गाभा:
खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार भीमराव तापकीर यांनी ३६२५ मतांनी विजय झाला आहे. तापकीर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार हर्षदा वांजळे यांचा पराभव केला. तापकीर यांना ५७,१७५ आणि वांजळे य़ांनी ५३,२२० मते मिळाली.
अनेक दिवस म.न.से.ला झुलवत अखेर वाजत गाजत राष्ट्रवादीवासी झालेल्या श्री. हर्षदा वांनळे याना लोकाची सहानभुती मिळेल असे वाटत असणा-यांचा मुखभंग झाला.
या पराभवची कारणे काय काय असावीत?????????
प्रतिक्रिया
17 Oct 2011 - 4:05 pm | मदनबाण
वांनळे नाही हो... वांजळे.
मनसे च मंगळसुत्र आजन्म बांधल्याची ग्वाही त्यांच्या कैलासवासी पतीने दिली होती,त्यांच्या निधना नंतर यांनी ( हर्षदा वांजळे.) मनसेला टाटा केले आणि मग मतदारांनी यांना टाटा केले. ;) शिवाय राष्ट्रवादीत साठमारी काय कमी आहे काय ? त्यांची ही मदत झालीच.
जाता जाता:---दैव देते पण कर्म नेते,ही म्हण आठवली.
17 Oct 2011 - 8:12 pm | चिंतामणी
बरोबर.
पोस्ट झाल्यावर लक्षात आले होते. परन्तु दुरूस्तीचा पर्याय गायब असल्याने करू शकलो नाही.
टायपो मिश्टेक होउनसुद्धा तुमच्या लक्षात आले आणि निदर्शनास आणल्याबद्दल धन्यु.
17 Oct 2011 - 4:05 pm | अमोल केळकर
भारतीय मतदार ( खडक वासलाचे लाखभर मतदार ) परिपक्व झाल्याचे तर हे लक्षण नाही ??? :)
अमोल केळकर
17 Oct 2011 - 4:06 pm | परिकथेतील राजकुमार
धागा अगदीच मिळमिळीत झाला आहे.
तेलाच्या आणि तुपाच्या डब्याचे फोटो, जोडीला आता 'अ' टक्के मतदारांनी मतदान केले असता 'ब' मतदाराला इतकी मते पडली तर 'क' मतदाराची मते गेल्या सालपेक्षा कमी झाली का जास्ती ? अशा प्रकारचे एखादे कोडे तरी द्यायचे राव.
17 Oct 2011 - 8:08 pm | यकु
गेल्या चार-आठ दिवसात कोड्यांच्या धाग्याचा आलेला पूर पाहता सहमत आहे.
18 Oct 2011 - 9:27 am | चिंतामणी
धागा यशस्वी करण्यासाठीच्या टिप्सची नोंद घेतल्या गेली आहे.
:) :-) :smile:
17 Oct 2011 - 4:29 pm | चिरोटा
ह्याला काही वांजळे यांचा दारूण पराभव्,मुखभंग वगैरे नाही म्हणता येणार. लोक मत देताना पक्ष बघत नाहीत. आदल्या दिवशी दारु,मटण्,साडी,लेंगा मिळाले की नाही ते बघतात.
17 Oct 2011 - 4:43 pm | अविनाशकुलकर्णी
३२% मतदान झाले..
लोक उदास आहेत...मतदानाचा कंटाळा करतात..
हिस्सार आणि पुण्यातील निकाल हे राज्य आणि केंद्र सरकार मधील सत्ता बदलाची नांदी आहे का?
दादोजी कोंडदेव यांचा पुतळा कसब्यातुन काढून खडकवासला मतदारसंघा जवळ आणून ठेवला अणि तिथेही हिंदुत्ववादी जिंकले.
हां योगायोग मानायचा का ? —
असो...
माननीय आमदार श्री.भीमराव तपकीर यांना मिपा समुहा कडुन विजयाच्या हार्दिक शुभेच्छा !
17 Oct 2011 - 7:01 pm | गणेशा
म. न. से ची भुमिका जास्त आवडली या ठिकाणी ..
बाकी हर्षदा यांनी म. न. से कडुन निवडनुक लढवली असती तर परिस्थीती वेगळॅए दिसली असती..
कै. वांजळे यांच्या बद्दल .. कार्याबद्दल सहानभुतीबद्दल खुप बोलले जाते तरी हा पराभव झाल्यास अवघड आहे...
म. न.से ने पुढील वेळेस पुन्हा कै वांजळें सारखे योग्य उमेदार येथे द्यावा असे वाटते ...
म. न. से ने उमेदवार उभा केला असता, तर हर्षदा वांजळे निवडुन आल्या असत्या असे मतदान फरकावरुन तरी वाटते.. पण तरीही तठस्थ राहिल्याने म. न. से. परिपक्व होत आहे हि नोंद शरद पवार दफतरी आता होत असाणार हे नक्की ..
18 Oct 2011 - 10:26 am | अमोल केळकर
साप ही मेला काठी ही तुटली नाही
अमोल केळकर
18 Oct 2011 - 1:48 pm | विजुभाऊ
तठस्थ राहिल्याने म. न. से. परिपक्व होत आहे
तठस्थ नाय हो. तटस्थ...........
17 Oct 2011 - 9:37 pm | स्वतन्त्र
पहिली गोष्ट म्हणजे हर्षदातैंनी पक्षबदल करायला नको हवा होता.
खडकवासला मतदारसंघात रमेशभाऊ वांजळे यांनी मनसे ची मुहूर्तमेढ रोविली तसेच लोकांचा त्यांनी विश्वास संपादन केला होता.
हर्षदातैंनी पक्ष बदल केल्यामुळे लोकांच्या विश्वासाला तडा गेला.
तसेच खडकवासला मतदार संघात राष्ट्रवादीचे नाव जरा खराबच आहे.
हि कारणे पुरेशी आहे असे मला वाटते.
19 Oct 2011 - 4:41 pm | श्रीरंग
पक्ष बदलला नसता, तर हर्षदा ताई काँग्रेसमध्येच असत्या. आणी जागांच्या विभाजनात खदकवासल्याची जागा राष्ट्रवादीची आहे.
18 Oct 2011 - 8:57 am | पाषाणभेद
शेजारशेजारच्या तालूक्यांमध्ये/ जिल्ह्यांमध्ये/ प्रांतांमध्ये एकमेकांचे नातेवाईक जास्त असतात.
मावळप्रांतात मागे पाण्यावरून पोलीसांनी जे काही युद्ध केले त्याचा हातभार देखील या निवडणूकीत आहे.
18 Oct 2011 - 10:26 am | समीरसूर
अजितदादांना आतातरी जाग आली असेल. खडकवासल्यात ११ नगरसेवक राष्ट्रवादीचे आहेत. खडकवासल्यात अजित पवारांनी आपली सगळी ताकद पणाला लावली होती; पण शरदराव गप्प होते. त्यांनी या निवडणूकीत अजिबात सहभाग नोंदवला नाही. अजितरावांना खाली खेचण्याचे तर हे कारस्थान नाही ना? तसे ही अजितरावांची कुवत एव्हाना सगळ्यांच्या लक्षात आलेलीच आहे. राज्य सहकारी बँकेची बरखास्ती, मावळचा गोळीबार आणि तेथील मृत्यू, विजेचे प्रचंड मोठे संकट आणि आता खडकवासल्यात दारूण पराभव! अजितदादांनी काय दिवे लावलेत हे शरदरावांना दिसत नसेल असे नाही. डोईजड झाल्यावर काहीतरी करून अशा व्यक्तीला बाजूला फेकून द्यायचे याच तत्वावर शरदरावांचे (अश्लाघ्य) राजकारण आतापर्यंत बेतलेले आहे. हा पराभव त्याचाच भाग तर नाही ना? तसेही राष्ट्रवादीतल्या कित्येक असंतुष्ट नेत्यांनी राष्ट्रवादीशी गद्दारी केली असे बोलले जात आहे. छगन भुजबळ, आबा पाटील आदी मंडळी (आणि जनतादेखील) अजितदादांच्या टगेगिरीला कंटाळली आहे हे सर्वश्रूत आहेच.
हर्षदा वांजळेंनी राष्ट्रवादीचे तिकिट घेऊन आयुष्यातली मोठी चूक केली. रमेश वांजळेंच्या पक्षाशी गद्दारी त्यांना भोवली. त्यांना आणि अजितदादांना वाटले की पैशाच्या बळावर ही निवडणूक सहजी जिंकता येईल पण मतदारांनी त्यांची जागा त्यांना दाखवून दिली आहे. अजितदादांची, राष्ट्रवादीची आणि शरदरावांची एवढी ताकद असूनदेखील त्यांचा पराभव झाला म्हणजे तो 'दारूणच' म्हणायला हवा. राष्ट्रवादीने दुसरा उमेदवार उभा केला असता तर तो अजून जास्त फरकाने हरला असता. हर्षदा वांजळे मनसेकडून उभ्या राहिल्या असत्या तर १००% निवडून आल्या असत्या. त्या निवडून आल्या नाहीत हे बरेच झाले. शून्य कर्तुत्व असतांना केवळ नवर्याच्या पुण्याईवर निवडून येणे ही जनतेसाठी चांगली गोष्ट नाही.
राष्ट्रवादीचा ढासळता बुरूज जेवढ्या लवकर जमीनदोस्त होईल तेवढे महाराष्ट्राला लवकर चांगले दिवस येतील. शरदरावांच्या घाणेरड्या, संधिसाधू, जातीपातीवर बेतलेल्या, गुंडगिरीवर आधारलेल्या, विश्वासघाताची बैठक असणार्या राजकारणाचा असाच शेवट व्हायला हवा. अमाप पैसा (गैरमार्गाने) गोळा करून, लोकांच्या पाठीत खंजीर खुपसून आणि गुंडगिरी करून राजकारण करता येत नाही हा धडा शरदरावांना कळेल तो सुदिन म्हणावा लागेल. दोन-तीन वेळा मुख्यमंत्रीपद आणि राष्ट्रीय राजकारणात दोन-तीन पदे याखेरीज शरदरावांच्या झंझावती राजकारणाचे फलित काय? आज किती लोकं त्यांच्याविषयी दोन चांगले शब्द बोलतात? खाजगीत राष्ट्रवादीमधलीच काही लोकं त्यांच्या हपापलेल्या आणि अवसानघातकी वृत्तीला नावे ठेवतात. शेवटी ज्याच्यासाठी आयुष्य पणाला लावले, आटापिटा केला, आकाशपाताळ एक केले, पैशांची कोठारे उभी केली, लोकांना फसवले, त्यांचा विश्वासघात केला, भ्रष्टाचाराची कुरणे फस्त केली ते पंतप्रधानपद पदरी पडले नाहीच आणि पडण्याची शक्यता अजिबात नाही. अजितराव त्याची पुरेपूर काळजी घेत आहेत. हेचि फळ काय मम तपाला...असे म्हणण्याखेरीज आता त्यांच्या हातात काय आहे?
18 Oct 2011 - 11:40 am | सविता
माझी तर फार इच्छा आहे, तिहार मध्ये जी सध्या तथाकथित मोठ्या राजकारण्यांची मांदियाळी जमली आहे त्यात एखाद्या घोटाळ्यामुळे सिनिअर व ज्युनिअर पवारांची ही वर्णी लागावी आणि असे नाव काळं झाल्यावर मग केव्हाही त्यांचा स्वर्गात/ नरकात (नरकातच!) जाण्यासाठी नंबर लागावा.
सुरेश कलमाडी आता दोषी सिद्ध होवा नाहीतर निर्दोष, तो काही परत पुण्यात निवडणुकीला उभा राहणार नाही , राहिला तर जिंकणार नाही आणि मेल्यावर त्याचा महात्मा होऊन गल्ली, बोळ आणि पुलांना त्याचे नाव पण दिले जाणार नाही.
आणि हेच दोन्ही पवारांच्या बाबतीत व्हावे अशी माझी इच्छा आहे. उगाच कुठल्या तरी रोगाने, अपघातात नाहीतर कोणी मध्येच उडवला त्याला नाव काळं व्हायच्या आधी, तर बळेच "जाणता राजा", मरणोत्तर पद्मभूषण, पुल /रस्त्यांना त्यांची नावं वगैरे सन्मान होतील आणि ते बघणे अजून संतापजनक असेल.
18 Oct 2011 - 12:32 pm | मदनबाण
आपल्या देशातील भ्रष्ट राजकारण्यांना जनतेची किंमत आहे कुठे ?
इथे सगळ्यांना सांगत सुटलेत की २०१२ पर्यंत लोड शेडींग मुक्त महाराष्ट्र करु !
आणि सध्याची परिस्थीती काय ?
राज्यातील वीज टंचाईमागील सत्य
http://goo.gl/F0mZp
राज्यात आणि देशात धड रस्ते नाहीत ! पण ग्रोथ रेट चे आकडे सांगण्यात सगळ्यांना धन्यता वाटते ! :(
देश खड्ड्यात आणि नागरिक सुद्धा खड्ड्यातच !
खड्ड्यांमुळे रिक्षातच प्रसुती
http://goo.gl/WuXOw
त्यातल्या त्यात जरा ही चांगली बातमी :---
अटींची पूर्तता न केल्याचं कारण सांगत पर्यावरण मंत्रालयाने लवासाला परवानगी नाकारली.
http://goo.gl/CHS5h
18 Oct 2011 - 1:58 pm | वपाडाव
अनुमोदन....
19 Oct 2011 - 12:22 am | हुप्प्या
खडकवासल्यात मिळालेला हा विजय ही नव्या बदलाची नांदी ठरो. समीरसूर व सविताशी १००% सहमत.
पवार खानदानाने आपल्या हीन राजकारणाने आपल्या तुंबड्या भरल्या आणि महाराष्ट्राची वाट लावली आहे. ते आपल्या कर्मानेच संपलेले बघायला मिळावे ही प्रार्थना.
आतल्या गाठीचे, स्वार्थी शरद पवार आणि उर्मट शिरोमणी अजित पवार ह्यातले डावे उजवे करणेही अवघड आहे.
मुळात राष्ट्रवादी पक्षाच्या अस्तित्वाला काही अर्थ आहे का? काँग्रेस आणि ह्या पक्षात मला तरी काहीही फरक दिसत नाही. काही गब्बर काँग्रेसी लोकांनी खाण्यापिण्याच्या सोयीकरत हा एक स्वतंत्र सुभा बनवला आहे.
अशा लोकांचे रस्त्या, पुलाला नाव मिळणे खरोखर लाजिरवाणे वाटेल. संजय गांधीसारखा नालायक, उन्मत्त, भ्रष्ट माणूसही आपले नाव त्या बोरिवलीच्या पार्कला चिकटवून बसला आहे. त्याची सद्दी आणि आयुष्य संपल्यावरही ते नाव हटण्याची शक्यता दिसत नाही.
19 Oct 2011 - 4:49 pm | श्रीरंग
डोईजड होत चाललेल्या विकास दांगट पाटील यांचे पंख कापण्यासाठी मुद्दाम त्यांना तिकीट नाकारलं अशी चर्चा पण कानावर पडली आहे.
19 Oct 2011 - 8:14 pm | गणेशा
राजकारण तसे वाईटच ..
वरती समिरसूर आणि सविता ह्यांच्या म्हणणे योग्य वाटत असले तरी सगळॅच राजकारणी याच लायकीचे आहेत.
भा.ज.पा. बरोबरची साथ सुटली असती तर शिवसेना ही सुद्धा राष्ट्रवादीशी संगत करण्यात १ नंबर तयार असती..
ती परिस्थीती आलीच होती २ दा वाचली..
आता याला शरद पवारांच्या नावाने गलिच्छ राजकारण म्हणायचे की इतरांचे राजकारणातील फक्त चुक हे आपल्यावर आहे..
अजुन अशी परिस्थीती नाही.. पण मागच्या वेळेस जागा वाटपाच्या वादात पवार-ठाकरे भेट.
आणि नंतर मुंडे वादामध्ये तुटण्याला आलेली युती यावेळेसची परिस्थीती तशीच होती..
राज ठाकरे.. (राजकारण नक्कीच करत असाणारच) पण निदान स्वाभिमानी राहुन तरी राजकारण करतील ही इच्छा आहे.. त्यामुळे यावेळेस म. न. से.
खुद्द बारामतीचाच असलो तरी शरद पवार साहेंबावर मी काही स्तुतीसुमने वाहत नाहित, परंतु इतर राजकारण्यांनी सुद्धा त्यांच्या त्यांच्या भागात काय दिवे लावले काय माहित ..
मग गटार छोटे काय आणि मोठे काय ते गटारच म्हणावे लागेल ...
असो ..
20 Oct 2011 - 1:08 pm | समीरसूर
इतर पक्षातले नेते काही कमी नाहीत फक्त त्यांना संधी मिळाली नाही किंवा त्यांच्या कर्तुत्वाची मजल इतकी जास्त नसावी... ;-)
आमच्या भाजपच्या आमदाराने कोट्यवधी रुपयांचा बंगला आमदार झाल्यापासून अवघ्या ७-८ वर्षात बांधला. प्रमोद महाजन तर रिलायन्सचे मंत्री म्हणून प्रसिद्ध होतेच. मनोहर जोश्यांचा जावई काय करून गेला हे सर्वांनाच माहित आहे....सगळे एकाच माळेचे मणी आहेत...आपले दुर्दैव! ठाकरे घराण्याची कितीतरी जमीन मुंबईत आहे असे ऐकले...शिवसेनेच्या काळात एक कोटी द्या आणि वीज महामंडळाचे सदस्य व्हा अशी योजना सर्रास होती असे ऐकीवात आहे. वीज महामंडळात नोकरीसाठी लाखो रुपये मंत्र्यांच्या हातात आणि 'प्रकाशगडावर' टेकवल्यावर नोकरी सहजी मिळत होती हे ही ऐकले आहे. अर्थात हे सगळ्याच सरकारांमध्ये होते...आपले राजकारण म्हणजे खरच गटार आहे....