मोहितो... । व्हिस्की गाथा... । लिक्युर गाथा... । व्हाइट रशिअन... । झणझणीत मरीआइ...
'कॉकटेल लाउंज' मालिकेतील आजचे कॉकटेल आहे अनारीटा
पार्श्वभूमी:
आज रविवार, मागच्या विकांताला काम केल्यामुळे आज सुट्टी आहे. पण श्रावण असल्यामुळे घरी काही अभक्ष भक्षण करता येणार नव्हते. बायकोचा आदेश आहे "श्रावणात बाहेर काय शेण खायचे ते खा, घरात ही थेरं चालणार नाहीत" (फक्त खाण्याबद्दलच हो, नाहीतर तुम्हाला वाटायचे मजा आहे सोक्याची, पण तेवढे भाग्य नाही हो :( )
हे कॉकटेल प्यायल्यानंतर बायकोच्या चेहेर्यावर आनंद आणि नवर्याच्या कलेबद्दल दुणावलेला आदर दिसला (फक्त क्षणभरच :() म्हणुन श्रावणात कॉकटेल न टाकण्याचा पण मोडुन हे कॉकटेल टंकायला घेतले :)
आज सुट्टी त्यात पावसाने वातावरणही मस्त कुंद झाले होते. मग वातावरण आणखीन 'रोमॅन्टीक' करण्यासाठी मस्त लेडिज स्पेशल कॉकटेल करायचे ठरवले. बायकोने ह्यावेळेच्या शॉपिंगमधे डाळिंब आणि डाळिंबाचा ज्युसही आणला होता. मग एक्दम अनारीटा आठवली. :)
टकीला बेस्ड जगप्रसिद्ध कॉकटेल मार्गरीटा ह्या कॉकटेलला डाळिंबाचा ट्विस्ट देउन बनवलेली रेसिपी म्हणजेच आजचे कॉकटेल, अनारीटा.
डाळिंबाचा, लालचुटुक रंग ह्या कॉकटेलला मस्त रंगीत छटा देतो आणि विशीष्ठ चव ह्या कॉकटेलला चवदार बनवते.
कॉइंत्रु: ही एक ऑरेंज लिक्युर आहे, उच्च दर्जाची ट्रिपल सेक.
प्रकार: टकीला बेस्ड, कंटेम्प्ररी कॉकटेल, लेडीज स्पेशल
साहित्य:
टकीला – 1.5 औस (45 मिली)
कॉइंत्रु – 0.5 औस (15 मिली) (दुसरा पर्याय ट्रिपल सेक)
डाळिंबाचा ज्युस – 2 औस (60 मिली)
लिंबाचा रस – 5 मिली
बर्फ
डाळिंबाचे दाणे – पाव डाळिंबाचे
ग्लास: – मार्गारीटा किंवा कॉकटेल
कृती:
कॉकटेल ग्लासमधे बर्फाचे खडे टाकुन त्यात पाणी घालुन ठेवा. ह्यामुळे ग्लास चिल्ड आणि फ्रॉस्टी होइल.
कॉकटेल शेकर मधे डाळिंबाचे 2 चमचे दाणे घेउन ते मडलर ने मडल(चेचुन) करुन घ्या.
मडल करुन झाल्यावर डाळिंबाचा रस सुटा होइल आणि एक छान फ्लेवर आणि अरोमा येइल कॉकटेलला
आता कॉकटेल शेकर बर्फाने अर्धा भरून घ्या. त्यात अनुक्रमे टकीला, कॉइंत्रु, डाळिंबाचा ज्युस आणि लिंबाचा रस टाकुन व्यवस्थित शेक करुन घ्या. शेकरवर बाहेरुन बाष्प जमा झाले की कॉकटेल तयार झाले असे समजावे.
आता कॉकटेल ग्लासमधला बर्फ टाकुन द्या, ग्लास आता मस्त फ्रॉस्टी झाला आहे. त्यात आता 7-8 डाळिंबाचे दाणे टाका.
हे कॉकटेल बनवताना डाळिंबाचे दाणे मडल केले असल्यामुळे हे कॉकटेल 'डबल स्ट्रेन' (दोनदा गाळुन घेणे) करावे लागते. कॉकटेल शेकरच्या अंगच्याच स्ट्रेनर ने कॉकटेल मिक्सिंग ग्लास मधे गाळून घ्या. आता Hawthorne strainer वापरुन कॉकटेल ग्लास मधे गाळुन घ्या.
अनरीटा तयार आहे :)
नोट: सदर क़ॉकटेलची कल्पना 'द टल्लीहो बुक ऑफ क़ॉकटेल्स' वरून साभार.
प्रतिक्रिया
15 Aug 2011 - 12:16 am | माझीही शॅम्पेन
सोकजिराव कातील फोटो ! फॅंटॅस्टिक वर्णनं पार खापलो !!!
टकीला / टकीला बेस्ड काहीही म्हणजे आपला विक पॉइण्ट !
श्रावणातही तुम्ही धुदगुस घाला राव !!!
15 Aug 2011 - 12:18 am | इंटरनेटस्नेही
उत्तम! एकदम इम्प्रेसिव्ह!
-
इंट्या स्मिर्न ऑफ!
15 Aug 2011 - 10:15 am | माझीही शॅम्पेन
इंट्याराव ! तुम्ही तुमच्या गर्ल फ्रेंडला पहिल्यांदा हे कॉकटेल ओफर करणार अशी काहीशी प्रतिक्रिया दिली होती ( हो नक्कीच :) )
प्रतिक्रिया बदलली का हो ? इथे मिपावर मैत्रीण असते की काय वाचायला ? :)
16 Aug 2011 - 12:36 pm | सोत्रि
इंट्या,
गप्प का ? उत्तर मलाही ऐकायचे आहे ;)
- (मिपावर छुप्या आयडीने वावरत असलेली बायको असलेला) सोकाजी
15 Aug 2011 - 12:42 am | कुंदन
पुस्तकाचे नाव मस्त आहे "'द टल्लीहो बुक ऑफ क़ॉकटेल्स'"
15 Aug 2011 - 12:44 am | गणपा
वेळ साधुन या मादक अस्त्राचा वापर केल्या जाईल. :)
15 Aug 2011 - 12:48 am | श्रावण मोडक
वाचतोय... लक्ष आहे. हिशेब चुकता केला जाणार आहे. ;)
15 Aug 2011 - 11:13 am | साती
वाह,काय दिसतेय हे कॉकटेल.
जळ्ळे हे लिक्युर्स आमच्या गावात मिळणार नाहीत.
हैद्राबादेत कुठेसे मिळतात माहित्येयत का?
15 Aug 2011 - 3:10 pm | सोत्रि
साती,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
हैद्राबादेत लिक्युर्ससाठी हा दुवा चेक करा.
- (वाटाड्या) सोकाजी
15 Aug 2011 - 12:18 pm | चिंतामणी
असल्या मादक अस्त्राचा वापर करायचे बरे सुचते तुला.
बाकी फोटु एकदम कातील.
खल्लास.
15 Aug 2011 - 6:16 pm | सोत्रि
उत्तर व्यनितुन दिल्या गेले आहे :lol:
- (मादक अस्त्रधारी) सोकाजी
15 Aug 2011 - 6:30 pm | चिंतामणी
:D
15 Aug 2011 - 8:18 pm | श्रावण मोडक
मला व्यनि कसा मिळाला नाही? ;)
15 Aug 2011 - 9:50 pm | सोत्रि
श्रामो,
चिंकांचा प्रतिसादच असा होता की व्यनि करण्यावाचुन गत्यंतर नव्हते ;)
मादक अस्त्र का, केव्हा आणि कसे वापरावे हे चारचौघात कसे काय सांगणार :lol:
आता तुम्हाला तर हिशेब चुकता करायचा आहे असे म्हणता, मग कुठेतरी 'बसले' पाहिजे ना हिशेब चुकता करायला, मग त्या बैठकीचे ठरले की मिळेलच की तुम्हालापण व्यनि :)
- (मादक अस्त्र हिशेबाने वापरणारा हिशेबी) सोकाजी
15 Aug 2011 - 10:02 pm | श्रावण मोडक
कॉलिंग परा, धमु, छोडॉ, बिका!!!! चिंका इथं आहेतच. ;)
15 Aug 2011 - 12:29 pm | विलासराव
आजच पाहीले आहे. दिसतेय तर छानच.
15 Aug 2011 - 4:38 pm | आत्मशून्य
.
15 Aug 2011 - 6:08 pm | सोत्रि
ह्या टिंबांचा अर्थ संदर्भासहित स्पष्ट कराल काय ? ;)
- (लिंबु - टिंबु) सोकाजी
15 Aug 2011 - 6:16 pm | आत्मशून्य
पहीलं टिंब हे प्रतीसाद मोकळा सोडता येत नाही म्हणून अॅड केलयं. आणी शेवटची ३ टिंब ही सहीमधील आहेत. :)
15 Aug 2011 - 6:24 pm | सोत्रि
.
...
- (केदार शिंदेचा पंखा) सोकाजी
15 Aug 2011 - 9:15 pm | आत्मशून्य
;)
16 Aug 2011 - 10:40 am | ५० फक्त
मस्त मस्त एकदम छान,
सोकाजीराव, या कॉकटेलला समांतर मॉकटेल बद्दल लिहावे ही विनंती, अगदी ३ :१ या प्रमाणात देखिल चालेल.
16 Aug 2011 - 10:40 am | ५० फक्त
मस्त मस्त एकदम छान,
सोकाजीराव, या कॉकटेलला समांतर मॉकटेल बद्दल लिहावे ही विनंती, अगदी ३ :१ या प्रमाणात देखिल चालेल.
16 Aug 2011 - 12:52 pm | सोत्रि
विनंतीची नोंद घेण्यात आली आहे याची नोंद घेण्यात यावी. :lol:
- (दयाळु) सोकाजी
16 Aug 2011 - 11:13 am | शाहिर
पुन्हा एकद सोकाजिरावांच्या कॉकटेल ने धुड्गुस घातला आहे ..
अवांतर : आमचा श्रावन मोडल्याचा पाप तुमच्या खात्यात ..