चिकन लिवर (कलेजी) मसाला

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
15 Oct 2011 - 4:45 pm

साहित्यः

चिकन कलेजी साफ करुन त्याला आले+लसुण+कोथिंबीर+पुदिना+हिरवी मिरची पेस्ट लावून मॅरिनेट करुन ठेवणे
१ छोटा कांदा उभा चिरलेला
३-४ टेस्पून सुके खोबरे
३-४ लवंगा
१ टेस्पून आले+लसुण पेस्ट
१ टेस्पून लाल तिखट (आपल्या आवडीप्रमाणे कमी-जास्त)
१/२ टेस्पून गरम-मसाला
१ टीस्पून धणेपुड
१/२ टीस्पून हळद
मीठ चवीनुसार
तेल

.

पाकृ:

प्रथम एका नॉन-स्टीक पॅनमध्ये १ चमचा तेल तापवून कांदा व लवंगा परतून घ्या.

.

कांदा चांगला परतला गेला की त्यात सुके खोबरे घालून खमंग परता. थोडे थंड झाल्यावर किचिंतसे पाणी घालून मिक्सरवर वाटून घ्या.

.

आता एका भांडयात तेल तापवून त्यात आले+लसुण पेस्ट घालून परता.

.

चांगले परतले गेले की त्यात कांदा-खोबर्‍याचे वाटण घाला व परता.

.

त्यात आता मुरत ठेवलेली कलेजी (लिवर) घाला व एकत्र करा.
त्यावर हळद, लाल-तिखट, गरम-मसाला, धणेपूड व मीठ घाला. (कलेजीत मीठ असतं त्याप्रमाणे मीठ अंदाजे घालावे)

.

तुम्हाला किती रस्सा हवा आहे त्याप्रमाणे पाणी घालून, झाकण लावून शिजु द्या.

.

सुकी कलेजी हवी असल्यास किचिंत पाणी घालून परता व झाकून वाफेवर शिजवून घ्या.
कांदा-खोबर्‍याचे वाटण नको असल्यास कांदा-टोमॅटो घालून ही बनवता येते.
तयार चिकन लिवर मसाला भाकरी, चपाती, भाताबरोबर सर्व्ह करा.

.

प्रतिक्रिया

५० फक्त's picture

15 Oct 2011 - 5:25 pm | ५० फक्त

ब-याच दिवसांनी दिसले.....

प्रचेतस's picture

15 Oct 2011 - 5:27 pm | प्रचेतस

हो हो, अगदी अगदी.

सचिनमिसलप्रेमी's picture

15 Oct 2011 - 6:54 pm | सचिनमिसलप्रेमी

वल्लीनी सामिश खायला सुरुवात केली का?

प्रास's picture

15 Oct 2011 - 8:51 pm | प्रास

इथे चमच्यांबद्दल बोलणं चाललंय.....

:-)

छानच असणार हे व्यंजन.

बाकी सानिकातैंच्या पाकृला निरामिशाहारत्वामुळे आमचा पास.....

:-)

पियुशा's picture

16 Oct 2011 - 12:01 pm | पियुशा

@ प्रास
इथे चमच्यांबद्दल बोलणं चाललंय.....
पण तो चमचा निळा होता ना प्लास्टीकचा ;)

प्रास's picture

16 Oct 2011 - 12:15 pm | प्रास

यात काय संशय? ;-)

वा सानिका मस्तच. आणि केवढी मेहनत ती प्रत्येक चमच्यात मसाले ठेवण्याची. मस्तच.

चिरोटा's picture

15 Oct 2011 - 5:36 pm | चिरोटा

मस्तच. कलेजा खल्लास.

सुहास झेले's picture

15 Oct 2011 - 5:52 pm | सुहास झेले

जबरदस्त... कलेज्याला घरं पडली :) :)

सचिनमिसलप्रेमी's picture

15 Oct 2011 - 6:56 pm | सचिनमिसलप्रेमी

नेह्मीप्रमाणेच जबरा पा.क्रु.

प्रभाकर पेठकर's picture

15 Oct 2011 - 7:58 pm | प्रभाकर पेठकर

सुकी कलेजीच मस्तं.

हि सी.के.पी. पद्धतीची पाककृती म्हणायची का?

सानिकास्वप्निल's picture

15 Oct 2011 - 8:35 pm | सानिकास्वप्निल

ही माझ्या आजीची कोकणातली पध्दत आहे :)

प्रभाकर पेठकर's picture

15 Oct 2011 - 8:40 pm | प्रभाकर पेठकर

हम्म्म्म.... त्या हिरव्या मसाल्यामुळे मला सी.के.पी. पाककृती असल्यासारखी वाटली. असो. धन्यवाद.

पेठकरांनी म्हटल्याप्रमाणे मलाही सुकी कलेजीच जास्त आवडते. (चखण्याला बरी पडते) ;)

ही पाकृही ट्राय केल्या गेली जाइल! :)

- (कलेजा खलास झालेला) सोकाजी

शाहिर's picture

15 Oct 2011 - 8:16 pm | शाहिर

हा पहाताच मसाला ....
कलिजा खलास झाला..!!

रेवती's picture

15 Oct 2011 - 8:36 pm | रेवती

मी शाकाहारी असूनही चमचे (चांगल्या अर्थी) पहायला येते.
सगळं कसं अगदी व्यवस्थित मांडून ठेवलेलं असतं.
पाकृही छान. कलेजी म्हणजे लिव्हर हे माहित नव्हतं.

आइला....... अगं काय मस्त आहे गं..... निशांतची आवडती डिश आहे. पण मला चिकन पेक्षा मटण कलेजी फ्राय जाम आवडतो. :)

प्रभाकर पेठकर's picture

16 Oct 2011 - 4:41 pm | प्रभाकर पेठकर

मला चिकन पेक्षा मटण कलेजी फ्राय जाम आवडतो.

'तो' कलेजी? मला वाटते 'ती' कलेजी.

'तो' शब्द वापरायचा असेल तर 'कलेजा' म्हणावे.

'तो' कलेजा, 'ती' कलेजी आणि 'ते' काळीज.

सहज जाणवलं म्हणून लिहिले आहे. राग नसावा.

अरे... हो.... लिहताना लक्षात नाही आले.. धन्स.. ;)

विजुभाऊ's picture

18 Oct 2011 - 1:42 pm | विजुभाऊ

'तो' शब्द वापरायचा असेल तर 'कलेजा' म्हणावे.

ती पहाताच बाला
चुर्र आवाज झाला
फोडणीचा वास आला
अन............
कलेजा फ्राय झाला

बरोबर ना पेठकर काका ;)

प्रभाकर पेठकर's picture

18 Oct 2011 - 4:48 pm | प्रभाकर पेठकर

'ती पाहताच बाला' पेक्षा, तो पाहताच झारा कसं वाटतं?

जाई.'s picture

16 Oct 2011 - 5:21 pm | जाई.

मस्त

कोंबडीची कलेजी बकर्‍याच्या कलेजी पेक्षा खुप मऊ आणि गोडुस असते.
गोडुस असल्याने मला जास्त आवड्त नाही पण लेकीच्या खुप आवडते. तिच्यासाठी सुकी कलेजी बरेच वेळा केली जाते.
पण हीच कलेजी नुसती कोळश्यावर भाजुन आणि वरुन थोडं मीठ भुरभुरुन समोर ठेवली तर त्याला दुसर्‍या कशाची तोड नाही. :)

कॉलेजात असताना अलिबाग बीचवर रात्री केलेली कलेजी पार्टी आठवली..

- (पूर्वाश्रमीचा मांसाहारी) पिंगू

मोहनराव's picture

16 Oct 2011 - 10:30 pm | मोहनराव

माझा कलेजा खल्लास झाला!!

कच्ची कैरी's picture

17 Oct 2011 - 9:54 am | कच्ची कैरी

मस्त मस्त मस्त !!!
गणपाभौंशी सहमत ,मलाही कलेजी भजुन आणि वरुन मिठ टाकुन खायला जस्त आवडते पण ही डीश मी नक्की ट्राय करेल.

लई भारी.म्यान केलेले चमचे बाहेर आले एकदाचे...
माझी टिल्ली चिकन ह्याच कारणाने खाते.कलेजी तिला खूप म्हणजे खूपच आवडते.
"पापा मुझे वो छोटा पिलू (अंडे, चिकन, मटण, मासे, कलेजी ) बना दो ना जल्दी जल्दी "

ज्योति प्रकाश's picture

18 Oct 2011 - 8:04 pm | ज्योति प्रकाश

अ प्र ति म.
नक्की करुन बघितल्या जाईल.

कलेजी (लिव्हर) मध्ये भरपूर अ जीवनसत्व असते असे वाचल्याचे स्मरते. म्हणजे डोळ्यांसाठी चांगली. पण गरोदरपणी फार खाऊ नये.

प्रभाकर पेठकर's picture

19 Oct 2011 - 12:15 am | प्रभाकर पेठकर

कलेजीचा (बोकडाची किंवा कोंबडीची) फायदा मेंदूतील 'स्मरण' विभागास होतो. तसा शाकाहारी पदार्थात 'सुरण' ह्या भाजीचा होतो.

कलेजीच्या खाण्याने कमकुवत यकृताला ताकद मिळते पण त्यात कोलेस्ट्रॉलही अधिक असते असे वाचले आहे.

दर वेळेस मटन, चिकन आणले की त्यात थोडी कलेजी घालावी. शाकाहारींनी आठवड्यातून एकदा सुरण जरूर खावा.

स्मरणशक्तीच्या कार्यासाठी शब्दकोडीही सोडवावीत. म्हातारपणी फायदा होतो.

चिरोटा's picture

22 Oct 2011 - 11:16 am | चिरोटा

आणि बुद्धी तरतरीत राहण्यासाठी मिपावरची कोडी. नाणी,टोपी,गंधवाली.