भरली कारली.

ज्योति प्रकाश's picture
ज्योति प्रकाश in पाककृती
15 Nov 2011 - 12:35 am

साहित्यः-४ कोवळी लहान कारली.व तळण्यासाठी तेल.
सारणासाठी साहित्यः-२ चमचे भाजलेले तीळ,
२ चमचे भाजलेले बेसन्(एक चमचा तेलावर भाजवे.)
२ चमचे भाजलेले सुके खोबरे.
१ चमचा धणेपूड.
१ चमचा जिरेपूड.
अर्धा चमचा आमचुर पावडर.
अर्धा चमचा लाल तिखट.
चिमूटभर हिंग.
पाव चमचा हळद.
१ चमचा बदिशेप.
चवीपुरती साखर.
१ चमचा खसखस.
मिठ.


कृती :-कारली धुवून घ्यावी.पाठ किसणीने किसून प्लेन करून घ्यावी.प्रत्येक कारल्याला उभा छेद करून घ्यावा.
आणि आतील बिया काढून साफ करावे.आतल्या बाजुने मिठ चोळून ठेवावे.तीळ,खोबरं एकत्र कुटून
घ्यावे.त्यात धणेजिरे पूड्,तिखट्,साखर्,भाजून कुटलेली खसखस्,तेलावर भाजलेले बेसन व मिठ घालून
मिश्रण एकत्र करावे.मिश्रण कारल्यात भरून कारल्याला गच्च दोरा बांधावा. व कारली कुरकुरीत तळावी.
वाढण्यापूर्वी दोरा काढून टाकावा.

प्रतिक्रिया

प्राजु's picture

15 Nov 2011 - 6:57 am | प्राजु

पाकृ छान.. पण फोटो :(
प्रेझेंटेशन बहोत जरूरी है !! (संजीव कपूर कडून साभार!!) :)

पैसा's picture

15 Nov 2011 - 7:34 am | पैसा

यांच्या पाकृ छान असतात, पण फोटोत गडबड होते.

कच्ची कैरी's picture

15 Nov 2011 - 10:38 am | कच्ची कैरी

असच म्हणेल .

झकास आवडती पाकृ... जियो...

:)

कच्चा पापड पक्का पापड's picture

15 Nov 2011 - 11:17 am | कच्चा पापड पक्क...

माझी आवडती भाजी...

निवेदिता-ताई's picture

15 Nov 2011 - 12:53 pm | निवेदिता-ताई

सुंदर ह....करुन पहातेच

पाककृती चविष्ट असणार यात काही शंका नाही. बाकी मोबाईल कॅमेर्‍याने फोटो काढतान जरा काळजी घेतली की असे धुरकट फोटो येणार नाहीत.

- पिंगू

मेघवेडा's picture

15 Nov 2011 - 5:43 pm | मेघवेडा

झकास! कारली म्हणजे लै खास! आवडली.

मदनबाण's picture

15 Nov 2011 - 5:44 pm | मदनबाण

वा... :)
चिंचेचा कोळ+कांदा यांचे सारण करुन केलेली भरली कारली सुद्धा मस्त लागतात. :)

JAGOMOHANPYARE's picture

15 Nov 2011 - 9:21 pm | JAGOMOHANPYARE

छान

शुचि's picture

15 Nov 2011 - 9:55 pm | शुचि

सुरेख!!!!

पूनम ब's picture

16 Nov 2011 - 7:47 am | पूनम ब

छान आहे पाककृती..करून पाहीन :)

सविता००१'s picture

17 Nov 2011 - 6:35 pm | सविता००१

हीच पाक्र.इथे आहे, वैदेहीताईच्या ब्लॉगवर .:http://chakali.blogspot.com/2011/07/bharli-karli.html

५० फक्त's picture

20 Nov 2011 - 6:07 pm | ५० फक्त

+१००० टु सविता००१

तुमची पण नजर जबरा आहे, मला हे वल्लीनं पण सांगितलेलं होतं. काही शब्दांचा फरक सोडला तर सेम टु सेम आहे, अगदी सामानाची यादी पण तशीच्या तशी आहे. म्हणजे दोन चित्रातले १२ फरक ओळखा असतं ना तसं आहे हे.

साहित्य रे कृतीच्या तिस-या पॉईंटातल्या पहिल्या ओळिपर्यंत तेच आहे सगळं. ही खावी कशाबरोबर आणि खालच्या दोन टिपा द्यायच्या राहिल्यात.

पण याबद्दल काय सांगतं मिपाचं धोरण माहित नाही याबद्दल कुणी काही सांगेल का ?

तिकडचे फोटो मात्र राइट क्लिक प्रोटेक्डेड दिसतात.