मिसळपाववर प्रसिद्ध झालेल्या खालिल कविता मला मराठी सृष्टी या संस्थ्ळावर प्रकाशित झालेले आहेत. (माझी याला हरकत नाही)
पण या सर्व कविता "सर्वेश पवार" या नावाखाली प्रसिद्ध झाले आहेत. (याला मात्र माझी हरकत आहे.)
आपण कोणी 'सर्वेश पवार' यांना तशी परवानगी दिली आहे का? मी दिलेली नाही.
मग या कृत्याला चोरी म्हणु शकतो का?
या दुव्यावर सर्वेश पवार यांनी आपल्या नावाखाली प्रसिद्ध केलेले सारे लेखन आहे. कृपया आपापले लेखन तपासुन पाहावे. मला जेवढे शक्य झाले तेवढे मी पाहिले.
http://www.marathisrushti.com/serve/index.php?lang=marathi&show=0&author...सर्वेश पवार&showpage=authorpage
अशा कृत्ये रोखण्यासाठी भारतात तरी सक्षम कायदे नाहीत. :(
तरी असे प्रकार रोखण्यासाठी काय करता येईल यावर मिपाकरांनी प्रकाश टाकावा.
(एक उपाय - आपले मिसळपाव वरिल लोकप्रिय लेखाची एखादी ओळ गुगल मधे शोधुन पहावी)
===========================================
प्रशांत उदय मनोहर यांची प्रवास कविता
http://www.marathisrushti.com/articles/index.php?lang=marathi&article=11242
http://www.misalpav.com/node/10322
विदेश यांची प्रेम - चारोळ्या कविता
http://www.marathisrushti.com/articles/index.php?lang=marathi&article=11886
http://www.misalpav.com/node/18543
शैलेन्द्र यांची किनारा कविता
http://www.marathisrushti.com/articles/index.php?lang=marathi&article=11400
http://www.misalpav.com/node/15620
माझी आयुष्य्-पुष्प कविता
http://www.marathisrushti.com/articles/index.php?lang=marathi&article=11925
http://www.misalpav.com/node/18779
रंजन यांची खिडकीकडून खिडकीकडे.. कविता
http://www.misalpav.com/node/66
http://www.marathisrushti.com/articles/index.php?lang=marathi&article=11475
कविता ढापणे यालाच म्हणतात का?
गाभा:
प्रतिक्रिया
6 Sep 2011 - 6:15 pm | JAGOMOHANPYARE
कविताच कशाला त्याने तर कौलेही ढापली आहेत..
http://www.marathisrushti.com/articles/index.php?lang=marathi&article=11940
http://www.misalpav.com/node/18683
6 Sep 2011 - 6:39 pm | मृत्युन्जय
त्याचे नाव सर्वेश पवार ऐवजी ढापेश पवार असावे काय?
बाकी आमचे साहित्य कोणी ढापतच नाही राव :)
12 Sep 2011 - 7:10 pm | चिंतामणी
http://misalpav.com/node/18683
भारतात भारतीय जनता सुरक्षित नाही परंतू भारतीय नेते मात्र सुरक्षित आहेत. याची कारणे काय असावीत?
http://www.marathisrushti.com/articles/index.php?lang=marathi&article=11940
भारतीय नेते सुरक्षित आहेत, मात्र भारतात भारतीय जनता सुरक्षित नाही.
दोन्हीतील मजकुर खूपसा समान आहे.
6 Sep 2011 - 6:48 pm | वपाडाव
http://www.marathisrushti.com/articles/index.php?lang=marathi&article=11448
हा साला मानुसच ढापण्या आहे....
टार्याचा हा लेख देखील ढापलाय याने तर..... http://www.misalpav.com/node/16702
लिस्ट लै मोठी दिस्त्ये बाब्बॉ ह्याची.....
12 Sep 2011 - 6:30 pm | सविता
होय की....
हल्ली परत टारझन दिसला नाही तो? काय जालीय हत्या/आत्महत्या केली की काय?
12 Sep 2011 - 6:51 pm | वपाडाव
टारोबा फ्यान क्लबच्या सदस्या फार आतुरतेने त्यांच्या परतण्याची वाट बघताय वाट्टे....
6 Sep 2011 - 8:53 pm | विकास
जर इथले लिखाण ढापून तिकडे लिहीले असेल, तर तिथल्या व्यवस्थापनाशी संपर्क करावा. तसेच काही उत्तर मिळाले तर येथे कळवावे.
9 Sep 2011 - 10:36 pm | धन्या
मालक, या पोकळ प्रतिसादाला काही अर्थ नाही. हे असं "जर तर" चा उपदेश दुसर्यांना करण्यापेक्षा स्वत: का तसं करत नाही. आणि जर स्वतः काही कृती करायची नसेल तर मग उंटावरुन शेळ्या हाकण्याला काहीच अर्थ नाही. :)
13 Sep 2011 - 7:45 pm | विकास
माझ्या कविता चोरीला गेलेल्या नाहीत. (तशी कोणी हिंमतही करू शकणार नाही, कारण मी कविता लिहीत नाही! ;) ). ज्याच्या चोरीला गेल्यात त्याने तक्रार योग्य तेथे मांडणे बरोबर ठरेल असे म्हणायचे होते आणि अजूनही म्हणत आहे. :-)
6 Sep 2011 - 9:02 pm | गणेशा
आपले लिखान जर आपण साहित्य परिषदेतुन रजिस्टर करुन घेतले तर, नंतर अश्या लेखन चोरणार्या व्यक्तीविरुद्ध आपण लिगल अॅक्शन घेवु शकतो.
पहिल्यांदा अश्या लोकांचा खुप तिरस्कार वाटायचा, अश्यातल्याच एकाला प्रत्यक्ष भेटुन समज दिल्याचे पण आठवते..
पण आज काल याकडे मी वयक्तीक रित्या दुर्लक्ष करतो..
कारण समाजात आपली प्रतिमा निर्माण करण्यासाठी, मनातील स्वप्रतिमेला जे गहान टाकतात, त्यांची कीव वाटते मला तरी...
" लिहिण्याला प्रामाणिकतेची जोड मिळाली की फक्त लिखाण होत नाही तर तो आयुष्याचा शिलालेख बनतो" - गणेशा
6 Sep 2011 - 9:27 pm | प्रचेतस
तुमचे लिखाण ढापून दुसरीकडे प्रसिद्ध होणे ही तुमच्या लिखाणाला मिळालेली एक कॉम्प्लिमेंट समजण्यात यावी. :)
6 Sep 2011 - 9:58 pm | JAGOMOHANPYARE
मी या लेखाची लिंक मराठीसृष्टेच्या लोकाना पाठवली आहे. पण ही व्यक्ती मिपावरदेखील आहे का?
9 Sep 2011 - 10:33 pm | पिंगू
च्यायला हल्ली साहित्यचोरी जरा जास्तच बोकाळली आहे. हा एक नविन बोका दिसतोय.
- पिंगू
10 Sep 2011 - 12:00 am | सुहास झेले
ह्म्म्म्म... अश्या लोकांपुढे हात टेकले... x-(
खूप प्रयत्न केले होते मागे आम्ही कॉपीराइटसाठी, सकाळनेदेखील पुढाकार घेतला होता. कांचन कराई ह्यांनी खूप काम केलं होत त्यासाठी, पण ही साहित्य चोरी थांबणे अशक्य आहे हे ही तितकंच खरं आहे :( :(
10 Sep 2011 - 2:14 am | पाषाणभेद
सिडींच्या पायरसीसारखं होतं आहे
10 Sep 2011 - 5:59 am | निनाद
तेथील सल्लागार मंडळ पाहिलेत का?
मराठीसृष्टीचे हे सन्माननीय सल्लागार
श्री कुमार केतकर – संपादक, लोकसत्ता, मुंबई
श्री श्रीधर माडगूळकर – साहित्यिक, पुणे
श्री दा कृ सोमण – लेखक, खगोलशास्त्र अभ्यासक, ठाणे
श्री किशोर कुलकर्णी – पत्रकार,पुणे
प्रा. डॉ. संजय कंदलगावकर – शिक्षणतज्ज्ञ, प्राचार्य-चिंतामणराव महाविद्यालय, सांगली.
डॉ. बाळ फोंडके – शास्त्रज्ञ, विज्ञान कथा लेखक
या लोकांना माहिती आहे का की ते कशाचे सल्लागार आहेत ते?
यांच्या कुणीसंपर्कात असेल तर त्यांना खबर करण्यात यावी...
तसेच Langindia Infoservices Private Limited / Marathi Srushti ही एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असावी.
तसेच त्यांचा सर्व्हर अमेरिकेत आहे.
त्यामुळे ते कायद्याच्या कक्षेत आहेत. कारवाईस काहीच प्रश्न दिसत नाही.
अधिक माहिती येथे पाहा - http://www.ip-adress.com/whois/marathisrushti.com
10 Sep 2011 - 11:19 am | चिंतामणी
या धाग्यावरून मागे मुक्तपीठ या ऑर्कुट कम्युनिटीवर झालेल्या चर्चेची आठवण झाली. त्यातील काही भाग येथे ठेवतो. त्या नमून केलेल्या ब्लॉगसना जरूर भेट द्यावी.
साहित्यचोर – बोक्या सातबंडे
ब्लॉग किंवा सोशल नेटवर्कींग साईटवर केलेलं लिखाण चोरीला जाणं, दुसऱ्यानं स्वतःच्या नावानं वापरणं, ही काही नवी गोष्ट राहिलेली नाही. पण अशा एका चोराला प्रसिद्ध ब्लॉगर कांचन कराई (मोगरा फुलला) यांनी चांगलाच धोबीपछाड घातला. त्यांच्या आणि महेंद्रच्या ब्लॉगची लिंक खाली देतो आहे...
आपणही या चळवळीत सामील होऊया... या दोघांना पाठींबा देऊ या...
http://www.mogaraafulalaa.com/2010/08/content-thief-bokya-satbande.html
महेंद्रचा ब्लॉग
http://kayvatelte.com/2010/08/17/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0...
10 Sep 2011 - 6:45 pm | अभिजीत राजवाडे
कांचन आणि महेंद्र ने तर त्या बोक्याला चांगलाच इंगा दाखवला आहे कि?
हॅट्स ऑफ!!!
10 Sep 2011 - 3:43 pm | अविनाशकुलकर्णी
शेवटी चोराला पकदुन काय करणार?केस कोर्टात,,उभि रहाणार,,
कोर्टात कईक लाख केसेस पेंडींग ...............
नाद सोडा....
10 Sep 2011 - 7:01 pm | परिकथेतील राजकुमार
शक्यच नाही !
केस वैग्रे करायची गरज येतच नाही हो काका. एकदा चोर आणि त्याचा आयपी सापडला की त्याची कंपनी आणि तो दोघांना कसे मस्त रट्टे देता येतात ह्याचा अंदाज नाही तुम्हाला ;)
आमच्या एका महाभागाने अशाच आंतरजालावर त्याला शिव्या देणार्या, सतत वाकड्यात शिरुन अर्वाच्य बोलणार्या माणसाचा आयपी आणि खरे नाव शोधुन काढले. मग एका शनिवारी तो मस्त रजा काढून त्या इसमाच्या हापिसात गेला आणि त्याच्या बॉस समोर लॉग्ज फेकले आणि एका व्यक्तीच्या मदतीने मिळवलेले आयपी युसेज ;) म्हणाला हा इसम कोण आहे ते मला माहीती आहे पण मी आयपी ह्या कंपनीच्या नावावर आहे तीच्यावर केस करणार आहे ;)
मग जो काय दंगा झाला तो किस्सा लिहीन एकदा. तो मुखवटा लावुन शिव्या देणारा एक हुषार आणि त्याचा बॉस दिड हुषार =)) ४ दिवस करमणूक मात्र मस्त झाली.
10 Sep 2011 - 7:33 pm | सुहास झेले
यप्प... बोक्या सातबंडेला नोकरीवरून काढले आहे :) :)
11 Sep 2011 - 7:37 am | रेवती
तू लिहिच आता!
या लोकांविरुद्ध फारसं काही करता येत नाही असं मला वाटतय.
कधी नव्हे त्या माझ्या पाकृ आणि गणपाच्याही अश्याच चोरीला गेलेल्या आढळल्या. आम्ही निषेध नोंदवला शिवाय गंपाने त्यांच्या संपादकांना तक्रार मेलवली.
शेवटी माणसाला थोडी लाज म्हणून असावी का नाही?
आजकाल हे प्रकार करूनही मजेत राहतात मेले!
11 Sep 2011 - 9:31 am | विश्वनाथ मेहेंदळे
हा किंवा असे काही किस्से असतील तर नक्की लिहावेत.
बाकी बोक्याला शिक्षा झाली हे ऐकून बरे वाटले.
12 Sep 2011 - 1:24 pm | परिकथेतील राजकुमार
लिहायला खरेतर काहीच हरकत नाही. पण गंमत अशी आहे की ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये सर्वात महत्वाचा भाग येतो तो एखाद्याचा आयपी अॅड्रेस शोधून काढणे. तो कसा शोधायचा ते लिखाणात वगळले तर मग उर्वरीत लिखाणाला काही अर्थच उरणार नाही. आणी ते जर इथे दिले तर संस्थळाच्या कायदा कक्षेत ते बसत नसल्याचे नीलकांतची अडचण व्हायची :)
खरेतर आयपी शोधण्याच्या काही सोप्या आणि कायदेशीर युक्त्या देखील आहेत, पण मग ते माकडाच्या हाती कोलीत दिल्यासारखे व्हायची शक्यताच जास्ती आहे.
12 Sep 2011 - 1:36 pm | गणपा
+१
संपुर्ण प्रतिसादाशी सहमत.
मनीच्या बाता : या युक्त्यांसाठी पराला व्यनी करावा काय रे? अंम्म्म नको बॉ... इथे नकोच. सरळ गबोल्यावरच विचारावे.
:)
14 Sep 2011 - 12:27 am | राजेश घासकडवी
आयपी कसे शोधून काढायचे हा भाग वगळला तरी या कथेचा बाकीचा भाग खूप रंजक होईल असं वाटतं. तेव्हा लिहाच.
कोलित मागण्यासाठी काही माकडं तुमच्या मागे लागतील, पण त्यांना तोंड द्यायला तुम्ही समर्थ आहातच. :) आणि वरच्या प्रतिसादानंतर तशीही ती टळणार नाहीतच.
10 Sep 2011 - 8:33 pm | जयंत कुलकर्णी
मी व्यवस्थापनाला लिहिल्रे आहे. बघू या काही उपयोग होतो का ?
12 Sep 2011 - 3:37 pm | नितिन थत्ते
कविता ढापणे असं याला कसं म्हणता येईल? हिला म्हणता येईल कदाचित. ;)
13 Sep 2011 - 9:30 pm | क्रान्ति
प्राजुची "षंढ सारी लेकरे" ही कविता सकाळच्या "स्मार्ट सोबती" या पुरवणीत कुणा "अनिल नेने" या महाभागांनी स्वत:च्या नावावर छापून आणली होती चक्क. ई-सकाळवरचा चोरीचा दुवा, मूळ कवितेचा मिपावरचा दुवा सम्राट फडणीस यांना थोपुवर निरोपात पाठवला, थोपुवरच्या बर्याच कविताविषयक समुहांत गोंधळ घातला, तेव्हा पुढच्या "स्मार्ट सोबती" मधे "ही कविता प्राजक्ता पटवर्धन यांची आहे" असा खुलासा करण्यात आला.
13 Sep 2011 - 9:30 pm | क्रान्ति
प्राजुची "षंढ सारी लेकरे" ही कविता सकाळच्या "स्मार्ट सोबती" या पुरवणीत कुणा "अनिल नेने" या महाभागांनी स्वत:च्या नावावर छापून आणली होती चक्क. ई-सकाळवरचा चोरीचा दुवा, मूळ कवितेचा मिपावरचा दुवा सम्राट फडणीस यांना थोपुवर निरोपात पाठवला, थोपुवरच्या बर्याच कविताविषयक समुहांत गोंधळ घातला, तेव्हा पुढच्या "स्मार्ट सोबती" मधे "ही कविता प्राजक्ता पटवर्धन यांची आहे" असा खुलासा करण्यात आला.
14 Sep 2011 - 12:58 pm | परिकथेतील राजकुमार
काय सांगतेस काय ? कसे शक्य आहे ?
प्राजुतै ची कविता १६ जुलैला ऑलरेडी तिच्याच नावाने मुक्तपीठमध्ये घेतलेली आहे.
हा दूवा
बाकी मिपावर ४ तास गाजवल्यावर अदृष्य झालेले किंवा केले गेलेले 'दादा बापट' आम्हाला पुन्हा ह्या कवितेच्या निमित्ताने इ-सकाळ वरती भेटले ;)