मिपा च्या सर्व सभासदाना:
मित्रहो, आपणा प्रमाणेच मी सुधा एक अभियन्ता आहे पण मला आपल्या field ला निगडीत असलेल्या magazine मधे काम करायचे आहे(उदा. chip or diGIT)...आपल्या पैकी कुणाजवळ या बद्दल माहिती असेल तर प्लिज मला कळवाल का??
chip वा digit मध्ये काम करायचे आहे म्हणजे आपण ईलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहात किंवा जाहिरातदार आहात.!!असो.
Linux For You हे मासिक ऐकले असेल. त्यात लेख लिहिणारे सहसा त्या क्षेत्रात ५ ते १० वर्षे काम केलेले असतात.
तंत्रज्ञानाशी निगडीत असलेल्या मराठी संस्थळावर लिहीण्याची इच्छा आहे का? कारण असे ज्ञान मराठीत सध्या फार कमी प्रमाणात उपलब्ध आहे. ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काही प्रयत्न सुरु असतात.
विनामोबदला अशा संस्थळावर लिहीण्याची तयारी असल्यास, तसेच तेवढा वेळ असल्यास व्यनीतून संपर्क करा.
प्रतिक्रिया
19 Sep 2011 - 9:34 pm | शाहिर
अरे स्वताच मॅगझिन काढा..ऑन लाइन काढा ..कशाला कुणाच्या हात खालि काम करयचे
19 Sep 2011 - 9:53 pm | चिरोटा
chip वा digit मध्ये काम करायचे आहे म्हणजे आपण ईलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहात किंवा जाहिरातदार आहात.!!असो.
Linux For You हे मासिक ऐकले असेल. त्यात लेख लिहिणारे सहसा त्या क्षेत्रात ५ ते १० वर्षे काम केलेले असतात.
19 Sep 2011 - 9:59 pm | शिल्पा ब
मी अभियन्ता नाही.
20 Sep 2011 - 10:52 am | गवि
मी पण अभियंता नाही..
मिसळपाववर काहीजण अभियंते नाहीत असे माझ्या आणि शिल्पाताईंच्या विधानांना एकत्र करुन म्हणता येईल.
19 Sep 2011 - 10:29 pm | प्रचेतस
निगडीत कुठलं मॅगेझिन प्रकाशित होत असेल असे वाटत नाही. हां पुण्यातून मात्र नक्कीच काही प्रकाशित होतात. तिथे एकदा चौकशी करून बघा. ;)
19 Sep 2011 - 11:39 pm | शाहिर
तुम्हाला माहिती असलेली बरी ...
19 Sep 2011 - 11:04 pm | यकु
कुठ्ल्याही नियतकालीक / वृत्तपत्रावर ते कुठून प्रकाशित होते त्याचा इत्थंभूत पत्ता लिहीलेला असतो.
तो तपसा.
तिथे तुम्हाला नक्कीच संपर्काचे नंबर्स मिळतील.
20 Sep 2011 - 6:14 am | ५० फक्त
@ वल्ली, मेलो मेलो, पण शुटिंगची व्यवस्था नसल्याने पुन्हा परत येउन हा प्रतिसाद टाकतो आहे.
20 Sep 2011 - 12:20 pm | परिकथेतील राजकुमार