गणपती विसर्जन आणि प्रदूषण
आज गणपती विसर्जनाला दरवर्षीप्रमाणे नदीवर गेलो तर तिथे पोलिस आणि नगरपालिकेचे कर्मचारी उभे होते. त्यानी मूर्ती विसर्जनास प्रतिबंध केला. त्याऐवजी जवळच्या एका हिरवेगार घाण पाणी असलेल्या खंदकाचा पर्याय दिला किंवा नदीजवळ एक छोटी काहिल होती त्यात गणपती सोडायला सांगितला. निर्माल्य टाकायला वेगळी ट्रॉली होती.
हरताळका विसर्जनाच्या वेळी नदीकाठी भात, निर्माल्य, फुले आणि मूर्ती यांचा राडा-चिखल झालेला होता, म्हणून असे केले असे साम्गण्यात आले.
१. घरगुती गणपती आणि निर्माल्य विसर्जनाने फार मोठे प्रदूष्ण खरेच होते का?
२. हेच शासन कारखान्यांची प्रदूषिते नदीत जाऊ नये म्हणून काय उपाय करते?
३. हे शासनाने लोकांच्या धार्मिक प्रथेवर केलेले आक्रमण नाही काय?
४. याबाबत इतर शहरे/ गावे यात आपला काय अनुभव आहे?
५. याबाबत अनिस वाल्याना मूर्ती दान करणे योग्य होईल का?
६. याबाबतचे आणखी काही विचार असल्यास इथे मांडावेत
प्रतिक्रिया
6 Sep 2011 - 5:08 pm | परिकथेतील राजकुमार
कुठल्या नदीवर गेला होतात ?
मिठी ? गंगा ? कॄष्णा ? नर्मदा ? गोदावरी ? सतलज ? ..
बाकीचे बोलू मग नंतर.
6 Sep 2011 - 5:10 pm | JAGOMOHANPYARE
आमच्या गावाजवळ कृष्णा आणि पंचगंगा संगम आहे.
6 Sep 2011 - 5:31 pm | परिकथेतील राजकुमार
मग तुम्हाला त्या पूरग्रस्त नदीजवळ जाउन दिले हेच खूप आहे :)
माझ्या माहिती प्रमाणे तरी आजकाल सर्व नगरपालीका त्यांच्या कार्यक्षेत्रातील नदीच्या काठावर तात्पुरत्या हौदांची तसेच विसर्जन कलशाची व्यवस्था करत असतात. काही ठिकाणी अनिस वैग्रे तत्सम संस्थांचे कार्यकर्ते मुर्तींचे दान देखील स्विकारतात. ह्यातले काही नको असेल तर आपल्याकडे घरातल्या टबात विसर्जन करणे व ते पाणी झाडांना वापरणे हा पर्याय आहेच.
6 Sep 2011 - 10:19 pm | अत्रुप्त आत्मा
@-ह्यातले काही नको असेल तर आपल्याकडे घरातल्या टबात विसर्जन करणे व ते पाणी झाडांना वापरणे हा पर्याय आहेच...
शंका-निवारक, इलाज-दायक ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© बाप्पा की जय हो...जय हो....जय हो....
6 Sep 2011 - 5:13 pm | स्पा
आपण फक्त धागा टाकण्यापुर्ते मिपावर उगवता,असे नम्रपणे नमूद करू इच्छितो
बाकी चालुद्या
6 Sep 2011 - 7:14 pm | कवितानागेश
मिपा HR Head स्पावड्या यांचा विजय असो.
10 Sep 2011 - 1:37 pm | विश्वनाथ मेहेंदळे
ह्या मुद्द्याचा गणपती विसर्जन आणि प्रदूषण याच्याशी काय संबंध रे बाबा ? एखाद्या सदस्याने वाचनमात्र राहू नये की काय ?
तसेही तुझ्या विधानाच्या सत्यतेबाबत शंका वाटते. त्यांची वाटचाल बघ. बाय द वे, हल्ली तुझे प्रतिसाद एकदम साचेबद्ध होत चालले आहेत.
10 Sep 2011 - 11:37 am | विसुनाना
१. घरगुती गणपती आणि निर्माल्य विसर्जनाने फार मोठे प्रदूष्ण खरेच होते का?
- निर्माल्य विसर्जनाने प्रदुषण होत नाही पण निर्माल्य प्लास्टिक पिशवीबरोबरच टाकले तर होते. (गणपती घरगुती असल्याने त्याचे प्रदुषण होते. मिरवणुकीतून आलेल्या मंडळाचा असल्यास बहुमताने होत नसावे. ;))
२. हेच शासन कारखान्यांची प्रदूषिते नदीत जाऊ नये म्हणून काय उपाय करते?
- आरटीआय, आरटीआय!!
३. हे शासनाने लोकांच्या धार्मिक प्रथेवर केलेले आक्रमण नाही काय?
- काहिलीत/कृत्रिम तलावात विसर्जन केल्यास ते धार्मिक प्रथेवर आक्रमण कसे? एकदा मूर्तीतून प्राण काढून घेतले की ती मृत्तिकाच.
४. याबाबत इतर शहरे/ गावे यात आपला काय अनुभव आहे?
- आमच्या गावात तरी असे निर्बंध घालण्याच्या केवळ बाताच होत असतात. :)
५. याबाबत अनिस वाल्याना मूर्ती दान करणे योग्य होईल का?
- आपण अंधश्रद्ध आहोत का?
६. याबाबतचे आणखी काही विचार असल्यास इथे मांडावेत
- काळाच्या गरजेप्रमाणे बदलले पाहिजे.
अवांतर- कुरुंदवाडात कधीपासून नदीप्रदुषणाची लागण झाली? आम्हाला तर फक्त शिरोळ साखर कारखान्याच्या कागद निर्मिती प्रकल्पाबद्दल माहिती होती.;)
10 Sep 2011 - 2:18 pm | चैतन्यकुलकर्णी
बहुतेक साखर कारखाने, कागद व रासायनिक कंपन्या, सजावटीसाठी वापरले जाणारे पी ओ पी, नदीत मिसळले जाणारे सांडपाणी यांच्यामुळे प्रदुषण होत नसावे. फक्त दरवर्षी गणेशोत्सवामुळेच नद्या व वातावरण एवढे प्रदुषित झाले आहे.
नाही का?
(साखर कारखाने किती चांगल्या रीतीने ईटीपी प्लँट चालवतात व कशा रीतीने प्रदुषण मंडळाकडून एन ओ सी मिळवतात ते जवळून पाहिले आहे.)