साहित्य शेझवान पोटॅटो:
अर्धवट उकडलेले छोटे बटाटे अर्धे कापून घेणे (तुम्ही बटाट्याच्या जाडसर फोडी ही करु शकता)
१ कांदा उभा चिरलेला
२ टेस्पून बारीक चिरलेला लसूण (चायनीज पाकृत भरपूर लसूण व आले लागते, आपल्या आवडीप्रामाणे कमी-जास्त करणे)
१ टेस्पून बारीक चिरलेले आले
५-६ लाल मिरच्या वाटून पेस्ट (मिरच्या गरम पाण्यात ३-४ तास भिजवणे व त्यातल्या बिया काढून मिक्सरवर पाणी न घालता वाटून घेणे)
३ टेस्पून कॉनफ्लोअर
१ टीस्पून काळीमिरीपूड
मीठ चवीनुसार
१ टीस्पून साखर
१ कप व्हेज स्टॉक (पाणी ही वापरू शकता)
१ टेस्पून सोया सॉस
तेल
पाकृ:
प्रथम अर्धवट उकडलेल्या बटाट्यांना कॉनफ्लोअर लावून डीप फ्राय करुन घ्या.
एका पॅनमध्ये २ टेस्पून तेल घालून चिरलेला लसूण व आले घालून परता.
चांगले परतले की त्यात उभा चिरलेला कांदा घालून परतणे.
त्यात वाटलेली लाल मिरची पेस्ट घालावी (आपल्याला तिखट किती सोसवेल त्याप्रमाणे)
चांगले परतले गेले की त्यात सोया सॉस व काळीमिरीपूड घालावे.
चवीपुरतं मीठ व साखर घालावी. ( सोया सॉसमध्ये ही मीठ असतं त्याप्रमाणे मीठ घालावे)
त्यात आता १ कप व्हेज स्टॉक घालून उकळी आणावी.थोडेसे कॉनफ्लोअर पाण्यात मिसळून ग्रेव्हीत घालावी, म्ह्ण्जे मिश्रण घट्ट होईल.
शेझवान सॉस दाट झाला की त्यात तळून ठेवलेले बटाटे घालावे व कितपत अजुन दाट हवे तसे शिजवावे.
त्यात थोडी चिरलेली कांद्याची पात घालावी.
आवडत असल्यास सॉस बनवताना आंबट्पणासाठी त्यात थोडे विनेगर घातले तरी चालेल.
साहित्य व्हेज हक्का नुडल्सः
१ पॅकेट हक्का नुडल्स
१ वाटी पातळ व उभा चिरेलेला पानकोबी
१ वाटी पातळ व उभा चिरेलेला गाजर
१ वाटी पातळ व उभी चिरलेली भोपळी मिरची
१/४ वाटी चिरलेली फरसबी
२ पातीचे कांदे पातळ व उभे चिरलेले
कांद्याची पात बारीक चिरलेली
१ टेस्पून बारीक चिरलेला लसूण
१/२ टेस्पून बारीक चिरलेले आले
मीठ चवीनुसार
१ टीस्पून काळीमिरीपूड
१ टेस्पून सोया सॉस
तेल
पाक्रु:
पाणी उकळत ठेवा, त्यात चमचाभर तेल व थोडे मीठ घाला.उकळी आली की त्यात नुडल्स घाला आणि शिजवा. शिजल्यावर चाळणीवर टाकून पाणी काढून टाका, त्यावर थोडे थंड पाणी घाला व निथळत ठेवा.
एका पॅन किंवा कढईत तेल गरम करून आले-लसूण घाला व परता.
त्यात चिरलेला पातीचा कांदा घालून परता.
आता त्यात फरसबी, गाजर व कोबी घालू परता.(पटापट परतायला हवे, आणी खुप वेळ नाही परतायचे, भाज्या थोडया कच्च्याच हव्यात )
त्यात आता भोपळी मिरची घालून परता.
त्यात सोया सॉस, मीठ व काळीमिरीपूड घाला. ( सोया सॉसमध्ये ही मीठ असतं त्याप्रमाणे मीठ घालावे)
त्यात शिजवलेल्या नुडल्स घालून परतणे व वरून चिरलेली कांद्याची पात घालणे.
व्हेज हक्का नुडल्स तयार.
गरमा-गरम हक्का नुडल्स शेझवान पोटॅटोबरोबर सर्व्ह करणे.
प्रतिक्रिया
21 Sep 2011 - 5:14 pm | सुहास झेले
खपलो... :) :)
21 Sep 2011 - 5:55 pm | अत्रुप्त आत्मा
पा.क्रु.नेहमी प्रमाणेच झकास....
चायनीज फुड...आणी घरी करायचं....? _/\_ यास्तव आमुचाही दंडवत......... :-)
अवांतर-यक डाव आमी नीस्त्या नुडल घरी करत असताना,हवेत उडवाया ग्येलो,,,तर त्या थोड्या तोंडावर, आनी बाकीच्या मागं पडल्या,,,त्या मुळे नंतर तोंडाला कैलास जीवन चं फेशीयल,आनी भिंतीवर आधुनिक चित्रकारीतेचा नमुना अशी दु-हेरी भ्येट मिळाली,त्यामुळ असल काय करायच लै भ्या वाट्ट..पन अता बगू प्रयत्न करुन...
21 Sep 2011 - 6:03 pm | शाहिर
शेझवान पोटॅटो एकदाम भारी !!
तुमचा प्रेझेन्टशान सुद्धा नेहमी प्रमानेच आकर्षक आहे ..
धन्यवाद !
21 Sep 2011 - 6:06 pm | रेवती
मस्त! मस्त्!! मस्त!!!
मला हक्का नुडल्स आवडतात पण मनासारखे कधीच जमत नाहीत.
ही पाकृ पाहून तुझी शेजारीण बनावे काय असा विचार मनात डोकावून गेला.
21 Sep 2011 - 8:02 pm | प्राजु
अगदी अगदी!!
मलाही हेच वाटलं..
झक्कास झक्कास!!
21 Sep 2011 - 6:16 pm | ५० फक्त
बटाटे लई भारी दिसताहेत, पण शुटिंगची व्यवस्था नसल्याने मेलो नाही, असो.
धन्यवाद, चायनीज पदार्थांची सुरुवात ही मराठी चिनी भाई भाई ची सुरुवात आहे म्हणायचे का ?
आणि अजुन एक बटाटा हा चीनी पदार्थात वापरला जातो का चीन मध्ये, आपल्याकडे पुण्यात जिरे घातलेलं पण चायनिज खाल्लेलं आहे,
21 Sep 2011 - 6:25 pm | विशाखा राऊत
नशीब जेवुन झाले आणी मग बघितले :)
21 Sep 2011 - 6:35 pm | जाई.
छान आहे हो पाकृ सानिकातै
तोँपासु
वीकेन्डला हा मेनू फिक्स
21 Sep 2011 - 6:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
_/\__
21 Sep 2011 - 7:17 pm | स्मिता.
सानिका, यापुढे मी तुझ्या पाकृंवर प्रतिक्रिया देणार नाही. त्या बाय डिफॉल्ट छान, मस्त, तोंपासु अश्याच असतात. ;)
21 Sep 2011 - 7:41 pm | प्रभो
मस्तच!!!!
>>चाईनीज पाकृत भरपूर लसूण व आले लागते,
हे भारतीय चायनीज मधे ना?? ऑथेंटीक चायनीज हाटेलात खाल्लेल्या पदार्थात (१-२ पदार्थ सोडल्यास) नावालाही सापडला नाही हो.... :(
21 Sep 2011 - 8:01 pm | प्रचेतस
तोंपासू.
आजच चायनिझ खाऊन येईन म्हणतोय.
21 Sep 2011 - 9:19 pm | इरसाल
ह्या शनिवारी किंवा रविवारी नक्की नक्की करणार.
फोटो क्र. ४ आणि ५ मध्ये तेल आणि कांद्याने मस्तपैकी माश्याचा आकार धारण केलाय.
21 Sep 2011 - 10:28 pm | कौशी
सानिका,
तुझा पत्ता दे लवकरच तुझ्याकडे येण्याचा विचार करते आहे.
22 Sep 2011 - 12:43 am | Mrunalini
खुपच छान. तोंपासु. :)
22 Sep 2011 - 7:11 am | आत्मशून्य
.
22 Sep 2011 - 10:04 am | पिंगू
पाककृतीत चायनीज मसाला ठासून भरला आहे आणि पाककृती आवडल्या गेले आहे...
- पिंगू
22 Sep 2011 - 10:24 am | daredevils99
ह्या पदार्थाचे नाव मराठीत कसे लिहिता येईल?
23 Sep 2011 - 1:44 pm | daredevils99
.
23 Sep 2011 - 2:40 pm | स्वानन्द
शेझवान बटाटे, शाक हक्का नुडलांबरोबर
25 Sep 2011 - 11:02 pm | माझीही शॅम्पेन
शेझवान बटाटे, शाक हक्का नुडलांबरोबर
शेझवान बटाटे आणि शाकाहारी हक्का शेवया बरोबर
सनिका पा कृ ख त र ना क !
22 Sep 2011 - 11:48 am | स्वानन्द
सह्हीच...
हक्का नुडल्स बनवताना.. सुरुवातीला ते अर्धवट शिजवतात... तेव्हा पाण्यातच तेल घालण्याची कल्पना चांगली आहे. नुडल्स पॅक वर लिहीलेले असते.. की पाणी काढून टाका आणि मग नुडल्स चिकटू नये म्हणून त्यावर दोन चमचे तेल टाका... पण ते काही सगळीक्डे पसरत नाही. त्यापेक्षा ही आयडीयाची कल्पना मस्त आहे.
22 Sep 2011 - 2:26 pm | खादाड
पा.क्रु. , मेनु , फोटो !! एक नंबर !!!! :)
22 Sep 2011 - 2:29 pm | पप्पुपेजर
बहुत बढीया
मी शेझवान सौस मध्ये तोमतो सौस पण टाकतो एक वेगळी चव येते आणि रंग पण बढीया येतो.
पाककृती खल्लासच झाली आहे.
22 Sep 2011 - 3:01 pm | इष्टुर फाकडा
नेहमीप्रमाणेच....
22 Sep 2011 - 3:07 pm | कवितानागेश
सेलरीशिवाय शेझवान सॉस????
मी ४वेळा साहित्य वाचून काढले. पण तुम्ही सेलरी विसरयात!
:(
सानिकाताई, असे करु नका हो.
- सेलरीप्रेमी माउ
22 Sep 2011 - 4:03 pm | सानिकास्वप्निल
शेझवान सॉस ची पाकृ मी संजीव कपुरच्या खाना-खजाना मध्ये पाहीली, त्यात ही सेलरी घातली नव्हती ...असो पुढ्च्या वेळेस नक्की सेलरी घालून बनवेन...मला ही आवडेल :)
धन्यु :)
22 Sep 2011 - 6:01 pm | चिंतामणी
नेहमी प्रमाणेच झकास....
(या फटुतसुद्धा चमच्यांचा वापर टाळण्यात आला आहे याची नोंद घेण्यात आली आहे.);) ;-) :wink:
22 Sep 2011 - 7:18 pm | वेताळ
एकदम मस्त पाकृ.... एकदम सुटसुटीत सादरीकरणामुळे आमच्या सारख्या अडाण्या स्वंयपाक्याला देखिल प्रयत्न करुन हे करायला जमायला हरकत नाही.
23 Sep 2011 - 1:35 pm | दिपक
23 Sep 2011 - 1:57 pm | योगप्रभू
फोटो आणि रेसिपी यांचे प्रेझेंटेशन जबरदस्त आहे.
क्या बात है!
23 Sep 2011 - 1:58 pm | ऋषिकेश
वा!!!
मस्तच! चायनीज इतक्या कमी पदार्थात करता येत असेल असे वाटले नव्हते.. आता घरी करून बघतो
25 Sep 2011 - 9:32 am | निवेदिता-ताई
खुपच सॉलीड..
25 Sep 2011 - 10:46 am | नितिन थत्ते
हा धागा आणि फोटो टाकल्याबद्दल.
!@#$%^&* !@#$%^&* !@#$%^&* !@#$%^&* !@#$%^&* !@#$%^&* !@#$%^&* !@#$%^&* !@#$%^&* !@#$%^&* !@#$%^&* !@#$%^&* !@#$%^&* !@#$%^&* !@#$%^&*
25 Sep 2011 - 7:35 pm | गणपा
चायनीज मध्ये बटाटा हा नवाच प्रकार पहातोय. शाकाहारी लोकांसाठी चांगला पर्याय आहे.
फोटु पाहुन एकदा चाखावस वाटतय. :)
25 Sep 2011 - 10:03 pm | प्रभाकर पेठकर
मला वाटतं चायनिझात बटाट्यांऐवजी 'टोफू' (सोया कर्ड) वापरतात. पण छोटे (दम आलू वाले) बटाटे सुद्धा चालायला काय हरकत आहे?
लाल मिरच्या म्हणजे 'काश्मीरी'च हव्यात. ५-६ मिरच्यात काय होतय? चांगल्या १५ तरी असाव्यात. शेझवान सॉस झणझणीत असावा. नाहीतर तर तो मंचुरियन सॉस होईल. (लाल रंगाचा).
तेल भरपूर असतं. व्हिनेगर पाहिजेच. शिवाय चायनिझ 'रेड चिली सॉस' अगदी आवश्यक आहे.
चायनिझ पाककृतींमध्ये काळी मिरी पावडर वापरत नाहीत सफेद मिरी पावडर वापरतात.
शेझवान पाककृतीत तिरफळेही (शेझवान पेपर) वापरतात.
शेझवान सॉस मधे सेलरी वापरतात पण त्याचा वापर ऐच्छिक आहे. त्यामुळे नाही वापरली तरी चालेल.
व्हेज. स्टॉक बनविताना मात्र सेलरी वापरावीच.
25 Sep 2011 - 10:08 pm | गणपा
काकांच्या या असल्याच छोट्या छोट्या पण मौलिक टिप्सचे आम्ही भारी फॅण आहोत. :)
26 Sep 2011 - 12:41 am | सानिकास्वप्निल
मी ह्या पाकृमध्ये छोटे (दम आलू वाले) बटाटेच वापरले आहेत वेगळा प्रकार म्हणून आणी तो आवडला ही :) टोफु घालून बनवेन एकदा
मी लाल मिरच्या 'काश्मीरी' न घेता बेडगी/ब्याडगी मिरच्या घेतल्या असल्याकारणामुळे ५-६ घेतल्या :)
अगदी बरोबर आहे शेझवान सॉस झणझणीतचं असावा म्हणून आपल्याला सोसवेल इतकी मिरची पेस्ट घालावी असे सांगितले आहे.
व्हिनेगर ही घालू शकता असे ही सांगितले आहे.(मला आणी नवर्याला व्हिनेगरचा वापर आवडत नाही म्हणून नाही केला, तसे तर अजिनोमोटो ही घालतात पण ह्र्दयासाठी ते चांगले नाही म्हणून वापर टाळते)
घरात काळीमिरीपूड सहज उपल्बध असते म्ह्णून घातली गेली आहे, तसे संजीव कपूरच्या पाक्रुत ही काळीमिरीपूडचं होती :)
शेझवान पेपर म्ह्णजे शेझवान लाल सुक्या मिरच्या वापरुन हा सॉस बनवतात पण त्या इथे सहज उपल्बध नाहीत.
व्हेज स्टॉक बनवताना कुठल्याही भाज्या घालू शकता , सेलरी ही... पण ती नसेल तरी चालू शकते, किंवा स्टॉक क्युब्स ही वापरू शकता.
26 Sep 2011 - 1:13 am | प्रभाकर पेठकर
शेझवान पेपर म्ह्णजे शेझवान लाल सुक्या मिरच्या
शेझवान पेपर म्हणजे शेझवान लाल सुक्या मिरच्या नाहीत तर आपल्या महाराष्ट्रात/कोकणात मिळणारी तिरफळं असतात.
श्री. संजीव कपूर ह्यांच्या बद्दल नितांत आदर आहे. पण हल्ली खूप वेळा त्यांची माहिती चुकीची असल्याचे लक्षात आले आहे. उदा. ह्या शेझवान पेपर बाबतीतच त्यांनी विधान केले होते की हे भारतात मिळत नाहीत (त्यांनी म्हणे चायना मधून खास आणले होते.) पण तिरफळं कोकणांत प्रत्येक दुकानात/घरात मिळतात. मुंबई-पुण्यातही खूप ठिकाणी मिळतात. असो.
26 Sep 2011 - 1:16 am | प्रियाली
+१. एवढेच नाही तर ऑथेंटीक असे नाव घेऊन ते कै च्या कै पाककृती दाखवतात असा अनुभवही आहे.
असो. सानिकातैंच्या रेशिपीज आणि फोटू सुरेखच असतात. याही आहेतच पण चायनीज डिशमध्ये बटाटा मला फारसा रुचत नाही.
26 Sep 2011 - 2:44 am | प्रभाकर पेठकर
शेझवान पेपर अर्थात आपली तिरफळं
डाव्या बाजूच्या चित्रातील तिरफळाचे कवच वापरतात उजव्या बाजूच्या बिया फेकून द्यायच्या.
ही तिरफळं माशांच्या आमटीत तसेच कोकणी शाकाहारी पदार्थातही वापरतात.
26 Sep 2011 - 4:01 am | सानिकास्वप्निल
शेझवान पेपर म्ह्णजेच तिरफळं हे काही माहीत नव्हते माहीती दिल्याबद्दल धन्यवाद :)
तिरफळं मालवणी लोकं जास्त वापरतात माशांचे कालवण बनवताना...मी ही वापरते :)
26 Sep 2011 - 4:25 am | सानिकास्वप्निल
तुम्ही सांगीतल्या प्रमाणे तिरफळाला शेझवान पेपरकॉर्न म्हण्तात आणी ह्या लाल सुक्या मिरच्या आहेत त्यांना शेझवान चिलीज असे :)
हा फोटो अतंरजालावरुन घेतला आहे तुम्ही इथे
http://friedtigerfrozendragon.wordpress.com/2010/05/13/la-zi-ji-sichuan-...
बघु शकता ह्या पाकृत त्याचा वापर केला गेला आहे :)
26 Sep 2011 - 7:24 am | सूड
28 Sep 2011 - 9:52 am | ऋषिकेश
अगदी मोजके साहित्य वापरून चायनीज करता येते हे बघुन खूष होऊन विकांताला घरी (घाबरत म्हणून दोघांपुरताच)प्रयोग केला.. एकदम 'हिट' झाला. खरंतर प्रयोग करताना घरात न्युडल्स नसल्याने (नसायचेच ;) ) लांब भाताचा उपयोग केला गेला. तरी चव उत्तम होती.
फक्त भात करताना सोया सॉस घातल्यानंटर भाताला काळपट रंग आला.. तुमच्या छायाचित्रासारखा लालसर/तपकिरी नाहि.. काय कारण असावं?
29 Sep 2011 - 12:01 pm | सानिकास्वप्निल
सोया सॉस घातल्यावर साधारण काळ्सर रंग येतो, तुम्ही कदाचित डार्क सोया सॉस घातला असावा किंवा थोडा जास्त घातला असावा...असो त्याने चवीत फारसा फरक पडणार नाही :)
धन्यवाद प्रतिसादाबद्दल :)
3 Nov 2011 - 3:58 pm | भलती भोळे
चू चू चिंग फु = लय भारी हो ! :D
28 Nov 2012 - 3:12 pm | हसरी
पाककृती आता दिसत नाही. काही ठराविक प्रतिक्रिया वाचता येत आहेत.
12 Dec 2012 - 4:26 pm | हसरी
साधारण २० माणसांसाठी हा पदार्थ करायचा आहे. आणि फक्त बटाटे वापरण्याऐवजी बेबी कॉर्न, पनीर, बटाटे, सिमला मिर्ची, गाजरं अश्या मिक्स व्हेजीज् वापरायच्या आहेत. बेबी कॉर्न, बटाटे, पनीर तळून घेतली आणि कांदे, सि. मिरची, गाजरं परतवून घेवून त्याची ग्रेव्ही केली तर चालेल ना? आयत्यावेळी आधी तळून ठेवलेले पदार्थ ग्रेव्हीत मिसळून वाढायचा विचार आहे. चालेल का? तळलेले पदार्थ कुरकुरीत राहतील का?