मासे ३३) कलेटं

जागु's picture
जागु in पाककृती
13 Sep 2011 - 8:04 pm

कालेटं ही ओळखायला अगदीच सोप्पी. त्यांचा लाल्-गुलबट रंग असतो. दिसायला ही जरी कशीचतरी दिसली तरी ह्ही खाल्याने रक्त वाढते असे म्हणतात. कालेट स्वस्त व चवदार असतात. शक्यतो हे तळूनच चांगले लागतात.

मसाला लावताना थोडा लिंबाचा रस लावला तरी वेगळी टेस्ट येते.
साहित्य :

कालेटं
मसाला
हळद
मिठ
तळण्यासाठी तेल
४-५ लसुण पाकळ्या ठेचुन (ऑप्शनल)

पाककृती:
कालेटं ही तळुनच जास्त चांगली लागतात म्हणून तळण्याची पाककृती देत आहे.
कालेट आधी साफ करुन घ्यावीत त्यासाठी कालेटांची खवले काढावीत. खवले जास्त नसतात. डोके व शेपुट काढून पोटातील घाण काढावी. मग तिन पाण्यातुन स्वच्छ धुवुन घ्यावीत. कालेटांना मिठ, हळद, मसाला चोळून घ्यावा.

नंतर तवा चांगला गरम करुन त्यावर तेल सोडून हवी असल्यास लसुण पा़कळ्यांची फोडणी द्यावी. फोडणी नको असल्यास गरम तेलात कालेट मस्त शॅलो फ्राय करावीत.

दोन्ही बाजू जास्तीत जास्त ४-५ मिनीटे मध्यम आचेवर तळाव्यात.

ही आहेत तयार कालेटं फ्राय. खायला या.

प्रतिक्रिया

निवट्यांचे चुलत भावंड दिसतायत. :)

नक्की :)

वा... एकदम वेगळी पाकृ.. कधी बघित्ले नाही हे मासे. पण फोटो बघुन लगेच खावेसे वाटतायत. :)

जाई.'s picture

14 Sep 2011 - 12:05 am | जाई.

एकदम जबरा
तोपासु

सहज's picture

14 Sep 2011 - 7:20 am | सहज

किमान एक दोन आठवडे, कोळ्यांच्या वस्तीवर मुक्काम करायचा. हे सगळे खायला मिळेल.

जागुतै नाही तुमचे आमंत्रण आहेच पण असे खाद्यटुरीझम आहे का जवळपास तुमच्या?

विजुभाऊ's picture

14 Sep 2011 - 11:26 am | विजुभाऊ

हे पहिल्यांदाच पहातोय. असे मासे असतात हेच माहीत नव्हते.
कुठे मिळतील?

गणपा असे म्हणायला हरकत नाही.
संदिप नक्कीच.

मृणालिनी, जाई, धन्यवाद.

सहज, विजुभाऊ सध्या खुप कमी येताहेत मासे. मध्ये वादळवार्‍यामुळे बंदी केली होती. थोड्या दिवसांनी परत चालू होतील.