नमस्कार मिपाजनहो,
आमच्या माहितीप्रमाणे सामान्य माणसाला मुंबईमध्ये, त्यातल्या त्यात कमी दराने तसेच लॉटरी पद्धतीने नावे काढून राहत्या घरांची सोय करणारी संस्था म्हणजे म्हाडा.
आमच्या आठवणीप्रमाणे आणि माहितीप्रमाणे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या सुरवातीच्या कारकिर्दीत त्यांनी सोनाली कुलकर्णी (नटरंग फेम. मुक्ता किंवा दिल चाहता है फेम नव्हे,) या मराठी सिने-अभिनेत्रीला म्हाडातर्फे मुंबईत राहते घर बहाल केले आहे.
आता काही शंका व प्रश्न -
१) सोनाली कुलकर्णी या अभिनेत्रीत मुख्यमंत्र्यांनी असे नेमके काय पाहिले की त्यांनी लांबच लांब रांगा लावून म्हाडाच्या जागांकरता अर्ज करणार्या मुंबईतील सामान्य जनांना पूर्णत: डावलले?
२) सोनाली कुलकर्णीच्या नटरंग या चित्रपटातील 'अप्सरा आली' या लावणीतील कमनीय बांध्याने आणि नाभीदर्शनाने (अवांतर पाहा) मुख्यमंत्र्यांवर नक्की असा काय प्रभाव पडला की त्यांनी तिला मुंबईमध्ये म्हाडाचे घर बहाल करावे?
३) कलावंत कोट्यातून म्हाडाचे घर दिले म्हणावे तर सोनालीपेक्षा वयाने कितीतरी ज्येष्ठ-श्रेष्ठ रंगकर्मी व सिनेअभिनेते महाराष्ट्रामध्ये आहेत. उदा - अगदी कालपरवापर्यंत किशोर नांदलसकर या गुणी कलावंताकडे राहते घर नव्हते. कै सुधाकार भावे, नटवर्य प्रसाद सावकार, उषा नाडकर्णी अश्या अनेक कलावंतांची, खास करून रंगकर्मींची नावे घेता येतील.
मग 'अप्सरा आली' ह्या एकमेव लावणीमुळे असा नेमका काय प्रभाव पडला? इथे मात्र बर्याच उलटसुलट शंकांना वाव निर्माण झाला आहे!
असो. आपल्यापैकी वाचकांना या संदर्भात काही अधिक माहिती असेल तर त्यांनी या धाग्यात अवश्य भर घालावी ही नम्र विनंती.
अवांतर - आपली मायमराठी तशी रांगडीच बुवा! नाभीदर्शन असे म्हटले तर ते खूपच सौम्य वाटते. परंतु नाभी ऐवजी बेंबी हा खणखणीत मराठी शब्द वापरल्यास मिसळ जरा जास्तच तिखट होते! ;)
कॉमॅ.
प्रतिक्रिया
13 Sep 2011 - 2:09 pm | ऋषिकेश
सगळी घरे सोनालीला दिली? तसे नसावे म्हणजे सामान्यजनांनाही घरे दिलीच की! तेव्हा त्यांना डावलून सोनालीला घरे दिले असे कसे म्हणता येईल आणि सोनाली सामान्यजन का नाही?
माझ्यामते कलावंतासाठीच्या कोट्यातून हे घर दिले असावे. यामधे नाभीदर्शनाचा वाटा नसावा असे वाटते
यासाठी कलाकारांनी सरकारकडे अर्ज करावा लागतो. तरच सरकार जागा देऊ शकते.
वर उल्लेखिलेल्या कलावंतांपैकी काहिंनी अर्ज करूनही त्यांना घरे मिळाली नसतील तर त्यामागचे कारण संबंधीत व्यक्तीच नव्हे तर अगदी तुम्ही देखील माहिती अधिकाराखाली मागवू शकाल.
इथे धागा टाकून कोणतीही खात्रिशीर माहिती मिळेल असे वाटत नाही
13 Sep 2011 - 2:06 pm | माझीही शॅम्पेन
तुम्हाला भारीच प्रश्न पडतात बुवा ! दुसर्या धाग्यातही नुसतेच प्रश्न ? :)
13 Sep 2011 - 2:13 pm | इंटरनेटस्नेही
इनो घ्या इनो!
13 Sep 2011 - 2:17 pm | चिरोटा
ही 'नजराणे' द्यायची पद्धत पूर्वीपासून आहे.त्यात विशेष ते काय?
सत्ता आणि सौंदर्य नेहमी एकत्र असतात.
13 Sep 2011 - 2:45 pm | परिकथेतील राजकुमार
माझ्यामते एकूण पाच कलाकारांना अयोग्य पद्धतीने घरवाटप झाले. त्यात सोनाली बरोबरच रेशम टिपणीस देखील होतीच. मग एकाच नावाची चर्चा का?
बादवे सोनाली कुलकर्णीला देण्यात आलेला फ्लॅट खरेतर निळु फुले यांच्या कुटूंबाला जाहीर झाला होता मात्र त्यांनी तो नाकारुन आपल्या जागी स्मिता शेवाळेला देण्याची शिफारस केली होती असे वाटते.
जाणकार दिवे लावतीलच.
13 Sep 2011 - 4:44 pm | आदिजोशी
ह्या मॅडमला आधीसुद्धा काही वर्षापूर्वी कोट्यातून एक घर मिळाले होते. आता दुसरे मिळाल्याने त्यावर चर्चा सुरू झाली. तर ह्या मॅडम म्हणतात की तो मिळालेला फ्लॅट तिने नवर्याच्या नावावर केला. घटस्फोटा नंतर आता वेगळे राहत असल्याने मला अजून एक फ्लॅट मिळण्यात वावगे काही नाही.
पूर्वी जेव्हा कलाकारांचे उत्पन्न तुटपुंजे होते तेव्हा ह्या कलेच्या साधकांना किमान हक्काचे छप्पर मिळावे म्हणून हा कोटा सुरू झाला. आताच्या कलाकारांच्या उत्पन्नांचे आकडे बघता त्यांना ह्या अनुदानाची गरज आहे का असा प्रश्न पडतो. सद्ध्या आलेल्या मालिकेंच्या लाटेमुळे आजकाल बर्यापैकी कुवत असलेला कलाकारही आर्थिक सुस्थितीत असतो. टुकार अभिनयामुळे गरिब राहिलेल्यांची गणना होऊ नये. तसेच पात्रतेची अट काय आहे हा सुद्ध एक मोठ्ठा प्रश्नच आहे.
13 Sep 2011 - 5:01 pm | प्यारे१
>>>टुकार अभिनयामुळे गरिब राहिलेल्यांची गणना होऊ नये.
काहीअंशी असहमत. टुकार अभिनयामुळे गरीब राहणारे फारसे कुणी नसावे. अभिनय टुकार असूनही प्रचंड यशस्वी आणि त्याउलट ( vice versa) कलाकार दिसतात.
बाकी फ्लॅट आणि फ्लॅटर्ड चा काही संबंध असेल तर कुणीतरी खुलासा करावा.
13 Sep 2011 - 5:12 pm | कॉमन मॅन
हे आम्हास माहीत नव्हते.
तिचे लग्न झाले होते हेही आम्हाला माहीत नव्हते.
नवीन माहितीबद्दल धन्यवाद
कॉमॅ.
13 Sep 2011 - 7:09 pm | प्रियाली
म्हाडाच्या घरांत हे कलाकार* खरंच राहतात?
* हे म्हणजे सोनाली आणि रेशमसारखे.
13 Sep 2011 - 8:51 pm | प्रास
सोनाली कुलकर्णी (ज्यु.) बद्दल काही माहिती नाही पण रेशमबाई आपल्या सरकारने दिलेल्या गोरेगावच्या बिंबिसार नगरातल्या घरात राहतात अशी माहिती कळते.
13 Sep 2011 - 8:56 pm | मुक्तसुनीत
आमचा अंदाज : नाही तिथे असे लोक रहात नाहीत. परंतु फुकट म्हाडाची मिळालेली काही घरं विकून लोखंडवाला, जुहू इत्यादि ठिकाणी रहायच्या एखाद दोन घरांचे पैसे कमावले जातात.
14 Sep 2011 - 3:02 am | शाहिर
यालाच राजाश्रय मिळने म्ह्णतात..