बोगदा

हेरंब's picture
हेरंब in काथ्याकूट
25 May 2008 - 11:43 am
गाभा: 

परवा पुण्याहून मुंबईला येत होतो. बरेचवेळा वाचलेली पाटीच परत वाचली.
' बोगदा पुढे आहे.' नेहमीप्रमाणेच खटकले, असं का लिहिलाय ? 'पुढे बोगदा आहे' असं का नाही ?
मग आठवलं, दादांच्या 'पांडू हवालदार' च्या टायटल्स् दाखवताना अशीच मजा केली होती.
पांडू हलवादार - दांडू हलवापार वगैरे वगैरे. म्हणून या वाक्याचं पण असेच करुन पहावे असं मनांत आलं.
बोगदा पुढे आहे.
बोगदा आहे पुढे.
पुढे बोगदा आहे .
पुढे आहे बोगदा.
आहे पुढे ,बोगदा!
आहे बोगदा पुढे.

सरकारी खात्यातल्या लोकांना कुठला पर्याय योग्य वाटेल ?

प्रतिक्रिया

बोगदा संपल्यावर ......
...
..
..
.
बोगदा मागे गेला ....

संजय अभ्यंकर's picture

25 May 2008 - 12:46 pm | संजय अभ्यंकर

योग्य वाक्य!
८० की.मी. वेगाने गाडी चालवताना क्षणार्धात वाचता येइल अशीच वाक्य रचना हवी.

केवळ बोगदा या शब्दावरुन नजर फिरली तरी पुढे बोगदा आहे हे कळते आणी चालक सावध होतो.
मुंबई - पुणे महा मार्गावर अनेक अपघात बोगद्याच्या असपास अथवा बोगद्यात होतात.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

प्रभाकर पेठकर's picture

25 May 2008 - 11:58 pm | प्रभाकर पेठकर

योग्य वाक्य!
८० की.मी. वेगाने गाडी चालवताना क्षणार्धात वाचता येइल अशीच वाक्य रचना हवी.

असहमत. मग नुसते मोट्या अक्षरात 'बोगदा' एवढेच लिहावे. ८० किमी वेगाने जाताना वाचण्यासाठी कमीतकमी शब्द असावेत.

मुळात 'बोगदा पुढे आहे' हा 'Tunnel Ahed' ह्या इंग्रजी सुचनेचे शब्दशः मराठी भाषांतर आहे. अनुवाद नाही.

'बोगदा पुढे आहे' ह्यातून 'उगीच इथे शोधू नका' असा अर्थ निघतो.
'पुढे बोगदा आहे' हा अनुवाद योग्य वाटतो. पुढे काय आहे? किंवा पुढे काय धोका आहे? हे सूचीत करणारे अर्थपूर्ण वाक्य होते, 'पुढे बोगदा आहे'.

हर्षद बर्वे's picture

26 May 2008 - 4:41 pm | हर्षद बर्वे

"बोगदा" १०० मीटर.. अशा प्रकार्चि पाटी असण्याची जास्त आवश्यकता आहे.त्यातून अनेक गोष्टी साध्य होतील.

१) बोगदा पूढे १०० ंमी. अंतरावर आहे हे चालकाला समजेल.म्हण्जे नक्की बोगदा कुठे आहे. हा संभ्रम राहणार नाही.

२)१०० मी. वर बोगदा असल्यामूळे चालक कितीही वेगात असला तरी त्याल वेग कमी करणे, आणि दिवस असल्यास हेड्लाईट्स चालू करणे इत्यादी गोष्टी करण्यास योग्य तेवढा अवधी मिळेल.

३)वेग्वेगळ्या तर्हेवाईक पाट्यां वाचण्याचा शौक असणार्या चालकांमूळे रस्त्यावरचे लक्ष जाउन होणारे संभाव्य अपघात टळतील.

:)

आपला...
हर्षद...

संजय अभ्यंकर's picture

27 May 2008 - 12:42 am | संजय अभ्यंकर

सहमत!

मुंबई - पुणे द्रुतमार्गावर याच प्रकारच्या पाट्या आहेत.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

निरंजन मालशे's picture

26 May 2008 - 5:24 pm | निरंजन मालशे

बोगदा आणि दादा कोंदके वाचुन वाटल की तु त्यांचा तो किस्सा सांगतोस.

"बोगदा" शब्दाला सेंसॉरने आक्षेप घेतला
दादा म्हणाले द्या पर्यायी शब्द पण ते शक्य झाल नाही आणि अर्थातच तो शब्द तसाच राहीला.