गाभा:
बस म्ध्ये जा एक रांग महिलांसाठि राखीव आसते उभ्याने प्रवासाचा मक्ता फक्त पुरषांचा महिला कोठेही जागा अडवु शकते व याचा फायदा युवतीच जास्त घेतात रांगेत पुरुष तासंतास थांबतो व बाई? (मुली) १० मि. काम उरकुन बाहेर .
५०% मते जर महिलांची तर कशाला पाहिजे ३३ % आरक्षण (कदाचीत स्वताहाचे मत नसावे)
प्रतिक्रिया
4 Jun 2008 - 4:58 pm | केशवराव
बाळासाहेब, [ नांव तरी देवनागरीत लिहायचे होतेत.]
तुम्ही जे काही लिहीले आहे ,आणि जसे लिहीले आहे ते पहाता पुरुष आणखीनच 'गरीब बिच्चारे 'च होतील.
4 Jun 2008 - 5:20 pm | भिकारी
काय करणार बाबा तोंडात बोळ कोंबुन मार खाण्याचि सवय करायाला हवी
4 Jun 2008 - 11:32 pm | पिवळा डांबिस
बस म्ध्ये जा एक रांग महिलांसाठि राखीव आसते याचा फायदा युवतीच जास्त घेतात.
अहो मग छानच आहे की!:)
आता पुढल्यावेळी मी सांगतो तसं करा....
अशी छान युवती जागा अडवून बसलेली आढळली की सरळ तिच्या नजरेत नजर मिळवा आणि अतिशय गोऽऽड स्मित करा.
तिच्यावर लाईन मारल्यासारखं नाही तर तिच्या डोळ्यांत बुडून गेल्यासारखं स्मित!
जर तिला आवडलं तर ती ही स्मित करेल....
परिणामः तुम्हाला ती सीट मिळणार नाही पण उभ्याने प्रवास करण्याचा त्रासही जाणवणार नाही!!:))
जर ती संकोचाने उठून गेली....
तर तुम्हाला ती सीट मिळेल, सुखाने झोपून प्रवास करा!:))
मात्र एक करा, तोंडाने एकही शब्द उच्चारू नका.
अनोळखी मुलीशी गोड हसल्याबद्द्ल ती फारफार तर तुम्हाला चक्रम ठरवू शकते, पण मवाली ठरवू शकत नाही!
पिवळा डांबिस
(प्रेमविषयक सल्ल्यांचे घाऊक व किरकोळ व्यापारी! गिर्हाईकांचा संतोष हेच आमचे समाधान!)
4 Jun 2008 - 11:42 pm | बेसनलाडू
फक्त ती छान युवती तुमची अर्धांगिनी नाही ना, याची खात्री करून घ्या. नाहीतर गोड हसल्याबद्दल पाणउतारा तर होईलच नि पुढचा सगळा प्रवास उभ्याने करून त्रासही होईल; वर सीटही मिळायची नाही! बाकी तुमचीच अर्धांगिनी असलेल्या युवती(?)स तुम्ही छान म्हणाल का हा भाग वेगळा. त्याबद्दल पुन्हा कधीतरी :)
(सावध)बेसनलाडू
अवांतर -डांबिसकाकूंना सावध करायला हवे ;)
(चुगलखोर)बेसनलाडू
5 Jun 2008 - 12:25 am | पिवळा डांबिस
आयला, तुमचं नवीनच लग्न झालेलं दिसतंय!!
तुमच्या अर्धांगिनीला जर ती सीट मिळालेली असली तर एकच करा...
तिला सुखनैव झोपू द्या!
म्हणजे तुमचा प्रवास कटकटीशिवाय पार पडेल!!!:))
4 Jun 2008 - 11:48 pm | llपुण्याचे पेशवेll
डांबिसकाका,
पण अभियांत्रिकीची ३३% आरक्षित जागा कशी मिळवायची याचा पण 'प्रेम'ळ सल्ला द्या की. (ह.घ्या.)
पुण्याचे पेशवे
4 Jun 2008 - 11:53 pm | पिवळा डांबिस
अभियांत्रिकीची ३३% आरक्षित जागा कशी मिळवायची याचा पण 'प्रेम'ळ सल्ला द्या की
ते शिक्शणाचं आम्हाला विचारू नको बाबा! त्याच्यासाठी चतुरंगकाका कडे जा....
आम्ही शिकलो असतो तर ही प्रेमाची वखार कशाला काढली असती?:)
5 Jun 2008 - 12:02 am | चतुरंग
परस्पर आमच्याकडे अंगुलीनिर्देश? :? /:)
चतुरंग
4 Jun 2008 - 11:52 pm | चतुरंग
मी चुकून "प्रेमविषयक बल्ल्यांचे घाऊक व किरकोळ व्यापारी" असेच वाचले! ;)
(स्वगत - माझ्या चष्म्याचा नंबर बदलेला दिसतो! काँटॅक्ट लेन्सेसच टाकून घ्याव्यात की काय?)
चतुरंग
4 Jun 2008 - 11:53 pm | एक
भाऊ तुमच्याकडे बघणार नाही याचीपण एकदा खात्री करा. नाहीतर बस मधेच काय ४ दिवस उठता बसता येणार नाही..
ट्रीक्स ऑफ द ट्रेड और क्या? ;)
5 Jun 2008 - 12:00 am | पिवळा डांबिस
मित्र-भावांना आपण घाबरत नाही. आयला, पहाटे उठून बेंचप्रेस मारतो ते मग कशासाठी?:))
5 Jun 2008 - 12:07 am | चतुरंग
'पिळदार डांबिस' असं ठेवलं तर? (हल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्केच) :B B)
चतुरंग
5 Jun 2008 - 12:14 am | पिवळा डांबिस
शोभून दिसेल!!!
हा, हा, हा!!!
5 Jun 2008 - 2:14 am | एक
आपली नाडी जुळणार... आम्हीही यासाठीच जिम जॉईन केली होती.
बाकी तुम्ही सल्ले द्या.आम्ही ईंटेलिजन्स आणि लॉजिस्टिक पुरवतो.. कॉलेज पासूनचा बि़झनेस आमचा..
एकदा फक्त टारगेट दाखवायचं . पुढच्या आठवड्यात आम्ही बाकिची माहिती पुरवू. उ. दा. फोन न>, गाडीचा नं. घराचा पत्ता. रोजचे जायचे यायचे रस्ते आणि वेळा, ई. ई..
करायची का पार्टनरशिप? ;)
4 Jun 2008 - 11:37 pm | वरदा
प्रेमविषयक सल्ल्यांचे घाऊक व किरकोळ व्यापारी! गिर्हाईकांचा संतोष हेच आमचे समाधान!
काका =))
4 Jun 2008 - 11:54 pm | १.५ शहाणा
कोणावर काका माला वाचवा म्हणण्याची वेळ येवु देवु नका म्हणजे पावलं
5 Jun 2008 - 12:01 am | पिवळा डांबिस
डिस्क्लेमरः एकदा विकलेला सल्ला कोणत्याही कारणास्तव परत घेतला जाणार नाही!:)
5 Jun 2008 - 12:05 am | १.५ शहाणा
सल्ल्या बद्लुन मिळेल काय व फु़क्ट्चा सल्ला देता का?
5 Jun 2008 - 12:19 am | पिवळा डांबिस
सल्ल्या बद्लुन मिळेल काय?
अरे तो काय नारळ आहे बदलून मागायला?:))
फु़क्ट्चा सल्ला देता का?
हो, फक्त (प्रेमातल्या) दारिद्र्यरेषेखालच्या लोकांसाठीच! पुराव्यासाठी तोंडावरचे कमीत कमी तीन वेगवेगळ्या लेडिज खेटरांचे व्रण दाखवावे लागतील!
बघा, तुम्ही क्वालिफाय होताय का? (प्रचंड ह. घ्या!)
5 Jun 2008 - 12:24 am | १.५ शहाणा
सल्य्या मुळे शाररिक व मानसिक नुकसान झाल्यास कोण जबाबदार?
5 Jun 2008 - 12:32 am | पिवळा डांबिस
समजा, तुम्ही दुकानातून नवीन शर्ट विकत घेतलात.
दुसर्या दिवशी तो अंगात घालून घराबाहेर पाय ठेवताक्षणी घसरून पडलात आणि तो शर्ट चिखलात माखवलांत!
जबाबदार कोण?
:))
5 Jun 2008 - 2:27 am | छोटा डॉन
>>दुसर्या दिवशी तो अंगात घालून घराबाहेर पाय ठेवताक्षणी घसरून पडलात आणि तो शर्ट चिखलात माखवलांत!
=)) =)) =))
डांबिसकाका, बाकीचे जरा साईड्ला टाका , मला द्या सल्ला ...
"उतणार नाही, मातणार नाही , घेतला सल्ला टाकणार नाही " ....
बाकी जी काही "लफडी" होतील ती संभाळू आमच्या आम्ही, हाय आपली गँग तयार ह्या "कट्टाकट्टी" साठी...
मग केव्हा येऊ "शिकवणीसाठी " ???
डांबिसकाकांचा शिषोत्तम छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....