गुजरात राज्याची प्रगती कितपत खरी आणि कितपत प्रचारकी?? (जिलब्या टाकतोय असे समजा हवे तर)
सर्वोच्च न्यायालयाचा तथाकथीत दिलासा मिळाला आणि आमेरीकेच्या लोकसभेच्या (कॉंग्रेस)अभ्यासगटाची प्रंशसा प्राप्त झाल्यामुळे सध्या नरेन्दर मोदिना अस्मान ठेंगणे झाले आहे.
पण ही पहा या महाभागाने केलेल्या पकरणांची यादी.
1. नॅनो प्लॅंट ची जमीन
2. अदानी ग्रुप
3. के रहेजा बिल्डर्स एयर्पोर्ट डावलून
4. नवसारी शेतकी महाविद्यालयाची जमीन हॉटेलला
5. पाकीस्तान सीमेशेजारील सरकारची जागा व्यंकय्या नायडूच्या रासायनीक कारखान्यासाठी
6. ऎस्सार स्टील प्लॅंट ने केलेल्या सरकारी जमीन अतिक्रमणाकडे दुर्लक्ष
7. विना टेंडर ने भारत हॉटेलला जागा दिलेली
8. एल अॅटण्ड टी ची जागा
9. एल अँड टी ची जागा
10. अंगण वाडी घोटाळा
अमेरीकेला मोदींचा एवढा पुळका का? कारण अमेरीकेन कंपन्या नी तिथे एन्व्हेस्टमेन्टस केल्याले आहेत. बरेच गुजराथी अमेरीकेत आहेत हे आणखी एक कारण असावे.
खलील लिन्का पहा
http://www.dnaindia.com/india/report_17-scams-that-narendra-modi-doesnt-...
घरोघरी मातीच्याच चुली
गाभा:
प्रतिक्रिया
14 Sep 2011 - 10:48 pm | क्लिंटन
यातील नक्की भ्रष्टाचाराची प्रकरणे किती याची कल्पना नाही.
उद्योगपती आणि सत्ताधारी (किंवा राजकीय पक्ष) यांचे साटेलोटे ही अजिबात नवीन गोष्ट नाही. गौतम अडानीला "दुसरा अंबानी" म्हणतात. १०-१२ वर्षांपूर्वी त्याचे नावही फारसे कोणाला माहित नव्हते.आज त्याच्या कंपनीचे वीजप्रकल्प काय, बंदर काय, इंडोनेशियातून कोळसा आयात करायची तयारी काय, एस.ई.झेड काय विचारू नका. तीच गोष्ट इंडियाबुल्सच्या समीर गेहलोतची.
मी एका अशा पेशामध्ये आहे ज्यातून मला यांच्या उद्योगाविषयी इतरही थोडी माहिती मिळाली आहे.यातून एकच सांगतो की या उद्योजकांचे सर्वच पक्षांशी जवळचे संबंध असतात.आणि पैसा दिसला की सगळ्या सरकारी यंत्रणा सर्वसामान्यांच्या पोटावर पाय देऊन या उद्योजकांसाठी दावणीला बांधली जाते.उदाहरणार्थ आमच्या बॅंकेने मध्यंतरी इंडियाबुल्सच्या पंजाबमधील मनसा वीज प्रकल्पाला कर्ज दिले. त्याविषयीची ही बातमी वाचा. एन्रॉनसाठी दाभोळमध्ये, टाटांसाठी सिंगूरमध्ये आणि इंडियाबुल्ससाठी मनसामध्ये झाले त्यात खूप काही फरक आहे असे वाटत नाही. त्या अर्थी घरोघरी मातीच्याच चुली आहेत असे म्हटले तर ते योग्यच आहे.
15 Sep 2011 - 12:21 am | पाषाणभेद
अहो दरवर्षीचे केंद्र-राज्यातले बजेट, त्यातील बदल हे उद्योजकांनी मान्य केल्याशिवाय तयारच होत नाही. सामान्य जनतेचा कोण विचार करतो?
15 Sep 2011 - 11:40 am | मृत्युन्जय
केले असतील घोटाळे तरी त्यामानाने विकास झालेला आहे ना? महाराष्ट्रातल्या एका बड्या धेंडाने (नाव सांगायची गरज आहे काय) महाराष्ट्रात डोंगरच्या आणि गावेच्या गावे स्वतःच्या कब्जात केली आहेत असा बोलबाला आहे. मध्यंतरी प्रयाग हॉस्पिटलच्या जागेसाठी २ राजकारण्यांमध्ये रस्सीखेच चालु होती. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र हे प्रकरण काही महाराष्ट्राला नविन नाही. अश्या परिस्थितीत मोदींनी किमान प्रगती आणि सुधारणा घडवली आहे. भ्रष्टाचाराशिवाय सरकार चालत नाही हे उघड आहे. पण पैसे खाउनही सुधारणा होत नाहीत त्याचे दु:ख असते. मोदींनी किमान सुधारणा घदवुन आणल्या. त्यामुळे चुल जरी मातीची असली तरी स्वयंपाक रुचकर होतो आहे हे काय वाईट आहे?
15 Sep 2011 - 4:14 pm | शाहिर
होउन जाउ द्या ...
15 Sep 2011 - 11:46 am | मराठी_माणूस
त्यामुळे चुल जरी मातीची असली तरी स्वयंपाक रुचकर होतो आहे हे काय वाईट आहे?
बरोबर अणि तो स्वयंपाक सगळ्यांना खायला मिळतोय हे विशेष.
तुम्ही ज्या महराष्ट्रातील नेत्याचा वर उल्लेख केला आहे तो फक्त स्वतःच्याच पोटात ढकलतोय आणि अजुनही त्याची भूक भागत नाही.
15 Sep 2011 - 4:03 pm | कापूसकोन्ड्या
अगदी बरोबर पण..नुसत रुचकर नको सर्वांना मिळायला हवा ना?
पुर्वी प्रगती /धर्म म्हणले की अति डावे आणि तथाकथीत सेक्युलर म्हणायचे भाकरी म्हहत्वाची. आता म्हणतात नुसती अर्थिक प्रगती काय काय कामाची.
हा माणूस (मोदी) फक्त विकासाबद्दल बोलतो आहे बाकी सर्व जण धर्मातच अडकले आहेत.
15 Sep 2011 - 12:22 pm | चिरोटा
मला तरी तसे वाटत नाही. काही वर्षापूर्वी मोदींना अमेरिकेने व्हिसा नाकारला होता. डाव्या/पांढर्या मंडळींचा आनंद त्यावेळी गगनात मावेनासा झाला होता. गुजरात सरकारने अमेरिकेला भाव न देता कॅनडा,आफ्रिका आणि ईतर राष्ट्रांतून गुंतवणूक आणायला चालू केली.'स्वर्णिम गुजरात' च्या जाहिरातीतही अमेरिका वगळून ईतर देशांची नावे असायची.
आपले मराठी नेते नुसता ईतिहास उगाळून स्वतःच्या तुंबड्या भरतात. मोदी आणी गुजराती नेते तसे नाहीत.
15 Sep 2011 - 3:53 pm | कापूसकोन्ड्या
खरे आहे. पण त्याना पण खूप (इतर) गोष्टी कराव्या लागल्या.
त्यामुळे घरोघरी मातीच्याच चुली हे खरेच.
15 Sep 2011 - 12:37 pm | परिकथेतील राजकुमार
15 Sep 2011 - 3:49 pm | कापूसकोन्ड्या
काय हे?
उत्तम प्रतिसाद! म्हणतात ना एक चित्र हजारो लिखीत ओळीचा ऐवज सांगून जाते. इथे तर तीन तीन चित्रे..
Only Fairytales Have Happy Endings ...ही तुमची सिग्नेचर पण तेच सांगते कमी शब्दात.
15 Sep 2011 - 4:02 pm | अविनाशकुलकर्णी
आपणास मोदी द्वेशाने पछाडले आहे का....असे करुन
राहुल कधिच पंत प्रधान होणार नाहि...
पराने बाटल्यांची चित्रे टाकुन धमाल केली...
15 Sep 2011 - 4:12 pm | कापूसकोन्ड्या
हो हो
मोदी द्वेषाने पछाडले हो हो पछाडले आहे.
अण्णा सांगतातच की जैसा चश्मा रहेगा वही कलर दिखेगा.
15 Sep 2011 - 4:20 pm | नितिन थत्ते
ओ, मोदींना काय बोलायचं काम नाय सांगून ठेवतो आम्ही !!!!!
वरच्या काही प्रतिसादांसारखी वाक्यं लिहून पाहिली.....
-खाल्ले असतील हर्षद मेहता कडून पैसे पण देशाला प्रगतीपथावर नेणारी आर्थिक धोरणे तर आणली...
-खाल्ले असतील बोफोर्सकडून पैसे पण संगणक आणि दूरसंचार क्रांतीचा पाया तर घातला...
-खाल्ले असतील एन्रॉनकडून पैसे पण दूरदृष्टी दाखवून वीज निर्मिती प्रकल्प तर आणला (दुर्दैवाने मोदींच्या पक्षाचा दृष्टीकोण त्यावेळी असा उदार नव्हता. त्याचे फळ महाराष्ट्र आजतागायत भोगत आहे असे कदाचित म्हणता येईल).
17 Sep 2011 - 3:45 am | अर्धवटराव
आणखी एक मुद्दा
-- दिली परवानगी अयोध्ध्येतील श्रीराममंदीरात पुजा-अर्चा करायला ( पण म्हणुन काय दंगली करायच्या??)
(मातीचा) अर्धवटराव
15 Sep 2011 - 7:25 pm | आदिजोशी
पण ही पहा या महाभागाने केलेल्या पकरणांची यादी.
1. नॅनो प्लॅंट ची जमीन - ह्यात काय घोटाळा झाला?
2. अदानी ग्रुप - ह्यात काय घोटाळा झाला?
3. के रहेजा बिल्डर्स एयर्पोर्ट डावलून - डावलून काय?
4. नवसारी शेतकी महाविद्यालयाची जमीन हॉटेलला - हे कळलं
5. पाकीस्तान सीमेशेजारील सरकारची जागा व्यंकय्या नायडूच्या रासायनीक कारखान्यासाठी - हे कळलं
6. ऎस्सार स्टील प्लॅंट ने केलेल्या सरकारी जमीन अतिक्रमणाकडे दुर्लक्ष - दुर्लक्ष केल्याचे पुरावे?
7. विना टेंडर ने भारत हॉटेलला जागा दिलेली - ह्यात भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे?
8. एल अॅटण्ड टी ची जागा - ह्यात काय घोटाळा झाला?
9. एल अँड टी ची जागा - ह्यात काय घोटाळा झाला?
10. अंगण वाडी घोटाळा - हे बर्यापैकी कळलं
आता चांगल्या कामांची यादी देत बसत नाही. गुगल करा. ह्याच्या कैकपट लांब यादी सापडेल.
16 Sep 2011 - 1:06 pm | कापूसकोन्ड्या
मान्य!
अगदी बरोबर दिलेली प्रकरणे कशी आहेत आणि त्यात कितपत तथ्य आहे हा उद्देशच या ध्याग्याचा नव्हता.
कितीही चांगले काम केले तरी अशा टिकांना तोंड द्यावे लागते आणि चांगले काम करण्यासाठी याची तयारी ठेवावी लागते असे सांगण्याचा उद्देश होता, म्हणून घरोघरी मातीच्याच चुली असे सांगण्याचा उद्देश होय. विचार प्रगट करण्याची हातोटी नसल्यामुळे कदाचीत मला व्यवस्थीत मांडते आले नसेल. हळुहळु संवय होइल.
16 Sep 2011 - 4:39 pm | बिपिन कार्यकर्ते
या मोदींनी असे काय केले आहे (जातिय दंगलीसकट) की जे भारतातल्या इतर अनेक राजकारण्यांनी केले नाहीये ते मला आजतागायत कळले नाहीये! अर्थात, कोणा एकाची बाजू घ्यायची आहे असे नाही. पण खरंच हा प्रश्न पडला आहे.