गाभा:
काय वाट्टेल ते होईल : हेलेन आणि जॉर्ज पापाश्विली : अनु: पु ल देशपांडे
ANYTHING CAN HAPPEN — George and Helen Papashvily
रशीयातील जॉर्जीया देशातून अमेरीकेत स्थलांतरीत झालेल्या एकाची कथा. स्थानिक ( इम्ग्रजी) भाषेचा गंध देखील नसताना हा पठ्ठ्या अमेरीकेत स्थायीक झाला त्याची कथा.
पुलंनी केलेल सुंदर अनुवाद. खरेतर अनुवादाचा एक वस्तुपाठ ठरावा असे पुस्तक.
मात्र दुर्दैवाने इतक्या चांगल्या पुस्तकाचे मूळ इम्ग्रजी पुस्तक तसेच मराठी अनुवाद कुठेच उपलब्ध नाहिय्ये
कुठे मिळत असेल तर हवे आहे. कोणाकडे असल्यास विकत घेईन अथवा झेरॉक्स मिळाली तरी चालेल.
व्यनी/फोन करावा.
प्रतिक्रिया
4 Nov 2011 - 5:34 pm | चिरोटा
अॅमेझॉनवर आहे-
http://www.amazon.com/gp/offer-listing/B000NPNDHO/ref=dp_olp_0?ie=UTF8&r...
4 Nov 2011 - 5:34 pm | परिकथेतील राजकुमार
ह्या प्रश्नचिन्हामुळे सगळा अर्थच बदलून गेला आहे शिर्षकाचा. संपादन करा बरे लगेच.
येवढ्या विद्वान विद्वान लोकांचे मित्र तुम्ही, आणि अशा चुका होतातच कशा म्हणतो मी. ;)
4 Nov 2011 - 5:51 pm | विजुभाऊ
ते प्रश्न चिन्ह हे एक वेगळे स्वतन्त्र वाक्य आहे.
पुस्तक हवे आहे हे माझे म्हणणे. त्यानंतरचे प्रश्नचिन्ह म्हणजे " आता ह्या वाक्यावर कोणकोण कयकाय प्रतिक्रीया देईल" या धास्तीने चेहेर्यावर उमटलेले भाव समजावेत"
अवांतरः परा हा माझा मित्र आहे असे मी जाहीर कर्तो. ( त्याच्या कथना नुसार मी विद्वान लोकाम्चा मित्र आहे)
माझी देखील माझ्याशी मैत्री आहे
मुख्य मुद्दा: मराठी पुस्तकाबद्दल कोणी सांगेल का?
4 Nov 2011 - 6:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सागर ने चांगला दुवा दिला आहे. पुस्तक कुठे मिळेल काही सांगता येत नाही.
कळ्ळच तर इथे डकवेन.
- दिलीप बिरुटे
4 Nov 2011 - 6:03 pm | चिरोटा
इंग्रजी पुस्तक आहे की आता अॅमॅझॉनवर. मराठी पुस्तक पुणे-२,मुंबई-४,मुंबई-२८ मध्ये बघावे लागेल.
4 Nov 2011 - 6:27 pm | दत्ता काळे
तुम्हाला हे पुस्तक पुणे मराठी ग्रंथालयात उपलब्ध होईल निश्चित. ग्रंथालयाचा पत्ता खाली देत आहे.
पुणे मराठी ग्रंथालय
पत्र्या मारुतीजवळ
नारायण पेठ, पुणे : ३०
पत्र्या मारूती मंदिरावरून आप्पा बळवंत चौकाकडे जाणार्या रस्त्यावरच उजवीकडेच ग्रंथालयाची मोठी इमारत आहे.
4 Nov 2011 - 6:30 pm | परिकथेतील राजकुमार
पुस्तक आणायला जाताना आमच्या घासुगुर्जींना अवश्य घेउन जा हो.
पुण्यातल्या दुकानदारांवर आणि विशेषतः पुस्तक दुकानदारांवर त्यांचे भारी प्रेम.
4 Nov 2011 - 7:31 pm | विश्वनाथ मेहेंदळे
ग्रंथालय म्हणालेत ते, पुस्तकांचे दुकान नाही.
स्वगत :- पुण्यात हल्ली ग्रंथालयाला पुस्तकांचे दुकान म्हणतात की काय? आमच्या वेळचे पुणे राहिले नाही आता, विचारलेले बरे !!!
7 Nov 2011 - 5:35 pm | परिकथेतील राजकुमार
इंग्रजी
Submitted by चिरोटा on Fri, 04/11/2011 - 18:03.
इंग्रजी पुस्तक आहे की आता अॅमॅझॉनवर. मराठी पुस्तक पुणे-२,मुंबई-४,मुंबई-२८ मध्ये बघावे लागेल.
tan(α)
.उत्तर द्या
4 Nov 2011 - 10:55 pm | JAGOMOHANPYARE
पुलंचे असे पुस्तक आहे, हे आज समजले. धन्यवाद
4 Nov 2011 - 11:17 pm | चेतन सुभाष गुगळे
<< स्थानिक ( इम्ग्रजी) भाषेचा गंध देखील नसताना हा पठ्ठ्या अमेरीकेत स्थायीक झाला त्याची कथा. >>
स्थानिक (मराठी) भाषेचा गंध देखील नसताना कृपाशंकर सिंह, अबू आझमी महाराष्ट्रात नुसते स्थायिक च नव्हे तर नेतेही झालेत. त्यांच्यावरही पुस्तक काढायला हवे:- काय वाट्टेल ते बरळतील.
19 Nov 2011 - 12:04 am | गणपा
तुम्हीच हे शीवधनुष्य उचलु शकाल, असा मला ठाम विश्वास आहे. :)
4 Nov 2011 - 11:39 pm | आशु जोग
कृपाशंकर सिंह यांच्या
"काय वाट्टेल ते बरळतील" या पुस्तकाला किती पाने आहेत ?
२ पॅने
20 Nov 2011 - 8:31 pm | आनंदी गोपाळ
बनारस मसाला का?
7 Nov 2011 - 1:33 pm | विजुभाऊ
काय वाट्टील ते होईल हे पुस्तक पुलं नी अनुवादीत केलेले आहे. मराठीतील एक अप्रतीम अनुवादीत पुस्तक.
अनुवाद कसा असावा याचा उत्तम वस्तुपाठच आहे. मात्र ते सध्या उपलब्ध नाही.
कोबियांकारी च्या खेड्यातून अमेरीकेत गेलेला जॉर्ज पापाश्विली चे हे आत्मनिवेदन आहे जॉर्ज हा उत्तम स्कल्पचरर होता. तेओ अमेरीकेत आला तेथेच स्थायीक झाला. जगात अत्यंत कमी लोकान अमाहीत असलेल्या जॉर्जीयन या मातृभाषा जाणणारा अजुन कोनी आहे का हेशोधत तो अमेरीकाभर फिरला.
त्याचे अनुभव एकदम झक्कास पद्धतीने लिहिले आहेत. आपण एखादे परकीय भाषेतले पुस्तक वाचत आहोत असे कुठेच जाणवत नाही
दुर्दैवाने हे पुस्तक बरीच वर्षे आउट ऑफ प्रिन्ट आहे.
विकीवर या इथे पुस्तकाबद्दल माहिती आहे.
पुस्तकाची महती देखील कळेलच
18 Nov 2011 - 11:44 pm | विवेक वाटवे
तुम्हेला हव असलेल पुस्तक गोव्याच्या सेन्त्रल लायब्ररित मिलेल.