संडे स्पेशल (दाल फ्राय, जिरा राईस)

स्वाती राजेश's picture
स्वाती राजेश in पाककृती
29 May 2008 - 8:23 pm

दाल फ्रायः
साहित्यः
पाव कप मुग डाळ
पाऊण कप पाणी
१ चिमूट हळद
वरील एकत्र करून मऊ शिजवून घोटणे.

३ टे.स्पून तेल
१ च.जिरे
२-३ सुक्या मिरच्या
१/२ च.आलं पेस्ट
१ च.लसूण पेस्ट
१/४ कप बारीक चिरलेला कांदा
१/४ कप बारीक चिरलेला टोमॅटो
१/२ टे.स्पून कसुरीमेथी
१ चिमूट हळद
२ टे.स्पून कोथिंबीर
१/८ च.अनारदाणा मसाला(पावडर)
१ च.बटर
मीठ

१.३ टे.स्पून तेलावर, जिरे परतणे. त्यात सुक्या मिरच्या,आलंपेस्ट्,लसूणपेस्ट, कांदा घालून परतणे.नंतर टोमॅटो घालून चांगले परतणे.कसूरी मेथी व हळद घालून वरील घोटलेली डाळ घालणे व पाणी घालणे.कोथिंबीर, अनारदाणा मसाला, बटर व चवीनुसार मीठ घालून उकळणे.

२.कढईत ३ परत ३ टे.स्पून तेल, पाव च.जिरे,१ सुकी मिरची,१/२ च.मिरची बी परतणे.
दालफ्रायवर कसुरीमेथी,१ चिमूट तिखट घालणे व वरील फोडणी घालणे.गरम जिरा राईस बरोबर सर्व्ह करणे.

टीपः कृती १ नंतर व फोडणी द्यायच्या अगोदर स्मोक देतात....(कोळसा तापवून) पण ते काही दर वेळी शक्य होत नाही. पण त्यामुळे त्याची चव खमंग लागते.

जिरा राईसः
साहित्यः
१ वाटी दिल्ली राईस
७ वाट्या पाणी
१ टे.स्पून तेल
मीठ
फोडणी साठी: दिड टे.स्पून तेल, २ च.जिरे, २ हिरव्या मिरच्या, १/२ च. लसूण पेस्ट(ऐच्छीक), १/४च.अजिनोमोटो

जाड बुडाच्या पातेल्यात ७ वाटी पाणी, १/२ टे.स्पून तेल घालून उकळी आल्यावर १ वाटी तांदुळ घालणे, गॅस मोठा ठेवणे. झाकाण न ठेवता उकळणे. शिजल्यावर चाळणीत घालून नळाखाली धरून गार करणे. २ तास निथळणे.
२ तासाने वरील फोडणी करून त्यात भात परतणे. कोथिंबीर घालणे व सर्व्ह करणे.

प्रतिक्रिया

वरदा's picture

29 May 2008 - 8:37 pm | वरदा

मी सरळ शिजलेला भात करुन फोडणीवर परतायचे जिर्‍याच्या...झाला जिरा राईस्..आता हे करुन पाहीन्..झाकण ठेवत नाही म्हणून इतकं जास्त पाणी लागतं का?
मुगाच्या डाळीऐवजी तूर डाळ वापरुन सेम क्रुती केली तर चालेल का?

स्वाती राजेश's picture

29 May 2008 - 9:48 pm | स्वाती राजेश

तूरडाळ वापरली तर चवीत थोडा फरक पडतोच...

भात शिजवल्यावर फोडणीच्या अगोदर भाताला १ च.तेल व मीठ लावून मग फोडणी द्यावी...

झाकण ठेवत नाही म्हणून इतकं जास्त पाणी लागतं का?
हो, आणि भात फडफडीत व्हायला पाहिजे, शीत अन शीत वेगळे व्हायला हवे...

वरदा's picture

29 May 2008 - 10:13 pm | वरदा

मग भात करताना मीठ घालायचं ना कि सगळं नंतरच लावायचं?
पुर्ण शिजवलेला भात चाळणीत काढून २ तास निथळायचा ना? म्हणजे पेज काढून टाकायची ना?

तूरडाळ वापरली तर चवीत थोडा फरक पडतोच...
मग तो फरक चांगला की वाईट? आपण रेस्टॉरंट मधे खातो ती तूरडाळ असते ना?

वैतागू नको गं माझ्या प्रश्नांना.....

स्वाती राजेश's picture

30 May 2008 - 12:10 am | स्वाती राजेश

मग भात करताना मीठ घालायचं ना कि सगळं नंतरच लावायचं?
हो, नंतरच लावायचं.
पुर्ण शिजवलेला भात चाळणीत काढून २ तास निथळायचा ना? म्हणजे पेज काढून टाकायची ना?
हो....
मग तो फरक चांगला की वाईट?
ही ज्याची त्याची आवड, पण मी नेहमी मूग डाळच वापरते....
पण दाल तडका करायचा असेल तर मसुरडाळ वापरते, पण त्यात कधी कधी पालक टाकते मग होते पालक-दालतडका.

वरदा's picture

30 May 2008 - 12:13 am | वरदा

धन्यु गं..आता उरलेले प्रश्न करुन पाहिल्यावर ... :D

विसोबा खेचर's picture

30 May 2008 - 11:04 am | विसोबा खेचर

वैतागू नको गं माझ्या प्रश्नांना.....

हम्म! वरदा, प्रश्न कितीही विचार पण पाकृ मात्र चवदार करून नवर्‍याला चांगलं खायला घाल म्हण्जे झालं! मला नेहमीच आमच्या जावयांची काळजी वाटते हो! :)

असो..!

स्वगत - आमची वरदा तशी स्वैपाकात जेमतेमच आहे! बिचार्‍या आमच्या जावयांना दोन टाईमच खाणं नीट मिळत असेल ना? :W

वरदा's picture

30 May 2008 - 10:41 pm | वरदा

तुम्ही या हो एकदा इथे जेवायला, मला स्वत:ची स्तुती करवत नाही सारखी सारखी ;)

चित्रा's picture

31 May 2008 - 5:59 am | चित्रा

आवडले.

यशोधरा's picture

29 May 2008 - 10:32 pm | यशोधरा

>> आपण रेस्टॉरंट मधे खातो ती तूरडाळ असते ना?

माझाही हाच प्रश्न

प्रभाकर पेठकर's picture

29 May 2008 - 10:39 pm | प्रभाकर पेठकर

आपण रेस्टॉरंट मधे खातो ती तूरडाळ असते ना?

वेगवेगळ्या उपहारगृहात वेगवेगळ्या डाळी वापरतात. मला आवडलेल्या पाककृतींमध्ये 'दाल फ्राय' साठी मसूर दाल आणि 'दाल तडका' साठी तूरडाळ वापरली आहे. मी तशाच डाळी पसंद करतो.

वरदा's picture

29 May 2008 - 10:57 pm | वरदा

मसूर दाल चा ऑप्शन पण छान आहे.....
सगळ्या डाळींचे या पद्धतीने करुन पाहाते...
ब्राऊन राईसचा भात करताना जरा आणखी जास्त पाणी घालावं लागेल बहुदा... :?

शितल's picture

30 May 2008 - 12:17 am | शितल

माझी तर ही ऑर्डर हॉटेलातील नेहमीचीच, त्यामुळे माझा ग्रुप मध्ये तर मला खुप चिडवतात.
पण मला ही डीश खुप आवडे, आणि घरी देखिल माझा आठवड्यातुन एकदा हा मेनु असतोच.
पण मी उदीड डाळ आणि तुरडाळ एकत्र करून मग डाळी तुझ्या प्रमाणे कृती करते आणि मसाला फक्त एम्.टी.आर्.चा असतो.

मनस्वी's picture

30 May 2008 - 10:45 am | मनस्वी

स्वातीताई.. जिरा राईस अन् दाल तडका मस्तच!

मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

विसोबा खेचर's picture

30 May 2008 - 11:05 am | विसोबा खेचर

स्वातीताई,

गं बाई मिपाच्या अन्नपूर्णे, तुझा दालफ्राय आणि जिराराईस नेहमीप्रमाणेच झकास! तेवढं फोटू मात्र पाठवायचा बघा हो. आम्हाला तुमच्या पाकृंचे फोटू पाहण्याचीही खूप तमन्ना आहे! :)

तात्या.

पद्मश्री चित्रे's picture

30 May 2008 - 2:10 pm | पद्मश्री चित्रे

मी जिर्‍याची फोडणी करुन त्यात, तांदूळ परतते अनि मग शिजवते.. होतो चांगला, पण एकदम फडफडित व मोकळा नाही होत..
भात वेगळा शिजवल्याने तसा होत असेल का? करुन पहिले पाहिजे..एखाद्या "शाकाहारी रविवारी".... :D

चित्रा's picture

31 May 2008 - 6:06 am | चित्रा

माझी आवडती पाकॄ.
फक्त माझी पद्धत जरा सोपी आहे! म्हणजे कमीत कमी कष्टांची. मी दाल - फ्राय तुरीची डाळ, जिर्‍याची फोडणी, आल्याचे तुकडे, मिरच्या आणि कोथिंबीर घालून करते. डाळ जरा दाटसर ठेवते. पण कांदा, अनारदाणे, कसूरी मेथी घालून छानच होत असेल डाळ.

वरदा's picture

31 May 2008 - 7:30 am | वरदा

मीही हेच करते...वरुन थोडं बटर आणि कोथंबिर घालून सजवतेही वाढण्यापुर्वी.....आणि भातही शिजवून मोकळा करुन घेते आणि तुप, जिरं, मिरचीची फोडणी करुन त्यात परतते...झालं दाल फ्राय आणि जीरा राईस्......

आवडाबाई's picture

1 Jun 2008 - 10:06 am | आवडाबाई

माझ्या आवडीचा पदार्थ !!

माझेही काही प्रश्न -
२-३ डाळींचे मिश्रण करतात ते फक्त दाल तडका मध्ये का? आणि दाल तडका मध्ये डाळ घोटून घ्यायची आणि वरून तडका मारायचा फक्त, बरोबर?

प्रभाकर पेठकर's picture

1 Jun 2008 - 10:25 am | प्रभाकर पेठकर

-३ डाळींचे मिश्रण करतात ते फक्त दाल तडका मध्ये का?

२-३ डाळींचे मिश्रण सुद्धा चांगले लागते आणि नुसती तुरडाळ वापरली तरी छान लागते.

स्वाती राजेश's picture

2 Jun 2008 - 6:05 pm | स्वाती राजेश

३ डाळींचे मिश्रण असते...त्यात हरभरा डाळ सुद्धा असते त्याला ढाबा डाल म्हणतात...

स्वाती दिनेश's picture

2 Jun 2008 - 1:31 pm | स्वाती दिनेश

स्वाती पाकृ मस्तच आहे.
मी मसूरीची डाळ प्रेफर करते दालफ्रायला.कसूरी मेथी नाही घातली कधी आणि आमचूर घालते.आता अनारदाना घालून पाहिन.आल्याचे आणि मिरचीचे बारीक तुकडे मात्र घालते हं भरपूर.
आणि एक शंका- भात मोकळा हवा तर ७ वाट्या पाणी जास्त नाही होत?
माझा शॉर्टकट-
१ वाटी भाताला पावणे दोन वाट्या पाणी घेते. त्यात चमचाभर मीठ आणि चमचाभर साजूक तूप घालते आणि मायक्रोवेव ला हाय पॉवरवर झाकण न ठेवता आधी ८ मि. ठेवते,मग उघडते, थोडी वाफ जाऊ देते आणि परत ७ मि. ठेवते.भात झाला की ताटात काढून पसरते म्हणजे वाफ जाते आणि अगदी मोकळा भात होतो.शीत न शीत वेगळे होते. पुलाव,फ्राइड राईस इ.साठीही मी असाच करते भात.
स्वाती

वरदा's picture

2 Jun 2008 - 5:29 pm | वरदा

शॉर्टकट मला सॉलीड आवडतात...धन्यु गं!

प्रभाकर पेठकर's picture

2 Jun 2008 - 4:27 pm | प्रभाकर पेठकर

आमचूर घालते.आता अनारदाना घालून पाहिन

दोन्ही घालू नये. दोन्ही आंबट आहे.

स्वाती दिनेश's picture

2 Jun 2008 - 4:36 pm | स्वाती दिनेश

दोन्ही एकदम नाही हो, मी चिमूटभर आमचूर घालते.त्याऐवजी अनारदाना घालून पाहिन असे म्हणायचे होते मला.
पण आमचूर आणि अनारदाना दोन्हीपैकी काहीच न घालता करावे असे म्हणायचे आहे का?
(गोंधळलेली)स्वाती

प्रभाकर पेठकर's picture

2 Jun 2008 - 4:38 pm | प्रभाकर पेठकर

पण आमचूर आणि अनारदाना दोन्हीपैकी काहीच न घालता करावे असे म्हणायचे आहे का?

छे: छे: असे नाही. दोन्ही एकावेळी वापरू नका एवढेच.

स्वाती दिनेश's picture

2 Jun 2008 - 4:41 pm | स्वाती दिनेश

ओक्के,समजले. मलाही तसेच म्हणायचे होते.:)
स्वाती