स्पर्धा परिक्षा.

कलंत्री's picture
कलंत्री in काथ्याकूट
4 Sep 2011 - 6:37 pm
गाभा: 

सध्या शिक्षणाला बहुपदर प्राप्त झाले आहेत, जसे एकिकडे सर्व मुले पास व्हावीत म्हणून सरसकट उत्तीर्ण करण्याचे शासकिय निर्देश, परिक्षाच टाळण्याचा कल त्याचबरोबर समांतर अश्या अनेक प्रवेशपरिक्षा असा घोळ चालू असतो. दुसरीकडे महाराष्ट्र शासनाचे शिक्षण मंडळ आणि त्याच्या परिक्षा आणि त्याच बरोबर केंद्रिय मंडळाच्या परिक्षा आणि त्याचा धर्तीवर अनेक स्पर्धा परिक्षा विशेषतः त्यांचा अभ्यासक्रमाच्या धर्तीवर IIT सारख्या परिक्षा.

या सर्वांचा विचार केला तर आयआयटी, चार्टेड अंकाँट्सच्या परिक्षेचा निकाल मात्र २ ते २१/२ टक्का इतकाच असतो. अनेक मान्यताप्राप्त शिकवणीवर्गाचा भरभक्कम शुल्क असुनही निकाल मात्र २ ते ३ % इतकाच असतो.

यासर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर मराठी विद्र्यार्थ्यांचे मात्र अतोनात नुकसान होत आहे. मराठी भाषक केंद्रिय अभ्यासक्रम , आयसिआयसि इत्यादींच्या मागे लागत आहे.

याबाबती काहीतरी करावे असे माझ्या मनात धाटत आहे. आजच्या घडीला सुध्दा महाराष्ट्रात ७०००० ( ७० हजार) मराठी माध्यमाच्या शाळा आहेत आणि त्या सर्व मुलांपर्यंत या सर्व स्पर्धा परिक्षांची माहिती द्यावी, त्यांची ( गुणवंत विद्यार्थी हेरुन ) तयारी करुन घ्यावी असा माझा मनोदय आहे किती अवघड आहे हे मला मात्र ठाऊक नाही.

या संदर्भात मला काही माहिती हवी आहे.

१. स्पर्धात्मक अश्या किती परिक्षा आहे? उदा आयाआयटी, सिये, एमपिसिई, युपिसिई इत्यादी.

२. अश्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी कशी व्यवस्था असायला हवी कि जेणे करुन अशी व्यवस्था तग धरुनही राहावी आणि गरिब मराठी विद्यार्थ्यांना त्यात सहभागही घेता यावा.

कृपया मार्गदर्शन करावे.

कलंत्री

प्रतिक्रिया

खेडूत's picture

4 Sep 2011 - 8:46 pm | खेडूत

| आयाआयटी, सिये, एमपिसिई, युपिसिई इत्यादी.
(आय आय टी, सी ए , एम पी एस सी , यु पी एस सी, इत्यादि.)
यापैकी सी ए हा स्पर्धा परीक्षांपेक्षा वेगळा प्रकार- व्यावसायिक अभ्यासक्रम आहे. त्या ऐवजी आय आय एम घेता येईल.
आमच्याकडे खेड्यात पोत्याने गुणवत्ता आहे, पण मार्गदर्शनाचा अभाव आणि मर्यादित महत्वाकांक्षा यामुळे मुले मागे पडतात.
भारतात असताना मी ग्रामीण मुलांसाठी (माझ्याच शाळेतल्या) थोडेसे प्रयत्न करत असतो पण नोकरी सांभाळून ते काम करताना मर्यादा येतात. मराठी शाळेत शिकल्याने नव्हे तर इंग्रजी चांगले न शिकवल्याने मुले मागे पडतात. (असे माझे वैयक्तिक मत ) स्पर्धा परीक्षेचा विचार करण्याची किमान पातळीच गाठली जात नाही. (आय टी आय, पोलीस, शिक्षक किंवा कारकून होणे इतकीच अपेक्षा मुले आणि पालकही ठेवतात.)

आपल्याला हे काम व्यावसायिक तत्वावर करायचे की समाज सेवा म्हणून? यावर ते कसे करता येईल हे ठरेल. श्री अविनाश धर्माधिकारी यांनी दोहोंचा बराच व्यावहारिक समन्वय साधला आहे असे वाटते.
स्पर्धा परीक्षा फक्त नोकरीच्या संधी देतात, व्यवसायाच्या संधींचे काय? ग्रामीण भागासाठी कुणीतरी व्यावसायिक प्रशिक्षण ( उदा. शेती मालावर प्रक्रिया करण्यासंबंधीचे किंवा इतर तांत्रिक प्रशिक्षण ) देणे आवश्यक वाटते. त्यामुळे शहरात येऊन नोकरीच्या नादात दुय्यम दर्जाचे आयुष्य जगण्याची हजारो लोकांची गरज नाहीशी व्हावी.

खेडूत

पाषाणभेद's picture

5 Sep 2011 - 12:28 am | पाषाणभेद

काय काका कुढं व्हतात इतके दिस? ऑ?

कुंदन's picture

5 Sep 2011 - 12:37 am | कुंदन

| आयाआयटी, सिये, एमपिसिई, युपिसिई इत्यादी.

या परीक्षा / अभ्यासक्रम यांची बरोबर नावे समजुन घ्या , बाकी मार्गदर्शन जाणकार लोक यथावकाश करतीलच.

आय आय टी, सी ए , एम पी एस सी , यु पी एस सी, इत्यादि.

अन्या दातार's picture

5 Sep 2011 - 12:45 am | अन्या दातार

टंकनश्रम वाचवल्याबद्दल धन्स हो कुंदनभौ!

रविंद्र प्रधान's picture

5 Sep 2011 - 11:10 am | रविंद्र प्रधान

स्पर्धा परीक्षा दोन प्रकारात मोडतात. १) एखाद्या विशिष्ट शाखेच्या प्रवेशासाठी. उदा. आय आय टी, आय आय एम इत्यादी.
२) शिष्यवृत्ती, बुद्धी चाचणी, ऑलिंपियड्स वगैरे.
पहिल्या साठी प्रत्येक शाखांसाठी जागा मर्यादीत असतात. तेवढ्या जागा भरल्या की इतर स्पर्धक बाद. जर ५ लाख विद्यार्थ्यांतून फक्त १०००० विद्यार्थी निवडले गेले तर त्यामुळे आयआयटी, चार्टेड अंकाँट्सच्या परिक्षेचा निकाल मात्र २ ते २ १/२ टक्का इतकाच असतो. यात एखाद्या वर्षी ८०% गुण मिळवर्~यास प्रवेश मिळू शकतो तर पुढच्या वर्षी ९०% गुण असणा~यांनाही प्रवेश मिळत नाही.
दुस~या प्रकारात देशीय तसेच आंतर्देशीय स्पर्धा भारतात घेतल्या जातात. या परीक्षां दुसरी तिसरी च्या विद्यार्थ्यांपासून ही असतात. यासाठी शाळेत तर शिक्षण मिळत नाहीच. पण फारसे शिकवणी वर्गही नसतात. यांत शिष्यवॄत्ती जरी मिळाली नाही तरी या परीक्षा दिल्यामुळे मुलांना शाळेचा अभ्यास सोपा वाटतो तसेच त्यांचा आत्मविश्वास वाढतो.
आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांतील बहुतेक परीक्षांसाठी गणित आवश्यक असते आणि ते ही शीघ्रगणित. यामुळे अनेक विद्यार्थी या परीक्षांना बसायला घाबरतात.
येथे हे नमूद करवेसे वाटते की जगातील १२५ हून अधीक देशांत वेदीक गणित हा इ. चौथीपासून शाळांतून आवश्यक विषय म्हणून शिकवला जातो. भारतात हा विषय शाळांत (येथील राजकारणामुळे) शिकवला जात नाही.

ग्रामीण भागात निदान प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाची तरी व्यवस्थित सोय लावली तर स्पर्धात्मक परिक्षा देण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने पुढे येतील. जोपर्यंत शिक्षण ही अत्यावश्यक गरज आहे हे ग्रामीण मनावर बिंबवले जात नाही, तोपर्यंत स्पर्धात्मक परिक्षेसाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने पुढे येणार नाहीत.

- पिंगू

ऋषिकेश's picture

6 Sep 2011 - 9:57 am | ऋषिकेश

त्या सर्व मुलांपर्यंत या सर्व स्पर्धा परिक्षांची माहिती द्यावी, त्यांची ( गुणवंत विद्यार्थी हेरुन ) तयारी करुन घ्यावी

मानस चांगला आहे मात्र विविध युनिवर्सिटीजतर्फे मोफत माहिती, मार्गदर्शन उपलब्ध आहे. तेथे विविध क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शनास असतात. १०वी-१२वी चे निकाल लागल्यावर बहुतेक युनिवर्सिटीजतर्फे असे मार्गदर्शन करायला पूर्णवेळ व्यक्तीची ./ विभागाची सोय असते. उदा. मुंबईला १०वी नंतर शास्त्रशुद्ध पद्धतीने विद्यार्थांचा आय-क्यु आणि मार्गदर्शनाचे वर्ग एल्फिस्टन कॉलेजमधे असायचे (अजूनही असावेत)

आपल्याला वैयक्तिकरित्या प्रत्येक स्पर्धा परिक्षेची माहिती नसते. शिवाय दरवरर्षी त्यात बदल होण्याची शक्यता आहेच अश्यावेळी विद्यार्थांना युनिवर्सिटीजशी थेट संपर्क साधुन माहिती घेण्यास उद्युक्त करावे असा (काहिसा अनाहुत) सल्ला

सुनील's picture

6 Sep 2011 - 11:15 am | सुनील

छान चर्चा. फक्त परिक्षा असे न लिहिता परीक्षा असे लिहिले तर डोळ्यांना खटकणार नाही!

प्रतिसाद मर्यादित असले आणि त्याचबरोबर माझ्या मनातही काही गोंधळ आहे मान्य केले तर कोठेतरी सुरवात व्हायलाच हवी याबद्दल दुमत नसावे.

१. स्पर्धा परीक्षा अथवा पुढील कारकिर्द घडवण्याच्या दृष्टीने असणारे परिसंवाद, माहितीसत्र इत्यादी पुण्यामुंबई इत्यादी ठिकाणीच असतात. माझ्या मते महाराष्ट्रातील इतर शहरातील लोकांनाही पुढे काय करायला हवे याची माहिती नसते.
२. सर्वसाधारणपणे मराठी शाळैय विद्यार्थ्यांना माहिती देता यावी इतकाच माझा उद्येश आहे.

बाकी बघु या कसे पुढे जाता येते ते.

सर्व प्रतिसाद देणार्‍यांचे आभार.

विनायक प्रभू's picture

10 Sep 2011 - 5:37 pm | विनायक प्रभू

वेलकम टू क्लब ऑफ मॅडनेस क.का.

खुसपट's picture

12 Sep 2011 - 11:11 pm | खुसपट

स्पर्धा परीक्षा नावाचे पुस्तक बाजारात मिळते , त्यात अनेक स्पर्धा परीक्षांची नावे व माहीती मिळेल.आय आय टी, आय आय एम, सरकारी मेडीकल कॉलेजांसाठी सी इ टी, आय ए एस, अशा परीक्षा उच्च बुद्धीमत्ता व अशा परीक्षांचा सराव करणार्‍या मुला-मुलींसाठीच असतात.बसणार्‍यांपैकी ८० टक्केतरी आवश्यक अशा बुद्धीमत्तेचे नसतात, विषेशतः गणिती बुद्धीमत्ता कमी असलेले असतात. ग्रामीण भागात चांगले इंग्रजी शिकवणार्‍या शिक्षकांची खरी गरज आहे, इंग्रजी माध्यमाच्या शाळांची नव्हे. पण हे अरण्यरुदन ऐकतो कोण ? आमचे शिक्षणमंत्री व शिक्षणाधिकारी शिक्षणसम्राटांच्या तालावर नाचतात. असो.

खुसपटराव ( अंगुठाछाप )

असे उदात्त कार्य हाती घेतल्याबद्दल धन्यवाद व या कार्याला शुभेच्छा. माझी मुले यातून बर्‍याच वर्षांपूर्वी पार झाल्यामुळे व परदेशी वास्तव्य असल्यामुळे या स्पर्धांबद्दल अद्ययावत् माहिती नाहीं, पण याखेरीज इतर कुठलीही मदत हवी असल्यास ती करायला मी तयार आहे.