आदरणीय सलमान जी खान यांचे wanted , दबंग, आणि रेडी हे चित्रपट माझ्यासारख्या अभागी माणसाने चित्रपटगृहात जाऊन न पहिल्याने जे पाप माझ्या डोक्यावर चढलेल होत, त्याच क्षालन करण्याची संधी परमेश्वराने मला "बॉडीगार्ड" च्या रूपाने दिली आहे, असे माझ्या हापिसातल्या मित्रांनी जेंव्हा मला समजावून सांगितले तेंव्हा मी सुद्धा भारावून जाऊन त्यांच्या बरोबर चित्रपट केंद्रात जाऊन चित्रपट बघण्यास तयार झालो,
सलमान च्या डबल अश्या आमच्या टीम मधल्या तीन काकवा, सलमान च्या अर्धे असे माझे दोन मित्र, आणि पाव असा पापी मी, संध्याकाळी ६ च्या मुहूर्तावर १२० रुपयांची दक्षिणा देऊन जेंव्हा आतमध्ये पोचलो, तेंव्हा आतमध्ये उपस्थित असलेल्या जवळपास ६०% मुली पाहून सलमान चित्रपट मुलं सुद्धा थेटरात येऊन का पाहतात याचा अंदाज आला
असो
थेटरात नशीब नेहमीच साथ सोडत. सर्व सुंदर मुली आजूबाजूला विखुरलेल्या असताना, आमच्या बाजूला २ भरभक्कम गुजराती येऊन बसले, काकवा मागे बसल्या होत्या
आणि आखिरकार ज्यासाठी १२० रुपये खर्च केले तो क्षण आला, चित्रपट सुरु झाला
एक लहान ढापण्या मुलगा त्याच्या आईची डायरी वाचताना ट्रेन मध्ये दाखवलय (कूच कूच होता हे छाप), आता थोडा अंदाज आलाच
तर चित्रपट आपल्याला भूतकाळात घेऊन जातो
सरताज नावाचं (राज बब्बर) बड प्रस्थ जयसिंगपूर मध्ये दाखवलंय , त्याची वट एवढी असते कि म्हणे त्याचा बंगला हे त्या गावासाठी स्वतंत्र न्यायालय का काय ते असत. तर एक बाई भेकत त्याकडे येते, आणि म्हणते कि तिच्या मुलीला कोणी म्हात्रे ग्यांग ने पळवून नेल आहे, परदेशात विकण्यासाठी, आणि ते जहाज आजच मुंबईहून सुटणार आहे. मग बब्र्या (राज हो) दय्लोग मारतो आप पुलिस के पास क्यू नाही गयी, मग तिची बडबड.. पुलिस मिली हुई हे वेग्रे वेग्रे.
आता गावापुरत ठीक आहे, पण याची वट मुंबईत पण चालते हे पाहून डोक बधीर व्हायला सुरुवात झाल. तिकडच्या टायगर नावाच्या सिक्युरिटी कंपनीला सरताज १० गार्डस मागवतो मुलींची सुटका करायला, मग अजून एक डायलॉग, त्याचा मालक म्हणतो.. सर इस काम के लिये तो तो सिर्फ एकही बॉडीगार्ड काफी हे. उसकी सिर्फ आंखे हि सामनेवाले कि प्यांट गिली कर देती हे
असे म्हणून तो सलमान ला फोन लावतो,
आणि
आणि
जिस बात का इंतजार था.. वो घडी आ गयी
सलमान खान एका उडत्या गाण्यावर एन्ट्री मारतो . त्याच्या त्या अचकट विचकट स्टेप्स मागे बसलेल्या काकवा आणि समस्त इतर मुली चवीने वेन्जोय करत होत्या . वर कतरिना पण थोड्यावेळासाठी थोबाड दाखवून गेलीये
, धधधडणारी लोकल आणि त्यात उभा असलेला सलमान ..... (ब्लुठूथ कानाला लावून .. हो कारण ते अख्या पिक्चर भर त्याच्या कानाला दाखवलंय ;) )
त्याच बॉस त्याला काय झालंय ते सांगतो आणि डॉक्कयार्ड ला जायला सांगतो ,
सलमान उर्फ लवली सिंग म्हणतो सर मी तो अभी उत्तर मे जा राहा हु, ये काम दक्षिण मे हे, आप किसी ओर को भेज दिजीये ना
बॉस : नही ये सरताज जी का काम हे, इस बहाणे तुम्हे उनका कर्ज चुकता करनेका मोका मिल रहा हे ( मग आपल्याला कळत कि सलमान चा बाप हा सुद्धा सरताज चा बॉडीगार्ड असतो आणि कार अपघातात तो दगावतो, आणि सलमान च पालन पोषण सरताज करतो, म्हणजे त्याचा मालिक)
हे एकदा कळल्यावर सलमान एकदम लोकल च्या बाहेर उडी मारतो, आणि चक्क ओवेऱ्हेड वायर ला पकडून गोल गिरकी खाऊन समोरून उलट्या दिशेने येणाऱ्या एक्स्प्रेस वर चढतो.. बाब्बो ..
परवाच एक फेसबुक वर असा स्टंट बघितला होता लोकल चे किडे, हा तर त्यांचा बाप निघाला, अभिमानाने डोळ्यात दाटलेलं पाणी फुसून मी पुढे काय होत बघायला सरसावलो , इकडे पब्लिक ने ठेतर शिट्या मारून डोक्यावर घेतलेलं होत :D
पुढे तर तो त्या गाडीवरूनही उलटी उडी मारून फ्लाय ओवर वर चढतो. हे कस काय झाल याच कोड न सुटल्याने मेंदू ह्यांग होऊन रीस्टार्ट होत असतानाच , तो फ्लाय ओवर वरून परत एक उडी मारतो, आणि थेट जहाज्याचा बेसमेंट मधेच येतो. असा मुंबईत जहाजाला कनेक्ट होणारा फ्लाय ओवर कुठे आहे याचा शोध सध्या घेतोय ;)
मग खाली आल्यावर गुंडांची जी धुलाई होते, ते केवळ बघण्यासारखी, अचाट मारामारी करून तो त्या मुलीना सोडवतो .
इकडे सरताज खुश होऊन त्याला त्याच्या मुलीचा दिव्याचा (करीना कपूर ) "बॉडीगार्ड" म्हणून नेमतो, कारण त्याने आता म्हात्रे ग्यांग शी दुष्मनी घेतलेली असते .
इकडे ती दिव्या लंडन हून MBA करायला इकडे आलेली असते. (खी: खी:)
ब्वार्र ती काय करते आणि तिचं MBA पूर्ण होत का निदान ६ महिने तरी हे कळायला नंतर मार्गच नाहि.
तिला असा "बॉडीगार्ड" नेमलेला अजिबात आवडत नाहि. त्याला काहीही करून पळवून लावायचाच, किंवा इतर कामात अडकवायचा म्हणून ती तिच्या फोन वरून त्याला "छाया" नावाने फोन करायला सुरुवात करते . तिचं नंबर "प्रायवेट नंबर" म्हणून दिसत असल्याने, यालाही कोण फोन करताय ते कळत नाहि.
हळू हळू तो तिच्यात अडकतो. आणि दिव्यालाही जरा मोकळीक मिळते
अशा एका वेळेस एका डिस्को मध्ये म्हात्रे चे गुंड परत हमला करतात, हा परत एकेकाला तोडतो. तेंव्हा दिव्याला कळत कि हा खरोखर आपल्या रक्षणालाच ठेवलेला आहे, आणि त्याची ताकद आणि साधेपणा पाहून त्याच्या प्रेमात पडते. हि गोष्ट ती आपल्या मैत्रिणीला सांगते. पण सरताजला हे कळले तर तो लवली चा जीव घेईल हि भीती असल्याने ती छाया म्हणूनच बोलत राहते .
इकडे बार मध्ये म्हात्रेच्या एका भावाला लवली ने स्वर्गवासी केल्याने म्हात्रे ( आदित्य पांचोली ) भडकतो. आता बदला घ्यायचाच या भावनेने टिपिकल गुंडान प्रमाणे भर पावसात(?) तो भावाची चिता जळवताना (?) प्रतिज्ञा घेतो . इकडे छाया हीच करीना आहे , हे घरातल्या नोकराणीला कळत आणि ती करीनाच्या आईला सांगते , आई सरताज ला. सरताज भडकतो. तो बाहेरगावी असतो. इकडे करीनाच mba करून संपत वाटत , म्हणून ती ब्यागा भरून लंडन ला जायला निघते, आणि लवली ला सांगते कि मला स्टेशन ला भेट म्हणजे मी कोण आहे हे तुला कळेलच. पण सलमानच्या मोबिल वर सरताज चा फोन येतो हि फोन उचलते, पण काही बोलायच्या आधीच सरताज याला घाल घाल शिव्या घालून मोकळा होतो, आता हिला कळत कि बापाला सर्व कळलेलं आहे , आता काय करायचं ब्वा ? या विचारात असताना म्हात्रे परत सर्व शक्तीनिशी करीनावर तुटून पडतो , हि पळत पळत कुठल्या तरी खंडर मध्ये जाते.. आता तिथे आसपास राजस्थानी खंडर कुठून आलं असा क्षुद्र विचार माझ्या मनात डोकावून गेला पण असो, मागोमाग सलमान धावत तिला वाचवायला येतो,
आता फुल फिल्मी सेट, खाली पाणी साचलंय. सलमान च्या डोळ्यात माती गेल्याने तो डोळे मिटूनच (?) सर्वांना झोडपून काढतोय
परत घमासान, शेवटी फक्त मेन म्हात्रे आणि त्याचा साथीदार (महेश मांजेरकर) उरतात .
मांजेरकर बाजूला करीनाला घेऊन उभा आणि तात्पुरत्या आंधळ्या सलमानला म्हणतो, एक मे तुम्म्पे एहसान करता हु, याहासे जाने देता हु
(आता मगास पासून सलमान च्या जीवावर ५० जण उठलेले असताना , आता कीस खुशिमे हे एहसान असा प्रश्न पडलेला असताना, मला लगेच त्याच उत्तर मिळाल )
"मुझपर एक एहसान करना कि मुझपर कोई एहसान ना करना" .. इति सलमान
(ओक्के हि टुकार पंच लाईन मारायची होती म्हणून आधीचा डायलॉग , मी पण ना.. मंदच आहे)
इकडे पांचोली रागाने एक पाण्याचा पाईप तोडतो. आणि सलमान वर फुल प्रेशर ने पाणी मारतो, त्या पाण्यामुळे सलमान चा शर्ट हळू हळू .......................................
येस you are right !!!!
ज्या क्षणासाठी समस्त स्त्री वर्गाने १२० ची पावती फाडली होती तो क्षण आला. सलमान च्या उघड्या अंगाच दर्शन. त्याच्या "6 packs abs "
कॅमेरा नुसता गरा गरा ३६० अंशात फिरतोय, सलमान च्या डोळ्यातून अंगारे .. इकडे आनंदाने चीर्कून बेभान झालेल्या मुली, आणि आमच्या टीम मधल्या काकवा.. आणि हे सर्व हतबुद्ध पण पाहणारा मी ... !!!!
असो..
तर यथावकाश शेवटचा म्हात्रे पण संपतो. हा करीनाला सोडवून बाहेर येतो, तर बाहेर सरताज परत याला चोप्तो, मग करीना मध्ये पडून सांगते कि ती मुलगी मी नव्हे याच प्रेम कोणी दुसरच आहे, याला स्टेशन वर जौंद्या
मग सरताज सलमान ला सोडतो. हा धावत स्टेशन वर जातो, स्टेशन कुठलं तर "पुणे" वा वा
पण सरताज त्याच्या मागे एक गुंड पाठवतो आणि सांगतो जर याला कुठली मुलगी दिसली नाहि तर खपवून टाक
इकडे करीना धावत घरी येऊन तिच्या मैत्रिणीला सर्व सांगते , आणि सांगते कि तू आत्ताच्या आता स्टेशन ला जा आणि त्याला संग कि छाया म्हणजे मीच आहे.
ती मैत्रीण सुसाट पळत स्टेशन गाठते, त्याने आधी छाया कोण हे बघितलेलं नसल्याने , त्याला वाटत तीच आहे, तो तिला मिठी मारतो, इकडे गुंड पण सर्व ओके म्हणून सरताज ला फोन लावतो..
पण पण...
पुढे काय ???
हे तर तुम्हाला जाऊनच बघायला हव ;)
पिक्चर मधली गाणी बरी आहेत
सलमान त्याच्या युनिफोर्म मध्ये कडकच दिसतो
करीना तर अहाहा .. आणि चक्क तिला अभिनयाची संधी दिलेली आहे, आणि तिने तिचं सोन केल आहे
ती जब वे मेट नंतर याच्यात खूपच सुंदर दिसली आहे
असो मी चित्रपटाला २ स्टार देईन .
बाकी तुम्ही हुशार आहातच :)
प्रतिक्रिया
4 Sep 2011 - 12:34 pm | कुंदन
आवडले परीक्षण.
टी व्ही वर येईल तेंव्हा बघितला जाईल.
4 Sep 2011 - 12:36 pm | सुहास झेले
बघायचा मुड नव्हताच, आता हे परीक्षण वाचून तर चुकूनही नाही... मस्त लिहिलंय !! :) :)
4 Sep 2011 - 1:02 pm | अन्या दातार
सलमानचे पिक्चर तसेही लई भारी म्हणावे असे नसतातच. कधीतरी अगदीच काही बघायला नसलं की बघतो. हा पण त्याच पठडीतला. टीव्हीवर गाजावाजा करत येईलच लग्गेच तेंव्हा बघितला तर बघु म्हणे ;)
4 Sep 2011 - 1:12 pm | बिपिन कार्यकर्ते
मेल्या, तब्येतीला झेपतील असेच सिनेमे बघत जा रे... तुला लेका नुसत्या मारामारीच्या सीनमुळेही दुखापत व्हायची! मग कोण जबाबदार? ऑं? आणि हतबुद्ध वैग्रे नाही व्हायचं हां! मुलींना का मन नसतं? त्यांना का भावना नसतात? त्या का माणूस नाहीत? तुझी अशी मतं पाशवी ग्यांगला कळली तर सलमान काय करेल अशी धुलाई करतील तुझी!
4 Sep 2011 - 9:14 pm | शैलेन्द्र
"मेल्या, तब्येतीला झेपतील असेच सिनेमे बघत जा रे... तुला लेका नुसत्या मारामारीच्या सीनमुळेही दुखापत व्हायची! "
+१११
बाकी लेख मस्त झालाच आहे.. हे वे सा न ल
4 Sep 2011 - 9:15 pm | शैलेन्द्र
"मेल्या, तब्येतीला झेपतील असेच सिनेमे बघत जा रे... तुला लेका नुसत्या मारामारीच्या सीनमुळेही दुखापत व्हायची! "
+१११
बाकी लेख मस्त झालाच आहे.. हे वे सा न ल
4 Sep 2011 - 1:19 pm | तिमा
उसकी सिर्फ आंखे हि सामनेवाले कि प्यांट गिली कर देती हे
नुसतं परीक्षण वाचूनच आमची पँट पाणावली !
4 Sep 2011 - 1:23 pm | आत्मशून्य
अत्यंत ज्वलंत चित्रण.. तूमच्या लेखणीमधे दम हाय.. बाकी चित्रपटाविषयी काही बोलण्यासारख नसल्याने......
4 Sep 2011 - 1:25 pm | अमोल खरे
>>आतमध्ये उपस्थित असलेल्या जवळपास ६०% मुली पाहून सलमान चित्रपट मुलं सुद्धा थेटरात येऊन का पाहतात याचा अंदाज आला
इकडे आनंदाने चीर्कून बेभान झालेल्या मुली, आणि आमच्या टीम मधल्या काकवा.. आणि हे सर्व हतबुद्ध पण पाहणारा मी ... !!!!
>>
हॅहॅहॅहॅहॅ....... कडक लिहिलायस. जळजळ पोहोचली. :) आपण दोघे इनो घेऊया.
4 Sep 2011 - 1:30 pm | प्रशांत
आदरणीय सलमान जी खान
........................................मेलो
4 Sep 2011 - 1:41 pm | अन्या दातार
आदरणीय सलमान जी खान
मेलो नाही पण हादरलो नक्कीच. त्यामुळे आदरणीय च्या ऐवजी हादरणीय असे वाचले. :)
4 Sep 2011 - 3:48 pm | विनीत संखे
हादरणीय साठी १०००+
:D
4 Sep 2011 - 3:52 pm | प्रचेतस
सलमानजी खान साहेब असा उल्लेख न केल्याबद्दल श्री. स्पा यांचा जाहीर निषेध.
4 Sep 2011 - 3:43 pm | Mrunalini
तुमचे परिक्षण आवडले. :)
कालच हा चित्रपट online बघितला.अत्यंत आनंद झाला की १ रुपया पण खर्च झाला नाही. मला समजत नाही, आपल्या कडे काय विचार करुन लोक ह्या movie ला सुपरहिट करतात.
4 Sep 2011 - 3:50 pm | प्रचेतस
लैच कडक परीक्षण स्पावड्या. वाक्या वाक्यागणिक हसत होतो. पिच्चर आता टीव्हीवर आल्यावरच बघितल्या जाईल.
रेडी सारखा भयाण चित्रपट पाहण्यासाठी अस्मादिकांनी १८० रू घालवले होते त्याची कटू आठवण या निमित्ताने झाली. :(
4 Sep 2011 - 4:53 pm | मी-सौरभ
त्यात पण १ तास फोन वर हापिसातल्यानी वैताग आणला होता..
पण पिच्चर पक्का सलमानटाईप होता :)
4 Sep 2011 - 5:02 pm | प्रियाली
रजनी अण्णाची पोकळी कोण भरून काढेल हा प्रश्न सल्लूने पुढल्या १० वर्षांपर्यंत तरी सोडवला आहे.
छे! छे! अजून चिंगम नाही पाहिला, त्यावर हा आणखी एक. कहर हो! ;)
बाकी, परीक्षण आवडले. ठेतर, दय्लोग, बब्र्या वगैरे शब्द तर खासच.
4 Sep 2011 - 5:06 pm | धन्या
मस्त परीक्षण... एकदम रीयालिष्टीक, पुर्वग्रहवेग्रे बाजूला ठेवून केलेले असे...
असो... हापिसातला कुणीतरी नाईट शिप्टमध्ये पाहायला म्हणून आणेलच... मग आम्ही पेन्ड्रायिववर कॉपी करुन नेउ घरी...
10 Sep 2011 - 6:07 am | पाषाणभेद
आमाला याची थेटरप्रिंट मिळाल्येली हाय. उद्यापरवा निवांत बगू.
बा़की आमाला रडारड, सामाजीक आशय, कलात्मक आसले पिच्चर आजाबात आवडत न्हाय. त्यामुळं हाबी आवडलंच.
4 Sep 2011 - 5:31 pm | अप्पा जोगळेकर
परीक्षण लिहिण्याची स्टाईल आवडली.
बाकी पिक्चर एकदम भारीच. एकदम पैसे वसूल. रजनीकांतच करिअर उतरणीला लागणार असं वाटतय.
फाईटिंग सिकवेन्स ट्रान्सपोर्टर सारखे वाटले.
4 Sep 2011 - 7:36 pm | सोत्रि
लेखन झक्कास!
पण स्पावड्या, बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवसाचे कलेक्श्न झाले 20 कोटी (त्याला तुझ्या 120 रुपड्यांचा हात्भार लागला आहे) त्यामुळे 'सलमान जी खान' यांच्या शिनेमाच्या कलेक्शन वर तु दिलेल्या "2 स्टार" परिक्षणाने काहीही फरक पड्णार नाही :lol:
- (सलमान जी खान ह्यांच्या 6 पॅकचा चाहता) सोकाजी
5 Sep 2011 - 1:26 pm | स्मिता.
परिक्षण आवडले रे स्पा!
तेच वाचून लग्गेच पिच्चर डाउनलोड करून बघितला. तो ओव्हरहेड वायरला धरून उडी मारायचा सिन बघून वेड्यासारखी हसले. तसेच तो करिनाच्या क्लासरूममधला सिन सांगायचा होता रे... तो पण भारी आहे.
बाकी शेवटाकडे जाताना चित्रपट चढत्या क्रमाने रटाळ होत गेला. आपल्याकडे असले टुकार चित्रपट सुपरहिट्ट का होतात हे काही कळलं नाही. याच्यापेक्षा मला सिंघम बरा वाटला होता.
4 Sep 2011 - 8:31 pm | जाई.
धमाल परीक्षण आहे.
आता पिक्चर डाउनलोड करुनच बघितला पाहिजे.
भले मैत्रिँणीचा आग्रह मोडावा लागला तरी चालेल.
मेरे पैसे बचाकर मुझपे एहसान कर दिया.
4 Sep 2011 - 10:30 pm | ५० फक्त
''आदरणीय सलमान जी खान'', स्पावड्या तुला सलमान, जी (स्त्रीलिंगी अर्थाने) खान, असं काही लिहायचं होतं का ?
असो, असा ही हा चित्रपट अंडरवेअरच्या जाहिरातीसाठी वापरला जात असल्याने पाहण्याचा काही संबंधच नव्हता, आणि आता तर छे नकोच, उगा कशाला रिस्क घ्या नसत्या.
स्पावड्या चित्रपट परिक्षणं करायला लागलेला पाहुन बरं वाटलं, भेळ ते चित्रपट परिक्षण व्ह्याया सज्जनगड, चांगला प्रवास आहे सगळा., ब-याच वेगवेगळ्या क्षेत्रात गळ टाकुन ठेवलेले दिसत आहेत. लागेलच एखादी मासोळी गळाला.
असो, आपण टाकाउ धाग्याचे बाजार उठवता हे माहित आहे, पण आता तुमच्या बॅटच्या पट्टित टाकाउ पिक्चर पण आले काय, ?
5 Sep 2011 - 9:03 am | किसन शिंदे
स्पावड्याची चौफेर फटकेबाजी चाललीय... मस्त लिहलयं चित्रपट परिक्षण... बघायची तशीही इच्छा नव्हतीच आणी आता तर कोणी फुकट जरी घेऊन गेलं तरी पण बघणार नाही.
अवांतर: शाळा कधी येतोय कुणास ठाऊक?
5 Sep 2011 - 10:30 am | सुहास झेले
ऑक्टोबरमध्ये .... :) :)
14 Sep 2011 - 2:07 pm | धमाल मुलगा
गेल्या वर्षी मी प्रोमो पाहिला तेव्हा मे महिन्यात प्रदर्शित होईल असे वाचले होते राव!
तेव्हापासून वाट पाहतोच आहे.
14 Sep 2011 - 2:11 pm | नगरीनिरंजन
आवडलेल्या पुस्तकांवरचे चित्रपट पाहू नयेत असा आमचा फुकट प्रेमाचा सल्ला घेऊन त्यावर विचार करावा ही नम्र विनंती.
14 Sep 2011 - 2:24 pm | धमाल मुलगा
पण च्यायला, ते प्रोमो पाहून तरी असं वाटतंय की गंडणार नाही.
सिनेमातली क्यारेक्टरं, पुस्तकातल्या क्यारेक्टरांशी खूपच साधर्म्य दाखवणारी वाटली. शिवाय सत्तरीतलं वातावरणही उभं करण्यात बरंच यश आलेलं दिसतंय. म्हणून उत्सुकता हों!
नायतर पुस्तकांवर बेतलेल्या सिनेमांचे बरेचसे अनुभव एकुणातच अपेक्षाभंग करणारे ठरले आहेतच.
15 Sep 2011 - 8:08 am | ५० फक्त
+१०० टु ननि, पुस्तकात लेखक लिहुन जे चित्र उभं करतो ते पडद्यावर उभं करणं फार अवघड असावं किंवा दोन वेगवेगळ्या पद्धती असल्यानं हा फरक असावा. अशा बाबतीतला माझा एकच अनुभव आहे तो, दा विंची, आधी पुस्तक वाचलेलं नंतर चित्रपट पाहायला गेलो आणि अर्ध्यातुनच निघुन आलो.
बाकी, शाळाच्या प्रोमो मध्ये अम्रुता खानविलकर काय जबरा दाखवलीय.
4 Sep 2011 - 10:43 pm | प्रीत-मोहर
मीसुद्धा हा चित्रपट काल ऑनलाईन पाहिला.
स्पा परिक्षण मस्तच :)
ह्यावर श्री. श्री. श्री. आदिमहाराज जोशी ह्यांची प्रतिक्रिया वाचण्यास उत्सुक
-प्रीमो
4 Sep 2011 - 11:14 pm | रेवती
काल रात्रीच हा शिनेमा थेट्रात जाऊन पाहिला आणि नवरा परिक्षण लिहिणार होता........तू लिहिलस ते बरं झालं. त्याचं काम कमी झालं. आत्ता वेळ नाहिये नंतर जमल्यास मोठा प्रतिसाद लिहीन. तेरी मेरी हे गाणं ठेक्यामुळे आवडलं. दोन तीन दिवसात विसरायला होणार आहे.
4 Sep 2011 - 11:48 pm | सूड
>>तेंव्हा आतमध्ये उपस्थित असलेल्या जवळपास ६०% मुली पाहून सलमान चित्रपट मुलं सुद्धा थेटरात येऊन का पाहतात याचा अंदाज आला
या साठ टक्क्यांचं थोडं ओघवतं वर्णन आलं असतं तर परीक्षणाला निरीक्षण पूरक ठरून चार चाँद का काय म्हणतात ते लागले असते. ( 'आखिरकार' आम्हाला पण हिंदी वाक्प्रयोग करता येऊ लागले तर !! येथे स्वतःचीच पाठ थोपटल्याचा स्मायली कल्पावा. ) ;)
स्पाकाका तुमचे धागे शतकी होतातच, हाही होईल. त्यामुळे विनाकारण शुभेच्छा वैगरे देत नाही.
6 Sep 2011 - 3:19 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>>स्पाकाका तुमचे धागे शतकी होतातच, हाही होईल. त्यामुळे विनाकारण शुभेच्छा वैगरे देत नाही.
शुभेच्छा नको रे, एक नजररक्षा यंत्र दे. त्याला त्याची गरज आहे. ;-)
बाकी, लेख मस्तच रे. एकदम झकास....
10 Sep 2011 - 12:16 am | मी-सौरभ
>>शुभेच्छा नको रे, एक नजररक्षा यंत्र दे. त्याला त्याची गरज आहे.
ते यंत्र फार जड नाही ना ह्याची खात्री करून घ्या..
5 Sep 2011 - 3:55 am | चित्रगुप्त
छान.
.........................ज्या क्षणासाठी समस्त स्त्री वर्गाने १२० ची पावती फाडली होती तो क्षण आला. सलमान च्या उघड्या अंगाच दर्शन. त्याच्या "6 packs abs "
....... इकडे आनंदाने चीर्कून बेभान झालेल्या मुली, आणि आमच्या टीम मधल्या काकवा......
अरे व्वा ...
..... पण त्या करीनाला असले काही का सुचू नये ? जिथे तिथे पुरुषांनीच का बाजी मारायची ? स्त्रियांना का मन नसते, तन नसते?
.... पुरुषप्रधान संस्कृतीत असे अन्याय होतच राहणार, असे खेदाने म्हणावे लागते, दुसरे काय?
14 Sep 2011 - 2:06 pm | धमाल मुलगा
अशा वेळी मात्र सोयीस्कररित्या समान हक्क, पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन बरोबरीनं वागणं वगैरे विसरलं जातं नै का हो ? ;)
5 Sep 2011 - 9:38 am | सुधीर काळे
स्पा,
अतीशय 'प्रसन्न' परीक्षण केले आहेस. वाचायला जाम मजा आली. असेच लिहीत जा.
या सिनेमाबद्दल नव्हे पण सलमानबद्दलची एक मनातली मळमळ लिहितो. कदाचित् तुम्हा तरुण मंडळींना आवडणार नाहीं.
सलमान हा गुन्हेगार आहे, त्याला एका खटल्यात (चिंकारा मारल्याबद्दल) तुरुंगवासाची शिक्षासुद्धा झालेली आहे. आता अपीलावर तो मुक्त आहे (म्हणे). त्या अपीलाचे काय झाले, ते सुनावणीला कां येत नाहीं याबद्दल कांहींच माहीत नाहीं. (असल्यास द्यावी)
त्याशिवाय तो गाडी चालवत असताना त्याने फूटपाथवर झोपलेल्या कांहीं लोकांना जिवे मारले आहे. शेजारी त्याचा 'बॉडीगार्ड' म्हणून दिलेला एक पोलीसही बसला होता. तो साक्षीदारही (eye witness) आहे. त्या खटल्याचेही पुढे काय झाले हे कळले नाहीं.
या खेरीज त्याच्या अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्या अनेक बातम्याही वाचण्यात आल्या आहेत. इंटरनेटवर याबद्दल खूपच माहिती आहे.
कायद्याच्या प्रक्रियेबद्दल आपल्या मनात कांहींही असो, पण आपण बोलू शकत नाहीं. पण या सर्व केसेस संपेपर्यंत आपण त्याचे सिनेमे पहाणे बंद करू शकतो (जसे मी केले आहे!) कारण असे न केल्यास या गुन्हेगारांना काय फरक पडतो?
पहा, जसे पटेल तसे प्रत्येकाने करावे.
5 Sep 2011 - 2:36 pm | मराठी_माणूस
त्याशिवाय तो गाडी चालवत असताना त्याने फूटपाथवर झोपलेल्या कांहीं लोकांना जिवे मारले आहे. शेजारी त्याचा 'बॉडीगार्ड' म्हणून दिलेला एक पोलीसही बसला होता. तो साक्षीदारही (eye witness) आहे. त्या खटल्याचेही पुढे काय झाले हे कळले नाहीं.
ह्या पोलिसाने त्याच्याविरोधि साक्ष दिलि होति. मधे पेपर मधे असे वाचले होते कि तो काही दिवस सातार्याला होता मग परत मुंबईमधे आला, त्या दिवसात तो भ्रमिष्टा सारखा वागत होता , नंतर त्याचा अंत अत्यंत दारुण स्थितीत झाला. त्याच्या अशा स्थीतीला हा खटला कारणीभुत होता.
बाकी तुमच्या वरच्या प्रतीक्रीयेशी पुर्ण सहमत .
त्याचा सिनेमा न बघणे असे काही होणार नाही , तेव्हढी संवेदनशीलता आता कुठे आहे. त्याचे उघडे होणे आणि लोकांचे किंचाळणे चालुच राहील.
5 Sep 2011 - 4:25 pm | तिमा
सुधीर काळ्यांशी सहमत. माझ्या काळ्या यादीत तर संजय दत्त या गुन्हेगाराचे पण नांव आहे.
5 Sep 2011 - 8:42 pm | बोका
काळे आणि तिरशींगरावांशी सहमत.
मी सलमान व संजय दत्त या दोघांचे चित्रपट टि. व्ही. वर सुध्दा पहात नाही.
मिपावरील परीक्षणे मात्र वाचतो !
5 Sep 2011 - 9:34 pm | धन्या
सलमान खान जी साहेबांबद्दल काहीही बोलू नका. झालं गेलं गंगेला मिळालं. आता ते एकदम संत वगैरे झाले आहेत. तुम्ही बीईंग ह्युमन टी शर्ट कँपेनबद्दल वाचत नाही काय?
की ही मळमळ सलमान खान जी साहेबांनी ह्युमन टी शर्ट कँपेन सुरु करताना जे चित्रतारकांना मंचावर बोलावले त्याबद्दल आहे? तसे असेल तर चालू दया तुमचं.
6 Sep 2011 - 4:25 pm | वपाडाव
आपल्याला बुवा सल्लुभाई आडौतो....
त्याची दर्यादिली आडौते.... माणुस म्हणुन तो खुप छान आहे...
पण साला त्याला GF तिकवुन नाय ठेवता येत....
पण पिच्चर लैच ************* दर्जाचा होता....
सल्लुभाई आम्ही पाहतो म्हणुन काहीही दाखवणार काय?
(******च्या जागी जेवढ्या शिव्या माहिती असतील त्या द्याव्यात)
5 Sep 2011 - 9:47 am | गवि
हा चित्रपट अगदी बघणारच होतो (दुसरा कोणता बरा शो त्यावेळी नसल्याने) पण ऐनवेळी माझ्या आतल्या आवाजाने मला वाचवलं. मी बेत रद्द केला.
स्पावड्याने माझ्या आतल्या आवाजावर शिक्कामोर्तब केलं आहे..
धन्यवाद..
5 Sep 2011 - 10:08 am | चतुरंग
'आतला आवाजच' तुमचा गार्ड आहे म्हणा की! ;)
(बाहेरचा आवाज) रंगा
5 Sep 2011 - 10:52 am | सुधीर काळे
'आतला आवाज' लई कामाचा असतोय्!
5 Sep 2011 - 10:19 am | रेवती
सलमान हा माझा नावडता बुवा आहे.
या चित्रपटाला मी कधीही गेले नसते पण सुट्टीला आलेल्या सतरा वर्षाच्या पुतण्याने "काकू जाऊया की." म्हटल्याने सगळेजण गेलो. यामध्ये एक्सपेक्टेड असलेली गोष्टी म्हणजे सलमानने शर्ट न घालणे. करिनाचा अभिनय गेल्या दोनेक वर्षात चांगला वाटायची शक्यता निर्माण झाली आहे. चांगली दिसलीच आहे पण मध्येच थकलेली वाटली.
कथेला शेवटी चांगला ट्वीस्ट आहे. तेरी मेरी, मेरी तेरी प्रेमकहानी हे गाणं पडद्यावर वाजत असताना माझ्या पुढच्या रांगेतील पाच सहा लोकांनी टाळ्यांनी चांगला ताल धरला होता. करीनाचे कमी कपडे पाहून त्यांनी शिट्ट्या मारल्या म्हणून माझा मुलगा जरा कन्फ्युज झाला.;) शिनेमाला इंग्रजी सबटायटल्स असल्याने मुलाला सांभाषण बर्यापैकी समजत होते. त्यात पँट गीली असा काहीतरी डायलॉग आल्यावर खी खी करून हसत होता. शेवटच्या मारामारीत रिमोट कंट्रोल हेलिकॉप्टरचा प्रकार आवडला. हिरव्या देशात थेट्रात गर्दी करून पब्लिक सिनेमे पाहतं हे निदान आम्हाला तरी माहीत नव्हतं ते पहायला मिळाल्याने आश्चर्य वाटल्या गेलं आहे.
14 Sep 2011 - 2:04 pm | धमाल मुलगा
न जमणारी गोष्ट करण्याचा फार प्रयत्न केला की एकदम थकायला होतंच. :D
14 Sep 2011 - 7:56 pm | रेवती
हा हा हा
खरं आहे.
5 Sep 2011 - 10:29 am | समीरसूर
स्पासाहेब,
एकदम कडक परीक्षण!!! वाचूनच चित्रपट बघण्याचा आनंद मिळाला. तसाही थिएटरात जाऊन हा चित्रपट बघणारच नव्हतो; आता तर नाहीच नाही. :-)
बाकी लेकीबाळींना सलमान खूप आवडतो हे मात्र खरे आहे. अशाच आनंदाने चेकाळून किंचाळणार्या पोरी मी 'दोस्ताना' नामक मानवी भावभावनांचा आलेख समर्थपणे दाखवणार्या चित्रपटादरम्यान पाहिल्या होत्या. जॉन अब्राहम जेव्हा समुद्रकिनार्यावर उघड्याबंब अवस्थेत आपली चड्डी थोडी खाली-वर करतो तेव्हाचा गोंधळ अवर्णनीय होता. जॉन अब्राहमचे चित्रपट चालत नाहीत परंतु तो मुलींमध्ये खूप लोकप्रिय आहे असे कळते.
सलमानची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. 'बॉडीगार्ड'ने म्हणे प्रदर्शित दिवसाच्या उत्पन्नाचे सगळे विक्रम मोडले आहेत. पुण्यात सकाळी सात वाजताचे सगळे खेळ हाऊसफुल्ल होते. एकूण १६ कोटी रुपयांचा गल्ला या चित्रपटाने पहिल्या १-२ दिवसात कमावला. एकूण १२०-१२५ कोटींचा गल्ला या चित्रपटामुळे जमेल असा तज्ञांचा अंदाज आहे. म्हणजे आतापर्यंतचे चित्रपटाच्या बॉक्सऑफीस उत्पन्नाचे सगळे विक्रम हा चित्रपट मोडीत काढेल असे दिसते. बाकी टीव्ही राईट्स, म्युझिक राईट्स, रिंगटोन्स, कॉलरट्युन्स, पेड चॅनल राईट्स, ईत्यादी माध्यमांतून किती पैसा गोळा होईल याचा अंदाज सुद्धा करवत नाही. हा सलमान म्हणे एका चित्रपटाचे ५० कोटी इतके मानधन घेतो. शुद्ध व्यावसायिक दृष्टीकोनातून विचार केल्यास त्याने इतके पैसे का घेऊ नये असा प्रश्न पडतो. आज त्याच्या नावावर चित्रपट चालतात. निर्माते, दिग्दर्शक, नट-नट्या, तंत्रज्ञ, थिएटरचालक, मालक, वितरक, म्युझिक कंपन्या, ईत्यादी सगळ्यांना सलमानच्या चित्रपटांमुळे दणकून फायदा होतो. आज या चलतीचा फायदा करून घेणे हे एक व्यावसायिक म्हणून खचितच उचित ठरते. शिवाय अप्रत्यक्षपणे कितीतरी लोकांना त्याच्या चित्रपटाच्या यशाचा फायदा होतो. एकपडदा चित्रपटगृहात हाऊसफुल्लचे बोर्ड लागतात तेव्हा त्या चित्रपटगृहातल्या कर्मचार्यांच्या रोजगारावर काहीकाळापुरती का असेना पण कुर्हाड कोसळणे टळते. अप्रत्यक्षपणे कितीतरी लोकांना पैशाच्या स्वरूपात मदत होते.
सलमान खान हे एक अजब रसायन आहे. एक सच्च्या हृदयाचा पण अनेक ठिकाणी चुकलेला, सरळसोट वागणारा, कुठेही आणि कधीही अभिजातपणाचा, बुद्धीमानतेचा अभिनिवेश न बाळगणारा असा दिलदार सलमान त्याने निर्माण करून ठेवलाय जो हिंदी चित्रपटांच्या तथाकथित नायकांच्या प्रतिमेशी खूप जास्त प्रमाणात साम्य दाखवतो. सत्तर-ऐंशीच्या दशकातले नायक अन्यायग्रस्त असत म्हणून ते वाईट मार्गाला लागत परंतु त्यांच्या आतला सच्चा माणूस ते मरू देत नसत. अमिताभचा 'दीवार'मधला गुन्हेगार नायक, 'शोले'मधले वीरू-जय अशी जी नायकांची भावूक, गुन्हेगार पण त्याचबरोबर सहृदय माणूस म्हणून प्रतिमा हिंदी चित्रपटांनी पोसलेली आहे तिच प्रतिमा सलमानने जाणते किंवा अजाणतेपणी धारण केलेली आहे. सामान्य जनता अशा नायकांना डोक्यावर चढवते. शिवाय त्याची टणक बॉडी, पडद्यावरचा त्याचा करिष्मा या गोष्टींमुळे त्याच्या प्रतिमेला पोषक अशी दुसरी अन्यायाला झोडपून काढणारी प्रतिमा निर्माण झालेली आहे. सलमानचे आजचे यश त्याच्या या दुहेरी प्रतिमेत दडले आहे असे मला वाटते. अमिताभला या प्रतिमेचा फायदा झाला (रेल्वे स्थानकावर आलेला, हरलेला अमिताभ, नंतर प्रकाश मेहरांनी बोलावून घेतले; ही गोष्ट खूप प्रसिद्ध झाली. नंतर रेखासोबतचे अयशस्वी प्रकरण, कुलीचा जीवावर बेतणारा अपघात, ईत्यादी). संजय दत्तला या प्रतिमेचा फायदा झाला (ड्रग्ज, एके ४७, तुरुंगातले दिवस, कोर्टकचेर्या ईत्यादी) आणि 'खलनायक', 'वास्तव'चा काळ त्याने गाजवला. शाहरूख खानचे आजकालचे चित्रपट त्यामानाने इतके चालत नाहीत. 'डॉन', 'रब ने बना दी जोडी' किंवा 'माय नेम इज खान' या चित्रपटांना असे दणदणीत यश मिळाले नाही. त्याला आपली सलमानसारखी प्रतिमा निर्माण करणे जमले नाही. फर्ड्या इंग्रजीमध्ये बोलणारा, सतत उच्चभ्रू वर्तुळात वावरणारा, चोप्रा, जोहर कँपातला मनोहारी प्रणयकथांमध्ये रमणारा शाहरूख या बाबतीत कमी पडला. सलमानच्या यशापुढे 'आरए १' ची दाळ कितपत शिजेल ही एक शंकाच आहे. माझ्या अंदाजाने 'आरए १' चित्रपट एकतर साफ कोसळेल किंवा अगदीच जेमतेम चालेल. तसेही त्याचे काही चित्रपट मारून-मुटकून हिट कॅटेगरीत ढकलल्याची उदाहरणे बरीच आहेत. असो.
समीर
10 Sep 2011 - 12:20 am | अप्पा जोगळेकर
प्रतिक्रिया खूपच आवडली.
सलमान खान हे एक अजब रसायन आहे.
+१००.
5 Sep 2011 - 12:38 pm | परिकथेतील राजकुमार
स्पा चे परिक्षण आणि समीर साहेबांची प्रतिक्रिया दोन्ही कडकच.
रेडी नंतर सलमानचा हा अजून एक फसलेला रिमेक आहे. अर्थात कलेक्शनच्या बाबतीत दोन्ही चित्रपटांनी कदाचीत निर्मात्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या असतील देखील, मात्र चाहत्यांच्या पदरात निश्चितच शून्य आले आहे.
रेडी आणि बॉडीगार्ड पेक्षा मी कधीही वाँटेड आणि दबंगला जास्ती मार्क देईन.
5 Sep 2011 - 3:36 pm | समीरसूर
'बॉडीगार्ड'ने आजपर्यंत (०५-सप्टें-२०११) म्हणजे केवळ ५ दिवसात एकूण ११० कोटींच गल्ला गोळा केला आहे. बातमी इथे वाचा: http://timesofindia.indiatimes.com/entertainment/bollywood/box-office/Bo...
कमाईचे सगळे विक्रम या चित्रपटाने मोडले.
परा, तुम्ही म्हणताय ते खरे आहे. 'दबंग' खूप मनोरंजक आणि नीट रचलेला चित्रपट होता. पटकथा कुठेच फाटत नाही. भट्टी छान जमली होती. बाकी 'रेडी' आणि 'वाँटेड' मी पाहिले नाहीत. 'वाँटेड' टीव्हीवर पडीक असतो पण बघायची इच्छा होत नाही. 'दबंग' मी टीव्हीवर बर्याचदा पाहिला. सॉल्लिड मनोरंजन होते....
5 Sep 2011 - 3:41 pm | स्पा
मला खरच कळले नाही कि.. काय हिशोबाने बाडी गार्ड बनवलाय...
जरा तरी डोक लावायचं
कथाच आधी इतकी पुचाट होती कि , पटकथा, दिग्दर्शन हे विषय दूरच राहिले
तरी सुधा इतकी कमाई... कठीण आहे .
रेडी पेक्षा नक्कीच बरा आहे पण
5 Sep 2011 - 3:54 pm | परिकथेतील राजकुमार
@ समीर साहेब :- वॉंटेड बघाच बघा. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर दबंगच्या यशात वाँटेडचा खूप मोठा हात आहे. शक्य झाले तर ४/५ दिवसात त्याचे परिक्षण नक्की टाकतो.
@स्पा :- अरे दादा हा 'बनवलेला' नाहीये रे ;) सौथ चित्रपटाचे रिमेक बनवण्याची सध्या जी फॅशन + चलती आहे, त्यातलाच हा एक पदार्थ. आता ह्याला रिमेक म्हणावे का? तर नक्कीच नाही, हा रिमेक असल्याचा दावा सगळे करत असले तरी हा चित्रपट ओरिगिनल चित्रपटाची अत्यंत भ्रष्ट नक्कल म्हणता येईल. जी पूर्णपणे फसलेली आहे !
5 Sep 2011 - 3:59 pm | स्पा
अरे दादा हा 'बनवलेला' नाहीये रे ,सौथ चित्रपटाचे रिमेक बनवण्याची सध्या जी फॅशन + चलती आहे, त्यातलाच हा एक पदार्थ.
चायला हा पण सौथ वरून उचललाय का काय?
कुठला रे कुठला?
5 Sep 2011 - 5:41 pm | वाहीदा
मल्याळममधील सिद्दीक याच दिग्दर्शकाच्या चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे.
भारतिय पाच भाषेत याचा रिमेक आहे
Bodyguard (Malayalam),
Kaavalan (Tamil),
Bodyguard (Hindi),
Ganga (Telugu).
BODYGUARD(Kannada)
10 Sep 2011 - 12:15 am | अप्पा जोगळेकर
शक्य झाले तर ४/५ दिवसात त्याचे परिक्षण नक्की टाकतो.
वाट बघत आहे.
- 'वाँटेड' प्रेमी, राजवीर शेखावतचा फॅन
5 Sep 2011 - 4:09 pm | वाहीदा
@ स्पा : डोकं लावून चित्रपट काढला असता तर चाललाच नसता अन तू पण वेडाच आहेस , डोके बाजूला काढून असे चित्रपट पहायचे असतात.. तू ना उगाच नसते कोडे मांडत बसतोस
डोक बधीर व्हायला त्याचा वापर कशाला करायला गेलास ?
पण मुलींच्या बाबतीत म्हटले तर आहेच सलमानची बॉडी बघण्यालायक तू का रे जळतोस ? आमच्या ऑफीसमध्ये पण समस्त महिलावर्ग सलमानवर फिदा, बोलेतो एकदम फुलटू फट्टाक ! :-)
काही चित्रपट आम्ही फक्त सलमान / जॉन यांच्या सारख्यांना च पहायला जातो, श्टोरी बिरी गेली तेल लावत ;-)
समीरसूर शी सहमत
5 Sep 2011 - 4:11 pm | स्मिता.
हा काय कोणा दक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे??? मला तर त्या डायरी वाचनावरून 'कुछ कुछ होता है' चा रिमेक वाटला.
बाय द वे... सलमानचा शर्ट काढायचा प्रसंगही काही किंचाळण्यासारखा नव्हता. त्यामानाने दबंगमधला प्रसंग भारी! ;)
5 Sep 2011 - 1:57 pm | नगरीनिरंजन
फारच खमंग परीक्षण आहे! पिक्चर अर्थातच पाहण्यात येणार नाहीय.
परा, फारएन्ड आणि समीरसूर यांच्या रांगेत स्पासाहेब जाऊन बसलेले आहेत.
5 Sep 2011 - 2:11 pm | गणपा
झक्कास पंचनामा रे स्पावड्या. :)
(टोरेंटवर पण वेळ आणि बँडविड्थ खर्चु नये तर. :))
5 Sep 2011 - 2:28 pm | स्वैर परी
मांजेरकर बाजूला करीनाला घेऊन उभा आणि तात्पुरत्या आंधळ्या सलमानला म्हणतो, एक मे तुम्म्पे एहसान करता हु, याहासे जाने देता हु
(आता मगास पासून सलमान च्या जीवावर ५० जण उठलेले असताना , आता कीस खुशिमे हे एहसान असा प्रश्न पडलेला असताना, मला लगेच त्याच उत्तर मिळाल )
"मुझपर एक एहसान करना कि मुझपर कोई एहसान ना करना" .. इति सलमान
(ओक्के हि टुकार पंच लाईन मारायची होती म्हणून आधीचा डायलॉग , मी पण ना.. मंदच आहे)
इकडे पांचोली रागाने एक पाण्याचा पाईप तोडतो. आणि सलमान वर फुल प्रेशर ने पाणी मारतो, त्या पाण्यामुळे सलमान चा शर्ट हळू हळू .......................................
येस you are right !!!!
ज्या क्षणासाठी समस्त स्त्री वर्गाने १२० ची पावती फाडली होती तो क्षण आला. सलमान च्या उघड्या अंगाच दर्शन. त्याच्या "6 packs abs "
कॅमेरा नुसता गरा गरा ३६० अंशात फिरतोय, सलमान च्या डोळ्यातून अंगारे .. इकडे आनंदाने चीर्कून बेभान झालेल्या मुली, आणि आमच्या टीम मधल्या काकवा.. आणि हे सर्व हतबुद्ध पण पाहणारा मी ... !!!!
असो..
मेले हे वाचता वाचता!!!
5 Sep 2011 - 2:30 pm | मदनबाण
एकदम फाडु परिक्षण... ;)
मस्त रे... :)
5 Sep 2011 - 3:54 pm | कवितानागेश
:D
5 Sep 2011 - 4:46 pm | यकु
क ड क !!!
मस्त रे स्पा.
प्रत्येक वाक्याला हसत होतो.
मजा आली.
5 Sep 2011 - 4:46 pm | राजेश घासकडवी
:)
5 Sep 2011 - 4:48 pm | यकु
प्रकाटाआ
5 Sep 2011 - 6:32 pm | विशाखा राऊत
बरे झाले अजुन पाहिला नाही आहे
5 Sep 2011 - 11:37 pm | माझीही शॅम्पेन
जबदस्त !!! आवडल बुवा तुझ लेखन !!!
6 Sep 2011 - 12:27 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
स्पा काही माझ्या कंपूतला नाही पण त्याच्या धाग्यात जॉनचा उल्लेख आल्यानंतर प्रतिक्रिया द्यावीच लागणार.
असो. तर बब्र्या हा शब्द बब्रुवान रुद्रकंठावार यांनी आधीच बुक केल्यामुळे राज बब्बर या नटासाठी इतर काही नाव शोधावे. शिवाय भूतकाळात सुरू झालेल्या सिनेमाचा शेवट कसा होतो हे न सांगितल्यामुळे स्पा यांचा एक मार्क कापला आहे. सलमानच्या फक्त सिक्स-पॅक-अॅबचाच उल्लेख आहे, त्याबद्दल एक मार्क, पण इतर काही उल्लेख नाही, उदा: सल्लूने पाय दाखवले आहेत का? त्याबद्दल स्पा यांचे दोन मार्क कापले आहेत. ब्लुठूथ, आणि प्रियालीने उल्लेख केलेले इतर मजेशीर शब्द वापरण्याबद्दल स्पा यांना एक बोनस मार्क देण्यात येत आहे.
स्पा यांना बेरीज-वजाबाकी जमत असेल तर त्यांनी करावी नाहीतर मी त्यांना ६.२८/१० मार्क देत आहे ते मान्य करावे.
मार्कवरून आठवलं, मार्क रॉबिन्सन हा गरीबांचा जॉन एक पिच्चरनंतर कुठे दिसला नाही.
6 Sep 2011 - 11:18 am | स्पा
स्पा यांना बेरीज-वजाबाकी जमत असेल तर त्यांनी करावी नाहीतर मी त्यांना ६.२८/१० मार्क देत आहे ते मान्य करावे.
नशीब फर्स्ट क्लास मिळाला
आम्ही तर ३.१४ /१० अपेक्षित केले होते ;)
6 Sep 2011 - 5:23 am | सिद्धार्थ ४
कोणी काही म्हणो आपण तर बाबा सल्लू मियाचे जबरदस्त फाण झालो आहे. तीजायला ४५ मध्ये हि अशी body ....काल च online बघितला. खिशातून काही पैसे काढून न बघितल्या मुळे आपल्याला तर picture जाम आवाडला . फुल टू tiempass आहे.
6 Sep 2011 - 9:17 am | शिल्पा ब
स्टेरॉईडचे इंजेक्शन घेत राहीले तर तुमची सुद्धा बॉडी अशीच होईल.
6 Sep 2011 - 9:48 am | सूड
+१
सगळी स्टेरॉईड्सची करणी !!
6 Sep 2011 - 10:03 am | स्पा
सगळी स्टेरॉईड्सची करणी !!
स्टेरॉईड्सची करणी,नि उतारवयात मेंदूत पाणी
12 Sep 2011 - 11:49 am | वपाडाव
पाणी अजुन कुठे तरी भरतंय असं ऐकुन आहे....
10 Sep 2011 - 12:11 am | अप्पा जोगळेकर
सगळी स्टेरॉईड्सची करणी !!
एवढं सोप्प वाटलं काय ? स्टेरॉईड पचवण्यासाठी दुप्पट व्यायाम करावा लागतो.
10 Sep 2011 - 12:18 am | मी-सौरभ
या विषयावर स्पाभौं चे विचार ऐकण्यास उत्सुक आहोत.
:)
10 Sep 2011 - 4:17 am | सिद्धार्थ ४
हेच म्हणतो. दुप्पट व्यायाम आणि तो सुधा daily
6 Sep 2011 - 9:18 am | सुधीर काळे
मराठी_माणूस, तिरशिंगराव माणूसघाणे आणि बोका,
धन्यवाद! आपला 'कंपू' वाढला पाहिजे!
6 Sep 2011 - 10:17 am | प्रचेतस
या निमित्ताने मिपावर एक सलमानविरोधी कंपू तयार होतोय हे बघून आनंद वाटला.
अवांतरः जाकार्ता पोस्ट आणि ई-सकाळ मध्ये सलमान विरोधी लेखाची आतुरतेने वाट पाहात आहे. ;)
6 Sep 2011 - 11:29 am | आत्मशून्य
:)
10 Sep 2011 - 12:20 am | मी-सौरभ
'डॉन' (कराची) मधल्या सल्लू विरोधी लेखाची लिंक ही येऊ शकते :)
6 Sep 2011 - 9:25 am | स्पा
मराठी_माणूस, तिरशिंगराव माणूसघाणे आणि बोका,
धन्यवाद! आपला 'कंपू' वाढला पाहिजे!
हाहाहा
काका फोर्मात आहेत आज :D
6 Sep 2011 - 12:22 pm | स्पंदना
अरेरेरे !
स्पाव्या अरे त्या १२० मध्ये शिराज मध्ये पराठा की रे खायचे, हे अस अधिच बधिर अस्लेल डोक आणि कशाला बधिर करुन घ्याच ब्वा?
असुदे असुदे ! निदान आजकाल पोरी काय पसंत करतात ते तरी ज्ञान झाल ना? चांगल्यात वाईट्....टंग ओफ स्लीप्...वाइट्टात चांगल .
9 Sep 2011 - 11:04 pm | ५० फक्त
@ अपर्णातै, '' शिराज मध्ये पराठा की रे खायचे'' हे शिराज कुठं आलं म्हणायचं ?
10 Sep 2011 - 12:22 am | मी-सौरभ
तुमच्या माहिती साठी...
शिराज हे एका लाल वारुणीच नाव आहे...
6 Sep 2011 - 12:37 pm | इंटरनेटस्नेही
उत्तम चित्रपट परी़क्षण! वाचताना मजा आली!
6 Sep 2011 - 2:31 pm | सविता००१
खमंग परिक्षण. प्रत्येक वाक्याला हसत होते. जाम मजा आली. आता तर हा सिनेमा टी.व्ही. वरही नाही पहाणार.
6 Sep 2011 - 5:12 pm | गणेशा
अप्रतिम रे स्पा ...
मस्त परिक्षण
6 Sep 2011 - 5:12 pm | गणेशा
अप्रतिम रे स्पा ...
मस्त परिक्षण
10 Sep 2011 - 3:33 am | इंटरनेटस्नेही
लेखन आवडले! अतिशय ओघवते आणि मजा मस्ती करत केलेले चित्रदर्शी वर्णन!
-
इंट्या.
10 Sep 2011 - 1:02 pm | चिगो
च्यायला स्पावड्या... अगदी अर्धा तास उकळलेल्या चहासारखं क ह ड क झालंय भौ ह्यो पंचनामा.. एकदम चिरफाड..
10 Sep 2011 - 11:38 pm | पैसा
आमच्या सल्लूवर जळतोस काय रे? असले सिनेमे डोकं बाजूला ठेवून बघायचे! सॉल्लिड मज्जा येते. तू काही म्हण, मी आज "सिंघम" बघतेय, आणि उद्या "बॉडीगार्ड" बघणार आहे. स्पायल्या, सगळंच काय सिरियसली घेतोस रे?
12 Sep 2011 - 12:38 pm | नंदन
मस्त परीक्षण रे, स्पावड्या!
12 Sep 2011 - 12:42 pm | स्पा
सर्वांना मनापासून ठांकू :)
12 Sep 2011 - 12:44 pm | प्रचेतस
हे काय....! १०० व्ह्यायच्या आधीच ठ्यांकू ?
12 Sep 2011 - 1:22 pm | सुधीर काळे
स्पा, आतापर्यंत मी 'दारू'चे अनेकवचन 'दारवा' असे करत असे. (म्हणजे आमच्या घरी पार्टी असते तेंव्हां दारूच्या बाटल्या ज्या टेबलावर ठेवल्या असतात तिकडे बोट करून 'दारवा तिथे ठेवल्या आहेत' असे सांगतो. त्याला 'पनघट' असेही नांव आहे!) पण 'काकू'चे 'काकवा' हे अनेकवचनी 'रूप' आजच वाचले!
14 Sep 2011 - 2:45 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
थोडं वाचन वाढवा, इतर अनेक मजेदार शब्द समजतील.
13 Sep 2011 - 9:18 pm | मी-सौरभ
:)
14 Sep 2011 - 12:34 am | आशु जोग
हा सिनेमा पहायची हिम्मत नाही करणार
पण
आपले रसग्रहण आणि लोक्सच्या कमेंटस आवडल्या
लिहित रहा !
--
रसग्रहण - सलमानचे परीक्षण आपण कोण करणार
14 Sep 2011 - 12:17 pm | किसन शिंदे
नुकत्याच ढकलपत्रातुन आलेल्या लेखातलं एक वाक्य इथे टाकयचा मोह अनावर होतोय. लेखाचा विषय होता कसं जगावं??
'पंचेचाळीस वय झालं तरी देवाच्या नावावर सोडलेल्या बोकडासारखं बकर्यांच्या मागे उंडरत फिरायचं तर सलमान खान सारखं.'
14 Sep 2011 - 12:54 pm | मराठी_माणूस
इथे तर उंडग्या बकर्याच फिरता आहेत निर्लाज्जपणे ह्या बोकडामागे
14 Sep 2011 - 12:20 pm | स्पा
'पंचेचाळीस वय झालं तरी देवाच्या नावावर सोडलेल्या बोकडासारखं बकर्यांच्या मागे उंडरत फिरायचं तर सलमान खान सारखं.'
=))
=))
=))
14 Sep 2011 - 12:55 pm | कवितानागेश
पुन्हा पुन्हा सलमानच्या वयाचा उल्लेख करुन त्याला का बरे हिणवले जातंय??
आता वय वाढलंय हा काय त्याचा बिचार्याचा दोष झाला का? :(
छे:!!
14 Sep 2011 - 1:27 pm | नगरीनिरंजन
>>आता वय वाढलंय हा काय त्याचा बिचार्याचा दोष झाला का?
नाही हो. वय वाढलंय हा नाही पण दुसरं काहीच वाढलं नाही हा त्याचा दोष झाला. :)
14 Sep 2011 - 12:59 pm | प्रचेतस
अजून एक धागा शतकी झाल्याबद्दल स्पाकाकांचे हार्दिक अभिनंदन.
14 Sep 2011 - 1:07 pm | सोत्रि
हा चित्रपट, पैसे खर्चुन पाहण्याचा योग काही अपरिहार्य कारणामुळे आला.
वॉंटेड आणि दबंग पुढे हा फारच सपक आणि निर्बुद्ध शिनेमा वाटला.
सलमानपटात असते तो मसाला अजिबात नाही. मी डोके बाजुला ठेवुनच शिनेमाला बसलो होतो. तरीही बोर झाले.
स्पावड्या,
असे शिनेमात कुठेही म्हटले नाही, ती MBA करुन लग्न होउन लंडनला जाणार असते.
MBA च्या कॉलेजचे नाव सिंबायोसिस दाखवले आहे म्हणुन पुणे स्टेशन आहे.
- (समीक्षक) सोकाजी
14 Sep 2011 - 1:28 pm | शाहिर
हुश्श !!!!
14 Sep 2011 - 2:04 pm | धमाल मुलगा
नुसतं आपलं धरुन फट्याक...धरुन फट्याक!
लेका, त्या सलमानला हे कळलं ना, तर ते लोकलच्या ओव्हरहेड वायरीला धरुन लोंबकळत येईल तुझ्या घरापर्यंत. आणि धू धू धुवेल तुला! :D
15 Sep 2011 - 8:18 am | ५० फक्त
सलमाननं त्याच्या अस्टिस्टंट्ला स्पाची खरडवही पहायला सांगितली होती ते काम एका डुआयडिच्या मार्फत करुन, त्यावरचा स्पा चा फोटो पाहुन त्याच्याघरी येण्याचं कॅन्सल केलं आहे असा निरोप त्याच्या अस्टिस्टंटने स्पाच्या ऑफिसच्या रिसेप्शनिस्टला देताना आम्ही ऐकलं आहे.
14 Sep 2011 - 4:50 pm | चिमी
झकास रे स्पा
न तो शेवटचा हेलिकॉप्टरचा सीन पन सान्गायचास की.
14 Sep 2011 - 5:15 pm | अविनाशकुलकर्णी
धमाल परीक्षण आहे.
प्ण पिकचर नाहि बघनार