नवरात्र नऊ रंग , स्त्री-शक्ति आणि आम्ही !
.. कुठलीही नवी जुनी गोष्ट सांगायची तर परवा ठरलेला असतो, पण ही कालची, परवाची , तेर्वा ,एरवाची आणि येणार्या उद्या , परवाची पण आहे पण गोष्ट आहे असो
अहो कालचीच गोष्ट स्टेशनवर उतरलो तर समस्त स्त्री वर्ग छान पैकी हिरव्या रंगांत न्हाउन गेला होता.
सगळ्या बायका , मुलीनी छान पैकी हिरवा रंगाच्या ठेवणितल्या साड्या घातल्या होत्या. ज्याना पूर्ण पणे ह्या रंगाचे पारंपरिक कपडे घालायचे नव्हते त्यानी जीन्स आणि हिरवे टॉप घातले होते. थोडा वेळ एकदम छान वाटल. पुढे रिक्शेच्या रांगेत पुढे मागे हिरवाच रंग होता.
माझा नंबर आल्या नंतर मागच्या एक (पिवळ्या देठाचा) हिरव्या बाईने झप्कन पुढे येऊन रिक्षा पकडली , आणि माझ्या सारख्या अ-हिरव्या पामरकडे तुछ्छ कटाक्ष टाकून पुढे निघून गेल्या.
पुढे ऑफिस मध्ये पाय टाकल्या वर काळजाचा ठोका चुकला , समस्त महिला वर्ग हिरव्या रंगात तोरयात वावरत होता. काय कळेना काय चालू ते. त्यातल्याच एक जवळच्या मैत्रिणीला कॉफी पिताना जिवा-वर उदार होईन आज सगळे हिरव्या रंगात काय अस विचारताच अजुन एक तुछ्छ कटाक्ष मिळाला , तरी पण तिने दया येऊन सांगून टाकल म्हणे आजकाल नवरात्रीला एका दिवशी एक असा रंग ठरवून टाकायचा आणि त्या रंगाचे कपडे घालायचे.
एवढ कळल्यावर पुढे आणखीन काही विचारण्याच धाडस झाल नाही. पण का कोण जाणे मला अचानक अस वाटायला लागल की सतत आपल्यावर कुठल्या तरी हिरव्या रंगाची आज पाळत आहे.
लेडी बॉस (त्या पण हिरव्याच) बरोबर काही मीटिंगा फार जड गेल्या , जणू काही मला कॉर्नर करण्यात येत होत. बर कॅण्टीन मध्ये जाऊन रिलॅक्स करू तर तिकडे तोच हिरवा रंग.
आता मला अस पक्क वाटायला लागल की हे दुसर तिसर काही नसून स्त्री शक्तीचे शक्ति-प्रदर्शन आहे. एका रंगाच्या निमित्ताने का होईना सगळ्या बायका एकत्र येत आहेत.
आता आज करडा उद्या पिवळा नंतर लाल , बापरे त्यातून काही सुटका नाही , मला तर अशी भीती वाटटायला लागलये दसर्याला समस्त पुरूष वर्गाच रावण दहन होत नाहीए ना ?
धोक्याची सूचना द्यायाच काम मी केल साभाळुन राहा रे मुलानो . मित्रांनो , काका आणि मामंनो :) ह्या नऊ रात्री वैरी होऊ शकतात.
ह्या वर उपाय काय आहे हे पण सुचवा ,
माझा विचार होता की गणपतीला दहा दिवस दहा रंगाचे शर्ट आपण घालू पण बायका तेव्हा ही आपल्ल्याला बॅंड वले म्हणून हिणवु शकतात , एक बैल पोळा आहे किंवा अजुन काही सण ?
सर्व हुश्शार मिपा परिवारनानी काय ते विचार करून फायनल सांगा :) उगाच्च भोचक म्हणी जश्या खाई त्याला खवखावे , चोर की दाढी मे तिनका इत्यादी टाकु नका :)
(इथेही मिपा-कारणिना सिंगल आउट करत नाहीए , आपली काय बिशाद आहे ह्या रंगीत पाशवी शक्तिशी पंगा घेण्याची :) )
प्रतिक्रिया
2 Oct 2011 - 12:34 am | धन्या
खरं आहे तुमचं. पण योग्य ती खबरदारी घेतली की काळजी करायचं कारण नसावं.
2 Oct 2011 - 4:28 am | राजेश घासकडवी
यावरून एक जुनी ऍड कॅंपेन आठवली. तुम्हाला नव-रात्रीत नऊ रंग वापरता आले तर तुम्ही तक्रार का करावी कळलं नाही?
2 Oct 2011 - 1:47 pm | पैसा
हा प्रतिसाद दुसर्या एका गुर्जींचा आहे की काय अशी शंका येऊन गेली क्षणभर!
बाकी माशॅ, लेख खुसखुशीत झालाय. आमच्या हापिसात उद्या पोपटी रंग ठरलाय!
2 Oct 2011 - 4:08 pm | निवेदिता-ताई
हो ग , आमच्या ऑफिसात उद्या लाल रंग आहे
2 Oct 2011 - 5:16 pm | मितान
आमच्याकडे उद्या पांढरा म्हणे...
2 Oct 2011 - 11:14 pm | प्रीत-मोहर
आम्ही उद्या गुलाबी रंग ठरवलाय :)
3 Oct 2011 - 10:32 am | मृगनयनी
आज सप्तमीचे सरस्वती-पूजन असल्यामुळे "पान्ढरा" रन्ग आहे. उद्या मन्गळवार असल्यामुळे तसेच अष्टमीचा "होम" असल्यामुळे "लाल" रन्ग आहे. ( टीपः ज्या बायकान्च्या अन्गात येते... त्यान्नी हिरवा रन्ग घातला तरी चालेल!! ;) ;) ) परवा बुधवारी "व्हॉयलेट" रन्ग ठरलेला आहे... आणि विजयादशमी'ला "गुलाबी" रन्ग आहे.
:)
॥ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके ॥
॥ शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ॥
:)
3 Oct 2011 - 11:32 am | llपुण्याचे पेशवेll
तुम्हाला विजयादशमीला सुट्टी नाय?
3 Oct 2011 - 1:50 pm | मृगनयनी
तुम्हाला विजयादशमीला सुट्टी नाय?
अय्या... काहीतरीच काय!!! आपण घरामध्ये "गुलाबी" रन्गाचे कपडे घालू शकत नाय? ;)
नुस्ता हापिसातच नै कै कलर सेलेब्रेशन करायचं! :)
3 Oct 2011 - 3:58 pm | वपाडाव
घरामध्ये घालायच्या कपड्यांचा रंग ठरौला नाही ठरौला काय फरक पडतंय ????
(गुलाबीच बरा सुचला असेल..... घरी घालण्यासाठी)
मी कुठेही काहीही अश्लील बोललो नाहीये.....
लगेच पाशवी शक्तींनी खाली येउन अश्लील अश्लील अश्लील असे खिदळु नये......
- कधीही कुठेही कोणत्याही रंगाचे पण कपडे घालणारा (रंगाकाका नोहे) वपाडाव
2 Oct 2011 - 1:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नवरात्रात नऊ रंगाच्या स्त्री शक्तीचं दर्शन आम्हालाही बर्याचदा घडलं आहे. दैनिकात छापायला बातम्या नसतात तेव्हा अशा स्त्री शक्तीचं दर्शनही नवरात्रात छापून येत असतं. विविध सोसायट्या, हापीसं सॉरी कार्यालयात असं दर्शन नित्यच असावं. :)
पण काहीही म्हणा. अशा एका रंगाच्या साडीत स्त्रीया अधिकच सुंदरच दिसतात.
>>>>>माझा विचार होता की गणपतीला दहा दिवस दहा रंगाचे शर्ट आपण घालू पण बायका तेव्हा ही आपल्ल्याला बॅंड वले म्हणून हिणवु शकतात.
अगदी- अगदी.
-दिलीप बिरुटे
2 Oct 2011 - 3:00 pm | स्मिता.
अच्छा, हे कारण आहे काय! तरीच आजकाल चेपुवर बर्याच मैत्रिणींचे ऑफिसातल्या सगळ्या स्त्रियांनी एकाच रंगाच्या साड्या नेसून काढलेले फोटो रोज झळकत आहेत.
पहिल्या दिवशी वाटलं त्यांच्या ऑफिसात 'कलर कोड' असावा, पण रोजच त्याच-त्या पोजेज् मधले फक्त साड्यांचे रंग बदललेले फोटो बघून गोंधळात पडले होते. आता उलगडा झाला ;)
2 Oct 2011 - 7:37 pm | अविनाशकुलकर्णी
सौजन्य चे.पु
2 Oct 2011 - 8:05 pm | जाई.
पण पुरुष सुध्दा अस करु शकतात
स्रिया साड्या नेसतात
तर तुम्ही वेगळ्या रंगाचे शर्ट वापरा
तेवढाच तुम्हालाही चेंज :smile:
2 Oct 2011 - 10:42 pm | माझीही शॅम्पेन
@धनाजीराव - वाकड्यात न शिरता पटकन सांगून टाका काय "खबरदारी" घेताय ते.
@ घासु गुर्जी - "वापरता" शब्दावर आक्षेप
@ पैसा - खुसखुशीत धन्यवाद आणि तुम्ही हिरव्या कडून पोपटी म्हणजे आम्ही आगीतून फुफाट्यात :)
3 Oct 2011 - 12:07 am | राजेश घासकडवी
हा आक्षेप कळला नाही. वापरणे मध्ये नक्की काय चूक आहे? घालणे हा शब्द जास्त बरोबर ठरला असता का?
3 Oct 2011 - 12:28 am | धन्या
त्या प्रतिसादात कपडे हा शब्द नसल्यामुळे घालणे हा शब्द भलतीच काशी घालतो असे विनम्रपणे सांगावेसे वाटते.
3 Oct 2011 - 5:03 am | राजेश घासकडवी
'ए, चला गं, उद्या आपण सगळ्यांनी निळं घालून येऊया' यात कुठली काशी घातल्यासारखं वाटतं हेही मी तितक्याच विनम्रपणे विचारतो.
3 Oct 2011 - 11:12 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
यात काय ते ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस आहे काय?
(निरागस) अदिती
कपड्यांचे रंग ठरवतात तसं फेस पेंटींग नाही का करत? तेवढंच जरा म्याचिंग!
(गणवेश"प्रेमी") अदिती
3 Oct 2011 - 12:37 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>>ए, चला गं, उद्या आपण सगळ्यांनी निळं घालून येऊ
इथे नक्की काय निळं आहे? हेच वाक्य कुणी "उद्या आपण सगळ्यांनी Nile घालून येऊया" असे interpret केले तर ?
3 Oct 2011 - 5:56 pm | धन्या
कुठल्याही रंगाचं घातलं तरी पुरुषांचं मन विचलीत होऊन त्यांच्या मनस्थितीची काशी घातली जाते.
3 Oct 2011 - 12:24 am | धन्या
एखादया गोष्टीवर आम्ही भाष्य केलं म्हणजे ती गोष्ट आम्ही स्वतः करतोच असे नाही. उंटावरुन शेळ्या हाकण्याचा हक्क आम्हाला जन्मानेच मिळाला आहे.
आमच्या प्रतिक्रियेचा रोख असा होता की दांडीया खेळताना जपून खेळावे. एखादे केमिस्टचे दुकान जवळपास पाहून ठेवावे. खरचटलं वगैरे तर बँडएड आणायला सोयीचं पडतं.
आम्ही आमच्या आडनावावर केलेली कोटी हे कोटी करणार्याच्या विनोदबुद्धीचे दिवाळे निघाल्याचं लक्षण समजतो. :)
3 Oct 2011 - 11:28 am | माझीही शॅम्पेन
बरोबर आहे तुमच वाकडे आड-नवा वरुन करण्या सारख्या कोट्या आता उरल्या नाही आहेत :)
@गुर्जी - वापरणे आणि घालणे ह्या दोन्ही शब्दा बरोबर कपडे हा संदर्भ नसेल तर भलताच अर्थ लागण्याची शक्यता आहे.
3 Oct 2011 - 11:49 am | सूड
असू द्या हो माशॅभौ, मात्र एक करा अष्टमीला कोणा आजीबैंच्या अंगात संचार झालेला पाह्यलात तर तुमच्या सुरक्षेची प्रार्थना करा ब्वॉ. या धाग्यावर पाशवी शक्ती भलत्याच अॅक्टीव्ह झाल्यात.
3 Oct 2011 - 1:04 pm | मृगनयनी
असू द्या हो माशॅभौ, मात्र एक करा अष्टमीला कोणा आजीबैंच्या अंगात संचार झालेला पाह्यलात तर तुमच्या सुरक्षेची प्रार्थना करा ब्वॉ. या धाग्यावर पाशवी शक्ती भलत्याच अॅक्टीव्ह झाल्यात.
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
सुधान्शु'जी... तुम्हाला "दैवी शक्ती" म्हणायचे आहे का? कारण नवरात्रातल्या "अष्टमी"ला नॉर्मली पवित्र लोकांच्या अन्गात येतं.. असं म्हणतात... आणि ती शक्ती "देवी"ची असते.. आणि हीच "दैवी" शक्ती अष्टमी- नवमी'ला 'अॅक्टीव्ह' होते.
असो... दैवी शक्तींना तुच्छ लेखणार्या किन्वा दैवी शक्तींची मस्करी करणार्या लोकांमध्ये "पाशवी शक्ती" अन्गीभूत असतात... असे म्हणतात... :) बाकी चालू द्या...
शेवटी तुम्ही नवरात्रात विशिष्ट रन्गान्चे कपडे घालणार्यांपैकी आहात की विशिष्ट रन्गाने तोन्डे रन्गवणारे आहात... यावरही बर्याच गोष्टी अवलम्बून असतात.... :)
3 Oct 2011 - 5:04 pm | सूड
>>कारण नवरात्रातल्या "अष्टमी"ला नॉर्मली पवित्र लोकांच्या अन्गात येतं.. असं म्हणतात... आणि ती शक्ती "देवी"ची असते.. आणि हीच "दैवी" शक्ती अष्टमी- नवमी'ला 'अॅक्टीव्ह' होते.
अहो मुर्गनयनी'जी , अंगात संचारलेल्या पवित्र शक्तीकडे धाग्यावरच्या पाशवी शक्तींपासून सुरक्षेची प्रार्थना करायचं म्हणतोय मी.
>>शेवटी तुम्ही नवरात्रात विशिष्ट रन्गान्चे कपडे घालणार्यांपैकी आहात की विशिष्ट रन्गाने तोन्डे रन्गवणारे आहात... यावरही बर्याच गोष्टी अवलम्बून असतात....
हे काहीतरी नवीनच कळतंय, असो. :)
3 Oct 2011 - 2:08 pm | राजेश घासकडवी
प्रत्येकच जण माझ्या निरागस शब्दांमधून भलतेच अर्थ लावत आहेत? तसा वाकडाच अर्थ काढायचा झाला तर मी नाही का विचारू शकत, 'तुमच्या वाक्यात अर्थ हा शब्द नसता तर 'भलताच लागणे' हा शब्द सूचक ठरला असता म्हणून?' वाकडेच अर्थ काढायचे झाले तर मृगनयनीआजींनी लिहिलेल्या प्रतिसादातल्या 'पवित्र' या शब्दातूनही वाकडे अर्थ काढता येणार नाहीत का?
मी म्हणतो तुमची नजर सुधारण्यासाठी पावित्र्याचे आय ड्रॉप्स घालून घ्या.
3 Oct 2011 - 6:51 pm | धन्या
गुर्जी सांभाळून हो. आम्हाला राहून राहून वाटतंय की तुमच्या खांदयावर पिचकारी ठेवून कुणाचं तरी थोबाड रंगवलं जातंय. ;)
3 Oct 2011 - 8:10 pm | राजेश घासकडवी
एकंदरीत चर्चेवरून तुम्ही पवित्र आणि आम्ही नीतिमत्ताहीन हे कळलं. तुम्ही रंगवता तेव्हा तो मेकप व इतर रंगवतात ते फेसपेंटिंग हेही कळलं. तुमचं ते नृत्य आणि इतरांच्या त्या माकडचेष्टा हेही ज्ञान झालं.
तेव्हा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन मी या मौलिक चर्चेतून अंग काढून घेतो.
3 Oct 2011 - 9:20 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अंग काढून घेताना रंग लागला का अंगाला? हा प्रश्नही अश्लील आहे का? असला तर असू देत, मला काय त्याचं? :-D
("अब तक छप्पन" टिकली लावलेली) अदिती
3 Oct 2011 - 10:31 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
घ्या! या सखूप्रेमींना आता अंग काढून घेताना रंग कसा लागतो ते आम्ही सांगायचं का?
3 Oct 2011 - 10:36 pm | स्मिता.
काय गं, पॉपकॉर्न संपलेत वाटतं... बकाणे भरून गिळल्यानंतर आता बोलायला तोंड उघडलंस का?
3 Oct 2011 - 10:54 pm | प्रियाली
अमेरिकेतला शो टाईम सुरु नव्हता झाला. आत्ता सुरु झाला असावा. ;)
रंगपंचमीच्या प्रतीक्षेत.
3 Oct 2011 - 11:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
नाही नाही. विकेण्डला पालथे धंदे न करण्याचं वचन मी माझ्या गुरूंना दिलेलं आहे. ;-)
3 Oct 2011 - 5:21 pm | नितिन थत्ते
>>माझ्या खरडवहीतल्या फोटोंपैकी तुम्ही ज्यान्ना "आजी" किन्वा "मावशी" म्हणू इच्छिता.. त्या माझ्या "माननीय गुरुवर्य - परमपूज्य कलावती आई" आहेत. कृपया त्यान्च्यावर कोणत्याही कमेन्ट्स न आल्या तर बरे होईल....
आँ? पार्टी -आपलं गुरू- चेंज?
3 Oct 2011 - 4:18 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>>बादवे, तुमच्या अन्गात आल्याचे अनुभव कधीतरी सान्गावे ही विनंती.
चला, आता पाशवी शक्ती विरुद्ध विज्ञान शक्ती यांचा सामना बघायला मिळणार. होऊन जाऊ देत. ;-)
3 Oct 2011 - 11:39 am | मृगनयनी
रन्ग ठरवण्याचा मक्ता काय फक्त बायकांनीच घेतला पाहिजे... असं काही नाही..... :) :)
खरंतर नवरात्रात भोप्यांबरोबर बहुरुप्यांना पण थोडं मार्जिन द्यायला हवं! ;)
3 Oct 2011 - 1:49 pm | श्यामल
आता मला अस पक्क वाटायला लागल की हे दुसर तिसर काही नसून स्त्री शक्तीचे शक्ति-प्रदर्शन आहे. एका रंगाच्या निमित्ताने का होईना सगळ्या बायका एकत्र येत आहेत. >>>
माझीही शॅम्पेन, स्त्री-शक्तिचा सन्मान करायला शिका ! आणि त्यासाठी पुढील वर्षीच्या नवरात्रीच्या नऊ दिवसांकरीता प्रत्येक दिवसाठी एक अशा नऊ रंगांच्या नऊ जरीच्या काठ पदराच्या साड्या तात्काळ वहिनींना खरेदी करुन द्या ! :wink: देवी तुम्हांवर प्रसन्न होईल ! :wink:
3 Oct 2011 - 3:28 pm | विश्वनाथ मेहेंदळे
वहिन्या पण नऊ पाहिजेत का? माशॅ तयारीला लागा, पुढच्या १२ महिन्यात ९ शिखरे सर करायची आहेत असे दिसते ;-)
3 Oct 2011 - 4:47 pm | श्यामल
वहिन्या पण नऊ पाहिजेत का? >>>
मेल्या विम्या, लागलास लगेच चेकाळायला ! अरे, आदरार्थी संबोधन आहे ते. म्हण बरं..... अहो वहिनी.....वहिनींना..... वहिनींसाठी....... वहिनींकरीता............ चल पाठ कर आजचा धडा ! :wink:
माशॅ तयारीला लागा, पुढच्या १२ महिन्यात ९ शिखरे सर करायची आहेत असे दिसते >>>
माशॅ, ह्या विम्याचं व्याकरण कच्चं आहे. त्याच्याकडे लक्ष देऊ नका. नाहीतर त्याच्या आणि तुमच्या भलत्याच तयारीला लागायला लागेल ! :wink:
3 Oct 2011 - 5:19 pm | वपाडाव
ह्याला,
९ महिन्यात १२ शिखरे सर करायची आहेत अस्से वाचल्या गेले आहे......
4 Oct 2011 - 12:05 am | माझीही शॅम्पेन
अहो विमे तयारी जोरात चालू आहे जिम-वीम पण लावण्यात आली आहे , नऊ पैकी कोणाच्या अंगात कधी येईल सांगता यायच नाही
इथे १० गणपतीत घालायला वेगवेगळ्या रंगाचे शर्ट घ्यायच मनावर घेतोय , आणि बाब्बौ त्यात अजुन नऊ साड्या म्हणजे आमच्या कोल्हापूर जनता सहकारी बॅंकेच कर्ज काढतुया आता...
बाकी सर्व सज्जन मिपाकरानो आता ही चर्चा आवारा...आपल आवरा :)
त्या भप्करच्या भाषेत सांगायाच तर माझ्या ब्लोग ची कोलाती घसरत चालली आहे. (अवांतर पण भप्कर झाल काय)
(बुचकळ्यात पडलेली) शॅम्पेन
3 Oct 2011 - 4:34 pm | मृगनयनी
ह्म्म्म... संध्या रंगात रंगलेली स्त्री-शक्ती रोज पहायला मिळतेय खरी !
:) ह्म्म्म्म्म!! :)
बाकी मॄग्गा... तू फारच "अभ्यास" करुन प्रतिक्रिया दिलेली दिसतेयस बॉ...!
हो रे... मदनबाण!!! ... स्वत:ला निरागस वैज्ञानिक समजणार्या पाशवी शक्तींविरुद्ध लढा तर द्यायलाच हवा ना रे!!! ;)
_______________
बाकी काय म्हणतोस? खूप दिवसान्नी दिस्लास!!!! :) बरे वाटले..... :)
3 Oct 2011 - 6:56 pm | धन्या
खिक !!! असं आहे तर. थोबाडाला रंग फासण्याच्या निमित्ताने स्कोअर सेटल होताहेत म्हणायचं तर :)
3 Oct 2011 - 6:14 pm | सुहास..
निरागास ? वगरै तर माहित नाही,पण काही गंडलेले असतात अस नक्कीच वाटतं मला !
हल्लीच एक बातमी वाचली होती...मंगळावर पाणी सापडल्याने शास्त्रज्ञांना आनंद झाला !
इथे ज्या ग्रहावर ही शास्त्रज्ञ मंडळी राहत आहेत्,त्याच ग्रहावर उद्या पाण्यामुळेच युद्ध होईल असे म्हंटले जाते.या ग्रहावरच्या पाण्यावर करोडो खर्च करण्या ऐवजी मंगळावरचे पाणी शोधण्यात ह्यांनी करोडो खर्च केले ! आहे की नाय मज्जा ! परग्रहावर जीवसॄष्टी शोधतात, पण ज्या ग्रहावर राहतात त्याच ग्रहावरचे अनेक जीव विलुप्त झाले आहे ! हे त्यांच्या गावीही नसावे बहुधा.
वेग वेगळे स्थिरांक शोधतात...मनाचा स्थिरांक जर यांना शोधता आला तर मनुष्य प्राण्याचे बरेच भले होईल ! आणि काही जणांचा विक्षिप्तपणा पण कमी होण्याची "शक्यता" निर्माण होईल.
असो... टंकनकष्ट आवरतो जरा >>>>>>>
_/\_
सांष्टांग !!!
अवांतर : बझवरचा आयडी मेलवा जरा
3 Oct 2011 - 11:51 pm | इंटरनेटस्नेही
चांगलं लिहिलंयस मित्रा!
-
माझीही कमेंट. ;)