उपोशण

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
28 Aug 2011 - 7:19 pm
गाभा: 

अण्णांनी १२ दिवस नुसते पाणी पिवुन उपोशण करुन जनतेस हवे ते मिळवुन दिले...या बद्दल सारा भारत त्यांचा आजन्म रुणी आहे यात शंकाच नाहि..
मराठे लढाया जिंकतात पण तहात हरतात असा आपला ईतिहास आहे..
पण ह्या राळेगणच्या पठ्ठ्याने लढाई तर जिंकलीच पण तह हि मनासाराखा घडवुन आणला.
पण १२ दिवस माणुस नुसत्या पाण्यावर राहु शकतो का? या वर लालु यांनी पण प्रश्न चिन्ह उत्पन्न करुन
ह्या उपोशणाची चौकशी झाली पाहिजे असा सुर संसदेत लावला.
अण्णांनी त्याला उत्तर देताना हे ब्रह्मचर्ये व्रताचे तेज असुन ज्यांना दहा मुले झाली त्यांना ब्रह्मचर्येचे महत्व काय कळणार असा टोला मारला.
त्यांची देखभाल करणारे डाक्टर त्रेयन यांनी पण हे काहि गोष्टींचा मेडीकल सायन्स ला उलगडा झाला नाहि पण हे ब्रह्मचर्ये व्रतामुळे शक्य झाल्याचे म्हटले आहे..
एका चर्चेत श्री खैरनार यांनी पण उपोशणा बाबत स्फोट्क विधाने केली होति..
समुहातिल ्मेडीकल तद्न यावर आपले मत माडुन समुहास माहिति देणार का????

प्रतिक्रिया

चित्रा's picture

28 Aug 2011 - 7:51 pm | चित्रा

अण्णांनी १२ दिवस नुसते पाणी पिन उपोण करुन जनतेस हवे ते मिळवून दिले...या बद्दल सारा भारत त्यांचा आजन्म णी आहे यात शंकाच नाही..
मराठे लढाया जिंकतात पण तहात हरतात असा आपला तिहास आहे..
पण ह्या राळेगणच्या पठ्ठ्याने लढाई तर जिंकलीच पण तह ही मनासाखा घडवून आणला.
पण १२ दिवस माणूस नुसत्या पाण्यावर राहू शकतो का? या वर लालु यांनी पण प्रश्नचिन्ह उत्पन्न करुन
ह्या उपोणाची चौकशी झाली पाहिजे असा सूर संसदेत लावला.
अण्णांनी त्याला उत्तर देताना हे ब्रह्मचर्य व्रताचे तेज असून ज्यांना दहा मुले झाली त्यांना ब्रह्मचर्याचे महत्व काय कळणार असा टोला मारला.
त्यांची देखभाल करणारे डाक्टर त्रेयन यांनी पण हे काही गोष्टींचा मेडिकल सायन्स ला उलगडा झाला नाही पण हे ब्रह्मचर्य व्रतामुळे शक्य झाल्याचे म्हटले आहे..
एका चर्चेत श्री खैरनार यांनी पण उपोणा बाबत स्फोट्क विधाने केली होती..
समुहातील मेडीकल तज्ञ यावर आपले मत मांडून समुहास माहिती देणार का????

४ मि. २० से. चे संपादन. मोबदला शून्य. करमणूक प्राईसलेस.

धन्या's picture

28 Aug 2011 - 8:01 pm | धन्या

हेहे... भावना समजून घ्या ;)

नितिन थत्ते's picture

28 Aug 2011 - 8:12 pm | नितिन थत्ते

मिपावर शुद्धिचिकित्सक?

चित्रा's picture

29 Aug 2011 - 12:36 am | चित्रा

मिपा बदलते आहे ना.. :)

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Aug 2011 - 11:57 pm | बिपिन कार्यकर्ते

४ मि. २० से. चे संपादन. मोबदला शून्य. करमणूक प्राईसलेस.

=))

अविनाशकुलकर्णी's picture

28 Aug 2011 - 8:52 pm | अविनाशकुलकर्णी

अण्णांनी १२ दिवस नुसते पाणी पिऊन उपोषण करुन जनतेस हवे ते मिळवून दिले...या बद्दल सारा भारत त्यांचा आजन्म ॠणी आहे यात शंकाच नाही..
मराठे लढाया जिंकतात पण तहात हरतात असा आपला इतिहास आहे..
पण ह्या राळेगणच्या पठ्ठ्याने लढाई तर जिंकलीच पण तह ही मनासारखा घडवून आणला.
पण १२ दिवस माणूस नुसत्या पाण्यावर राहू शकतो का? या वर लालु यांनी पण प्रश्नचिन्ह उत्पन्न करुन
ह्या उपोषणाची चौकशी झाली पाहिजे असा सूर संसदेत लावला.
अण्णांनी त्याला उत्तर देताना हे ब्रह्मचर्य व्रताचे तेज असून ज्यांना दहा मुले झाली त्यांना ब्रह्मचर्याचे महत्व काय कळणार असा टोला मारला.
त्यांची देखभाल करणारे डाक्टर त्रेयन यांनी पण हे काही गोष्टींचा मेडिकल सायन्स ला उलगडा झाला नाही पण हे ब्रह्मचर्य व्रतामुळे शक्य झाल्याचे म्हटले आहे..
एका चर्चेत श्री खैरनार यांनी पण उपोषणा बाबत स्फोट्क विधाने केली होती..
समुहातील मेडीकल तज्ञ यावर आपले मत मांडून समुहास माहिती देणार का????

कुंदन's picture

28 Aug 2011 - 8:59 pm | कुंदन

पेण्यापुर्वी :
अण्णांनी १२ दिवस नुसते पाणी पिवुन उपोण करुन जनतेस हवे ते मिळवुन दिले...या बद्दल सारा भारत त्यांचा आजन्म रुणी आहे यात शंकाच नाहि..

पेयल्यानंतर :
अण्णांनी १२ दिवस नुसते पाणी पिन उपोण करुन जनतेस हवे ते मिळवून दिले...या बद्दल सारा भारत त्यांचा आजन्म णी आहे यात शंकाच नाही..

कानडाऊ योगेशु's picture

28 Aug 2011 - 11:47 pm | कानडाऊ योगेशु

जनलोकपाल बिलाचा मिसळपाव ड्राफ्ट बनवताहात का काय लेको?

नगरीनिरंजन's picture

28 Aug 2011 - 9:17 pm | नगरीनिरंजन

तज्ञ की तज्ज्ञ?

बाकी "ब्रह्मचर्य हेच जीवन, वीर्यनाश हाच मृत्यु" अशा घोषणा हल्ली दिसत नाहीत. :)

-(मर्त्य मृत मुमुर्षु) नगरीनिरंजन

चित्रा's picture

29 Aug 2011 - 12:54 am | चित्रा

बहुदा तज्ज्ञ असावे. पण तेवढे सांभाळून घ्या. :)

याचे लेखन कसे करावे याविषयी येथे अधिक माहिती मिळाली.
http://www.manogat.com/node/2634

-(मर्त्य मृत मुमुर्षु) नगरीनिरंजन

खपलो!!!
=)) =)) =))

ब्रह्मचर्याचा आणि उपोषणाचा काय संबंध ? आण्णा आपले काहीही डायलॉग मारतात..
"अण्णा उपोषणा दरम्यान ग्लुकोज, इलेक्ट्रॉल घेतात" म्हणून त्यांची साथ सोड्ली असे सांगणार्‍या काही क्लिप्स इथे मागे कुणीतरी टाकल्या होत्या. असे सांगणार्‍या लोकांना ठोकून काढायला पाहिजे.
लेको एखाद्या माणसानं खरंच १०/१२ दिवस उपाशी राहायला पाहिजे हा कुठल्या न्याय आहे? तो अन्नत्याग करुन ग्लुकोज / इलेक्ट्रॉल घेतोय एवढं पुरेसं नाही का?
अर्थात अण्णा खरंच ग्लुकोज / इलेक्ट्रॉल घेतात असं मला म्हणायचं नाही.. पण घेत असतील तर उत्तम!

अत्रुप्त आत्मा's picture

29 Aug 2011 - 12:54 am | अत्रुप्त आत्मा

आमचही हेच म्हणण आहे. अफझलखान मारायचा असेल....तर त्याच्याशी दगाच करावा लागतो... आणी प्रामाणिकपणे जे वागायला हवं होतं,तस तर अण्णा वागलेच होते की,पण सत्ताधाय्रांनी वेळोवेळी दगाच दिला ना? मग त्यांच्याशी कशाला पूर्ण प्रामाणीकपणे वागायला पाहिजे?...