गाभा:
माझं १० पर्यंत पुर्ण संस्कृत होतं.
मी त्या नंतर शास्त्र शाखा निवडून १२वी केलं.
आता मी M.Sc.(computer scince) करुन software developer म्हणून काम करत आहे.
पण आता मला पुढे नविन काहीतरी शिकायची इच्छा आहे.
मी संस्कृत भाषेत पुढे शिकावं असा विचार करत आहे.
परंतु मला काही कळत नाहीय कि सुरुवात कुठुन करु.
कोणी ह्या बाबतीत मला मार्गदर्शन करु शकेल का????
प्रतिक्रिया
4 Jun 2008 - 12:49 pm | विसोबा खेचर
परंतु मला काही कळत नाहीय कि सुरुवात कुठुन करु.
हम्म! मलाही ते अजूनपर्यंत कळलेलं नाही, त्यामुळे माझीही अद्याप सुरवात झालेली नाही. आता तो नाद सोडून दिल्यापासून माझं तसं बरं चाललं आहे! :)
असो..
तात्या.
4 Sep 2008 - 6:28 pm | धमाल मुलगा
=)) =))
तात्यांशी सहमत...अगदी जोरदार आवाजी मतदानानं सहमत!!!!
4 Jun 2008 - 5:45 pm | मनस्वी
तू पुण्यात असशील तर टिळक महाराष्ट्र विद्यापीठ (टिमवी) मध्ये चौकशी कर.
एक शाखा गुलटेकडी आणि एक सदाशिव पेठेत आहे.
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
4 Jun 2008 - 8:32 pm | धनंजय
यांचा अभ्यासक्रम मला आवडला.
सातवळेकर गुरुजींचे "सुबोध संस्कृत शिक्षक" (२४ छोट्याछोट्या पुस्तिकांचा संच) चांगला आहेत. रामायण, महाभारत वगैरे त्यातल्या त्यात सोपे ग्रंथ वाचण्यापुरते संस्कृत खेळीमेळीने शिकता येते.
4 Jun 2008 - 7:43 pm | डोमकावळा
माझं सुद्धा
>>१० पर्यंत पुर्ण संस्कृत होतं.
>>त्या नंतर शास्त्र शाखा निवडून १२वी केलं.
>>आता M.Sc.(computer scince) करुन software developer म्हणून काम करत आहे.
पण मला देखील तात्यांसारखं वाटतं... आणि पटतं.... :D
काय तात्या ! ;)
5 Jun 2008 - 12:17 am | विसोबा खेचर
काय तात्या !
हम्म! अगदी खरं! :)
4 Jun 2008 - 8:25 pm | llपुण्याचे पेशवेll
माझं सुद्धा
>>१० पर्यंत पुर्ण संस्कृत होतं.
>>त्या नंतर शास्त्र शाखा निवडून १२वी केलं.
>>आता B.C.S. करुन software tester म्हणून काम करत आहे.
पण मला सुरूवात कुठून करायची ते आत्तापुरते कळले आहे. :)
सध्या शिवमहीम्न स्तोत्राचा अर्थ समजावून घेत आहे. :)
पुण्याचे पेशवे
4 Jun 2008 - 10:05 pm | एक
बे एरियात एक जण शिकवतात (भावे नाव त्यांचं)
5 Jun 2008 - 1:17 am | फटू
आठवी ते दहावी असं तीन वर्ष शंभर मार्कांचं संस्क्रुत होतं बरं का...
पण त्या तीन वर्षात ना आम्ही "देव" शब्दाच्या पलीकडे कुठला शब्द शिकलो... ना आमची गाडी दा यच्छ गच्छामी च्या पलिकडे गेली...
आणि त्यानंतर मग इंजिनीयर होण्याचा झेंगटात आम्ही सन्स्क्रुतला दुरावलो ते आजतागायत...
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
5 Jun 2008 - 5:32 am | शितल
माझ्या वडिला॑ची शाळा असल्यामुळे त्या॑ची इच्छा होती की मी नाहितर माझी बहिण स॑स्कृत शिक्षिका व्हावे. पण माझे बोबडे बोल १० प. टिकुन असल्याने माझी माघार, पण प्॑पाचे स्॑स्कृत चा॑गले असल्याने मी वर्गात सगळ्यात जास्त मार्क मिळवायची. आणि खडाखड सुभाषिते म्हणायचे पण जास्त बोलल्यावर बोबडी वळायची. आणि भगवत गीताचा १२,१५,१८ अध्याय पुर्ण पाठ असल्याने शाळेत भाव खायची.
4 Sep 2008 - 6:23 pm | उर्मिला००
:| नमो नम:! मी नूकतेच सभासद झालेले आहे.मी एम.ए.,एम एड सन्स्क्रुत आहे.मला खरच आनन्द झाला आहे की अजुनही या विषयाबाबत एवढी अभिरुची आहे.तुम्हि सन्स्क्रित मधिल मराठी भाषातरीत पुस्तके वाचा.
शुभास्ते पन्थानाम