गुरूञ्चे द्वैत

३_१४ विक्षिप्त अदिती's picture
३_१४ विक्षिप्त अदिती in काथ्याकूट
4 Oct 2011 - 1:28 am
गाभा: 

आपले लाडके विचारवन्त मिपा'कर श्री. नितिन थत्ते उर्फ थत्ते'चिच्चा यांनी दिलेला हा प्रतिसाद वाचनात आला. थत्ते'चिच्चाञ्चे असे विचार वाचून माझ्या मनास यातना झाल्या. थत्तेचिच्चा हे भारतासारख्या महान देशात जन्माला आले, रहातात आणि तरीही त्याञ्चे असे एकेश्वरवादी, अब्राहमिक (होय अब्राहमिकच, अब्रह्मण्यम नव्हे!) विचार वाचून भारतासारख्या महान देशात अजूनही किती अज्ञान आहे आणि त्यासाठी अवतारी गुरूञ्ची किती गरज आहे हे माझ्या लक्षात आले. अशा वेळेस मिसळ'पावसारख्या सर्व विश्व व्याप्त करणार्‍या माध्यमाची गरजही माझ्या लक्षात आली. माझे दोन गुरू परमपूज्य घासकडवी'गुर्जी आणि श्री श्री भयावती'माता याञ्चे दिव्य आशीर्वाद माझ्यावर पडले नसते तर मी किती अडाणी राहिले असते हे माझ्या लक्षात आले.

कवितेतली सौन्दर्यस्थळं उलगडून दाखवणारे आमचे घासकडवी'गुर्जी हे किती महान आहे याची कल्पना अगदी नवख्या मिपाकरान्ना नसेल. पण गुर्जीन्नी जेव्हा ऊर्जेची गणिते माण्डली होती तेव्हाच मला कल्पना आली होती की हा कोणी ज्ञानी महात्मा आहे. विज्ञाननिष्ठाञ्च्या मांदियाळीत गुर्जीन्सारख्या उन्नत आत्म्याचे स्थान फार उच्च आहे. पण गुर्जीन्ना हे स्थान देण्याआधी माझे आयुष्य सुसङ्गत असण्यात मला मदत झालेली आहे ते सद्'गुरू भयावती'माता याञ्ची.

भयावती'माता आणि माझी ओळख होण्यास कारण आज दिवङ्गत असणारे जाल आयडी श्री. सखाराम गटणे TM याञ्ची. गटणे'जी यांनी मला भयावती'माता उर्फ भयाली'देवी यांच्याबद्दल साङ्गेपर्यन्त मी फक्त त्याञ्चे प्रतिसाद वाचत असे. त्याञ्च्या खरडवहीतले नऊ मुद्दे वाचून मला खात्रीच पटली की मी आन्तर'जालावर असण्याचे जे कारण मला आत्तापर्यन्त समजले नव्हते ते भयावती'माता हेच आहे. भयावती'माताञ्ची मी स्वयङ्घोषित शिष्या झाले. आजपर्यन्त मी भयावती'माता आणि पुढे घासरूद्ध गुर्जी यान्ना दोघान्नाही गुरू'स्थानी मानत आले आहे.

आज थत्ते'चिच्चाञ्चा हा अब्राहमिक धर्माप्रमाणे एकगुरूवादाचा प्रतिसाद वाचला आणि मला वाईट वाटले. माझ्या दोन आन्तर'जालीय गुरूम्मुळे माझे आन्तरजालीय आयुष्य प्रकाशमय झाले आहे. निदान हे अनावृत्त पत्र वाचून तरी थत्ते'चिच्चाञ्चे मनःपरिवर्तन होईल अशी आशा आहे.

धागा एक माशॅ काढणार। मिपाचा वाचक आधार॥
मी फक्त चेहेरा रंगवणार । नवरात्र रंगणार निश्चित॥
-- ॥इति घासूगुर्जी महावाक्यम॥

शेवटी थत्ते'चिच्चा आणि सर्व मिपा'करांसाठी प्रार्थना करून मी माझी व्यथा मिपा'कराम्पर्यन्त पोहोचेल अशी अपेक्षा करते.

संस्थळी आयडी। होती जे पाशवी॥
तयाचा आनंद। वाटे माते॥
पहाताती वाट॥ आयडींचे व्यास॥
स्थळी गणपती। व्हावा कोणी ॥
भक्त नसलिया।कंपू तरी व्हावा॥
कंपूगान गाई। सर्वकाळ ॥
माता आणि गुर्जी ॥ आशीर्वाद देती।
विनोदही व्हावे। निरंतर॥

या धाग्यावर माझ्या दोन्ही गुरूञ्चे आशीर्वाद असावेत हीच नम्र विनन्ती.


प्रतिक्रिया

Nile's picture

4 Oct 2011 - 1:43 am | Nile

खालचे दोन्ही फटू पाहू गतप्राण झालेलो आहे.. धागा पुन्हा जीवात जीव आल्यावर वाचल्या गेला जाईल.

धन्या's picture

4 Oct 2011 - 2:38 am | धन्या

तिकडे रासगरब्यामध्ये आमच्या पुजनिय गुरुजींच्या खांदयावर पिचकारी ठेवून त्यांच्या शिष्यवृंदावर रंग उडवला जात आहे हे जेव्हा कळलं तेव्हाच जाणवलं होतं की आता कयामत येणार. पण आमचे गुरुजी फार्फार पोचलेले. अगदी जांभळ्या* रंगाच्याही पलिकडे गेलेले. त्यांनी ते फारसं मनावर घेतलं नाही.

परंतू न्युटनच्या तिसर्‍या गतीविषयक नियमानूसार (किंवा तसल्याच कसल्यातरी नियमानूसार, चुभुदयाघ्या.) वाताचा कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे तुफान आलंच आहे. (हे वाक्य स्व. अमरीष पुरी स्टाईलने वाचणे)

अद्वैतसामर्थ्यदाता** घासरुद्ध गुर्जींना साष्टांग नमस्कार.

* या शब्दाच्या अर्थासाठी तुम्हाला कांद्र्याला गुर्जींच्या दरबारात यावे लागेल.
** लोकांना द्विअर्थी भासणार्‍या कवितांमधून परमेश्वराशी अद्वैत कसं साधायचं हे शिकवणारा.

प्रियाली's picture

4 Oct 2011 - 3:01 am | प्रियाली

बै तुम्ही १ आणि २ का, अहो, १० गुरू करा पण त्यापैकी एका कडून तरी थोडी विरामचिन्हांचा योग्य वापर आणि पब्लिकमध्ये कसं आणि काय बोलावं हे शिकून घ्या. नाहीतर तिथे भक्ती आणि इथे रंगपंचमी. :)

असो. त्या वर कोणी तुमच्या गुरुमाता आहेत त्यांना म्हणावं थोडं डाएट करा. वजन फार वाढलंय. ;)

आणि थत्तेचिच्चांचं फार ऐकू नका. जगात जे काही वाईट घडतं आहे ते त्यांच्यामुळे, महात्मा गांधींमुळे, इंदिरा गांधींमुळे, राजीव, सोनिया, राहूल इ. इ. गांधींमुळेच हे लक्षात ठेवा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Oct 2011 - 5:00 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रियालीताई, तू माझ्या गुरूम्बद्दल असं कसं लिहू शकतेस? माझ्या भावना दुखवून तुला काय आनन्द मिळतो? आणि राजीव'जी एवढे हॅण्डसम होते, एवढे हॅण्डसम होते, की खूपच हॅण्डसम होते की WE MISS YOU RAJIV'JI. तू त्याञ्च्याबद्दल प्लीज असं लिहू नकोस गं. मला वाईट वाटतं.

पैसा's picture

4 Oct 2011 - 7:58 am | पैसा

वरच्या लेखात अब्राहमचा नुसता उल्लेख आणि इथे "राजीवजी हॅण्डसम" काय? आमच्या प्रिय जॉनीला अशी कशी विसरलीस?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Oct 2011 - 8:36 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

काही दैवी शक्तीञ्च्या पवित्र साक्षात्कारामुळे मला माझ्या पूर्वीच्या चुकाञ्ची जाणीव झालेली आहे. मी आता असा उठवळपण करायचं नाही असं ठरवलं आहे.

॥जय जय श्री श्री माता प्रसन्न॥

क्रेमर's picture

4 Oct 2011 - 3:41 am | क्रेमर

गुरून्चे द्वैत सम्पून ते एक होवोत यासाठी शुभेच्छा!

शिल्पा ब's picture

4 Oct 2011 - 5:35 am | शिल्पा ब

कोण आहेत हे लोकं आणि त्यांच्या आवडीनिवडीबद्द्ल आम्हाला माहीती का देताय? धन्यवाद.

बरोबर

घासुरुध्द गुर्जी किती महान आहेत मला माहीत नव्हती
अग तो लेख वाचून मी सुद्दा कविता केली दोन तासांत म्हणजे बघ
लेख मस्तच आहे
बाकी गुर्जीँचा फोटो मात्र मस्त आहे एकदम खपले
माँडर्न दिसतायत
गुर्जीनी आम्हा पामराना फायनलसाठी टिप्स देउन उपकृत करावे ही विनंती

ऋषिकेश's picture

4 Oct 2011 - 9:49 am | ऋषिकेश

अगं पण एखाद्या व्यक्तीला गुरू करणे म्हणजे त्याचे/तिचे फोटो कपड्यांवर बिल्ले करून लावणे (जालावर असाल तर खरडवहीमधे डकवणे), एखादा वार ठरवून भक्तगणांनी जमुन शक्तीभक्तीप्रदर्शन करणे, वर्षातून एखादा मेळावा भरविणे, त्या गुरूबद्दल चमत्कारांचे पुस्तक काढणे, गुरूदेव/माता यांनी स्वप्नात येऊन दृष्टात दिल्याचे जगाला कळ(वि)णे, त्यांच्या नावे ट्रस्ट उघडून दक्षिणा घेऊन एक मंदीर व हॉटेलधर्मशाळा बांधणे वगैरे गोष्टी येतातच. (असं सगळं केल्यानंतर लोकांना मी यांची भक्त आहे त्यांच्याबद्द्ल काहिहि वाईट बोलायचं काम नाही सांगून ठेवते, नाहीतर.... असं धमकावणं बोलणं ही शेवटची स्टेज आहे)

तु तर दोन दोन गुरु केलेयस तर इतकं सगळं कसं म्यानेज करतेस?

नितिन थत्ते's picture

4 Oct 2011 - 10:02 am | नितिन थत्ते

१.

हल्लीच्या तथाकथित हुच्चभ्रूंना प्रत्येक विचार हा बाहेरून आयात झाला असे म्हणण्याची खोडच लागलेली आहे त्यामुळेच एकेश्वरवादाचे हवे तेवढे दाखले भारतातल्या श्रुतीस्मृतीपुराणवाङमयात उपलब्ध असताना मी हा एकगुरूवाद बाहेरून आणला असा ही & हि आरोप करण्यास दुर्बिटणेबाईंची बोटे धजावली.

गीतेत जागोजागी भगवान कृष्णांनी मीच (एकमेव) खरा देव आहे असे सांगितले आहे. जे भक्त इतर देवतांची पूजा करतात त्यांना मीच निर्मिलेली फळे मिळतात. असेही सांगितले आहे.

२.
हिं हृ स वि दा सावरकर यांचे एक वचन आठवते. "कुंभाराच्या मनोराज्यात गाढवेच गाढवे". या वचनासारखेच अजून एक वचन येथे सांगू इच्छितो, ते म्हणजे "दुर्बिटणेबाईंच्या मनोराज्यात अब्राहमच अब्राहम"

टीप : येथे कुंभार कोण आणि गाढव कोण याच्या खुलाश्यात पडत नाही.

असो. सध्या इतकेच पुरे.

३. वर मुद्दा क्रमांक १ मध्ये देवाच्या एकत्वाविषयी लिहिले आहे गुरूंच्या एकत्वाविषयी काही नाही. परंतु गुरूच्या ठायी संपूर्ण निष्ठा असणे हे आवश्यक मानले जाते. अनेक गुरू असल्यास या 'संपूर्ण' निष्ठेत उणीव राहू शकते. अर्थात वैयक्तिक मत म्हणाल तर गुरूंचे द्वैत (त्रैत किंवा चतुष्ट्यही) असण्यास माझी हरकत नाही. परंतु माझ्या 'त्या' प्रतिसादामागचे कारण एका गुरूच्या जागी दुसर्‍या गुरूची प्रतिष्ठापना झालेली दिसली. दोन गुरू दिसले नाहीत म्हणून पार्टी चेंज का असा प्रश्न विचारला.

ऋषिकेश's picture

4 Oct 2011 - 10:15 am | ऋषिकेश

या प्रतिसादाचा आणि विषयातील 'हॅट'चा संबंध कळला नाही ;)
का 'त्या प्रतिसादात पार्टीचेंज केल्यावर बदलाव्या लागणार्‍या टोपी - पक्षि हॅट- बद्द्ल बोलताय?
का दुर्बिटणे ताईंना दोन हॅट घालाव्या लागतील असे सुचित करताय?
का त्यांना 'हॅट'वादी म्हणायचे आहे?

श्रावण मोडक's picture

4 Oct 2011 - 10:09 am | श्रावण मोडक

वाद आमचा राजेश करणार, विक्षिप्त अदिती आधार,
कंपूबाज प्रतिसाद देणार, धागा भरकटणार निश्चित!

विसुनाना's picture

4 Oct 2011 - 3:37 pm | विसुनाना

!

गुरू क्रमांक एक यांचे खरे नाव उर्सुला आहे असे दिसते. हे पाहा:-

http://disney.wikia.com/wiki/Ursula
http://en.wikipedia.org/wiki/List_of_Disney's_The_Little_Mermaid_characters

गुरू क्रमांक दोन हे एका व्यायामपटूचे व्यंगचित्र आहे. हे पाहा:-

http://www.stockphotopro.com/photo_of/bodybuilder/9932974LPB/__bodybuild...

नगरीनिरंजन's picture

4 Oct 2011 - 12:14 pm | नगरीनिरंजन

आपल्या काटेकोरपणाचे आणि विनोदबुद्धीचे मला पहिल्यापासूनच फार कौतुक वाटत आलेले आहे.

धन्या's picture

4 Oct 2011 - 12:42 pm | धन्या

आपल्या नावाची शिफारस उत्खननशास्त्रातील नोबेल पारितोषिकासाठी करण्यास काहीच हरकत नसावी ;)

प्रचेतस's picture

4 Oct 2011 - 1:52 pm | प्रचेतस

असेच म्हणतो.

मदनबाण's picture

4 Oct 2011 - 1:29 pm | मदनबाण

गुरू क्रमांक दोन हे एका व्यायामपटूचे व्यंगचित्र आहे.
चेतनराव आपल्या मौलिक उत्खनना बद्धल मंडळ आभारी आहे. ;)
जरा त्या व्यायामपटुच्या जिमच्या पावतीचे व्यंगचित्र गावते का ते पहा बरं ! ;) नाही म्हणजे त्यालाही जरा "प्रसिद्धी" वग्रैरे मिळेल बॉ. ;)
बाकी या धाग्याने चांगले मनोरंजन होत असल्याने सदर लेखिके बद्धल "आदर" वाढला ! ;) आणि ड्वाले पानावले देखील ! ;)

खरे सांगायचे तर चेतनजी तुमच्या कडुन अभ्यास पुर्ण आणि मार्मिक टीप्पणीची अपेक्षा होती ( या पूर्वीच्या प्रतिसादांवरुन )..

आपण चित्रांविशयी माहिती देउन सत्य बाहेर आणलेले आहे..त्य बद्दल धन्यवाद..
( आणि प्रस्तुत लेखिकेने जालिय संदर्भ सुद्धा दिले नाहीत ...हे मि पा च्या धोरणा मधे बसत नाही ..पण जुन्या जाणत्यांसाठी कदाचित धोरण वेगळे असेल ) ..

प्रियाली's picture

4 Oct 2011 - 2:16 pm | प्रियाली

चेतन सुभाष गुगळे, जरा तुम्ही त्या उर्सुलाचे 'द लिटिल मरमेड' बघून टाका. जमल्यास इतर काही कार्टून्सही बघा. विनोदबुद्धी नाही तरी तोंडावर हसू आले तरी खूप आहे.

श्यामल's picture

4 Oct 2011 - 12:42 pm | श्यामल

अदिती, तुझ्या गुरुमातेचं साजिरं गोजिरं आणि सात्विक रुप पाहुन भक्तीभावाने नतमस्तक झाले. जय गुरुमाता !

प्रम्पुज्य घासरुद्ध गुर्जींना सुद्धा सादर प्रणाम ! जय गुरुदेव !

विजुभाऊ's picture

4 Oct 2011 - 1:22 pm | विजुभाऊ

एकाच वेळेस दोन दोन गुरु म्हणजे दोन बायका फजीती ऐका असेञ्च म्हणाव्ञे लागेंल.
वरील पैकी भ्याव्ती मातेचा रंग नीळसर आहे. कालीका चामुन्डा यांचा ही रंग नीळाच असतो असे कोणीतरी म्हणाले होते.
भ्याव्ती मातेला बरेच दिवसात आयडीबळी मिळालेला न्हाई असे दिस्तेय.
अवाम्तरः वरील फोटो हे अंतार्जालावरील असल्यास त्यांचा तसा उल्लेख क्रावा. हा मिपाच्या धोरणाम्चा एक भाग आहे

आत्मशून्य's picture

4 Oct 2011 - 1:52 pm | आत्मशून्य

थत्ते'चिच्चाञ्चे असे विचार वाचून माझ्या मनास यातना झाल्या.

चालायचं, मनच तर है, अणूरेणूच्यां परीभाशेत सापडणारी गोश्ट थोडीच है की येवडी चिंटा कराय्ची ?

प्रचेतस's picture

4 Oct 2011 - 1:54 pm | प्रचेतस

बरूबर है. मनास थोडीच भौतिकशास्त्राचे नियम लागू पडणार.

बालगंधर्व's picture

4 Oct 2011 - 2:53 pm | बालगंधर्व

अरे बाप्रे.... आत्ता कुठं सगळे सन्दर्भ लागायला लागलेत......

बालगंधर्व हा जर एक अविष्कार असेल तर त्याबद्दल सहानुभूती वाटते.

का रे ?
मृगनयनीच्या ख व ची लिंक संपादित केली का? का त्या लिंक साठीच आविष्कार झाला होता?

सुहास..'s picture

4 Oct 2011 - 3:51 pm | सुहास..

पेर्‍या

लिंक संपादित होणारच होती . इतके दिवस मिपावर राहुन साधे गणित कळत नाही तुला म्हणजे

अरे हा यार. लगेच साक्षात्कार पण झाला. बाकी प्रतिसाद पण संपादित झाले.

रडीचा डाव आहे रे हा!

आम्ही कटाप. आजपासून नो मिपा. च्यु(इंगम) गिरी आहे.

रडीचा डाव आहे रे हा!
"ओकार्‍या" काढणार्‍यांचे प्रतिसाद मात्र तसेच राहतात बरं !

सुहास..'s picture

4 Oct 2011 - 4:02 pm | सुहास..

साक्षी ला केव्हापास्न ओ(त)कार्‍या व्हायल्या लागल्या ..असो... अरे खव पण संपादित झाली आहे ..

कहर आहेत ब्वा ! असो आता तिकडे ये नाहीतर आपलाच गेम व्हायचा ;)

अवांतर : घाबरत नाही रे, पण समोर नाहीत ना लेकाचे :)

कवितानागेश's picture

4 Oct 2011 - 3:19 pm | कवितानागेश

तिसरा नियम जोरात सुरु आहे!

नावातकायआहे's picture

4 Oct 2011 - 4:03 pm | नावातकायआहे

सर्व 'प्राणी' उडाले!

बाकी चालु द्या!

प्यारे१'s picture

4 Oct 2011 - 3:27 pm | प्यारे१

;) ;) ;)

छोटा डॉन's picture

4 Oct 2011 - 4:03 pm | छोटा डॉन

कृपया मिपावर वावरताना परस्परात जे काही असतील ते वाद, मतभेद आणि असलीच तर भांडणे सांभाळताना सर्वांनी संयम पाळावा ही कळकळीची विनंती.

- छोटा डॉन

संपादक मंडळ's picture

4 Oct 2011 - 4:13 pm | संपादक मंडळ

दोन्ही बाजूंनी काहीही कसर बाकी ठेवली नाही, त्यामुळे यापुढचे अप्रिय प्रसंग टाळण्यासाठी हा धागा वाचनमात्र करण्यात येत आहे. म्हणलं तर सगळेच शहाणे, म्हणलं तर सगळेच... असो.

पुढील कारवाईबद्दल विचार करण्यात येईल.