पारंबी हा नवीन मराठी चित्रपट येत्या २५ तारखेला प्रदर्शीत होतोय. मराठीत सध्या फार कमी आशयघन चित्रपटांची निर्मीती होतेय. म्हणूनच सध्या प्रदर्शीत झालेल्या "देऊळ" नंतर "पारंबी" या चित्रपटाला देखील विशेष महत्व आहे.
शिक्षण आणि तंत्रज्ञानाद्वारे होत असलेली प्रगती आणि पर्यायाने दिवसागणीक अधिकाधिक प्रगत होणार जग असं चित्र आपण सारेच अनुभवतोय. त्यात असणारा भारतीय सुशिक्षित भारतीय तरूणांचा सहभाग खूप मोलाची कामगिरी बजावतोय. पण हे झालं भारताचा चेहरा असणा-या शहरी विभागाचं चित्र! अजूनही भारतातला ग्रामीण वर्ग अप्रगतच आहे.शहरातील तरुणांनी खेड्याकडे वाटचाल केल्यास खेड्यातील विविध गोष्टींचा कायापालट होऊन आधुनिक विचारसरणी खेड्यांमध्ये रुजेल आणि सर्वांगीण प्रगतीची वाट आपणास दिसेल असं आशादायी चित्र हा चित्रपट निर्माण करतो.
या चित्रपटाबद्दल अधिक माहिती http://www.maanbindu.com/new-marathi-movie-Parambi या लिंकवर उपलब्ध आहे!
तसच "शेअर ऍंड विन" ही प्रतियोगिता ही सुद्धा या लिंकवर सुरू आहे. या प्रतियोगितेच्या पहिल्या ५ विजेत्यांना प्रिमियरची प्रत्येकी २ तिकीटे फ़्री मिळणार आहेत, तसच पहिल्या १०० जणांना या चित्रपटाच्या Free Audio CDs देखील मिळणार आहेत! मिपाकरांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा :)
प्रतिक्रिया
14 Nov 2011 - 6:36 pm | यकु
देऊळ झालं
पारंबी झाली
आता पुढच्या वेळेस
शेंडी
नावाचा सिनेमा पहावा लागणार बहुतेक.
नाही.. आजकाल कशात काय आशय असेल हे काही सांगता येत नाही म्हणून म्हटले.
15 Nov 2011 - 1:00 pm | मन१
शेंडी नावाचा चांगला चित्रपट असेल तर आम्ही तोही पाहू. त्याबद्दलही लिहिलेले वाचू. आशय असलाच पाहिजे असे नाही.
सामान्य किंवा सुमार दर्जाचे हिंदी चित्रपट मोठ्या प्रमाणावर बघितले जात असतील, चर्चिले जात असतील तर महाराष्ट्रात मराठी माणसाने तरी मराठी चित्रपट सामान्य किंवा सुमार दर्जाचा वाटला तरी पहावा.
रेडी,बॉडीगार्ड, दे दनादन्,ढोल,रा-वन असे काही फारसे विशेष नसणारे सिनेमे सातत्याने बघणारी मराठी मंडळी सर्वत्रच सापडतील. त्यांना मायभाषेतल्या चित्रपटाकडे खेचण्यासाठी "चित्रपट आलाय", किंवा "चित्रपटात अमुक अमुक चांगले वाटले" हे सांगत राहणे अधिक हिताचे आहे.
चित्रपटाची ओळख आवडली. चित्रपटातला आशय नाही.* तरीही बघायचा विचार आहे.
*माझा खेड्यात राहण्याचा अनुभव जेमतेम काही महिन्यांचाच आहे. तेवढ्या अवधीत वेगवेगळ्या पाच्-सात खेड्यात राहिलेलो आहे.पण माझेही निरिक्षण असेच की खेडी म्हणजे ग्रामीण समृद्धीचा(दूध दुभत्याचा पूर्,भरपूर सकस अन्न, सात्विक-सज्जन माणसे वगैरे) व संस्कृतीचा वारसा सांगणारी महानतम जागा असा आव फक्त प्रचारकी माध्यमातच असतो. प्रत्यक्षात खेडे म्हणजे वेगळेच काही तरी, भीषण असे आहे.
14 Nov 2011 - 6:42 pm | आदिजोशी
शिक्षण आणि तंत्रज्ञानाद्वारे होत असलेली प्रगती आणि पर्यायाने दिवसागणीक अधिकाधिक प्रगत होणार जग असं चित्र आपण सारेच अनुभवतोय. त्यात असणारा भारतीय सुशिक्षित भारतीय तरूणांचा सहभाग खूप मोलाची कामगिरी बजावतोय. पण हे झालं भारताचा चेहरा असणा-या शहरी विभागाचं चित्र! अजूनही भारतातला ग्रामीण वर्ग अप्रगतच आहे.शहरातील तरुणांनी खेड्याकडे वाटचाल केल्यास खेड्यातील विविध गोष्टींचा कायापालट होऊन आधुनिक विचारसरणी खेड्यांमध्ये रुजेल आणि सर्वांगीण प्रगतीची वाट आपणास दिसेल असं आशादायी चित्र हा चित्रपट निर्माण करतो.
आशुतोष गोवारीकरांच्या स्वदेसची आठवण झाली
15 Nov 2011 - 4:24 am | अर्धवटराव
तसं "स्वदेस" मला प्रचंड कंटाळवाणा (फालतू म्हणणार होतो...) वाटला होता. पारंबी स्वदेस पासुन फुटलेली नसावी अशी आशा करतो.
(मूळ) अर्धवटराव
14 Nov 2011 - 8:17 pm | रेवती
आजकाल सिनेमाच्या धाग्यांचा मिपावर पाऊस पडतोय.:)
15 Nov 2011 - 2:20 pm | मोहनराव
असेच म्हणतो.
ते काय ते राकस्टारच २ वेळा परिक्षण आलय!!
15 Nov 2011 - 5:12 am | सन्जोप राव
शिक्षण आणि तंत्रज्ञानाद्वारे होत असलेली प्रगती आणि पर्यायाने दिवसागणीक अधिकाधिक प्रगत होणार जग असं चित्र आपण सारेच अनुभवतोय. त्यात असणारा भारतीय सुशिक्षित भारतीय तरूणांचा सहभाग खूप मोलाची कामगिरी बजावतोय.
हे एक 'स्वीपिंग स्टेटमेंट' आहे. भारतात जे होते आहे त्याला सरसकट 'प्रगती' असे म्हणणे बालीशपणाचे आहे. 'बदल' म्हणा हवे तर, प्रगती नव्हे. तंत्रज्ञान आणि शिक्षण या दोन शब्दांनाही माझा असाच आक्षेप आहे. पण विषयांतराच्या भीतीने सध्या ते राहू देतो.\
शहरातील तरुणांनी खेड्याकडे वाटचाल केल्यास खेड्यातील विविध गोष्टींचा कायापालट होऊन आधुनिक विचारसरणी खेड्यांमध्ये रुजेल आणि सर्वांगीण प्रगतीची वाट आपणास दिसेल असं आशादायी चित्र हा चित्रपट निर्माण करतो.
हा गांधीवादी आदर्शवाद फार भाबडा वाटतो. एकतर खेडे आणि खेड्यातील जीवन यांवर भरभरुन लिहिणार्या-बोलणार्या लोकांनी स्वतः कधी महानगरपालिकांची वेस ओलांडलेली नसते. आणि दुसरे म्हणजे कसले आले आहे खेड्यांतील आदर्श जीवन? 'जे जे अहितकारक असते, ते ते वेगाने फैलावते' याची प्रचिती घ्यायची असेल तर भारतातली -विशेषतः महाराष्ट्रातली आजची खेडी बघावीत. गलिच्छ, ओबडधोबड, धुळकट रस्ते, मागासलेल्या, बुरसट विचारांची स्वार्थी अप्पलपोटी माणसे, रोगराई आणि अडाणीपणा, अंधश्रद्धा आणि टीव्हीजन्य बटबटीतपणा आणि अगदी मूलभूत सुविधांची वानवा.... शहरे आणि खेडी यातले काय अधिक वाईट हे सांगणे कठिण होऊन बसले आहे. या वर्षीच्या 'दीपावली'च्या अंकात पुणे-मुंबई-नाशिक या सुवर्ण त्रिकोणापासून तासा-दोन तासांच्या अंतरावर विकासाचे, प्रगतीचे (सर्वांगिण विकास, रोहयो वगैरे) वारेही कसे पोचलेले नाही यावर एक लेख आहे. यावर उत्तर म्हणूनच 'तरुणांनो, खेड्याकडे चला, आपण खेडी बदलूयात, पर्यायाने जगही बदलेल' अशा सानेगुरुजी कल्पना डोक्यात असणार्यांनी सलग पंधरा दिवस एखाद्या खेड्यात घालवून दाखवावेत. फक्त अशा गोष्टी ऐकायला, पडद्यावर बघायला लोकांना बरे वाटते, इतकेच. म्हणूनच असे 'स्वदेस' छापाचे चित्रपट आणि करण जोहरचे चित्रपट यांच्यात काही फरक नाही असे मला वाटते.
15 Nov 2011 - 12:20 pm | शाहिर
"मागासलेल्या, बुरसट विचारांची स्वार्थी अप्पलपोटी माणसे, "
तुम्हाला खेड्याविषयी आकस असेल म्हणुन अशी भडक आणि मुर्ख विधाने करत आहत..
सर्व माणसांना एकाच मापामधे कसे काय तोलता तुम्ही ??
तरुणांनो, खेड्याकडे चला, आपण खेडी बदलूयात, पर्यायाने जगही बदलेल' अशा सानेगुरुजी कल्पना डोक्यात असणार्यांनी सलग पंधरा दिवस एखाद्या खेड्यात घालवून दाखवावेत"
तुम्हाला अवघड वाटत असेल पण बरेच जण जाउन रहातात ..
आज सुद्धा प्रकाश आमटे आणी कित्येक लोका आदिवासी भागात काम करतात..
आमचे मंडळ देखील वर्षातुन एकदा १० -१२ दिवस श्रमदान करतेच ..
अजुन ज्यांचे गाव सुटले नाही ते चाकरमानी लोकांना सुद्धा खेड्याची ओढ असतेच
हे एक 'स्वीपिंग स्टेटमेंट' आहे. भारतात जे होते आहे त्याला सरसकट 'प्रगती' असे म्हणणे बालीशपणाचे आहे. 'बदल' म्हणा हवे
सरसकट विधाने तुमचया लक्षात येतात तर तुम्ही सुद्धा ती टाळली तर बरे
16 Nov 2011 - 4:33 am | सन्जोप राव
तुमच्या बालीश विधानांना प्रतिसाद देण्याची मला गरज वाटत नाही. मला वादात खेचण्याच्या तुमच्या आमंत्रणाला मी नकार देतो.
16 Nov 2011 - 12:04 pm | कपिलमुनी
प्र क ट आ
15 Nov 2011 - 8:19 pm | दादा कोंडके
रावसाहेब एकुणच प्रतिसाद पटला त्यापेक्षा हे किती पोटतिडकीनं लिहिलय हे समजलं.
आणि खरच या बदलाला प्रगती म्हणवत नाही. गलिच्छपणा, धुळकट रस्ते, रोगराई, मुलभुत सोईसुविधांचा अभाव हे सगळं जाईलही एक दिवस पण लोकांचं काय करायचं? शिस्त, श्रमप्रतिष्ठा, प्रामाणिकपणा हे सगळं कुठुन आणायचं? ह्या सगळ्याचा विचार केल्यावर प्रचंड निराशा येते.
15 Nov 2011 - 9:01 am | मराठी_माणूस
महाराष्ट्रातली आजची खेडी बघावीत. गलिच्छ, ओबडधोबड, धुळकट रस्ते, ..........
मुंबई मधे दिव्यांचा लखलखाट , खेड्यात शेतीच्या पंपासाठी विजेचा ठणठणाट
मुंबई पुणे सहापदरी एक्सप्रेसवे , त्यावर विशिष्ट अंतरावर फोनची सुविधा, हादडायची सुविधा, ट्नेल्स.
जुना रस्ता सुध्दा चार पदरी
प्रगती काही भागापुरतीच मर्यादीत राहीली आहे.
15 Nov 2011 - 9:03 pm | आत्मशून्य
यूरोप मधील खेडी कशी एकदम देखणी, सूबक, व अत्याआधूनीक सोयीसूवीधांनी नटलेली असतात. गांधीजींनी त्यांमूळेच प्रेरीत होऊन चला खेड्याकडे संदेश दीला न्हवता ना ?
बाकी चित्रपट मराठी आहे म्हणजे... चर्चेची गरजच नाही, डॉक्योमेंटरी अथवा रडका कलात्मकच असणार.
16 Nov 2011 - 12:29 am | दादा कोंडके
भारत हा जगातील सर्वात अस्वच्छ आणि गलिच्छ देश आहे असं खुद्द केंद्रीय मंत्री जयराम रमेश कालच म्हणाले!
http://72.78.249.107/esakal/20111116/5130603525937547105.htm