साहित्य चिकन चिमीचांगा:
५०० ग्राम साफ करुन तुकडे केलेले बोनलेस चिकन
फ्लॉर / कॉर्न तोरतीया (Tortilla)
३ टेस्पून तयार मेक्सिकन सीझनिंग (हे जर तुम्हाला नाही मिळाले तर तुम्ही पॅपरीका पावडर किंवा लाल मिरची पावडर, मीठ, गार्लिक पावडर, ऑरेगॅनो, लिंबाचा रस, जिरेपूड, धणेपूड, साखर हे सर्व एकत्र वापरु शकता.)
१ हिरवी भोपळी मिरची बारीक चिरलेली
१ लाल भोपळी मिरची बारीक चिरलेली
१ मध्यम कांदा बारीक चिरलेला
१ छोटा टोमॅटो चिरलेला
१ टीस्पून लसूण बारीक चिरलेले
१ टीस्पून काळीमिरीपूड
२-३ हॅलेपिनो किंवा हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
१ वाटी मॉंन्टेरी जॅक चीझ ( मेक्सिकन पाकृत हे चीझ हमखास वापरलं जातं, मला ते नाही मिळाले म्हणून मी मॉझ्झरेला चीझ वापरले...तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही चीझ आणी कितीही वापरु शकता.)
एका अंड्याचा पांढरा भाग
तेल
मेक्सिकन सीझनिंगमध्ये मीठ असल्यामुळे मी घातले नाही , तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता.
पाकृ:
प्रथम चिकनच्या तुकड्यांना २ चमचे तेल व मेक्सिकन सीझनिंग लावून मॅरीनेट करावे १० ते १५ मिनिटे.
एका पॅनमध्ये तेल तापवून त्यात चिरलेला लसूण घालावा. लसूण परतला गेला की त्यात चिरलेला कांदा घालून चांगले परता.
मग त्यात हिरवी व लाल चिरलेली भोपळी मिरची घालून परतणे.
त्यात टोमॅटो, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या व काळीमिरीपूड घालून परतणे.
आता त्यात मॅरीनेट केलेले चिकन घालून एकत्र करणे. झाकण लावून मंद गॅसवर शिजवणे.
चिकनचे पाणी आटले की गॅस बंद करणे.
एका पॅनमध्ये तोरतीया हलकेच दोन्ही बाजूंनी शेकून घेणे. त्यावर शिजवलेले चिकन, ग्वाकामोली डीप, टोमॅटो सालसा व चीझ घालावे.
तोरतीयाच्या कडा अंडाच्या पांढर्या भागाने ब्रश करणे व त्याच्या कडा पूर्ण बंद करून चौकोनी आकार द्यावा.
खरंतर चिमीचांगा हे डीप-फ्राय केलं जातं पण आपण तसं न करता त्याला शॅलो फ्राय करुयात एका नॉन-स्टीक पॅनमध्ये.
हलकेच शॅलो फ्राय केल्यावर त्याला खुसखुशीतपणा व कुरकुरीतपणा येण्यासाठी आपण चिमीचांगाला प्री-हिट केलेल्या ओव्हनमध्ये १९० डीग्री सेंटीग्रेड्वर १०-१२ मिनिटे बेक करणार आहोत.
तयार चिकन चिमीचांगा ग्वाकामोली डीप व टोमॅटो सालसा बरोबर सर्व्ह करा. (मी रेडीमेड टोमॅटो सालसा वापरला आहे)
तुम्ही रीफ्राईड बीन्स, मेल्टेड चीझसोबत ही सर्व्ह करु शकता.
साहित्या ग्वाकामोली डीप:
१ अव्होकॅडो
१ टेस्पून बारीक चिरलेला कांदा
१/२ लिंबाचा रस
मीठ व मिरपूड चवीनुसार
१ टीस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
१ हिरवी मिरची बारीक चिरलेली
पाकृ:
अव्होकॅडोला मधोमध कापून दोन भाग करावेत.सुरीने त्याच्यामधली बी काढून टाकावी.
चमच्याने त्याच्या आतला गर अलगद काढावा.
गर चांगला मॅश करुन घ्यावा.
त्यात कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ व मिरपूड आणी लिंबाचा रस घालावा व एकत्र करावे.
नॅचोज बरोबर, बरीतो, चिमीचांगा सोबत सर्व्ह करणे.
आवडत असल्यास ह्यात टोमॅटो ही घालू शकता.
प्रतिक्रिया
3 Oct 2011 - 7:28 am | रेवती
पाककृती आवडली.
मी शाकाहारी असले तरी मुलाला खूपच आवडेल हा पदार्थ!
डीप फ्राय न करता जो कमी तेलाचा मार्ग अवलंबला आहेस तो आवडला.
अर्धा किलो बोनलेस चिकमध्ये किती चिमीचांगा तयार होतात?
3 Oct 2011 - 7:35 am | सानिकास्वप्निल
छोटे तोरतीया घेतले तर साधारण ५-६ होतात
मोठे घेतले ३-४ :)
3 Oct 2011 - 7:36 am | रेवती
धन्यवाद.
3 Oct 2011 - 9:35 am | चिंतामणी
चिकन चिमीचांगाचे तयार झाल्यावरचे (लाकडी टेबल/टी पॉयवर डिशमधे ठेवलेले) फोटो एकदम जबरा.
एक शंका हे "अव्होकॅडो" आपल्या देशात मिळते का?:(
3 Oct 2011 - 10:22 am | शिल्पा ब
छान दिसतंय. मला ग्वाकामोली आवडते. अगदी ताजी असेल तरच चांगली लागते. लोकं येणार असतील तर ते आल्यावरंच करायची. खुप वेळ आधीच करुन ठेवली तर काळी पडेल.
3 Oct 2011 - 10:23 am | सुहास झेले
खपल्या गेलो आहे..... _/\_
काय हे काय चाललंय काय... किती तो छळ ;-)
3 Oct 2011 - 10:53 am | पिंगू
अजिबात खपलो नाहीये.. जिवंत आहे नैवेद्य खायला. चिकनएवजी सोया चंक्स घालून पण चव येईल आणि शाकाहा-यांना हा उत्तम पर्याय असेल असे मला तरी वाटते..
हाय काय आणि नाय काय...
- पिंगू
3 Oct 2011 - 3:08 pm | चिंतामणी
"तोरतीयाच्या कडा अंडाच्या पांढर्या भागाने ब्रश करणे" याला पर्याय काय्??:(
3 Oct 2011 - 3:40 pm | गणपा
खायचा फेव्हिकॉल* वापरा. :)
* थोडा मैदा पाण्यात भिजवुन ;)
3 Oct 2011 - 10:55 am | पिंगू
प्रकटाआ.
3 Oct 2011 - 11:06 am | शाहिर
वेगळी रेसीपी आहे..
तोपासु ...
नव रात्र संपली कि लगेच करणार
3 Oct 2011 - 2:32 pm | ऋषिकेश
बापरे ही रेसिपी मात्र माझ्यासारख्या(उपद्व्यापी नवर्यां) ना करता येणे कठीण आहे. त्यात घरी नॉनवेज बनत नसल्याने कोणी बनविणार असेल तर सांगा.. तोंड घेऊन खाण्यास हजर होईन :)
4 Oct 2011 - 3:17 am | Nile
अरे लेका ये की इकडे. ऑथेंटीक मेक्सिकन खाऊ घालतो तुला. ग्वाकोमोलीतर काय लागते, अहाहाहा!
चिमी अन ग्वाकोमोली मस्त दिस्तीए, चांगलीच झाली असेल.
ग्वाकोमोली असेल तर नॅचो कशाला हवेत राव (नॅचोस म्हणजेच टॉर्टीया चिप्स्+चीज वगैरे). फक्त चिप्स त्या बादलीभर अन ग्वाकोमीली घमेलंभर. विषय संपला.
3 Oct 2011 - 2:44 pm | गणपा
हायला या पदार्थाच इतक भारी नाव आहे होय? आम्हाला माहीतच नव्हत.
शोरमाच्या थोडा जवळपास जाणारा हा पदार्थ खुप भन्नाट लागतो यात शंका नाही.
3 Oct 2011 - 2:47 pm | सविता
बाकी सारे छानच
पण "चिमीचांगा" हे नावच आपल्याला भारी आवडले आहे.
3 Oct 2011 - 3:58 pm | मानस्
मस्तच..फोटोही छान.
सध्या नवरात्र चालू आहे नाहीतर लगेच करुन पाहिलं असतं.
3 Oct 2011 - 4:43 pm | कच्ची कैरी
अरे व्वा एकदम चिंगचिंगाट रेसेपी आहे !!!फोटो तर एकदमच जिवघेणे आहेत ,मस्तच !
3 Oct 2011 - 11:16 pm | कवितानागेश
कालच अॅव्होकॅडो पाहिले. पण काय करायचे ते माहित नव्हते.
आता ही मेक्सिकन चटणी करेन.
4 Oct 2011 - 1:13 pm | गवि
कुठेशी पाहिले ठाण्यात? की परदेशी व्हिजिटवर सध्या?
4 Oct 2011 - 1:43 am | प्राजु
माझा आवडीचा पदार्थ आहे.
मार्गारीटा'ज मध्ये खूप मस्त मिळतो.
आता घरीही करेन.
धन्यवाद सानिका.
4 Oct 2011 - 5:05 am | चित्रा
छान आणि माझ्या दृष्टीने ह्यातील बदल स्वागतार्ह आहेत.
9 Jan 2015 - 4:30 pm | कपिलमुनी
लै भारी !!
9 Jan 2015 - 8:19 pm | ग्रेटथिंकर
फुड ट्रक सुरु करा.