भरल पापलेट

जागु's picture
जागु in पाककृती
30 Oct 2011 - 11:14 pm

साहित्यः
५-६ पापलेट
१ वाटी ओले खोबरे
१ मोठया लसूण कांद्याया पाकळ्या
४-५ हिरव्या मिरच्या
१ मुठ कोथिंबीर
अर्धा इंच आले
हळद
मिठ
रवा
तेल

पाककृती:
१) ओले खोबरे, आले-लसुण, मिरची, कोथिंबीर ह्यांचे वाटण कमी पाणी टाकून करून घ्या. म्हणजे घट्ट झाले पाहीजे. जर पातळ झाले तर पापलेटच्या पोटातून बाहेर येईल.

२) पापलेटांना त्यांच्या पोटाच्या कडे पासून बरोबर मध्यभागी धारदार सुरीने फोटोत दाखवल्या प्रमाणे चिर पाडा. आणि पोटातील घाण काढून ती साफ करून धुवून घ्या. धुतल्यावर त्याला चिरेत व बाहेरून मिठ व लिंबूरस लावुन घ्या.

३) आता ह्या पोटाच्या चिरेत वरील वाटण दाबून भरा.

४) एका ताटात थोडा रवा घेउन त्यात पापलेट हलक्या हाताने उलथे पालथे करा.

५) पॅन मध्ये तेल चांगले गरम करून त्यात पापलेट तळण्यासाठी सोडा. गॅस मिडीयम ठेवा.

६) ५-६ मिनीटे एक बाजू चांगली खरपूस भाजून झाली की पलटी करून दूसरी बाजू शिजत ठेवा. ती पण ५-७ मिनीटे चांगली खरपूस तळू द्या. पण गॅस मोठा ठेऊ नका नाहीतर करपेल पापलेट

७) हे आहे गरमागरम, खरपूस भरल पापलेट

अधिक टिपा:
(ही पाककृती मनोगत इ दिवाळी अंक २०११ मध्ये प्रकाशीत झाली आहे.)

वाटणात पुदीनाही टाकू शकता.
वाटण घट्टच करा नाहीतर पापलेट बाहेर ओघळेल.

प्रतिक्रिया

असा असतो तर पापलेट.
हा फार चविष्ट असतो असे मागे एकदा गवि म्हणाले होते..
एक पापलेट उचलुन पाहू का खाऊन :)

अवांतरः कोकणातला बामन
समुद्रावर बसून संध्या करी
मासळी दिसली की जानव्यानं धरी
मासळी म्हणे पळुन जायन
ब्राह्मण म्हणे तळून खायन
(वात्रटिका, मंगेश पाडगावकर )

विलासराव's picture

31 Oct 2011 - 11:28 am | विलासराव

>>>>>>>असा असतो तर पापलेट.
हा फार चविष्ट असतो असे मागे एकदा गवि म्हणाले होते..

मी कोळीवाड्यात २ वर्ष राहीलो आहे. तर त्या लोकांच म्हणनं अस आहे कि पापलेट हा चवदार असा मासा नाहीच आहे.
याहीपुढे माझे गावचे लोक ससुन डॉकमधे असतात.तेथील मोठे धंदेवाले सर्व आमच्या तालुक्यातील आहेत.
तेथील माझे मित्र जे रोज या माश्यांच्याच गराड्यात असतात ते तर म्हणतात की "जे लोक म्हणतात पापलेट फार चवदार असतात त्यांना माशे खाण्याची जाण नाही असे खुशाल समजावे."
मीही त्यातलाच एक आहे कारण मी जेव्हा-जेव्हा मासे आणायला जायचो तेव्हा मी पापलेटचाच धोशा लावायचो. त्यांनी दिलेली 'कापशी' (लोकल नाव) जेव्हा मी काही मित्रांना दिली त्याची माझ्याकडे मागणीच सुरु झाली. ती कापशी देतानाच त्यांनी मला सांगीतले होते की ही कोणाला देउ नको. कारण ती दिली तर ते लोक परत परत ती मागणारच. झालेही तसेच . त्यांनी रेकमंड केलेल्या माश्यांच्या बाबतीतही असाच प्रकार झाला.
कापशी- मोठी कोळंबी.

मी कोळीवाड्यात २ वर्ष राहीलो आहे. तर त्या लोकांच म्हणनं अस आहे कि पापलेट हा चवदार असा मासा नाहीच आहे.

बरं झालं सांगितलंत... मत्स्याहार सुरु करायची कधी वेळ आली असती तर मी हे जागुताईनं टाकलेले फोटो पाहून पापलेट द्या म्हणालो असतो.. :) अर्थात जागूताई खाली म्हणत आहेत की चविष्ट बनवणं आपापल्या हातात असतं.. पण हाटेलवर भरोसा नाय..

याहीपुढे माझे गावचे लोक ससुन डॉकमधे असतात. तेथील मोठे धंदेवाले सर्व आमच्या तालुक्यातील आहेत. तेथील माझे मित्र जे रोज या माश्यांच्याच गराड्यात असतात ते तर म्हणतात की "जे लोक म्हणतात पापलेट फार चवदार असतात त्यांना माशे खाण्याची जाण नाही असे खुशाल समजावे."

मग गविंनी नक्कीच दुसरा कोणता तरी मासा सांगितला असेल..
गविंचा मासे एवंच खाद्यानुभव या विषयातला अभ्यास पाहता, गविंची चालू लेखमाला जे वाचत असतील त्यांना गविंना मासाविषयक जाण नाही असे म्हणण्याची आमचीच काय कुणाचीही छाती हो़णार नाही..
सबब, माझ्या मेमरीने दगा दिला असेल..

पापलेट = चॉकलेट सारखं वाटतं म्हणून ते माझ्या लक्षात आलं असेल..

पैसा's picture

31 Oct 2011 - 8:46 pm | पैसा

माझ्या नवर्‍याच्या म्हणण्याप्रमाणे (मी मासे खात नाही), पापलेट खायला सोपा असतो. शिकाऊ लोकांना काटे काढायचा त्रास घ्यावा लागत नाही. चवीच्या बाबतीत त्याचं असं मत आहे की पांढर्‍यापेक्षा काळ्या रंगाचे मासे जास्त चवदार असतात. त्यातून काटे जेवढे जास्त तितका मासा चवदार. कर्ली हा सगळ्यात चविष्ट मासा समजला जातो.

जाई.'s picture

31 Oct 2011 - 9:10 pm | जाई.

१००% बरोबर

विलासराव's picture

31 Oct 2011 - 9:31 pm | विलासराव

>>चवीच्या बाबतीत त्याचं असं मत आहे की पांढर्‍यापेक्षा काळ्या रंगाचे मासे जास्त चवदार असतात. त्यातून काटे जेवढे जास्त तितका मासा चवदार.
असच मला त्यांनी सांगीतले होते. पण मला हे सर्व लक्षात नव्ह्ते. आभारी आहे @पैसा.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

5 Nov 2011 - 2:20 am | विश्वनाथ मेहेंदळे

>>बरं झालं सांगितलंत... मत्स्याहार सुरु करायची कधी वेळ आली असती तर मी हे जागुताईनं टाकलेले फोटो पाहून पापलेट द्या म्हणालो असतो..
यकु, मत्स्याहाराला सुरुवात केलीत तर पापलेटापासून करा. फार तर सुरमई, कोलंबी चालेल. उगाच कर्ली खायला जाल आणि घोळ (मासा नव्हे, गडबड या अर्थी) व्हायचा. शिकायची सुरुवात बिगरीपासून कराल कि थेट बारावीला जाल?

>>मग गविंनी नक्कीच दुसरा कोणता तरी मासा सांगितला असेल..
माझ्या आठवणीत त्यांनी पापलेटच सांगितला होता. आणि त्यांनी सांगितले नसेल तर मी सांगतो, पापलेट चविष्ट असतो.

यकु's picture

5 Nov 2011 - 9:07 pm | यकु

थैंक्यू विमे!
:)

आँ... हे पहायचंच राहिलं होतं. विमें धन्यवाद.

हो पापलेट निश्चितच टेस्टी असतो. पट्टीच्या खाणार्‍यांना अनवट प्रकार नेहमीच अधिक चांगले वाटतात. उदा. हापूस हा आंबा सारे जग आवडीने खाते, पण आपण त्यातले दर्दी आहोत असे म्हणणारे लोक हापूस.. हॅ.. त्यात खरी मजाच नाही.. खरी मजा लंगडा, दशहरी, माणकुराद,शेपू किंवा आणखी एखादी कोपर्‍यातली आम्रजात.. यात असते.. असं म्हणतात.

अर्थातच आपापल्या जागी हे वेगळाले आंबेही चविष्टच असतात पणं हापूस हा हापूस राहतो.

पापलेट हा हापूस आहे.

यकुला हा मासा रेकमेंड केला याचं कारण मला वाटतं त्याने "सुरुवात कशाने करु?" असं विचारलं होतं. त्यात कमी काटे, उग्रगंधविरहीत वगैरे असे अनेक मुद्दे होते..

सुहास झेले's picture

30 Oct 2011 - 11:42 pm | सुहास झेले

अजुन काय बोलू....तोंडाला पाणी सुटले.

आत्ताच जेवलो, पण पुन्हा भुक लागलीय..... दोन-तीन पापलेट दे नं धाडून :)

रेवती's picture

31 Oct 2011 - 6:45 am | रेवती

जागु, तू मला एक दिवस मत्स्याहारी बनवूनच सोडणार.;)
फोटू भारी आलेत.

मदनबाण's picture

11 Nov 2011 - 9:27 am | मदनबाण

हेच की व्हो... ;)
थोडक्यात, आज्जीशी पूर्णपणे सहमत ! ;)

प्रभाकर पेठकर's picture

11 Nov 2011 - 9:55 am | प्रभाकर पेठकर

रेवती,

जागु, तू मला एक दिवस मत्स्याहारी बनवूनच सोडणार

त्यात तुमचाच फायदा आहे. शुद्ध शाकाहारी स्त्रियांना म्हातारपणी पूर्ण प्रथिनांच्या अभावामुळे स्नायुंच्या अशक्तपणाचा त्रास होऊ शकतो (होतोच असे म्हणत नाही). माझ्या आईच्या बाबतीत असेच झाले. त्यावर वरील निदान हे एका निष्णांत डॉक्टरांचे आहे.

+१००००००

सहमत
माझी आजीला देखील हेच निदान सांगितले आहे

या भारतभेटीत पापलेट खाऊन बघते.

राजहंस's picture

31 Oct 2011 - 10:42 am | राजहंस

अतिशय भारी दिसतंय पापलेट.....फोटोस तर एकदम "तोंडाला पाणी सुटणारे" आहेत. एखादा मासा उचलून पटकन तोंडात टाकावासा वाटतोय :).

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Oct 2011 - 10:46 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

_/\_

-दिलीप बिरुटे

वां...... प्लीज १ पाठवुन दे ना.... सकाळी सकाळी असे फोटो बघुन मेले मी. :)

यशवंत विलासराव हे खरे आहे की पापलेटची चव थोडी मुळमुळीत असते. पण त्याला चवदार बनवणे आपल्या हातात असते.

रेवती कधी खातेयस बोल ?

सुहास, राजहंस, डॉ. दिलिप, मृणालिनी धन्यवाद.

सोना-शार्वील's picture

31 Oct 2011 - 7:40 pm | सोना-शार्वील

जागु ताई पापलेट लहान बाळांना चालतात का?
मला लहान बाळासाठी काही पोष्टी़क पाककृती सांग ना

संदीप चित्रे's picture

31 Oct 2011 - 10:22 pm | संदीप चित्रे

तुझं नक्की आम्ही काय वाईट केलंय, जागु? :)
ते पापलेट आणि हिरवं वाटण दिसतंयच इतकं भन्नाट की चव बेष्टच असणार!

पैसा बरोबर कर्लि हा मासा काटेरी असतो पण चविष्ट असतो.
काळ्या पापलेटला कलेट म्हणतात. ते पापलेटपेक्षा महाग असते. पण चविला पापलेटपेक्षा चांगले असते.
सोना पापलेट १ वर्षा नंतरच्या बाळाला देतात. इतकेच काय तर डिलिव्हरी नंतरही मातेला ते चालत. फक्त तिखट न टाकता हळद, मिरीवर करावे लागते. लसूण जास्त टाकावा लागतो. तळायचे झाल्यास कमी मसाला लावावा. मी आधी पापलेटची पाकृ टाकलेली आहे. प्लिज ती चेक करा आणि त्यातून फक्त मसाल्याचे प्रमाण पाव पट करा बाळासाठी.

तुझं नक्की आम्ही काय वाईट केलंय, जागु?
तुमचे असेच प्रतिसाद मला अजुन रेसिपी टाकायला भाग पाडतात.

कच्ची कैरी's picture

1 Nov 2011 - 3:51 pm | कच्ची कैरी

जागु मला पापलेट खूप आवडतो आणि ही रेसेपी बघुन तर कधि एकदा करुन खाऊ असे झाले आहे

चित्रा's picture

1 Nov 2011 - 5:25 pm | चित्रा

छान!

आशिष सुर्वे's picture

2 Nov 2011 - 12:18 am | आशिष सुर्वे

कर्ली बाईंचे चवीबाबत निर्वीवाद वर्चस्व आहेच
पण.. भरलेला पापलेटही आपल्या जागी झ्याकच आहे हो!

कोकन्याक अजून काय हवंय ओ.. असा मस्त मसाल्याने तुडुंब भरलेला पाप्लेट अन् तांदळाची भाकरी..
वा जागुताई वा!
(रिकामी पिशवी पाठवू का?.. पार्सेल..)

एकदा भुसावळला तापी नदीतला " लालपरी" नावाचा मासा खाल्ला होता.
त्याची चव झकास होती
सुरमयी च्या चवी बद्दल काय मत आहे?

प्राजु's picture

4 Nov 2011 - 10:17 pm | प्राजु

जागु... अता बस्स झालं!! मी येणारच आहे तुझ्याकडे. तयारीत रहा.

प्रभाकर पेठकर's picture

11 Nov 2011 - 1:56 am | प्रभाकर पेठकर

व्वा..! भरले पापलेट (चटणीत पुदीना घालून) खाण्यास उत्तम . (पांढरे मांस असल्याने आरोग्यदायीही समजण्यास हरकत नाही).

माशात हिरवी चटणी भरल्यावर ते केळीच्या पानात गुंढाळून, दोरा बांधून, दोन्ही बाजूंनी तळून घ्यावे. केळीच्या पानाचा मस्त वास त्याला लागतो. चव अप्रतिम होते.

प्रभाकर बघेन मी पण केळीच्या पानात तळून.

प्राजू ये चल कधी येतेयस ?

विजूभाऊ सुरमयी चविला चांगली असतेच ना. लाल परी म्हणजे राणी मासे का ? थोडे गुलाबी आणि पिवळट छटा असलेले ?

आशिश अगदी बरोबर प्रत्येक माश्याची चव आपआपल्या जागी असते.

चित्रा, कैरी धन्स.

विश्वनाथ अगदी बरोबर आहे तुमची मासे खाण्यास सुरुवात करायची असेल तर पापलेट आणि कोलंबीनेच करावी. कर्ली तर मांसाहार करणारी लहान मुलेही नाही खात. पटकन काटा कधी घशात, हिरडीत अडकेल त्याचा भरवसा नसतो. पापलेटची चवही अगदी उग्र वगैरे नसते. सौम्य आणि चांगला लागतो.

प्रभाकर पेठकर's picture

11 Nov 2011 - 3:51 pm | प्रभाकर पेठकर

केळीच्या पानात तळताना रवा लावू नका. चटणी लावलेले पापलेट थेट केळीच्या पानांत लपेटून, दोरा बांधून तळा.

शुभेच्छा....!

पापलेटची चवही अगदी उग्र वगैरे नसते. सौम्य आणि चांगला लागतो.

पापलेटला अरेबिक भाषेत 'झुबैदी' म्हणतात. 'झुब्दा' म्हणजे लोणी/बटर. लोण्यासारखा मासा तो 'झुबैदी'.

जागु's picture

11 Nov 2011 - 10:06 pm | जागु

प्रभाकरजी नक्कीच.

पाकक्रुती आणी प्रतिसाद दोन्हिही दिसत नहित

सुर's picture

30 Nov 2012 - 11:44 am | सुर

धन्यवाद

हे खर आहे की पापलेट ह्या माश्याला तितकीशी चव नसते. म्हणूनच नविन खाणार्‍यांनी (आता जे जे चालू करणार आहेत म्हणजे रेवती, मदनबाण यांनी हा हा हा.............) पापलेट आणि कोलंबी पासुनच सुरुवात करावी. कारण माश्यांचा विशिष्ट येणारा वास ह्यांना जास्त नसतो तसेच कोलंबीत तर आजीबात काटा नसतो, पापलेटमध्ये एक मधलाच काटा असतो. शिवाय पापलेट हा पचायला हलका असतो. कोलंबी जड असते पण चवीला चांगली असते.