडक कायदे असणे आवश्यक असले तरी त्यांचा वापर खरेच गरजू करत (करु शकत) आहेत का यावरही लक्ष द्यायला हवे. कायद्यांचा अतिरेक करत बसण्यापेक्षा कुटुंबसंस्था आणखी मजबूत कशी होईल यावर सरकारने आपली शक्ती खर्च केल्यास जास्त हितवाह ठरेल असे वाटते.
19 Nov 2011 - 7:36 pm | रेवती
सहमत.
पण ते अवघड होत जाते कारण कोणताही संसार ज्यांचा आहे त्यांनी करण्यापेक्षा दुसरेच लोक येऊन त्यांनी करण्याची पद्धत आहे. जसे, नवरा बायकोच्या भांडणात ज्येष्ठांनी मध्यस्थी केल्यास लग्न वाचण्याची शक्यता असते (जी चांगली बाजू) तसेच त्यांचा नेहमीचा सहभाग अती झाला तर तराजू दुसरीकडे झुकतो. अनेक घरांमध्ये आजही मुलासुनेचा संसार सासूसासरे किंवा (मुलीचे) आईवडील करत असतात. मुलांना जरा अडचण आली की पळत जातात. त्यांचे त्यांना निस्तरू देत नाहीत मग हे असे संसार नाजूक अवस्थेत राहतात असे मला वाटते. कुटुंबसंस्था मजबूत करायची असेल तर सरकारची जबाबदारी अल्प असते. एकंदरीतच तारेवरची कसरत आहे.;)
19 Nov 2011 - 4:19 pm | ५० फक्त
धन्यवाद भास्कार केंडे, मला जे म्हणायचं होतं ते अगदी करेक्ट शब्दात मांडलं आहे तुम्ही, '' कुटुंबांमध्ये कामपेक्षा जास्त सरकारी लुडबुड केल्याने घटस्फोटित, निराधार वृद्ध आणि एका पाल्यासोबत वाढलेले एकलकोंडी मुले ही सगळी डोकेदुखी वाढत आहे. त्यांची जबाबदारी सरकारी खजिण्यावर पडून अर्थव्यवस्थेवरही तान पडत आहे. ही जबाबदारी सरकारवर पडू द्यायची नसेल तर केवळ कायदे करत बसण्या ऐवजी कुटुंबसंस्था मजबूत होण्यासाठी शिक्षण आणि "भावी घटस्फोटितांना" जोडपे म्हणून एकत्र राहण्यासाठी प्रोत्साहित करणारी संस्था विकसित करणे जास्त हितवाह आहे.'''
सरकार सरकार म्ह्णुन आपल्या खाजगी गोष्टीत किती येउ द्यायचं कायद्याला हे ज्यानं त्यानं ठरवायचं आहे.
19 Nov 2011 - 5:12 pm | JAGOMOHANPYARE
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10787699.cms