संपादक मंडळ आणि व्यवस्थापकीय संरचना.

नीलकांत's picture
नीलकांत in घोषणा
5 Oct 2011 - 3:15 pm

मिसळपावच्या नवीन संपादक मंडळाची घोषणा करण्यात येत आहे.

१) रेवती
२) छोटा डॉन
३) निखील देशपांडे
४) प्रा.डॉ. दिलीप बिरूटे
५) इनोबा म्हणे
६) गणपा
७) पैसा

सदर संपादक सहा महिण्यांसाठी किंवा पुढील घोषणेपर्यंत कार्यरत राहील. सदर संपादकांना मिपावर प्रकाशित होणारे सर्व साहित्य व प्रतिक्रिया संपादन करण्याचे अधिकार आहेत. केलेल्या संपादनासाठी त्यांनी कुठेही खुलासा देणे अपेक्षीत नाही. तसेच या यादीमध्ये येत्या काही दिवसांमध्ये काही नावे येऊ शकतात. तशी घोषणा त्यावेळी केली जाईल.

या शिवाय मिसळपाव पुढे कसं जावं. कुठल्या नवीन बाबी जोडल्या जाव्यात, काय वगळायला हवे. तसेच व्यवस्थापनासाठी काय बदल असायला हवेत या सर्व विषयांवर मी काही लोकांशी कायम चर्चा करीत असे त्या लोकांना मिपावर विशेष अधिकार देऊन त्यांचा सक्रिय सहभाग मिपाच्या वाढीसाठी व्हावा असा विचार करून मिपा सल्लागार मंडळ तयार करण्यात आलेले आहे. विशेषतः येत्या काळात मी (नीलकांत) मिसळपाववर सक्रिय नसेन. तेव्हा या सल्लागार मंडळाने संपादक मंडळासोबत मार्गदर्शनपर काम करून मिसळपावचे काम, निर्णय, तांत्रीक अडचणी आदींवर उपाय शोधावेत अशी अपेक्षा आहे.

सल्लागार मंडळ खालील प्रमाणे -

१) रामदास
२) विकास
३) बिपीन कार्यकर्ते
४) प्रशांत

येथे एक खुलासा करणे आवश्यक आहे की सल्लागार हे संपादक नाहीत. त्यामुळे त्यांच्याशी संपादकीय विषयावर चर्चा न करता अन्य विषयांबाबत त्यांचा सल्ला घेऊ शकता. तसेच प्रशांत यांचेकडे मिसळपावचे सर्व तांत्रीक व कार्यकारी अधिकार दिलेले आहेत. माझे गैरहजेरीत प्रशांत कुठलाही निर्णय घेऊ शकतात.

आता पर्यंत अनेक संपादकांनी मिसळपाव येथपर्यंत घेऊन येण्यात आपले सहकार्य दिले त्यासाठी त्यासर्वांचा मी आभारी आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा यापुढेही मिसळपाव आणि मला होत राहील अशी अपेक्षा आहे.
धन्यवाद.

- नीलकांत