एक dual SIM वाला mobile घ्यावा म्हणतोय. त्यासाठी सल्ला हवाय. माझे निकष खाली देतोय, त्यानुसार सुयोग्य असा कुठला ठरेल?
१.तो micromax नसावा.(माझ्या सर्व मित्रांना ह्याचा अत्यंत वाइट अनुभव आलेला आहे.)
२.परफॉर्मन्स चांगला हवाय. आवाजात सुस्प्ष्टता हवी.(सोनीचे पूर्वी सातेक हजार पर्यंत मिळणार्या काही मॉडेल्स मध्ये अशी अप्रतिम स्पष्टता होती. तितकी असेल तर उत्तम, त्याच्या जवळपास तरी जाणारी हवी.)
आज काय तर स्पीकर बिघडलाय. उद्या काय तर बॅटरीच बदलायची वेळ आली, असा सततचा त्रास नको. micromax सारखे नको. आमचा नोकिया ६०३० जसा पाचेक वर्षापासून ठणठणीत आहे, तसे काहितरी हवे.
मेन्टेनन्सची, देखभालीची कटकट नको.
३.GPRS,camera,FM व तत्सम हाय्-फाय गोष्टी असल्याच पाहिजेत असा हट्ट नाही. मिळाल्या, तर ठिक, नाही मिळाल्या तरी चालेल .
४.किंमत कमी असलेली बरी.(maintenace व voice quality ह्यावर तडजोड न करता.)
बंधूंनो,मित्रांनो,माझ्या जालशेजार्यांनो जितक्या लवकर ही माहिती मिळेल तेवढे चांगले. भरभरून प्रतिसादाची वाट पाहतो आहे. माझ्यासाठी हे तातडीने करण्याचे काम आहे.
संपादकांनी पाच-सात दिवसांनी धागा उडवला तरी चालेल.
--मनोबा
प्रतिक्रिया
3 Nov 2011 - 11:02 pm | पैसा
मॉडेल्स इथे बघा आणि मग (आणखी काही ठिकाणी किमतीची चौकशी करून) जसा हवा तसा घ्या.
3 Nov 2011 - 11:18 pm | छोटा डॉन
सॅमसंग चॅम्प ह्या श्रेणीमध्ये ड्युएल सीम मोबाईल फोन्स आहेत.
माझा एक मित्र हा पीस वापरतो, त्याचा फीडबॅक चांगला आहे. जरा चौकशी करुन पहा ह्या पीसची.
- छोटा डॉन
3 Nov 2011 - 11:24 pm | नीलकांत
गेल्या दोन वर्षात सॅमसंगने मोबाईल मार्केट मध्ये धूम केली आहे.
सर्वांत आधी चांगले ड्युएल सीम फोन सॅमसंगने आणले आहेत. सॅमसंग मध्ये अनेक पर्याय मिळतील. माझा अनुभव चांगला आहे.
फ्लिपकार्ट किंवा अन्य तत्सम संकेतस्थळावर आधी वाचून , तुलना करून मग हवा तेथून घ्या.
- नीलकांत
3 Nov 2011 - 11:38 pm | आशु जोग
काही काही मोबाइलमधे प्रॉब्लेम्स आहेत असे ऐकले.
एका सिमवर बोलल्यावर तो रीस्टार्ट करावा लागतो दुसर्या सिमवर जाण्यासाठी !
बोलणे चालू असेल त्यावेळी दुसर्या सिमवर कॉल केल्यास एन्गेज लागण्याऐवजी
नॉट रीचेबल लागतो
4 Nov 2011 - 12:50 pm | गणेशा
spice QT 55
नेत वरुन ऑर्डर केल्यास काहीतरी २००० हजाराच्या आतच येतो.. शिवाय २०० रुपयाचे गिफ्ट वॉव्ह्चर,
बॅटरी लाईफ खुप छान (नोकिया प्रमाणे), साउंड सुंदर.. दोन ४ जीबी चे मेमरी स्लॉट्स. २ gsm card slots
रेडीओ विदाउट हेड फोन लावता ऐकता येतो.
अजुन बरेच काही .. दिसायला सुंदर.. टिकायला रफ टफ, बिझिनेस फोन दिसत असला तरी २ दिवस तर सहज बॅटरी चालते.
नेट वरुन माहिती मिळवा...
थोडासा स्लो चालतो येव्हडीच कमतरता आहे.
4 Nov 2011 - 1:34 pm | प्रचेतस
अरे बाप रे,
२० लाखाचा फोन म्हणजे बराच महाग आहे की. शिवाय इतका महागडा फोन घेउन फक्त २०० रू. चे गिफ्ट व्हाऊचर काही पटले नाही.
आणि spice QT 55 नेत वरुन ऑर्डर करणे म्हण्जे spice QT 55 कुठे न्यायचा? आणि ऑर्डर वरून करायची म्हणजे नेमकी कुठून? वरच्या माळ्यावरून का डायरेक्ट स्वर्गावरून?
4 Nov 2011 - 3:51 pm | वपाडाव
वीस लाखाचा फोन घेउन माणुस स्वर्गवासी नाही का होणार....
म्हणुन ऑर्डर द्यायची नेटवरुन पण
डिलिव्हरी अॅड्ड्रेस्स स्वर्गातला द्यायचा....
काही समजले का वल्लीशेट....
- (वीस लाखात फोन ऐवजी फ्लॅट घेणारा) वपाडाव...
5 Nov 2011 - 12:01 am | आशु जोग
तुमचा स्पेलचेक चालू आहे का !
4 Nov 2011 - 1:26 pm | सामान्य वाचक
Chat 322
यात दोन्ही सिम एकावेळी active रहात नाहीत.
पण फोन चांगला अहे.
व्हॅल्यू फॉर मनी.
@ ३६००
७७२२ : यात दोन्हीही सिम active राहतात.
@ १००००
4 Nov 2011 - 3:58 pm | वपाडाव
साहेब, सॅमसंग चॅट हा मोबाइल लैच भारी आहे....
क ड क...
ड्युअल सिम ब्येश्ट ह्यांडसेट... वरुन तीन हजारात...
फक्त हा घेतल्यावर जुना ६०३० कुकडं फेकताय ते सांगा....
म्हणाजे तिथं आधीच जाउन बसतो...
- (फुकट सल्ले न देणारा) वपाडाव
4 Nov 2011 - 4:50 pm | मन१
सर्व प्रतिसादकांचे आभार. तुमची माहिती कामी येत आहे. उदया-परवातच घ्यावा म्हणतोय.
4 Nov 2011 - 6:55 pm | अशोक पतिल
सॅमसंग HERO 2232 , किमत २१०० ते २३०० आसपास आहे. GPRS,camera,FM आहेतच ,ड्युअल सिम व GPRS चा स्पीड खुपच चांगला आहे.आवाज सुस्प्ष्ट आहे.
4 Nov 2011 - 11:38 pm | चेतन सुभाष गुगळे
नोकिया डबल सीमकार्ड मोबाईल : जे तडजोड करीत नाहीत त्यांच्याकरिता..