कोकणात सध्या गणपतीची धामधूम सुरु आहे.रोज वेगवेगळा नैवेद्य.बाप्पाच्या आगमनाने घर भरलेलं आहे.
पंचखाद्य हा बाप्पाचा खास प्रसाद्.आज त्याची रेसीपी.
आमच्या घरी विराजमान झालेले गणपती बाप्पा.
साहित्यः-ज्वारीच्या लाह्या.
गूळ,
भाजलेले शेंगदाणे.
फुटाण्याची डाळ.
काजुचे तुकडे.
भाजलेली मुगाची डाळ.
सुक्या खोबर्याचे तुकडे.
तूप.
कृती :- ज्वारीच्या लाह्या.
गूळ सोडून बाकी साहित्य एकत्र करावे
कढईत एक चमचा तूप घालून त्यात गूळ घालावा व त्याचा एकतारी पाक करावा.
पाक तयार झाल्यावर त्यात एकत्र केलेले साहित्य व लाह्या घालाव्या.
पंच्खाद्य तयार.
प्रतिक्रिया
5 Sep 2011 - 4:54 pm | निवेदिता-ताई
छानच...
6 Sep 2011 - 6:12 am | शुचि
मस्त!!! टेस्टी वाटतयच.
6 Sep 2011 - 6:33 am | मदनबाण
मस्त... :)