फेसबुकचे भाषांतर

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in काथ्याकूट
2 Nov 2011 - 11:33 am
गाभा: 

मिपाकरहो !

आत्ताच फेसबुकच्या मराठी भाषांतराबद्दलचा संदेश आला. तुम्हालाही तो आला असेलच. भाषांतर बघताना जाणवलं की बरेच शब्द आणि वाक्प्रचार अजून चांगले होऊ शकतील. तंतोतंत आणि समजायला सोपं भाषांतर करण्यात मिपाकरांचा कळफलक कोण धरणार?

https://www.facebook.com/?sk=translations इथे जरा बघाल? आपल्यासारख्या जाणत्यांनी योगदान दिलं तर फेसबुकवर चांगली मराठी UI बघायला मिळेल.

जे पी

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

2 Nov 2011 - 11:43 am | किसन शिंदे

चेपु ऑफिसमध्ये बॅन असल्याने आता पाहता येणार नाही, घरी जावून नक्की पाहतो.

डावखुरा's picture

2 Nov 2011 - 2:29 pm | डावखुरा

ही कोणती भाषाय?

公共の広場Copy
みんなの広場
パブリック広場

डाव्या हाताने लिहिलेली वाटतेय..... ;-)

चिरोटा's picture

2 Nov 2011 - 3:11 pm | चिरोटा

उघडत नाही.
हे काम फेसबूकवालेच का नाही करत? गूगलच्या,याहूच्या तोंडाला फेस आणू पाहणारे नवे चेहरे का नाही घेत कंपनीत?
चिरोटा शुगर्बघ.

भास्कर केन्डे's picture

2 Nov 2011 - 8:44 pm | भास्कर केन्डे

अहो मी मतदान केरत गेलो. पानाच्या शेवटाला गेलो की पुन्हा मतदानाची यादी वाढत आहे. हनुमानाचे शेपूट आहे का काय हे?

हे बरं केलं चेपुवाल्यांनी.
अब हो जायेगा दुध का दुध और पानी का पानी.
जीमेल व याहूच्या लवकरच मराठीत सुरु होणार्‍या आवृत्त्यांच्या अशक्य ग्लॉसरीजनी हफिसातलं काम म्हणजे अक्षरशः भाषिक खाटिकखान्यासारंखं केलंय.
तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाल्ल्यासारखं, चांगलं भाषांतर होऊ शकत असतानाही फक्त ग्लॉसरीत तो शब्द लिहीलाय म्हणून तोच वापरला पाहिजे ( 'आम्ही क्षमस्व आहोत' असलं थोर वाक्य मला याच हातांनी लिहावं लागलेलं आहे.. ) .... वगैरे ताणात कधीतरी डोकं तडकून आम्ही पुन्हा एकदा बेकार कधी होणार हे त्या भगवंतालाच माहित..
फेसबुकवाल्यांचं अभिनंदन.
लोकहो तुम्हाला जो शब्द भावतो त्यालाच व्होट करा. ती भाषा तुम्हालाच वापरावी लागणार आहे.

कुणाची पेटते माडी आणि कोण त्याच्यावर पेटवतो विडी ;)

आम्ही माडी विझवण्याचा भरपूर प्रयत्न केला आमच्या परीनं.
पण पहिल्या मालकाचीही माडी जळताना बोंबाबोंब केल्यानं आम्हाला तिथून परागंदा व्हावं लागलेलं आहे.
आता इथंही तेच केलं तर लगेच एका महिन्यात इथंही रामराम करावा लागेल... तो यथावकाश होईलच... पण एवढ्या लवकर करणं परवडणारं नाही.
म्हणून माडी जळताना आम्ही काही करु शकत नाही, मग अशी बिडी पेट्वू पहातो. :(