गाभा:
अण्णांच्या आंदोलानाच्या निमित्ताने काही चर्चा ऐकल्या
आणि काही शंका मनात आल्या
माहिती अधिकार कायदा काय आहे ?
RTI Activist म्हणजे काय ?
अण्णांना या कायद्याचे जनक म्हणतात ते का ?
त्यांचे यामधे योगदान काय.
दुसरी बात
गेल्या आठवड्यात भोपाळला एका RTI Activist ची हत्या झाली
मागील वर्षी पुण्यातही एकाची हत्या झाली
असं काय आहे या कायद्यात की ज्याला एवढे घाबरावे ?
माहिती मिळाली तर आनंद होइल
टीप - ज्यांना माहिती असेल त्यांनीच इथे माहितीची भर घालावी
बाकीच्यांनी इथे सकाळची कामे करू नयेत, ती इतरत्र उरकावीत)
प्रतिक्रिया
21 Aug 2011 - 9:31 pm | नर्मदेतला गोटा
अण्णांचे योगदान काय आहे हीदेखील उत्सुकता आहे
21 Aug 2011 - 9:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माहितीचा अधिकार कायदा आणि माहितीसाठी हा दुवा पाहा. .
>>>>अण्णांना या कायद्याचे जनक म्हणतात ते का ?
माहितीच्या अधिकाराचा कायदा होण्यासाठी देशातील अनेक संस्थांनी, व्यक्तींनी, आपापल्या पातळीवर प्रयत्न केले होते. महाराष्ट्रात श्री अण्णा हजारेंनी प्रयत्न केले. इतकेच जनकत्वाच्या मुद्याबद्दल बोलता येईल.
>>>असं काय आहे या कायद्यात की ज्याला एवढे घाबरावे ?
इंग्रजांनी गोपनीयतेचा कायदा केलेला होता. इंग्रज गेले तरी कायदा तसाच राहीला. पुढे वेगवेगळ्या सामाजिक चळवळींनी माहिती अधिकार कायद्यासाठी प्रयत्न केले. कायद्यात काय असावे, नसावे, यासाठी समिती स्थापन करुन २००० आणि २००५ ला माहितीचा अधिकार कायद्यात बदल होऊन माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी सुरु झाली. आता झालं काय. आपल्याला सर्व शासकीय स्तरावर माहितीच्या बाबतीत सामान्यांपासून माहिती ’लपवून” ठेवण्याच्या सवयी लागलेल्या होत्या.
भ्रष्टाचार करता येत होता. आता मागेल ती माहिती माहिती अधिकारात द्यावी लागत आहे. माहिती मागणारे जेव्हा अडचणीची माहिती मागू लागले. रेकॉर्ड उपलब्ध नसणे, घोळ करुन ठेवणे आणि इतर-इतर कारणामुळे माहिती देण्याच्या बाबतीत हा कायदा काहींना अडचणींचा ठरु लागला आणि अनेक समस्याही त्याबरोबर निर्माण होऊ लागल्या.
चुभुदेघे.
-दिलीप बिरुटे
22 Aug 2011 - 5:26 pm | पप्पु अंकल
फार छान दुवा दिला आहे.
22 Aug 2011 - 5:44 pm | तिमा
माहितीच्या कायद्याच्या अधिकारात 'वरील सर्व विषय' येतात हे माहित नव्हते.
23 Aug 2011 - 3:50 pm | इरसाल
चला तुमच्या निमित्ताने का होईना मलाही ह्याची समग्र माहिती मिळेल अशी आशा बाळगतो.
तुमचे आणि बिरुटे सरांचे मनापासून आभार.
अवांतर: लेखातील सगळ्यात शेवटचे वाक्य आवडले.
23 Dec 2011 - 12:09 am | नर्मदेतला गोटा
अवांतर: लेखातील सगळ्यात शेवटचे वाक्य आवडल
भले शाबास
पण माहिती अधिकार नन्तर
लोकपाल अण्णांच्या नावावर लागणार काय !