मिसळपाव माझ्यासाठी

आशु जोग's picture
आशु जोग in काथ्याकूट
27 Aug 2011 - 12:29 am
गाभा: 

अनेक मिसळकरांना असे वाटते
मिसळपाव ही माझ्यासाठी काय आहे ? यापेक्षा मिसळपाव काय नाही !

हे माझे घर आहे इथेच मुक्काम करावा हलूच नये,

हे माझे अन्न आहे, ते खाल्ल्याशिवाय आमचे पोटच भरत नाही

मिसळपाव काय आहे नेमके ---साध्य की साधन.... ? ??

काय आहे तुमच्यासाठी मिसळपाव म्हणजे ?
काय दिलं मिसळीनी आम्हाला...

--

ज्यांचे पोट ठीक आहे त्यांनीच रतीब घालावा
बाकीच्यांनी १ दिवस विश्रांती घेतली तरी चालेल
सगळ्यांना त्रास नको

प्रतिक्रिया

शुचि's picture

27 Aug 2011 - 12:46 am | शुचि

हे दिलं मला तरी. या धाग्यात सापडेल.
>> कुंभाराच्या चाकावर फिरणार्‍या गोळ्याला त्याचे पाण्याने भिजलेले नाजूल हात लागून घाटदार मडके घडावे तसा ह्या अदृष्य पण भावनेने भिजलेल्या हातांनी हा पिंड घडत असतो.
कुणाला देशी मडक्याचा आकार येतो, कुणाला विदेशी कपबशीचा!>>

आशु जोग's picture

27 Aug 2011 - 12:51 pm | आशु जोग

अनेक मिसळकरांना असे वाटते
मिसळपाव ही माझ्यासाठी काय आहे ? यापेक्षा काय नाही !

हे माझे घर आहे इथेच मुक्काम करावा हलूच नये, दुसरा कुणी आला तर
त्याला हुसकवून लावावे

हे माझे अन्न आहे, ते खाल्ल्याशिवाय आमचे पोटच भरत नाही

मिसळपाव ही वाट आहे मिसळपाव हा घाट आहे

मिसळपाव एक मकाम आहे मिसळपाव राह आहे
मिसळपाव एक चालणे आहे मिसळपाव एक बोलणे आहे
मिसळपाव एक रडणे आहे मिसळपाव एक कण्हणे आहे

मिसळपाव एक दुखणे आहे मिसळपाव एक खुपणे आहे
मिसळपाव खुपते तिथे गुप्ते आहे, मिसळपाव एक व्यासपीठ आहे
मिसळपाव एक छुटकारा आहे मिसळपाव एक तिटकारा आहे

मिसळपाव एक रुसणे आहे मिसळपाव एक त्रासणे आहे

मिसळपाव एक प्रवास आहे मिसळपाव एक श्वास आहे

काय आहे तुमच्यासाठी मिसळपाव म्हणजे ?

परिकथेतील राजकुमार's picture

27 Aug 2011 - 1:18 pm | परिकथेतील राजकुमार

कुठल्याशा लेखावर हे वाचनात आले :-

Submitted by आशु जोग on Fri, 26/08/2011 - 23:48.

माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण आहे
(हे मिसळीवर जरा दुर्मिळ आहे)

बाकी चालु द्या...

आशु जोग's picture

1 Sep 2011 - 3:04 am | आशु जोग

ठँक यु

आपण ही सहमत आहात तर

विश्वनाथ मेहेंदळे's picture

27 Aug 2011 - 2:20 pm | विश्वनाथ मेहेंदळे

माझ्यामते, माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण लेखन हा मिपा चा USP कधीच नव्हता. (त्यासाठी उपक्रम आहे) मग तसे बोलले तर काहीही बिघडले नाही.

बाकी चालु द्या... (किंवा थांबू दिलेत तरी चालेल)

स्पा's picture

27 Aug 2011 - 2:25 pm | स्पा

मस्तच आवडेश छान जिलब्या .

संपादकांचा प्रतिसाद आला आहेच. अजुन काय लिहिणे. ;)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

27 Aug 2011 - 9:13 pm | विश्वनाथ मेहेंदळे

कोण संपादक ?? म्हणजे वरील पैकी नक्की कोण संपादक आहे ?

अत्रुप्त आत्मा's picture

27 Aug 2011 - 3:11 pm | अत्रुप्त आत्मा

त्यो जोरात करंट देनारा नाष्टा हाय?....मधुन मधुन करत जावं...पोटाला बी बेश्ट...बेटरी बी चार्ज ह्रातीया... ;-)

खरंच सांगते मिसळ पाव माझ्यासाठी टॉनिक आहे !!!!!!!

साधारण एक वर्षापुर्वीची गोष्ट आहे. इंटर्शियल पल्मनरी फायब्रोसिस आजाराकरीता घेतलेल्या गोळ्यांनी साईड इफेक्टस झाले. आणि माझ्या डोक्यावरचा केस न केस गायब झाला. पापण्यांचे केस, भुवया वगळता अंगावर एकही केस शिल्लक राहिला नाही. संपूर्ण शरीर सुजले. नजर कमजोर झाली. संपूर्ण तोंड, ओठ, गळा स्कार्सनी (छाल्यांनी) आतून सोलवटून निघाला. जेवण सोडा पण ज्यूस किंवा पाणी पिण्यासाठीसुद्दा ओठ विलग करता येईनात. चक्क स्ट्रॉने ज्यूस किंवा पाणी पोटात ढकलावे लागले. परिणामतः प्रचंड अशक्तपणा आला. अवती भवतीच्या जगाचे भान नाहीसे झाले. महिनाभर इंजेक्शन्स टोचून घेतल्यावर हळूहळू साईड इफेक्टसचे परिणाम कमी झाल्यावर पहिले भान झाले ते केशविरहीत विद्रुप रुपाचे! ते रुप बघून एकदम उध्वस्त झाले. खचून गेले. हे आता असेच विकेशा म्हणून जगावे लागेल का ह्या भितीने हादरुन गेले. जगण्याची उरली सुरली आसक्तीही गमावून बसले. बदललेली ऑषधे काम करेनाशी झाली. ..........

आणि अशावेळी मला मिसळ पाव गवसले. मिसळ पाववरील परा, टारझन, धमु, गवि, ५० फक्त, पुपे, नितिन थत्त्ते, चतुरंग, मृत्युंजय, बिका, छोटा डॉन,....... (माफ करा काही नावे राहिली असतिल), वगैरेंच्या भन्नाट लिखाणांनी, प्रतिसादांनी, एकमेकांना दिलेल्या मिश्किल कोपरखळ्यांनी, हळूच काढलेल्या चिमट्यांनी मी वेडावले. झपाटल्यासारखी मी सकाळ संध्याकाळ ह्या अचाटवीरांचे अफाट लिखाण वाचू लागले. वेगवेगळ्या विषयावरील लेख, कथा, कविता, वगैरे विविध साहित्य वाचू लागले. माझ्या शारिरीक आणि मानसिक वेदना मला जाणवेनाश्या झाल्या. जणू मला जगण्याची नव संजिवनी लाभली ! टॉनिक मिळाले..............!!!!!!!!!!!

धन्यवाद!!!!!!!!! मिपाकर संपादक मंडळ आणि मिपाकर बंधू भगिनींनो, शतशः धन्यवाद!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

या आणि अशाच प्रतिसादांमुळे लिहिलेल्या अक्षर अन अक्षराचं सार्थक होत असतं.

खूप बरं वाटलं.. सर्वांच्या वतीने मी ही भावना बोलून दाखवतोय..

चतुरंग's picture

28 Aug 2011 - 5:16 pm | चतुरंग

आपण लिहिलेले कोणी वाचले आणि त्यांना ते कोणत्या ना कोणत्या स्वरुपात उपयोगी पडले ही जाणीव समाधान देणारी आहे. पुढील लेखनाला हुरुप आला!
श्यामलताई तुमच्या मनमोकळ्या प्रतिक्रियेबद्दल तुम्हाला धन्यवाद आणि तुम्ही लवकर बर्‍या व्हा अशा शुभेच्छा!

(समाधानी)रंगा

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Aug 2011 - 8:41 pm | बिपिन कार्यकर्ते

गवि आणि रंगो बापूजींशी सहमत!

छोटा डॉन's picture

29 Aug 2011 - 3:11 pm | छोटा डॉन

हेच म्हणतो.
आम्ही लिहलेले काहीही किडुकमिडुक कुणाच्यातरी आयुष्यात कुठल्या ना कुठल्या स्वरुपात आनंद देऊन जाते ही भावना अचंबित करुन गेली आणि त्यामुळे किंचित समाधानही वाटले.
तुम्ही असेच रेग्युलर मिपावर येत जाता आणि मिपाकरही तुम्हाला भरभरुन आनंद देतील असे मी सर्वांतर्फे आश्वासन देतो.

लवकर बर्‍या होण्यासाठी तुमच्यासाठी सदिच्छा आहेतच :)

- छोटा डॉन

परिकथेतील राजकुमार's picture

29 Aug 2011 - 3:14 pm | परिकथेतील राजकुमार

श्यामलताई तुमच्या मनमोकळ्या प्रतिक्रियेबद्दल तुम्हाला धन्यवाद आणि तुम्ही लवकर बर्‍या व्हा अशा शुभेच्छा!

:)

लवकर बर्‍या व्हा आणि इथे लिहीत्या पण व्हा.

आत्मशून्य's picture

28 Aug 2011 - 5:22 pm | आत्मशून्य

.

मृत्युन्जय's picture

28 Aug 2011 - 11:41 pm | मृत्युन्जय

+१

बाकी तुमच्या डोक्यावर केस परत उगवले हे वाचुन बरे वाटले. साले आमचे एकदा गेले ते गेलेच. :)

आता तब्येत कशी आहे?
लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा!

शिल्पा ब's picture

28 Aug 2011 - 9:54 am | शिल्पा ब

असेच विचारेन. काळजी घ्या.

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Aug 2011 - 8:40 pm | बिपिन कार्यकर्ते

श्यामल,

मी या धाग्यावर एक काहीतरी आचरट प्रतिसाद देणार होतो. गंमत म्हणून. पण तुमचा प्रतिसाद वाचून एकदम चपराक बसली आणि भानावर आलो. प्रतिसाद कँसल.

तुमच्या आजारपणाबद्दल वाचून वाईट वाटले. लवकरात लवकर बरे होण्यासाठी मनःपुर्वक शुभेच्छा!

तुम्हाला इथे नियमितपणे बघायला आणि दंगा घालताना बघायला आवडेल!

_/\_

अर्धवटराव's picture

1 Sep 2012 - 6:26 am | अर्धवटराव

मिपाकरहो... आयुष्यात आपण असं काय ग्रेट केलं हा प्रश्न यापुढे कधी तुम्हा - आम्हाला पडणार नाहि.
एक सुखद, प्रखर मिपाकर असल्याचा अभिमान दाटुन आला मनात.
जय हो.

अर्धवटराव

आशु जोग's picture

1 Sep 2012 - 2:35 pm | आशु जोग

जय हो

श्यामल's picture

28 Aug 2011 - 11:15 am | श्यामल

गवि, धन्यवाद!

रेवती, शिल्पा ब, आता माझी तब्बेत बर्‍यापैकी बरी आहे. धन्यवाद ! डोक्यावर पुरेसे जंगलही उगवले आहे.

आतापर्यंत फक्त वाचनमात्र होते. तुम्हां सार्‍यांसारखे मुद्देसुद, प्रवाही लेखन करायला जमत नाही. म्हणून नेहमी प्रतिसाद द्यायची टाळाटाळ करीत होते. पण मिपावरचे खट्याळ, खोडकर पण तरीही अतिशय निर्मळ, खेळकर वातावरण मला आजही भुरळ घालते. म्हणून झणझणीत मिपाची वारी नियमित चालू आहे.......

अरे हां, कृपया मला प्रतिसादात स्मायली कशा अ‍ॅड करायच्या हे कुणी सांगेल का?

जाई.'s picture

28 Aug 2011 - 12:09 pm | जाई.

खरड केली आहे

डोक्यावर पुरेसे जंगलही उगवले आहे.

हे झ्याक झाले! :)

माझ्या बायकोचे नावही श्यामल आहे (माझे नाव ब्रिजेश म्हणजे श्याम) :)
मग एक्दम तिच्या डोक्यावरचे केस गेल्यावर ती कशी दिसेल असा एक हलकट विचार डोक्यात चमकुन गेला :evil:
(ह.घे.हे.सां.न.ल.)

मला मिपाने हा खेळकरपणा दिला. तुमच्यासारख्याच अनेक जिंदादिल लोकांशी ओळखी करुन दिल्या.
मिपा आता घरातलीच एक खोली वाटते.

म्हणून नेहमी प्रतिसाद द्यायची टाळाटाळ करीत होते.

लिहा... बिनधास्त लिहा, मनापासुन लिहा. (फक्त जिलब्या पाडु नका) ;)

- (अती हलकट) सोकाजी

आशु जोग's picture

28 Aug 2011 - 3:07 pm | आशु जोग

श्यामलताई,

आपला प्रतिसाद आवडला. तो कायम लक्षात राहील.

आपल्याला शुभेच्छा. त्याव्यतिरीक्त माझ्याकडे काहीच नाही

चेतन सुभाष गुगळे's picture

28 Aug 2011 - 5:10 pm | चेतन सुभाष गुगळे

महाजालाच्या आगमनाबरोबरच हा शब्दही चर्चिला जाऊ लागला. मला वाटतं महाजालावरील या संकेतस्थळाला देखील हाच शब्द अगदी चपखल लागू होतो. वास्तव जीवनात असतात तसेच इथेही चांगले, वाईट, तटस्थ, विरोधक, प्रशंसक सर्व प्रकारचे लोक भेटतात. अनेकदा सुरूवातीला भांडलेले नंतर चांगले मित्र होतात. त्यात देखील एक गंमत आहे - विरोधक त्यांचा रोष इथे संकेतस्थळावरच प्रगट करतात तर समर्थक अनेकदा व्यक्तिश: संपर्क साधून देखील पाठिंबा देतात. म्हणजेच यातना आभासी जगातच राहतात तर आनंद आपल्या वास्तविक जीवनात देखील पसरतो.

कधी कधी इतके नैराश्य जाणवते की हे स्थळ सोडून द्यावेसे वाटते (असा प्रत्यय तर आपल्या वास्तविक जीवनात देखील येतो, आहे की नाही साम्य). मला ही असेच वाटावे असा प्रसंग एकदा आला, मग मी बराच काळ या संकेतस्थळावर फिरकलो देखील नाही. तरीही अनेक जण मला सतत इथे परतण्याचा आग्रह करीत होते. इथल्या लेखांचे दुवे वारंवार ईमेल ने पाठवित होते. पण मी बाहेरच. म्हणजे त्यांनी दिलेल्या दुव्यांवरचे लेख वाचायचो पण खात्यात प्रवेश न करता. शेवटी हे चटकदार लेख आणि त्यावरचे प्रतिसाद वाचून इथे परण्याचा मोह जागृत झालाच (मला दुवे पाठविणार्‍या मित्रांचा उद्देश सफल झाला). मग मोठ्या कालावधीनंतर (खरे तर एवढा काळ माझे खाते जिवंत राहिले आणि गोठविले गेले नाही हे एक आश्चर्यच) मी पुन्हा इथे लेख प्रकाशित करायला (काही सदस्यांच्या मते - जिलब्या पाडायला) सुरूवात केली. बरे, वाईट, प्रशंसात्मक, नकारात्मक, प्रोत्साहनपर, हेटाळणीयुक्त असे अनेक प्रकारचे प्रतिसाद मिळायला सुरूवात झाली. प्रतिक ठाकूर (गणपा) च्या मार्गदर्शनामुळे माझ्या ज्ञानात भर पडली.

वास्तविक जीवनात तुम्ही जर कंटाळून एकदा खेळ सोडलात तर तुम्हाला परतण्याची संधी मिळत नाही. इथे ती मिळते हा या आभासी जगाचा फायदा. शिवाय हे जग इथले थोडेफार लेखक, प्रतिसादक यांच्यापुरतंच मर्यादित नाहीय. इथे खाते न खोलता ही हे संकेत स्थळ वाचणारे अनेक जण आहेत. जसे की आता पाहा इथे 14 users and 67 guests आहेत. अनेक दा ही संख्या तीन आकडीही असते. ह्यांना इथे प्रतिसाद देणे शक्य नसले तरी हे लोक ही नियमित मला व्यक्तिश: संपर्क साधून बरे वाईट शेरे कळवित असतात (या करिताच मी नेहमी स्वाक्षरीत संपर्क तपशील देत असतो).

आता मिसळपाव आपल्या साठी काय आहे? म्हंटलं तर सारं काही - म्हंटलं तर काहीच नाही. चित्रपट / दूरचित्रवाणी पाहिलं नाही तर आयुष्य अडतं का? नाही ना? तरीही आपण पाहतोच की. का? असलेलं आयुष्य अजुन रोमांचकारी बनविण्यासाठी. मिसळपाव चं आपल्या आयुष्यातलं हेच स्थान आहे. हे थ्रिल अनुभवताना चक्करल्यासारखं व्हायला लागलं तर सरळ बाहेर पडायचं. पुन्हा जरा वेळानी बरं वाटलं तर या भुलभुलैय्यात शिरायचं धाडस करायचं. या चक्रव्यूहात आपण मरणार नाही हे नक्की.

प्रीत-मोहर's picture

28 Aug 2011 - 9:39 pm | प्रीत-मोहर

बिका चाचाजान शी सहमत

पैसा's picture

28 Aug 2011 - 9:44 pm | पैसा

खरं सांगायचं तर धागाकर्त्यांना काय म्हणायचं आहे नीटसं कळलं नाही, पण श्यामल आणि श्री. गुगळे यांचे प्रतिसाद आवडले.

श्यामल लवकर बर्‍या व्हा आणि मिपावरचा गोंधळ वाढवायला मदत करा.. ;)

श्यामल's picture

28 Aug 2011 - 10:55 pm | श्यामल

चतुरंग, बिका, आत्मशून्य, जाई.साहित्ययात्री, आशु जोग, गुगळे, प्रीत-मोहर, पैसा तुम्हां सार्‍यांच्या शुभेच्छाबद्दल खूप
खूप धन्यवाद ! :smile:

>>> माझ्या बायकोचे नावही श्यामल आहे. मग एक्दम तिच्या डोक्यावरचे केस गेल्यावर ती कशी दिसेल असा एक हलकट विचार डोक्यात चमकुन गेला (ह.घे.हे.सां.न.ल.)>>>

सोकाजीराव, हे तुमचे उदात्त विचार फक्त वहिनींपर्यंत पोहोचू दे, मग तुमची बिन पाण्याने कशी होईल याचे नेत्रसुखद कल्पनाचित्र नजरेसमोर उभे राहिले. :wink: जरा वहिनींचा भ्र.ध्व.क्र. देता का?....................

माझीही शॅम्पेन's picture

28 Aug 2011 - 11:27 pm | माझीही शॅम्पेन

सोकाजीराव, हे तुमचे उदात्त विचार फक्त वहिनींपर्यंत पोहोचू दे, मग तुमची बिन पाण्याने कशी होईल याचे नेत्रसुखद कल्पनाचित्र नजरेसमोर उभे राहिले. जरा वहिनींचा भ्र.ध्व.क्र. देता का?

वाह शामल ताई ! ही झाली मिपा-धर्माशी साजेल अशी प्रतिक्रिया.

मी काही तर फाल्तू प्रतिक्रिया द्यायला आलो , तुमची ह्या धग्यावरील पहिली प्रतिक्रिया वाचली आणि स्तंभित झालो.

लवकरात लवकर १००% बर्‍या होऊन दंगा करायला या !! येवा (दंगा करायला) मिपा आपलाच असा !!!

प्रीत-मोहर's picture

28 Aug 2011 - 11:35 pm | प्रीत-मोहर

आत्तासुद्धा दंग्याला सुरवात करायला हरकत नाहीये. त्याला बर होणे हा क्रायटेरिया नाहीये :)

माझीही शॅम्पेन's picture

28 Aug 2011 - 11:55 pm | माझीही शॅम्पेन

अहो प्री-मो क्रायटेयरीया तुम्ही लावतय :)

बिपिन कार्यकर्ते's picture

29 Aug 2011 - 12:02 am | बिपिन कार्यकर्ते

त्याला बर होणे हा क्रायटेरिया नाहीये

खरंय! ;)

प्रीत-मोहर's picture

29 Aug 2011 - 12:14 am | प्रीत-मोहर

सहमती दर्शविल्याबद्दल धन्यु बरका चाचाजान ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Aug 2011 - 12:23 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

श्यामल, आता कशा एकदम 'आतल्या' वाटलात! ;-)

तब्येतीची काळजी तर तुम्ही घेत आहातच पण केस गेले तर गेले, 'पर्सिस खंबाटा' कट आहे असं द्यायचं सांगून! जास्त त्रास करून घ्यायचा नाही.

आशु जोग's picture

28 Aug 2011 - 10:59 pm | आशु जोग

>> खरं सांगायचं तर धागाकर्त्यांना काय म्हणायचं आहे नीटसं कळलं नाही, पण श्यामल आणि श्री. गुगळे यांचे प्रतिसाद आवडले <<

फारच अपेक्षा बुवा

स्पंदना's picture

29 Aug 2011 - 6:43 am | स्पंदना

बर्‍याच दा लिहिलेल आड्मार्गाला जातान दिसत इथ, पण आज अगदी पहिल्यांदाच, 'काय बी' लिहिलेल्याला मार्गावर आणल ते या श्यामलच्या प्रतिसादान.
बाय द वे श्यामल केस गेल्याच दु:ख वेगळ ठेवल तर डोक किती साफ धुता येत होत हा एक फाय्दा राहिलाच की सांगाय्चा... (ह. घे.)

वरील आआआआदिती ( चेक इट 'आ" ) चा पर्सीस खंबाटा ही सुरेखच!

>>> तब्येतीची काळजी तर तुम्ही घेत आहातच पण केस गेले तर गेले, 'पर्सिस खंबाटा' कट आहे असं द्यायचं सांगून! जास्त त्रास करून घ्यायचा नाही.>>>

आदिती, सध्या 'पर्सिस खंबाटा' कटाऐवजी मी बॉयकट करुन मिरवतेय. नाहीतरी फार दिवस इच्छा होती बॉयकट करायची. आता अधिकृतरित्या ती पूर्ण करुन घेतेय. थोड्क्यात काय तर जो होत्ताय अच्छेके लिये होत्ताय !............ :wink:

>>> बाय द वे श्यामल केस गेल्याच दु:ख वेगळ ठेवल तर डोक किती साफ धुता येत होत हा एक फाय्दा राहिलाच की सांगाय्चा... (ह. घे.)>>>

अपर्णा अक्षय, अग फक्त डोक किती साफ धुता येत होत हा एक फायदा तर होताच. पण भांग पाडण्यात आणि केशरचना करण्यात जाणारा अमूल्य वेळही वाचत होता. गेले ते दिन गेले......... :bigsmile:

बिपिन कार्यकर्ते's picture

29 Aug 2011 - 2:10 pm | बिपिन कार्यकर्ते

दिती असे लिहिल्याबद्दल तुमचे अभिनंदन करणेत येत आहे!

बघा श्यामलताई. तुम्ही नशीबवान आहात. इथे तुमची तब्ब्येतीविषयी आपुलकीने चवकशी होते आहे.

मी मधे जरा आजारी पडलो तर इथल्या काही मित्रांनी थेट वड्याचे पीठ मळायला घेतल्याचं मला आणखी काही मित्रांनी सांगितलं.

केवढी ही सूडभावना.. ?

असले मित्र असल्यावर वेगळे शत्रू कशाला हवेत ? ;)

(तुम्ही आता बर्‍या झाल्याचे म्हणाला आहात म्हणून या विषयावर गंमत करु धजावतोय..)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

29 Aug 2011 - 2:39 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>>केवढी ही सूडभावना.. ?
अशी भावना असणाऱ्याला स्वयंपाक न करता येणारी बायको मिळेल असा शाप द्या. करू देत वडे जन्मभर.
(आधी आय.टी. वाईफ असे लिहिणार होतो, नंतर म्हटले, नको. सूड राहायचा बाजूला आणि माझ्यासाठी वडे करायची वेळ येईल)

बिपिन कार्यकर्ते's picture

29 Aug 2011 - 7:42 pm | बिपिन कार्यकर्ते

पुन्हा संधी मिळाल्यास आम्हालाही बोलावा म्हणतो... आम्हाला पण वडे आवडतात.

ओ गवि, ब्राउ पूर्ण करा आणि वाट्टेल ते करा!
तो केळ्या मनोरुग्ण असल्याचा अंदाज आहे माझा!
झायरात: येत आहेत, येत आहेत, येत आहेत्........तंबिटाचे लाडू!

श्यामलताई
मी खरतर या धाग्यावर एक वात्र्ट प्रतिक्रीया द्यायला आलो होतो.
पण तुमचा अनुभव वाचला आणि मत एकदम बदलले.
मिपा ने मला बरेच मित्र दिले. पुन्हा कॉलेजच्या क्यान्तीनमधली चकाट्यांची मजा दिली.
दिल्ली सारख्या गावात मला हक्काचा मित्र असू शकतो. तो गावाकडून आलेल्या पाहुण्याचे आतिथ्य करेल तितक्याच आतिथ्याने घरी बोलावून फर्मास जेवणाचा बेत करतो.
मिपावरील सदस्यांच्या कडे तुम्ही घरी कधी गेलात तर त्यांच्या घरातील सर्वाना तुमच्या बद्दल माहिती असते. हा विषेश मला सर्वांकडेच आढळला.
मिपामुळे मला खरेच कुठेही गेलो तरी घरापासून दूर असल्याचे फिलींग येत नाही.
श्यामलताई तुमच्या साठी एक आम्हा सर्व मिपाकरांकडुन एक मिपा वरील सर्वात धम्माल कविता भेट
या इथे http://misalpav.com/node/6332

मिसळीबाबतचे धागे येउ लागले आहेत हल्ली

श्यामल's picture

29 Aug 2011 - 3:06 pm | श्यामल

>>>मी मधे जरा आजारी पडलो तर इथल्या काही मित्रांनी थेट वड्याचे पीठ मळायला घेतल्याचं मला आणखी काही मित्रांनी सांगितलं.

केवढी ही सूडभावना.. ?

असले मित्र असल्यावर वेगळे शत्रू कशाला हवेत ? >>मी मधे जरा आजारी पडलो तर इथल्या काही मित्रांनी थेट वड्याचे पीठ मळायला घेतल्याचं मला आणखी काही मित्रांनी सांगितलं.>>> :lol: :bigsmile:

गवि, हसून हसून डोळ्यात पाणी आले. किबोर्ड दिसत नाहीय.........

>>>श्यामलताई, तुमच्या साठी एक आम्हा सर्व मिपाकरांकडुन एक मिपा वरील सर्वात धम्माल कविता भेट
या इथे http://misalpav.com/node/6332>>>>>>

विजुभाऊ, मस्त भेट! आवडली.

स्पा's picture

29 Aug 2011 - 6:40 pm | स्पा

शामल तै . तुम्ही लवकर बर्या व्हालच.. नव्हे झालात हात...
आता लिहित्या व्हा....

अगदीच गरज पडली तर साचा भेट दिल्या जाईल ;)

जगड्या's picture

29 Aug 2011 - 8:56 pm | जगड्या

खरे तर मिपा वरील बरेच लेख, मिपा माहित नसतानापासून मित्रांच्या ढकलपत्रा मधून वाचण्यात येत होते. पण मीपा ची पहिली ओळख झाली ती "It wife " या लेखामधून. एका मित्राच्या ढकलपत्रा मधून ती लिंक उघडली व मिसळपाव.कॉम पहिले. या लेखावरील प्रतिक्रिया व चर्चा आणखीन हि वेळ मिळाल्यावर वाचतो. विशेषत: अदिती तै ( तै हा शब्द इथेच पहिल्यांदा पहिला)च्या प्रतिक्रिया म्हणजे एकदम जबरदस्त ! या लेखामुळेच मिपाशी जोडला गेलो असे वाटते.

बर्याचदा मी येथे येतो ते "पॉप कोर्न" घेउनच, कारण लेख, कविता लिहिणे व ते हि येथे, हे केवळ अशक्यच !
ढकल पत्रावरील बरेच जोक्स वाचले, पण office मधील वातावरनात एकटाच खदखदून हसलोय ते मिसळपाव वरील "comments " वाचून !
कितीही कंट्रोल केले तरीही दररोज एकदा तरी मिपा वर आल्याशिवाय राहवत नाही, हीच मिपा ची खासियत वाटते !!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Aug 2011 - 11:38 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ठांकू हां ठांकू! जबरदस्त वगैरे विशेषणं आपल्याला आवडतात. थोडा आणखी वेळ मिळाला की खवउपा सुरू करा, आणखी मजा येते. ही थोडी अ‍ॅब्स्ट्रॅक्ट चव आहे, पण सवयीने हे आवडू लागतं. ;-)

आशु जोग's picture

29 Aug 2011 - 11:16 pm | आशु जोग

ढकलपत्र

आवडले प्रथमच ऐकले