गाभा:
आपण सर्व गेले ९-१० दिवस या आंदोलनाबद्दल वाचतो आहोत. एक समाज सगळ्या देशाला वेठीवर धरुन आहे, कोणी कांही करु शकत नाही. आज आठ दिवस दिल्ली -मुंबई रस्ता व रेल्वे विस्कळीत झाली आहे. अनेक लोक उत्तरेकडे अडकले आहेत. लोकांच्या हालांना पारावार राहिला नाही.
मतांसाठी सर्व लाचार पक्ष मूग गिळून बसले आहेत.
या आणि अशा प्रकारच्या हिंसक आंदोलनाचा नुसता निषेध करुन चालणार नाही. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणार्या प्रत्येक व्यक्तिला सरकारने 'अतिरेकी' मानून त्यानुसार कारवाई केली पाहिजे.
प्रतिक्रिया
31 May 2008 - 8:44 pm | मुक्तसुनीत
काही साधारण दिल्लीवासीयांशी माझी मैत्री आहे. हे आंदोलन गेल्या वर्षीच छेडले गेले त्यावेळी त्यांच्यापैकी एक व्यक्ति मला म्हणाली होती ..." बॉस ! अगर ये गुज्जर लोग किसी बात पे उतर आये तो भैय्या ! सबकी खटीया खडी होगी !" मी म्हण्टलं , "क्यूं भई ! ऐसा क्या है ! सभी लोगोंका तो अपना अपना गुट होता है. ये सब कास्ट पोलिटीक्स तो चलेगा !" तेव्हा ती व्यक्ती छद्मीपणे हसली, इतकेच.
आता त्याचा अर्थ थोडा समजतोय. जे होते आहे त्याला मध्ययुगीन टोळीचा दहशतवाद इतकेच म्हणता येईल. एखाद्या जमातीविरुद्ध सरसकट विधान करणे अयोग्यच , पण इथे हे मान्य करायला पाहिजे , की ऍज अ होल, गुज्जर समाज अत्यंत प्रतिगामी , हिंसक अशी त्याची प्रतिमा जी आहे त्याच्याशी सुसंगत अशा गोष्टी घडत आहेत. उत्तरेकडील नागरिक जीव मुठीत घेऊन बसले आहेत. या समस्येचा इतर प्रदेशाशी संबंध प्रत्यक्षपणे नाही ; पण सार्या देशाचे लक्ष इथे लागलेले आहे, साक्षात राजधानीच्या मुसक्या इथे आवळल्या गेल्या आहेत.
1 Jun 2008 - 12:16 pm | राजे (not verified)
गुज्जर समाज !!!!
लढाऊ... दणकट.... व सर्वात मोठी गोष्ट एकजूट समाज आहे हा गुज्जर.. सध्या जे आंदोलन चालू आहे .... ते आंदोलन पुर्वी पासूनच चालू आहे... कधी कॉग्रेस ने अश्वासन देऊन सत्ता मिळवली राजस्थान ची तर कधी बिजेपीने !
त्यामुळे हे आंदोलन चालू झाले व हिंसक वळण लागले... एका समाजाची सारखी सारखी फसवणूक केली तर कसे महाग पडू शकते ह्याचे सर्वात उत्तम उदाहरण आहे हे गुज्जर आंदोलन !!!!
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
2 Jun 2008 - 1:42 pm | अमोल केळकर
हे विषयाला धरुन नाही. ( ह. घ्या)
----------------------
आजच फौरवर्ड आलेला एक मार्मिक विनोद भारतातील आरक्षण वर
नवीन परिक्षा पध्दत - भारत
१. जनरल कॅटेगिरी- सर्व प्रश्नांची उत्तरे लिहा.
२. ओ.बि. सी. - कुठल्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहा.
३.एस्.सी- प्रश्न फक्त वाचा.
४.एस्.टी- आपण आलात आभरी आहे
आणी
५. गुज्जर : आपण इतरांना परिक्षाकेंद्रावर येऊ दिलेत त्याबद्दल आभारी आहे.
2 Jun 2008 - 3:31 pm | चतुरंग
आणि जागतिकिकरणाच्या रेट्यात अधिकच धारदार आणि असुरक्षित झालेल्या संपूर्ण समाजाचे हे प्रतिसाद आहेत. महागाईच्या भडक्याला, नोकरी नसण्याला, योग्य शिक्षण न परवडण्याला सत्तेच्या वर्तुळात प्रवेश करुन मलमपट्ट्या करणारे राजकारणी ह्याला प्रामुख्याने जबाबदार आहेत. राखीव जागांचे कुरण करुन सत्तेच्या शिड्या चढणारे नंतर सोयिस्करपणे आपला गट विसरुन त्याची खरी प्रगती बघत नाहीत आणि वेगवेगळी गाजरे दाखवून त्यांना झुलवत ठेवतात. कारण 'राखीव जागा' कायम असणे हेच त्यांच्यासाठी सत्तेत राहण्याचे कारण बनते - कारण संपले तर सत्ताही संपली!
विधायक कार्याच्या मार्गाने सत्तेत राहता येते. चांगले काम करता येते हा विश्वास कमी होत आहे.
राखीव जागांच्या मतांच्या राजकारणाचे हे भोगावे लागणारे परिणाम आहेत. सर्व प्रकारच्या असमतेवर 'राखीव जागा' हाच एकमेव अक्सीर इलाज आहे हे समीकरण जोपर्यंत भारतीय राजकारणातून नाहिसे होत नाही तोपर्यंत ही बातमी दरवेळी वेगवेगळ्या समाजाचे नाव पुढे करुन अशीच येत रहाणार.
चतुरंग
4 Jun 2008 - 4:11 pm | रम्या
सर्व प्रकारच्या असमतेवर 'राखीव जागा' हाच एकमेव अक्सीर इलाज आहे हे समीकरण जोपर्यंत भारतीय राजकारणातून नाहिसे होत नाही तोपर्यंत ही बातमी दरवेळी वेगवेगळ्या समाजाचे नाव पुढे करुन अशीच येत रहाणार.
अगदी सहमत.