मासे ३४) टोळ

जागु's picture
जागु in पाककृती
23 Sep 2011 - 3:56 pm

टोळ हा मासा समुद्रात मिळणारा हा दिसायला लांबलचक व सुंदर चकचकीत असतो.

ह्याच्या शेपटीला टिकलीसारखा काळा ठिपका असतो.


ह्याचे डोके म्हणायची की चोच असाच प्रश्न पडतो मला ती लांब लचक असते.


हे मासे समुद्रात उडतात. आतुन काही भाग जरा पोकळसर असतो. पण चविला चांगले असतात.

साहित्यः
टोळ मासे १ वाटा

रस्श्यासाठी:
वाटण - पाव वाटी ओल खोबर, अर्धा इंच आल, ५-६ लसुण पाकळ्या, १ मिरची, थोडी कोथिंबीर

हिंग
हळद
मसाला
मिठ
तेल
चिंचेचा कोळ

तळण्यासाठी
चिमुटभर हिंग
हळद
मसाला
मिठ
तेल
लिंबू (ऑप्शनल)

पाककृती:
रस्सा:
टोळीचे डोके व शेपुट काढून टाकायचे. मधल्या भागाचे आपल्याला सोयिस्कर आकारात तुकडे करायचे. हे तुकडे तिन पाण्यात स्वच्छ धुवुन घ्यायचे.

भांड्यात तेल गरम करुन त्यावर ४-५ लसुण पाकळ्यांची फोडणी द्यायची. मग त्यावर लगेच हिंग, हळद, मसाला घाऊन लगेच वाटण टाकायचे. त्यातच चिंचेचा कोळ, मिठ घालायचे व मग टोळच्या तुकड्या टाकायच्या. रस्सा ५-१० मिनिटे उकळवून ग्यास बंद करायचा.

तळलेले टोळः
धुतलेल्या तुकड्यांना हिंग, हळद, मिठ, मसाला हवा असल्यास लिंबू रस लावावा. तवा चांगला तापल्यावर तुकड्या शॅलोफ्राय कराव्यात. तुकड्या ३-४ मिनीटांनी पलटा व परत दुसरी बाजू शिजवुन गॅस बंद करा.

(रेडी रेसिपिज चा फोटो काढायला विसरले त्याबद्दल क्षमस्व. मी परत केल्यावर टाकतेच)

प्रतिक्रिया

वेगळेच दिसताहेत मासे. करकोच्यासारखे चोचवाले.

छान.

माशावर ती एक माशी बसलेली दिसतेय, तिला गायब करता येईल का?

माशावर ती एक माशी बसलेली दिसतेय, तिला गायब करता येईल का?

हे घ्या

फोटो योग्य जागी गेल्याने इथून हलवल्या आहे :)

खादाड's picture

23 Sep 2011 - 5:14 pm | खादाड

धन्यवाद जागुताई !! तुमच्यामुळे आम्हाला वेगवेगळे मासे बघायला मिळतात !! ईथे नागपुरला समुद्रातले मासे एक दोन प्रकार सोडुन बाकी नाही मिळत !!

रेवती's picture

23 Sep 2011 - 7:17 pm | रेवती

माशांचे तुकडे पाहून शेवग्याच्या शेंगांचे तुकडे आठवले.
टोळ हा शब्द एका हिरव्या किड्यासाठी वापरला जातो. त्याला नाकतोडाही म्हणतात.
टोळ नावाची पाकृ पाहून जरा बिचकतच धागा उघडला.

सविता आणि स्पा दोघांसाठी टाळ्या!;)

+१
मलाही टोळ शब्द वाचून तेच वाटलं
नाकतोडा हा शब्द आठवतच नव्हता कितीतरी वेळ
थँक्स रेवतीताई

जागुतै शेवटचा फोटो लवकर टाक प्लीज

मदनबाण's picture

23 Sep 2011 - 9:02 pm | मदनबाण

रेवती आज्ज्जीशी सहमत... ;)

प्राजु's picture

24 Sep 2011 - 12:05 am | प्राजु

हेच म्हणते, टोळ म्हणजे हिरव्या रंगाचा वाकड्या पायांचा किडा... नाकतोडा! :)

धनंजय's picture

24 Sep 2011 - 12:43 am | धनंजय

मासे अगदी वेगळेच दिसत आहेत. मिनिएचर स्वर्डफिश!

मला असे वाटायचे की टोळ आणि नाकतोडे हे वेगवेगळे कीटक आहेत. टोळ हे झुंडीने धाड घालणारे कीटक आहेत. नाकतोडे एका जागी राहातात, धाडी घालत नाहीत. इंग्रजीत टोळांना लोकस्ट म्हणतात, आणि नाकतोड्यांना ग्रासहॉपर.
(शिवाय ज्या कीटकांना इंग्रजीत मँटिस म्हणतात, त्यांनाही आमच्या घरी आम्ही मुले नाकतोडे म्हणायचो.)

परिकथेतील राजकुमार's picture

27 Sep 2011 - 5:19 pm | परिकथेतील राजकुमार

टोळ प्रचंड संख्येने येतात आणि शेताचा एक पूर्ण भागच नष्ट करण्याची त्यांची ताकद असते. त्याला टोळधाड म्हणतात.
नाकतोडा म्हणजे सहसा गवतावर दिसणारा हिरवा किटक.

@ मस्त्यकन्या :- अगं शाकाहारी काहितरी टाक ना __/\__

शाकाहारी काहितरी
आजकाल बरेच पाकप्रयोग चाललेले दिसतात.
पण पाकृचे साहित्य मिळणार कारे तुला?
त्यासाठी करावी लागणारी वणवण बघवत नाही अगदी!
माझ्या वधूवर सूचक मंडळात नाव नोंदणी करायचा विचार दिसतोय तुझा!

सगळ्यांचे धन्यवाद.

गणपा यांनी माशी उडवून दिल्याचा फोटो वर अपलोड केला आहे.

अरे वा, एकदम वेगळे मासे आहेत. कधी बघीतले नाही. मला वाटते हे मासे फ्राय केल्यावर ओले बोंबील सारखे लागतील. परत कराल तेव्हा रेडी रेसिपीचा फोटो नक्की काढा. :)

नाही मृणालिनी बोंबील एकदम लिबलिबीत असतात हे कडक असतात इतर माश्यांसारखे.

प्रभाकर पेठकर's picture

24 Sep 2011 - 3:08 am | प्रभाकर पेठकर

आम्ही ह्यांना 'टोळके' म्हणतो. चवीला अत्युत्तम वगैरे नसतात पण रश्यापेक्षा तळून जास्त चांगले लागतात. (एक उत्तम चखना..).
ह्या माशांचा एक फायदा असा की जास्त साफ करावे लागत नाहीत. खवले नसतात. डोके-शेपटी काढायची आणि पोटातील घाण काढून तुकडे करायचे. काटेही नसतात. एक सरळ काटा असतो. असो.

तुरीच्या डाळीची आमटी (आंबट वरण) - भात - आणि त्यावर वरील मासे तेलात चुरचुरीत तळून. (आणि दुपारची झोप. स्वर्गसुख स्वर्गसुख म्ह्णतात ते हेच).

प्रभाकर तुमच्याशी सहमत ह्या माश्यांना तशी खास चव नसते.

प्राजू धनंजय ते हिरवे टोळ जपानमध्ये कुरकुरीत तळून खातात.

jaypal's picture

24 Sep 2011 - 9:01 pm | jaypal

तुझ्यामुळे टोळ नावाचा मासा देखिल असतो हे माहीत झाले.
(मला तर फक्त मिपा वरील टोळभैरवच माहीत होते ;-) )
तुझ्या सगळ्याच पा.क्रु. खुपच टेंम्प्टींग असतात ही पण तशीच आहे.
लाल मसाल्याची रेसीपी देना .प्लीज

शिल्पा ब's picture

25 Sep 2011 - 8:39 am | शिल्पा ब

सुग्रण जागुतै!!
मुंबईला आले की तुला भेटणारच...तु नै म्हणालीस तरी.. :)

जागुताई मस्त पाकृ.
त्यांच्या त्या मगरीसारख्या चोची घेवून टोचा टोची खेळायचो ते आठवले.

शिल्पा तुचे स्वागत आहे. कधी येतेयस ?

जयपाल, इरसाल धन्यवाद.

चित्रा's picture

27 Sep 2011 - 8:33 am | चित्रा

सुरेख मासे.

प्रसाद थोड्याच वेळात टाकते व्हेज रेसिपी.

आज बाजारात गेले तर भले मोठे टोळ मासे दिसले. पण ते वरच्या टोळ एवढे सुंदर नव्हते.

मराठमोळा's picture

28 Sep 2011 - 7:28 am | मराठमोळा

नविनच प्रकार..
जागुतै मुळे नविन नविन प्रकार आणि रेसेपी पहायला मिळतात :)

धन्यवाद.. :)

विशाखा राऊत's picture

28 Sep 2011 - 9:01 pm | विशाखा राऊत

हा मासा पहिल्यांदा बघितला.. जागुताई तुझ्या पोतडीत किती मासे आहेत अजुन :)

मराठमोळा धन्यवाद.

विशाखा ती पोतडी नाही ग जाळ आहे. एक निसटला जाळ्यातुन की परत एखादा अडकतो.