आंघोळ

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in काथ्याकूट
3 Nov 2011 - 3:58 pm
गाभा: 

दिवाळीच्या पहाटे आंघोळ करताना उटणे लावले जाते.
ते नेमके का लावतात?
त्या मागचे शास्त्रिय कारण काय?
एकतर आज काल तर नोव्हेंबर मधे थंडीचा मागमुस सुद्धा नसतो.
त्यात तेल लाउन आंघोळ म्हणजे अत्याचारच होतो.
आता बाथरुम मधे ए.सी.लावण्याइतकी जागिरदारी काय उतु जात नाहीये.
आणि हे वर उटणे लावायचे कंपलशन.
मी तर दिवाळीच्या दिवशी उटण्याच्या पाकिटाला हातच लाउ देत नाही.
आंघोळ चालेल.
पण उटणे फक्त शास्त्रापुरता.
उटणे लावायच्या परंपरेची कारण मिमांसा होइल काय?

प्रतिक्रिया

कॉलिंग मास्तर !!कॉलिंग मास्तर !!कॉलिंग मास्तर !!

मन१'s picture

3 Nov 2011 - 4:16 pm | मन१

इतका साधा प्रश्न प्रभु गुर्जी कसे काय विचारतात ब्वॉ?
काय तरी गोम दिस्तीये मनोबा ह्यात. दूरच रहा बुवा.

त्यातही "आंघोळ चालेल." हे वाक्य आवडले. आपण दिवाळीला(तरी) आंघोळ करता हे वाचून बरे वाटले.

गवि's picture

3 Nov 2011 - 4:19 pm | गवि

हेच म्हणतो.. गूढार्थ शोधण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. तुम्हास आधी गावला तर सांगा..

धमाल मुलगा's picture

3 Nov 2011 - 4:40 pm | धमाल मुलगा

खुद्द मास्तरालाच असले प्रश्न पडायला लागल्यावर आम्ही विद्यार्थ्यांनी कुणाचा गायडन्स घ्याचा मास्तुरेऽऽ?

नरेश_'s picture

3 Nov 2011 - 5:04 pm | नरेश_

बहुधा श्री अविनाशकुलकर्णी यांना उचकी लागलेली दिसतेय!?
खरंय ना गुर्जी ?

वपाडाव's picture

3 Nov 2011 - 5:23 pm | वपाडाव

अंघोळ म्हटलं की मला वाटलं....
प्रभु गुर्जींनी एखादी अंघोळीची स्वस्तात गोळी काढली काय किंवा एजेंसी वेग्रे....
म्हटलं लगेच ३५० ची ऑर्ड्र देउन मोकळं करावं....
पण छ्य्या हे काय? अंघोळ करायचीच का? असा प्रश्न पडणारा माणुस मी....
मी काय वुत्तर देणार.....

किसन शिंदे's picture

3 Nov 2011 - 5:29 pm | किसन शिंदे

यावरून मला नानेघाटातला अंघोळीविषयीचा किस्सा आठवला.

धमाल मुलगा's picture

3 Nov 2011 - 5:40 pm | धमाल मुलगा

तुम्ही लोक नाणेघाटातही उटणे घेऊन गेला होता की काय? :P

विश्वनाथ मेहेंदळे's picture

4 Nov 2011 - 3:16 pm | विश्वनाथ मेहेंदळे

तुम्हाला नाणेघाटाचे आमंत्रण नव्हते ? कमाल आहे !!!

काडी लावण्याचा क्षीण प्रयत्न.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

4 Nov 2011 - 3:33 pm | विश्वनाथ मेहेंदळे

नाही नाही, काडी नाही. धमुराव सर्वसंचारी आहेत आणि त्यांना सर्व कंपू, कंपू नसलेले ग्रुप्स अशा सगळ्यांकडून आमंत्रण असते असे आम्ही ऐकले होते. म्हणून एक जेनुईन प्रश्न विचारला बुवा.

आता तुम्ही बोलावून पण ते गेले नसतील तर गोष्ट वेगळी आहे. ;-)

परिकथेतील राजकुमार's picture

3 Nov 2011 - 5:31 pm | परिकथेतील राजकुमार

उत्तर व्यनी केले आहे.

१८ वर्षावरील (आणि बालवाडी मधून बाहेर पडलेल्या) व्यक्तींनी स्वजबाबदारीवर गुर्जींकडून जाणुन घ्यावे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Nov 2011 - 5:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर, नरकाला भिणार्‍यांनी तिलतैलाचा अभ्यंग करुन स्नान करावे असे सांगितले जाते. बाकी, अजून काही माहिती समजली तर कळवत हो सर...!

पण सर अचानक असा प्रश्न का पडला ?

-दिलीप बिरुटे
(प्रभुसरांचा विद्यार्थी)

चिरोटा's picture

3 Nov 2011 - 6:39 pm | चिरोटा

त्यांना ह्या दिवाळीत कोणीतरी साखर झोपेत असतानाच उटणे फासून बाथरूममध्ये ढकललेले दिसतेय. त्याचा राग आता मिपावर.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Nov 2011 - 6:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आदरीणीय गुरुजींची साखरझोप इतक्या बेक्कार पणे कोणी मोडणार नाही असे वाटते.
पण काय सांगता येत नाही. प्रास्ताविक तर तसं रागातच आलेलं दिसतंय. :)

-दिलीप बिरुटे

विनायक प्रभू's picture

3 Nov 2011 - 7:01 pm | विनायक प्रभू

अजुनही निट उत्तर मिळाले नाहीये.
असो.
म्हणुन काही जणांना व्य. नी केला.
प्रत्युत्तरात फक्त ही हीही आणि खॅखॅखॅ.
काय कळेना ब्वॉ.
सरळ विचारलेल्या प्रश्नात काही तरी क्रिप्टीक मिळाले की काय?

मी-सौरभ's picture

3 Nov 2011 - 7:05 pm | मी-सौरभ

माझा 'पास'
तुम्हीच उत्तर द्या.
तुम्हाला माहीत असेलच ना ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Nov 2011 - 7:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभ्यंग स्नानाचे वर प्रतिसादात जे कारण सांगितले आहे तेच खरे कारण आहे.
तरी मी तुमच्यासाठी शास्त्रोक्त माहिती शोधतोच आहे सर.

प्रत्युत्तरात फक्त ही हीही आणि खॅखॅखॅ.

सॉरी सर. :(
पण, ते तुम्हाला बाथरुममधे ढकलल्याचं चित्र डोळ्यासमोर आलं होतं सर.
चिरोट्यानं शेंगा खाल्ल्या आहेत. मी टरपलं उचलणार नाही.

-दिलीप बिरुटे

मायला.. गुर्जींना असले प्रश्न पडावेत. बाकी कुणाला उत्तर भेटल्यास मला पण व्यनि करा रे... :D

- पिंगू

तिमा's picture

3 Nov 2011 - 7:31 pm | तिमा

पूर्वी दिवाळीच्या वेळी थंडी असायची. थंड हवेत त्वचा कोरडी पडते. उटणे लावून अंघोळ केल्याने ती मऊ पडते म्हणून उटणे लावून अंघोळ करत. त्याकाळी मॉइश्चरायझर क्रीम्स नव्हती, त्याच्या जाहिराती ब॑घून कोणाला गुलाबी स्वप्ने पडत नव्हती. म्हणून देशी स्वस्त व मस्त उपाय केला जात असे.
आता थंडीच नसते तर उटणे लावायची जरुर काय? 'डोव्ह' सारखे साबण वापरले तर त्वचा मऊ होते. म्हातारपणी तर डोव्ह
साबणाची चंगळही परवडणारी नाही. कारण त्वचा मऊ होईल पण बाथरुमच्या टाईल्स बुळबुळीत झाल्याने पडून हाडं फ्रॅक्चर होण्याची शक्यता अधिक.

अ‍ॅरोमा थेरपी की कायसे.....

पैसा's picture

3 Nov 2011 - 7:41 pm | पैसा

दिवाळीच्या दिवशी काय झालं याबद्दल वहिनींची मुलाखत घ्यावी म्हणते मी!

आनंदी गोपाळ's picture

3 Nov 2011 - 9:00 pm | आनंदी गोपाळ

ते आधी तेल लावतात ना?
ते तेल धुण्यासाठी उटणे लावावे लागते. पूर्वी साबण नसायचे. म्हणून उटण्याने घासून त्वचा स्वच्छ करीत असत.

अत्रुप्त आत्मा's picture

3 Nov 2011 - 10:11 pm | अत्रुप्त आत्मा

वरील अनेकांशी सहमत... आणी अनेकांशी असहमत(ही) ... ;-)

पिवळा डांबिस's picture

3 Nov 2011 - 10:55 pm | पिवळा डांबिस

दिवाळीच्या पहाटे आंघोळ करताना उटणे लावले जाते. ते नेमके का लावतात?
पाडव्याला जर चुकूनमाकून मटका लागलाच तर अंग मऊ आणि सुवासिक असावं या पूर्वतयारीसाठी नरकचतुर्दशीला अंगाला तेल-उटणं लावतात!!!!!!
;)

खुळा मास्तर! कैच्या कैच विचारतो!!!
:)

अर्धवटराव's picture

4 Nov 2011 - 2:06 am | अर्धवटराव

पिडा काकाच्या कारणमिमांसेला तोड नाहि.

(मटक्या) अर्धवटराव

विनायक प्रभू's picture

4 Nov 2011 - 5:00 pm | विनायक प्रभू

चुकून माकून ला आक्षेप.
चुकून माकून मटका मधे पॉसिबिलिटी आणि प्रोबॅबिलिटी दिसते.
सुर्योदय चुकून होतो का? तसेच पाडव्याचे हो पिडां.
आणि बुल्स आय बद्दल धन्यवाद.

अनिवासि's picture

4 Nov 2011 - 12:39 am | अनिवासि

प्रतिसाद वाचून पडलेला प्रष्र्न

वर्षातुन एक्दा - अथवा थडी सुरु झाल्यावर एकदा उटणे लावुन त्वचा वर्ष भर मऊ राहती का?

मराठमोळा's picture

4 Nov 2011 - 3:29 pm | मराठमोळा

मास्तरांनी काहीतरी "आं" टाईपचा "घोळ" केलेला दिसतो आहे.
:)

सर्वसाक्षी's picture

4 Nov 2011 - 3:42 pm | सर्वसाक्षी

मास्तर,

फार दिवसात गावचे असून दर्शन नाही. मधयंतरी रामदासशेठ कडुन तुमची खुशाली समजली.

आपला गहन प्रश्न प्रत्यक्ष भेटुन चर्चिला पाहिजे. हा शनिवार अगोदरच दुसरीकडे ठरलाय, पुढच्या शनिवारी भेटु आणि सविस्तर चर्चा करु, उत्तर नकी मिळेल

किचेन's picture

5 Nov 2011 - 2:28 pm | किचेन

सर्वांसमोर नवर्यला या एकाच दिवशी आंघोळ घालता येते.इतर दिवशी त्याच्यापासुन दीड फ़ूट लांब.म्हणुन महिलांसाठी सोयिस्कर: ;)

रविंद्र गायकवाड's picture

14 Nov 2011 - 2:09 pm | रविंद्र गायकवाड

माझा तर्क असा आहे की.... (म्हणजे हा फक्त तर्क आहे बरं का)
१) दिवाळी म्हणजे वर्षातला मोठा सण त्यादिवशी चांगलं चुंगलं खायच् प्यायचं ल्यायचं. मोठ मोठ्या धनिक आणि शाही लोकांप्रमाणे हौस मौज करायची. म्हणुन वर्षातुन एकदातरी मोठ्या लोकांप्रमाणे उटणे/उठणे/उटने/उठणे ( फक्त इथे चारी पैकी जो योग्य शबद असेल तो ग्रुहित धरावा. माझं मराठी शुद्धलेखन खराब आहे तेव्हा जरा समजुन घ्यावे) लावून अंघोळ करावी अशी प्रथा असेल.
२) असं म्हणतात की त्या दिवशी प्रभु रामचंद्र वनवास पुर्ण करून आयोध्येला परत आले होते. तेव्हा त्यांना राज्याभिषेकापुर्वी उटणे लावून अंघोळ घातली असेल. आणि सर्व प्रजेनेही राजनिष्ठेने अनुकरण केले असेल म्हणून असेल.
३) ह्या काळात बहुतेक थंडी नुकतीच चालू झालेली असते (हल्ली वैश्विक उष्म्यामुळे नसतेच). तेव्हा अचाणक झालेल्य बदलामुळे त्वचेची तापमान व वातावरणाला अनुसरून आर्द्रता अ‍ॅडजेस्ट करण्यासाठी असेल.
४) ह्या काळात झोप जास्त प्रिय असते, झोपेतुन लवकर उठावे म्हणून किंवा अंघोळ झाल्यावर परत झोप लागून नये म्हनुन त्यात उटण्यात पुर्वी काही अयुर्वेदिक तत्वे असतिल (हल्ली अयुर्वेदिक वनस्पतिंची शक्तीही कमी झालेली आहे असे म्हणतात.) म्हणून त्याचे नाव उठणे असेल ते नंतर उटने झाले असेल..